Total Pageviews

Monday 20 June 2011

70 ROUNDS OF POLICE WEAPON STOLEN

ठाण्यातील बिल्डर गणेश वाघ यांचा पोलीस अंगरक्षक श्रीकांत वानखेडकर यांची टोपी आणि कार्बाइनमधील ७० जिवंत काडतुसे अज्ञात चोराने पळविल्याची घटना उघडकीस आली आहे . हा सुरक्षारक्षक काडतुसे गाडीत ठेवून रिकामीच कार्बाइन घेऊन फिरत होता . या हलगर्जीपणामुळे या पोलीस अंगरक्षकाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे .

वानखेडकर यांना एक कार्बाइन आणि नऊ एमएमच्या ७० जिवंत काडतुसांसह गणेश वाघ यांचे अंगरक्षक म्हणून ड्यूटी देण्यात आली होती . या कार्बाइनमध्ये काडतुसांचे १५ राऊंड लोड करणे आवश्यक होते . तसेच , उर्वरित काडतुसे कमरेच्या पट्ट्याला अडकविणे अपेक्षित होते . मात्र वानखेडकर यांनी सर्व म्हणजे ७० काडतुसे वाघ यांच्या गाडीतच ठेवली होती . तसेच रिकामी कार्बाइन घेऊन ते वाघ यांच्या सोबत बँकेत गेले होते . त्याच वेळी गाडीत ठेवलेली काडतुसे आणि वानखेडकर यांची पोलीस टोपी अज्ञात चोराने लांबविली होती . या प्रकरणी वानखेडेकर यांच्या विरोधात नौपाडा पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता .

डीसीपी डॉ . एस . टी . राठोड यांनी केलेल्या सखोल चौकशीअंती वानखेडेकर यांच्या हलगर्जीपणा निष्पन्न झाला आहे . वाघ यांच्यावर त्या वेळी जर कुणी हल्ला केला असता तर पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर टीकेची झोड उठली असती . त्यामुळे वानखेडेकर यांच्यावर बेजबाबदार वर्तणूक केल्याचा ठपका ठेवत त्याना पोलीस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश एस . टी . राठोड यांनी दिले आहेत .

No comments:

Post a Comment