INDIA AGAINST CORRUPTION STORY 47
आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी, ‘होय सचिनला भारतरत्न दिले जावे अशी शिफारस आम्ही जरूर करू’, असे जाहीर करून टाकले. आणि पाठोपाठ भाजपाचे एक प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनीही ‘हां, सचिन को भारतरत्न जरूर मिलना चाहिये’, असे सांगत आपणही काँग्रेसपेक्षा कमी अपरिपक्व नाही, हे दाखवून दिले. काही नी तर सचिनने राजकारणात यावे आणि भ्रष्टाचाराचा सफाया करावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. देवाच्या डोक्यावर हात ठेवून भक्ताने त्यालाच भस्म करून टाकावे, तसला हा प्रकार झाला. सचिन आणि त्याच्या सहकाऱ्यांना ते विश्वचषकात खेळत असल्याबद्दल रग्गड मानधन मिळते. त्यांची कामगिरी चांगली झाली तर त्यांना बक्षीस देण्यासाठी क्रिकेट संघटनेकडेही अमाप पैसा आहे. तरीही या खेळाडूंना राज्य सरकारांकडून कोटींची बक्षिसे अणि मोफत प्रवासाच्या सवलती आणि काय काय दिले जाते. आधी म्हटल्याप्रमाने ते अर्थातच सरकारी पैशातून असते, खरे तर आपले सगळेच राजकारणी आणि मंत्री-संत्री त्यांच्या त्यांच्या गावचे-परिसराचे राजे असतात, परंतु अशा एखाद्या राजाने, आपल्या स्वत:च्या खिशात हात घालून खेळाडूंना काही तरी दिल्याचे कधी ऐकले-वाचले आहे का कोणी?
एकदा सचिनचं भारतरत्नचं करून टाकलं की झालं आठवडय़ात क्रिकेट विश्वचषकाचा न संपणारा आनंदसोहळा पाहात असताना असे वाट्ले की आता भारताला साध्य करण्यासारखं जगात काहीच राहिलेलं नाही. ते एकदा सचिनचं भारतरत्नचं करून टाकलं की झालं.. अशा भावनेनं सारा देशच भारावलेला होता. लहानथोर सगळेच कानात वारं गेल्यासारखं करत होते. एरवी सोनिया गांधी तशा स्वत:चा आब राखून असतात, पण विश्वचषक जिंकला आणि त्यांनाही इतरांसारखं वागावंसं वाटलं. उघडय़ा गाडीतून तिरंगा घेऊन दिल्लीच्या रस्त्यावरनं त्या भटकून आल्या. पंतप्रधान सिंग, ‘भावी’ पंतप्रधान राहुल गांधी, यांच्यापासून ते गल्लीतल्या नगरसेवकांपर्यंत सगळय़ांत जणू चढाओढच लागली होती. देश महासत्ता बनल्याची खात्रीच पटली ते पाहून.
पण मुळात जेमतेम दहा देशांतल्या खेळातल्या विजेत्याला विश्वविजेता मानावं का, हा पहिला प्रश्न. तो विचारणं या क्षणी पाप आहे याची जाणीव आहे, तरीही तो विचारायलाच हवा. देशानं आता एवढय़ातल्या एवढय़ात विश्वनाथन आनंदसारखा खराखुरा जगज्जेता पाहिलेला आहे. तो जेव्हा दुसऱ्यांदा विश्वविजेता बनून आला तेव्हा त्याच्या स्वागतालासुद्धा विमानतळावर कोणी गेलं नाही. याचं कारण साधं आहे. कोणतीही बहुराष्ट्रीय कंपनी विश्वनाथन आनंद याची पुरस्कर्ती नाही.. त्यामुळे टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात जाहिराती नाहीत. त्या नाहीत म्हणून त्याच्या बाबत हवाच नाही. म्हणजे तो कोणाच्या उत्पादनांची जाहिरात करत नसल्यानं त्याच्या यशाची उंचीच आपल्याला कळणार नाही. म्हणजे आपण काय कळून घ्यावं याचा निर्णय या कंपन्या करणार.. बाजारपेठीय शक्तींच्या हाती आपण काय काय देणार.
