Total Pageviews

Sunday, 24 April 2011

आयुष्यात बरेच शॉर्टकट्स मीही मारलेत...गाडी पळवली म्हणून दिलेली चिरीमिरी

................

एक विझलेली मेणबत्ती

नाहीतरी... र्वल्ड कप संपलाय..

वर्षाअखेरीची धावपळही

आणि मुलांच्या परीक्षाही..

आयपीएल तर संध्याकाळी

थोडा वेळ आहे तळव्यावर..

मलाही वाटलं तेव्हा मग

' सो कोल्ड' भ्रष्टाचाराविरोधात

एखादी मेणबत्ती पेटवून..

उभं राहावं.. एका कळपात..

आणि...

माहितीचा अधिकार... लोकपाल..

असं पुटपुटावं काहीबाही..

पण खोटं का बोलू...

आयुष्यात बरेच शॉर्टकट्स

मीही मारलेत...

परवा पिवळा लाइट असताना

गाडी पळवली म्हणून दिलेली चिरीमिरी..

पैशाची निकड भागवताना..

बिलाची फाइल पास व्हावी

म्हणून केलेली हुशारी..

क्वचित कधीतरी

तिकीटं काढताना...

रांगेत केलेली घुसखोरी..

' जिंदाबाद' करायला

आवळलेल्या मुठी उघडल्या..

माझे तळवे बरबटलेले नव्हते जरी

मळलेले तरी होतेच ना!

तुम्ही म्हणाल..

त्यात काय...!!

' देर आये दुरुस्त आये'..

पण छे हो.. कसंच काय?

दहावी झाल्यावर मुलांची...

कदाचित इंजिनीअरींग-मेडिकलची

' तश्शी' पे-सीट घ्यावी लागेल..

त्यासाठी मी जमवतेय नं पैसे...

पण... मला सांगा..

तुम्ही आहात का हो..

अगदी धुतल्या तांदळाचे??

त्याच काय्ये,

विझलेली ही मेणबत्ती

तुमच्या हाती देईन म्हणते..!!

- अनुराधा म्हापणकर

वादळ असेच घोंघावत राहो..

भ्रष्ट संस्कृतीचा, संपेल आता पाढा

लोकपाल विधयेकासाठी, अण्णांचा लढा।।

पेटून उठल्या चारी दिशा, धरती, अन् आभाळ

भ्रष्टाचाऱ्यांनी आवरावे आता, चंबुगबाळं।।

दीन-जन आता, अश्ाू नाही ढाळणार

जनतेचा मालकी हक्क, जनतेला मिळणार।।

टाकलेले पुढचे पाऊल, मागे नाही घ्यायचे

रामराज्य पुढच्या पिढीला, आपणच दाखवायचे।।

जनएकतेचे वादळ, असेच घोंघावत राहो

लोकशाही भारताची, चिरंजीव होवो।।

प्रशांत कुलकणीर्, अहमदनगर

No comments:

Post a Comment