Total Pageviews

Friday, 3 June 2011

95000 YOUTH HIV POSITVE IN INDIA

INDIA IN ANOTHER FIRST LIST
संयुक्त राष्ट्रसंघ - संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार भारतात 95 हजार तरुण "एचआयव्ही'ग्रस्त असून, सर्वांत जास्त तरुण "एचआयव्ही'ग्रस्त असलेल्या सहारा उपखंडातील देशांच्या पंक्तीत भारत जाऊन बसला आहे.

देशात 10 ते 19 वयोगटातील 46 हजार मुली व तरुणी आणि 49 हजार मुलगे व तरुण "एचआयव्ही'ग्रस्त आहेत. सर्वांत जास्त एचआयव्ही संसर्ग झालेले तरुण असलेल्या देशांच्या यादीत भारत 2009 मध्ये दहाव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका या यादीत पहिल्या क्रमांकावर असून, आफ्रिकेत 2 लाख 10 हजार तरुणी आणि 82 हजार तरुणांना संसर्ग झालेला आहे. नायजेरिया यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून, 1 लाख 80 हजार तरुणी आणि 1 लाख तरुणांना संसर्ग झालेला असून, केनिया तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

काल जाहीर करण्यात आलेला या अहवालात सगळ्यात जास्त संसर्ग झालेले तरुण सहारा उपखंडातील देशांत असून, यात महिलांची संख्या जास्त आहे. बऱ्याच तरुणांना ते "एचआयव्ही'ग्रस्त असल्याची माहिती नाही. बाधित तरुणींचे प्रमाण जगभरात 60 टक्के आहे. भारतात ही संख्या वाढण्याचे प्रमुख कारण वेश्‍याव्यवसाय हे असून, 4.9 टक्के वेश्‍या या "एचआयव्ही'ग्रस्त आहेत. लैंगिक शिक्षणामुळे भारतातील स्थितीत सुधारणा होत आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment