Total Pageviews

Sunday, 5 June 2011

BABA RAMDEVA FAST EDITORIAL SAMANA

कॉंग्रेसच्यारावणलिलां’नी देशभरात संतापमध्यरात्री रामदेवबाबांचे आंदोलन चिरडले
शेम! शेम!! लोकशाहीची भयंकर कत्तल झाली
नवी दिल्ली, दि. (वृत्तसंस्था) - भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध योगगुरू स्वामी रामदेवबाबांनी छेडलेले शांततामय आंदोलन केंद्रातील कॉंग्रेस आघाडी सरकारने मध्यरात्री चिरडून टाकत लोकशाहीची भयंकर कत्तल केली. सरकारच्या इशार्‍यावरून रामलीला मैदानावर घुसलेल्या कॉंग्रेसच्या हजार पोलिसांनी अक्षरश: ‘रावणलीला’च घडवल्या. रामदेवबाबांसह गाढ झोपेत असलेल्या हजारो आंदोलकांवर पोलिसांनी राक्षसी हल्ला चढवला. अमानुष लाठीहल्ला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून पोलिसांनी आंदोलकांना पिटाळून लावले. लहान मुले, महिलांवरही भयानक अत्याचार केला. रामदेवबाबांची उचलबांगडी करून त्यांना हरिद्वारमध्ये नेऊन सोडले. ‘दिल्लीत पाय ठेवाल तर याद राखा!’ अशी नोटीसही त्यांना पोलिसांनी बजावली. पोलिसी बळाचा वापर करून रामदेवबाबांचे आंदोलन चिरडून टाकणार्‍या कॉंग्रेसविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली असून गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकारचा धिक्कार सुरू आहे.काळा पैसा ही राष्ट्रीय संपत्ती जाहीर करावी आणि भ्रष्टाचारी व्यक्तींनी विदेशी बँकांमध्ये जमा केलेले ४०० लाख कोटी रुपयांचे काळे धन देशात परत आणावे या इतर मागण्यांसाठी स्वामी योगगुरू रामदेवबाबांनी उपोषणाची घोषणा केल्यापासूनच केंद्र सरकारने घातपात करण्याचे प्रयत्न चालवले होते. मात्र सरकारचे लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असे रामदेवबाबांनी निक्षून सांगितल्यानंतर सरकारने मध्यरात्री उपोषणाच्या पेंडॉलमध्ये राखीव दलाच्या हजार जवानांची फौज घुसवली.घेरून घेरून मारले...
रामलीला मैदानावरील योग शिबिराची परवानगी रद्द करण्यात आली आहे. शिबिराच्या नावाखाली सुरू असलेला सत्याग्रह बेकायदा असून, सर्वांनी ताबडतोब रामलीला मैदान सोडून बाहेर पडावे, असे आदेश दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी दिले. मात्र काही क्षणातच पोलिसांनी चहुबाजूंनी आंदोलकांना घेरून घेरून लाठीचार्ज सुरू केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या गोंधळातच रामदेवबाबांनी २० फूट उंचीच्या मंचावरून उडी मारली. क्षणार्धात महिला अनुयायांनी रामदेवबाबांभोवती कडे केले. रामदेवबाबांसह मंडपात असलेल्या सर्व साधूसंतांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. फरफटत नेऊन त्यांना गाड्यांमध्ये कोंबले. एवढ्यात अश्रुधुराचे एक नळकांडे मंचावरच फुटले आणि व्यासपीठाला आग लागली. तब्बल तीन तास रामलीला मैदानावर पोलिसांचा राक्षसी अत्याचार सुरू होता. लहान मुले, महिला, वृद्धांचीही पोलिसांनी गय केली नाही. समोर जो दिसेल त्याला पोलीस गुराढोरांसारखे बडवत होते

