Total Pageviews

Tuesday, 26 April 2011

SURESH KALMADI VS ANNA HAJARE -खासदारांची सरासरी मालमत्ता ५ कोटी

२००९ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांची सरासरी मालमत्ता कोटी ३३ लाख झाली
SURESH KALMADI VS ANNA HAJARE -INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 90
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/सहा
वर्षे खासदार सरकारी जावई होतो खासदारांची चैन असते, . खासदारांपाठोपाठ महाराष्ट्रातील आमदारांनी घसघशीत वेतनवाढ घेतली. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात निवृत्त आमदारांचे पेन्शनही वाढले. निधी वाटपातील असमानतेमुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी एकमेकांच्या उरावर बसले होते. आपल्याला वेगळा विकास निधी देण्याच्या मागण्या केल्या जात होत्या. त्या पार्श्वभूमीवर एक माजी खासदार आपल्या ब्लॉगवर करीत असलेले आत्मचिंतन अन्य लोकप्रतिनिधींनाही प्रेरणादायी ठरणारे आहे.

खासदाराला मिळणारे १६ हजार वेतन, कार्यालयीन खर्च मतदारसंघ भत्त्यापोटी दिले जाणारे प्रत्येकी २० हजार रुपये, मोटार खरेदी करण्याकरिता पैसे, इंधनाचा खर्च, मोफत वीज आणि फनिर्चर, बगिच्यातील झाडे, माळी मुबलक पाणी, घरातील पडदे, सोफा कव्हर धुण्याचा खर्च असे अनेक भत्ते सुविधा खासदारांना मिळत असल्याने त्यांना खिशात हात घालावाच लागत नाही. मात्र एका भत्त्याचे नंदी यांना नेहमी अतीव आश्चर्य वाटत आले. प्रत्येक खासदाराला संसदेचे अधिवेशन सुरू असताना संसदेत जाण्याकरिता एक हजार रुपयांचा भत्ता दिला जातो. ज्या कामाकरिता लोकांनी खासदाराला निवडून दिले आहे त्या कामाकरिता भत्ता कशाला हवा, असा सवाल नंदी यांनी केला आहे. नंदी यांच्या आत्मचिंतनाने हेही स्पष्ट झाले की, संसदेत गदारोळ करून सभागृह बंद पाडणारे गोंधळी खासदार हे कृत्य करण्याकरिता दररोज एक हजार रुपये खिशात घालतात.

राज्यसभा हे समाजातील जे घटक निवडणुकीच्या साठमारीत टिकून राहू शकत नाही अशा कला, साहित्य, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवरांचे सभागृह. परंतु या राज्यसभेवर सध्या धनदांडग्यांनी कब्जा केला आहे, असे नंदी म्हणतात. राज्यसभेच्या नवीन ५४ सदस्यांपैकी ४३ गब्बर पैसेवाले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीच्यावेळी संसद सदस्य असलेल्यांची सरासरी मालमत्ता कोटी ८६ लाख होती. २००९ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांची सरासरी मालमत्ता कोटी ३३ लाख झाली आहे. पाच वर्षांत २०० टक्क्यांनी झालेली मालमत्तेतील ही वाढ थक्क करणारी असल्याचा साक्षात्कार नंदी यांना झाला आहे.

काँग्रेसचे दहापैकी सात खासदार कोट्यधीश आहेत तर भाजपचे पाच खासदार कोट्यधीश आहेत. डीएमके, एनसीपी, बीएसपी, टीआरएस, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पाटीर्, नॅशनल कॉन्फरन्स आणि शिवसेना अशा सर्वच पक्षांमधील खासदार कोट्यधीश आहेत. सीपीएम आणि तृणमूल या पश्चिम बंगालमधील दोन पक्षांमध्ये मात्र कोट्यधीश खासदार अभावाने आढळतात. लोकसभेतील १५० खासदारांवर गुन्हे असून त्यापैकी ७३ जणांवर खून, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे आहेत, याबद्दल नंदी यांनी खंत प्रकट केली आहे.

No comments:

Post a Comment