आता विश्वचषक जिंकल्यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या हाताला कसा जादुईस्पर्श आहे.. तो हात लावेल त्याचं सोनं कसं करतो.. झहीर खानच्या गोलंदाजीत कशी जादू आहे.. यावर रकानेच्या रकाने लिहिले गेले आणि टीव्हीवरनं या सगळय़ांच्या आरत्याच ओवाळणं बाकी होतं. पण याच महेंद्रसिंग धोनी याच्या घरावर २००७ सालच्या विश्वचषक स्पर्धेतल्या पराभवानंतर आपल्याच लोकांनी दगडफेक केली होती. त्याच्या आईवडिलांना जीव मुठीत धरून राहावं लागत होतं. झहीर खान याच्या हॉटेलचं नुकसान केलं होतं. आता तोच धोनी आणि तेच आपण तो मॅनेजमेंट गुरू म्हणून कसा उत्तम आहे, याचे गोडवे गातोय. पाचेक वर्षांपूर्वी आपलं रेल्वे खातं चांगलं चालविल्या बद्द्ल लालुप्रसाद यादव हेसुद्धा असेच मॅनेजमेंट गुरू वगैरे झाले होते. भाषणही द्यायला जायचे ते वेगवेगळय़ा मॅनेजमेंट कॉलेजांतून. नंतर ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्या आणि त्यांनी सांगून टाकलं लालूंनी रेल्वेची कशी वाट लावलीये ते. सर्वोच्च न्यायालय आपल्याला सांगतं की, देशात गरिबांची संख्या दाखवली जाते त्यापेक्षा अधिक आहे आणि दिवसाला फक्त १२ रुपये एवढा मोबदलाही त्यांना मिळू शकत नाही. त्याच वेळी हेच सरकार अब्जावधी रुपयांचा दौलतजादा क्रिकेटपटूंवर करतं, तेव्हा त्याचं समर्थन असं काय करायचं? देशातल्या प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी गमावून बसणाऱ्या अनेकांना सरकारकडून जमिनीच्या तुकडय़ाची देण्यात आलेली आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत. अनेक जवानांच्या विधवा पत्नी, वृद्ध पालक त्यांना जाहीर झालेल्या जमिनीच्या, पेट्रोलपंपांच्या प्रतीक्षेत आहेत. अशा वेळी या क्रिकेटपटूंना भूखंडच्या भूखंड देण्याच्या सरकारांच्या घोषणेचं काय करायचं? आणि सरकारच्या म्हणण्यानुसार हे क्रिकेटपटू देशासाठी खेळत नाहीत, तर बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया या कंपनी कायद्यानं नोंदणीकृत असलेल्या कंपनीसाठी खेळतात. त्यात असं सगळय़ांनीच वाहून जात राहणं देश म्हणून कितपत योग्य?
जेव्हा या राजवटीला तडे जायला लागले आणि एकेक वीट ढासळू लागली त्यावेळी राजानं काय केलं? तर गावोगाव आयपीएल सर्कशीचे खेळ लावले आणि लोकांना आमंत्रणं दिली. बघा. ही सर्कस बघून मनोरंजन करून घ्या. पण दु:ख करू नका.गेल्या
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS
MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/ ---
तर ‘सचिनला आता देशाचा राष्ट्रपती करावे’ अशीच थेट मागणी केली असतीसचिन तेंडुलकर नामक देवाला भारतरत्न मिळालेच पाहिजे, असे ठासून सांगणाऱ्या भक्तांचा जत्था सध्या सर्वत्र हिंडतो आहे. त्या आधी म्हणजे अगदीच अलिकडे अलीकडे, चार वर्षांपूर्वी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची मागणी त्यांच्या भक्तांनी केली होती आणि आता अण्णा हजारेंनी दिल्ली काबीज केल्यावर त्यांनाही भारतरत्न द्यावे अशी मागणी त्यांची भक्तमंडळी करू लागली आहेत. आता पुरस्कार तर एवढे झाले आहेत की, ‘गल्लीरत्न’पासून तर ‘दिल्लीरत्न’पर्यंत कोणताही पुरस्कार मिळणे, मिळविणे तसे काही फार अवघड राहिलेले नाही. या सगळ्याच