उपवास
करून भ्रष्टाचार नष्ट होणार नाही. भ्रष्ट सरकारला खाली खेचून प्रामाणिक सरकार आणणे हाच त्यावर मार्ग आहे.
नुसते शंख फुंकून काय होणार?हिंदुस्थानात रोज असंख्य भूकबळी जात आहेत. कुपोषणाने बालके मृत्युमुखी पडत असताना आता वेगळी उपोषणे कशाला? उपोषणाने प्रश्‍न सुटणार असतील तर या देशातील पंचवीस टक्के जनता अर्धपोटी आणि उपाशीच असते, पण त्या उपासमारीची लाज आमच्या राज्यकर्त्यांना वाटत नाही. दिल्लीतील उपोषणकर्त्या बाबा-अण्णांपुढे मात्र सरकार गुडघे टेकते. हे राजकीय ढोंग आहे. अर्थात बाबा रामदेव यांनी सरकारी कृपेने सुरू केलेले उपोषण अखेर सरकारी दबंगशाहीनेच चिरडले आहे. शनिवारी मध्यरात्री दिल्लीचे हजारो पोलीस रामलीला मैदानात घुसले. त्यांनी रामदेवबाबांच्या समर्थकांना फरफटत बाहेर काढले. लाठीमार केला, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. बाबा रामदेव यांनाही दिल्ली पोलिसांनी अटक करून डेहराडूनमार्गे हरिद्वारला नेऊन सोडले. योग साधनेद्वारे आता बाबा रामदेव सरकारला कोणता शाप देणार? बाबांची तपस्या वगैरे पाहता ते मनमोहन सरकारचे भस्म करणार की कबुतर करणार हे आता पाहावे लागेल. रामदेवबाबा यांनी भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाचे हे चित्र आहे. एका योगी बाबाच्या विरोधात सरकारला शेवटी इतक्या प्रचंड बळाचा वापर का करावा लागला? आंदोलन काळ्या पैशांविरुद्ध होते. आंदोलन देशाला वाळवी लावून पोखरणार्‍या भ्रष्टाचाराविरुद्ध होते. प्रश्‍न इतकाच आहे की, सरकारला रामदेवबाबांचे आंदोलन नको होते तर त्यांनी रामलीला मैदानावर बाबा पोहोचण्याआधीच त्यांना थांबवायला हवे होते. सरकारने तसे केले नाही. उलट बाबा दिल्लीत पोहोचताच सरकारचे चार ज्येष्ठ मंत्री बाबांच्या स्वागताला गेले. त्यांनी बाबांच्या मागण्यांबाबत चार तास चर्चा केली. या चर्चेने म्हणे दोन्ही पक्षांचे समाधान झाले. तरीही उपोषणाला बसतो नंतर उपोषण सोडतो अशाप्रकारचे लेखी आश्‍वासन बाबांतर्फे देण्यात आले. हे पत्र दोन पक्षांतलागुप्त’ व्यवहार होता. तरीही सरकारतर्फे शनिवारी संध्याकाळी हे गोपनीय पत्र उघड करून बाबांना भंपक खोटे ठरविण्याचा प्रयत्न झाला. मॅच फिक्सिंगप्रमाणे बाबांचे उपोषणहीफिक्सिंग’ असल्याचे चित्र निर्माण केले. प्रसिद्धी माध्यमांनी हीमॅच फिक्सिंग’ दाखवल्यानंतर मध्यरात्री हजारो पोलीस उपोषणस्थळी घुसून त्यांनी आंदोलन अक्षरश: चिरडून टाकले. रामदेव बाबा स्वत:ला शूर सगळ्यात शहाणे समजत होते, पण तरीही कॉंग्रेसच्या कपटी राजकारणाने बाबांना नामोहरम केले. बाबांची पुरती बेअब्रू करून दडपशाही मार्गाने त्यांना बाहेर काढले. योगसाधना, शीर्षासन, कपालभाती वगैरे पोलिसी दंडुक्यांसमोर कुचकामी ठरले. अण्णा हजारे यांनी हा इशारा आधीच दिला होता. सरकार रामदेवबाबांना फसवेल, मूर्ख बनवेल. रामदेवबाबांनी अण्णांचे ऐकले असते तर त्यांच्यावर ही नामुष्कीची वेळ नक्कीच आली नसती. मुळात रामदेवबाबांना इतक्या तडकाफडकी उपोषणाचा निर्णय घेण्याची गरज होती काय? दीडेक महिन्यापूर्वी अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर दिल्लीत जाऊनच उपोषणाचे जंतरमंतर केले होते. हे जंतरमंतर यशस्वी झाले भ्रष्टाचार रोखू शकेल अशा जनलोकपाल बिलासंदर्भात सर्व मागण्या मान्य झाल्या. या आंदोलनात आपल्या खास विमानाने येऊन रामदेवबाबा हजर राहिले होते, पण बहुधा अण्णांना मिळालेले यश पाहून बाबांनाही लढण्याची इच्छा झाली सरकारनेही त्यांना वापरून घेतले. योगी रामदेवबाबांना सरकारी कपटनीतीचा सुगावा लागू शकला नाही रामलीला मैदानातील शानदार शामियान्यात बाबा त्यांचे हजारो समर्थक निद्रादेवीच्या अधीन झाले. त्याच अवस्थेत पोलिसांनी लाठीमार केला असेल तर तो डरपोकपणाचा कळस आहे. दिल्लीचे पोलीस आता कांगावा करीत आहेत की, बाबांनी मैदानाचा गैरवापर केला. रामदेवबाबा यांना रामलीला मैदानावर एका महिन्यासाठी योग शिबीर करण्याची परवानगी दिली होती. मात्र बाबांनी सरकारविरुद्ध उपोषण करून नियम मोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई केल्याचे दिल्ली पोलीस सांगतात. पोलीस खोटे बोलत आहेत. याच पोलिसांचे मंत्रिमंडळातलेबाप’ बाबांच्या मागेपुढे फिरत होते उपोषणापासून प्रवृत्त व्हावे म्हणून मनधरण्या करीत होते. उपोषणाची घोषणा तर बाबांनी आधीच केली होती आंदोलनाचे शंखही फुंकले होते. तेव्हा पोलीस कानात बोळे घालून झोपले होते काय? त्यांनी बाबांना मैदानात येऊ दिले. उपोषण सुरू झाल्यावर ठरल्याप्रमाणे गोपनीय पत्राचा स्फोट केला त्याच रात्री मैदानात घुसून उपोषण चिरडून टाकले. बाबांनी स्वत:ला महिला आणि वृद्धांच्या घेर्‍यात लपवले आणि पळण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारची बदनामी आता दिल्ली पोलिसांकडून केली जात आहे. शेवटी रामदेवबाबांना दिल्लीतील रावणांनी घायाळ केले आहे. राजकारण लढाया हा बाबांचा प्रांत नव्हता. तरीही ते राजकारणात पडले. स्वत:चा एक राजकीय पक्ष स्थापन केला. त्यांना देशाचे नेतृत्व करायचे होते. शेवटी सरकारने बाबांना घेरले फजिती केली. या फजितीस ते स्वत: जबाबदार आहेत. कॉंग्रेसवाले म्हणजे कोल्हा लांडग्यांची अवलाद आहेत. भ्रष्टाचार नष्ट व्हायलाच पाहिजे, पण तो शंख फुंकून आणि उपवास करून नष्ट होणार नाही. भ्रष्ट सरकारला खाली खेचून त्या जागी प्रामाणिक लोकांचे सरकार आणणे हाच त्यावर मार्ग आहे. जे इजिप्तमध्ये झाले, येमेनमध्ये झाले तसे घडविण्याची ताकद असलेले नेते जिवंत’ जनता असेल तरच काही घडेल. रामदेवबाबांनीयोग’ शिकवावेत, पण राजकारण करू नये अशा प्रकारची मुक्ताफळे आता कॉंग्रेसवाल्यांकडून उधळली जात आहेत. बाबांनी योग शिकवायचे की आणखी काय शिकवायचे हा त्यांचा प्रश्‍न आहे. विदेशी सोनिया गांधी कॉंग्रेसवाल्यांच्या राजकीय गुरुमाता होऊ शकतात त्या स्वतंत्र हिंदुस्थानवर राज्य करू शकतात, मग रामदेवबाबांनाही या देशाचे नागरिक म्हणून राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अर्थात उपोषणे किंवा अशा बैठ्या आंदोलनाने देशातील कोणतेही प्रश्‍न मार्गी लागणार नाहीत. असल्या आंदोलनावर आमचा विश्‍वासही नाही. धक्के देऊन राज्यकर्त्यांना खाली खेचणारे आंदोलनच देश वाचवू शकेल. बाबा रामदेव यांच्या व्यासपीठासमोरगाणी’ म्हणणारे, टाळ्या वाजवून भजने म्हणणारे हात हे मजबूत मनगटांची हत्यारे बनतील तेव्हाच आंदोलनाचा भडका उडून त्यात कॉंग्रेसवाल्यांच्या खुर्च्या भस्मसात होतील. रामदेवबाबा यांच्या अंगावर भगवी वस्त्रं असल्यानेच सरकारने त्यांच्यावर कारवाई केली. एखादा इमाम, मुल्ला किंवा पाद्रा मिशनरी अशाप्रकारे आंदोलनास बसला असता तर त्याच्यावर पोलिसांनी असा हल्ला केला असता काय? याचा जाब सरकारला द्यावा लागेल

No comments:

Post a Comment