पुरस्कारांच्या निवड समित्याही असतात, म्हणजे रत्नपारख्यांची संख्यासुद्धा भरपूर झाली आहे. सचिनचे शंभरावे शतक झाले नाही हे नशीबच म्हटले पाहिजे. विश्वचषकावर कब्जा आणि सचिनचे शंभरावे शतक असा सुवर्णयोग जर जुळून आला असता, तर कदाचित भक्तांनी ‘सचिनला आता देशाचा राष्ट्रपती करावे’ अशीच थेट मागणी केली असती. सचिन महान खेळाडू आहे, त्याची खेळाप्रती असलेली निष्ठा अजोड आहे आणि एक माणूस म्हणूनही तो तेवढाच चांगला आहे. सगळे कबूल. सगळे मान्य आहे, परंतु भारतरत्न? क्रिकेट सामन्याचे समालोचन करणारे अनेकदा बोलण्याच्या ओघात, हा खेळ किती महान आहे वगैरे सांगत असतात, तो त्यांच्या व्यवसायाचा एक भाग आहे. एखादी चित्तथरारक लढत जिकंल्यावर क्रीडा समीक्षक त्याच्या स्तंभात काल सचिन देवासारखा धावून आला वगैरे लिहित असतात. ‘देवासारखा’ या शब्दातला ‘सारखा’ हा शब्द ज्यांना कळत नाही त्या लोकांच्या बुद्धीची कीव तरी का आणि किती करावी? असे समीक्षक त्या क्षणी सचिनला देव म्हणतात, भारतीय संघाने पाकिस्तानला हरविले त्याचा आणि त्यात सचिनच्या धावांचा वाटा मोठा होता याचा, त्याच्या भक्तांना कैफ चढला. आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी, ‘होय सचिनला भारतरत्न दिले जावे अशी शिफारस आम्ही जरूर करू’, असे जाहीर करून टाकले. आणि पाठोपाठ भाजपाचे एक प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनीही ‘हां, सचिन को भारतरत्न जरूर मिलना चाहिये’, असे सांगत आपणही काँग्रेसपेक्षा कमी अपरिपक्व नाही, हे दाखवून दिले. काही नी तर सचिनने राजकारणात यावे आणि भ्रष्टाचाराचा सफाया करावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. देवाच्या डोक्यावर हात ठेवून भक्ताने त्यालाच भस्म करून टाकावे, तसला हा प्रकार झाला. सचिन आणि त्याच्या सहकाऱ्यांना ते विश्वचषकात खेळत असल्याबद्दल रग्गड मानधन मिळते. त्यांची कामगिरी चांगली झाली तर त्यांना बक्षीस देण्यासाठी क्रिकेट संघटनेकडेही अमाप पैसा आहे. तरीही या खेळाडूंना राज्य सरकारांकडून कोटींची बक्षिसे अणि मोफत प्रवासाच्या सवलती आणि काय काय दिले जाते. आधी म्हटल्याप्रमाने ते अर्थातच सरकारी पैशातून असते, खरे तर आपले सगळेच राजकारणी आणि मंत्री-संत्री त्यांच्या त्यांच्या गावचे-परिसराचे राजे असतात, परंतु अशा एखाद्या राजाने, आपल्या स्वत:च्या खिशात हात घालून खेळाडूंना काही तरी दिल्याचे कधी ऐकले-वाचले आहे का कोणी?
एकदा सचिनचं भारतरत्नचं करून टाकलं की झालं आठवडय़ात क्रिकेट विश्वचषकाचा न संपणारा आनंदसोहळा पाहात असताना असे वाट्ले की आता भारताला साध्य करण्यासारखं जगात काहीच राहिलेलं नाही. ते एकदा सचिनचं भारतरत्नचं करून टाकलं की झालं.. अशा भावनेनं सारा देशच भारावलेला होता. लहानथोर सगळेच कानात वारं गेल्यासारखं करत होते. एरवी सोनिया गांधी तशा स्वत:चा आब राखून असतात, पण विश्वचषक जिंकला आणि त्यांनाही इतरांसारखं वागावंसं वाटलं. उघडय़ा गाडीतून तिरंगा घेऊन दिल्लीच्या रस्त्यावरनं त्या भटकून आल्या. पंतप्रधान सिंग, ‘भावी’ पंतप्रधान राहुल गांधी, यांच्यापासून ते गल्लीतल्या नगरसेवकांपर्यंत सगळय़ांत जणू चढाओढच लागली होती. देश महासत्ता बनल्याची खात्रीच पटली ते पाहून.
पण मुळात जेमतेम दहा देशांतल्या खेळातल्या विजेत्याला विश्वविजेता मानावं का, हा पहिला प्रश्न. तो विचारणं या क्षणी पाप आहे याची जाणीव आहे, तरीही तो विचारायलाच हवा. देशानं आता एवढय़ातल्या एवढय़ात विश्वनाथन आनंदसारखा खराखुरा जगज्जेता पाहिलेला आहे. तो जेव्हा दुसऱ्यांदा विश्वविजेता बनून आला तेव्हा त्याच्या स्वागतालासुद्धा विमानतळावर कोणी गेलं नाही. याचं कारण साधं आहे. कोणतीही बहुराष्ट्रीय कंपनी विश्वनाथन आनंद याची पुरस्कर्ती नाही.. त्यामुळे टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात जाहिराती नाहीत. त्या नाहीत म्हणून त्याच्या बाबत हवाच नाही. म्हणजे तो कोणाच्या उत्पादनांची जाहिरात करत नसल्यानं त्याच्या यशाची उंचीच आपल्याला कळणार नाही. म्हणजे आपण काय कळून घ्यावं याचा निर्णय या कंपन्या करणार.. बाजारपेठीय शक्तींच्या हाती आपण काय काय देणार.
आता विश्वचषक जिंकल्यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या हाताला कसा जादुईस्पर्श आहे.. तो हात लावेल त्याचं सोनं कसं करतो.. झहीर खानच्या गोलंदाजीत कशी जादू आहे.. यावर रकानेच्या रकाने लिहिले गेले आणि टीव्हीवरनं या सगळय़ांच्या आरत्याच ओवाळणं बाकी होतं. पण याच महेंद्रसिंग धोनी याच्या घरावर २००७ सालच्या विश्वचषक स्पर्धेतल्या पराभवानंतर आपल्याच लोकांनी दगडफेक केली होती. त्याच्या आईवडिलांना जीव मुठीत धरून राहावं लागत होतं. झहीर खान याच्या हॉटेलचं नुकसान केलं होतं. आता तोच धोनी आणि तेच आपण तो मॅनेजमेंट गुरू म्हणून कसा उत्तम आहे, याचे गोडवे गातोय. पाचेक वर्षांपूर्वी आपलं रेल्वे खातं चांगलं चालविल्या बद्द्ल लालुप्रसाद यादव हेसुद्धा असेच मॅनेजमेंट गुरू वगैरे झाले होते. भाषणही द्यायला जायचे ते वेगवेगळय़ा मॅनेजमेंट कॉलेजांतून. नंतर ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्या आणि त्यांनी सांगून टाकलं लालूंनी रेल्वेची कशी वाट लावलीये ते. सर्वोच्च न्यायालय आपल्याला सांगतं की, देशात गरिबांची संख्या दाखवली जाते त्यापेक्षा अधिक आहे आणि दिवसाला फक्त १२ रुपये एवढा मोबदलाही त्यांना मिळू शकत नाही. त्याच वेळी हेच सरकार अब्जावधी रुपयांचा दौलतजादा क्रिकेटपटूंवर करतं, तेव्हा त्याचं समर्थन असं काय करायचं? देशातल्या प्रकल्पांसाठी आपल्या जमिनी गमावून बसणाऱ्या अनेकांना सरकारकडून जमिनीच्या तुकडय़ाची देण्यात आलेली आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत. अनेक जवानांच्या विधवा पत्नी, वृद्ध पालक त्यांना जाहीर झालेल्या जमिनीच्या, पेट्रोलपंपांच्या प्रतीक्षेत आहेत. अशा वेळी या क्रिकेटपटूंना भूखंडच्या भूखंड देण्याच्या सरकारांच्या घोषणेचं काय करायचं? आणि सरकारच्या म्हणण्यानुसार हे क्रिकेटपटू देशासाठी खेळत नाहीत, तर बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया या कंपनी कायद्यानं नोंदणीकृत असलेल्या कंपनीसाठी खेळतात. त्यात असं सगळय़ांनीच वाहून जात राहणं देश म्हणून कितपत योग्य?
जेव्हा या राजवटीला तडे जायला लागले आणि एकेक वीट ढासळू लागली त्यावेळी राजानं काय केलं? तर गावोगाव आयपीएल सर्कशीचे खेळ लावले आणि लोकांना आमंत्रणं दिली. बघा. ही सर्कस बघून मनोरंजन करून घ्या. पण दु:ख करू नका.गेल्या
No comments:
Post a Comment