Total Pageviews

Friday, 8 April 2011

ANNA HAZARE FAST UPTO DEATH AGAINST CORRUPTION STORY 36

 
ANNA HAZARE FAST UPTO DEATH AGAINST CORRUPTION STORY 36
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TOAS
MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/
हसन अली खान एक गूढ: ३५ हजार कोटी रुपयांची संपत्ती विदेशात की निष्पाप ?व्हॉट
हेल इज गोईंग ऑन इन धिस कंट्री?’ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी एका जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी नुकताच असा उद्विग्न असा सवाल केला. त्याला कारणीभूत ठरली ,संपूर्ण देशासाठीच गूढ बनून राहिलेली एक व्यक्ती- हसनअली खान . स्वत:चे रेसचे अव्वल दर्जाचे घोडे, घोडय़ावर पैसे लावणे आणि देशभरातील रेसमॅनेज करून बक्कळ पैसा कमविणे हा त्याचा धंदा. हा झाला त्याच्याकडून दाखवला जाणारा व्यवसाय. पण त्याच्याही पलीकडे त्याची ओळख असल्याचे यंत्रणांचे म्हणणे आहे. त्यानुसार खान याची तब्बल ३५ हजार कोटी रुपयांची संपत्ती विदेशातील खात्यांमध्ये जमा असून, त्यावर त्याने प्राप्तिकर भरलेला नाही, असा आरोप त्याच्यावर आहे. प्राप्तिकर विभागाने चार वर्षांपूर्वी त्याच्या पुणे, मुंबई, हैदराबाद येथील घरांवर छापे टाकून त्याच्याकडील कागदपत्रे, बँक खात्यांचे तपशील, लॅपटॉप ताब्यात घेऊन त्याच्या हिशेबी-बेहिशेबी संपत्तीची माहिती घेतली होती. त्यावरून प्राप्तिकर विभागानेअपरेजल रिपोर्ट तयार करून तो तपासासाठी पुढे पाठविण्यात आला होता. तरीसुद्धाएन्फोर्समेन्ट डिरेक्टोरेटने (ईडी) त्याला साधी अटकही केली नाही. त्यामुळे हे प्रकरण चार वर्षे रेंगाळत राहिले. या पाश्र्वभूमीवर याबाबत ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने आपली उद्विग्न प्रतिक्रिया दिली. ‘हसनअली याला अटक करून त्याच्याकडे चौकशी करा, नाहीतर न्यायालयच हा तपास हातात घेईल,’ असा निर्वाणीचा इशाराही दिला. त्यानंतर .डी.कडून त्याला येत्या १० तारखेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स देण्यात आले. एकीकडे त्याच्या नावावर ३५ हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे आणि त्याने हजारो कोटी रुपयांचा प्राप्तिकर बुडवल्याचा आरोप आहे. त्यावरचा दंड, वगैरे धरून आता तो ५० हजार कोटी रुपयांचा कर देणे लागतो, असे सांगितले जाते. पण त्याच वेळी त्याची परदेशात कोणतीही खाती नसल्याचे सांगितले जाते.नेमके खरे काय आणि खोटे काय, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे.एन्फोर्समेन्ट डिरेक्टोरेटने (ईडी) १० तारखेला एक कम्जोर खटला भरला, त्यामुळॆ त्याची लगेच सुटका झाली. .
हैदराबादच्या नवाब घराण्याशी जवळचा संबंध असलेली हसन अली खान ही व्यक्ती सध्या आपल्या देशातील एक गूढ बनून राहिलेली आहे. हैदराबादच्या हसन अलीचे वडील उत्पादन शुल्क खात्यात निरीक्षक होते. परंतु १९८२ च्या सुमारास लक्षाधीश असलेली ही फॅमिली आता या देशातील अब्जाधीश म्हणून ओळखली जात आहे . निजामाचा हसन अली नावाचा हा वंशज सुरुवातीला पुराण वस्तूंची विक्री करीत होता. त्यानंतर तो आखाती देशात तांदूळ, कांदा आदी वस्तूंची निर्यात करू लागला. तेथून त्याचे दुबईतील एका शस्त्रास्त्र दलालाशी संबंध आले. काही काळ दाऊद इब्राहिम कासकरही दुबईतच होता. मुंबईत १९९३ साली बॉम्बस्फोट घडविल्यानंतर तो पाकिस्तानात पळाला, परंतु तत्पूर्वी हसन अली दाऊद दुबईतच भेटायचे . हसन अली हा दाऊदमुळेच मोठा झाला असावा. दाऊद हा मुंबई क्राइम ब्रँचच्या हवालदाराचा मुलगा, तर हसन अली हा एक्साईजच्या इन्स्पेक्टरचा पुत्र! ही जोडी शस्त्रांच्या तस्करीतूनच मालामाल झाली.हसन अलीला राजकारण्यांनीच मोठा केला ?
दाऊदची पाकिस्तानात अब्जावधीची प्रॉपर्टी आहे, तर हसन अलीची हैदराबाद, पुणे, मुंबई, दुबई आदी भागांत मोक्याच्या ठिकाणी मालमत्ता आहे. हसन अलीचे कोट्यवधी रुपये (अब्ज डॉलर) स्वीस बँकेत जमा आहेत. दाऊदचा राजकारण्यांनी व पाकीस्तान ने वापर करून घेतला. जेव्हा मुंबईत गँगवॉर वाढले तेव्हा दाऊद दुबईला पळाला. हसन अलीलाही राजकारण्यांनीच मोठा केला आहे. त्याचे जसे दाऊदशी संबंध आहेत तसेच या देशातील बड्या राजकीय व्यक्तींशीही आहेत. बर्‍याच राजकीय व्यक्तींचा काळा पैसा हसन अलीकडे आहे. हसन अली हा या देशातील सर्वात जास्त टॅक्स भरणारा आहे. विदेशातील ३५ हजार कोटी रुपयांच्या रकमेवर अलीने प्राप्तिकर भरलेला नाही असा त्याच्यावर सध्या आरोप आहे. त्याला मार्च रोजी इन्फोर्समेंण्ट डिरेक्टोरेटने (इडी) अटक केली असून त्याला शस्त्राची तस्करी करण्याच्या आरोपावरून का अटक करण्यात आली नाही, असा सवाल न्यायालयाने केला आहे. एक्साईज इन्स्पेक्टर वशुद्दीन यांना अपत्य. त्यातील हसन अली हा सर्वात धाकटा! परंतु हसनची सर्व भावंडे परदेशात असतात. हसन अली हा एकटाच भारतात राहतो. घोड्यांच्या शर्यतीचे हसन अलीला प्रचंड वेड आहे. त्याच्या मालकीचेच ३२ घोडे आहेत. परंतु बेट घेऊन, रेस मॅनेज करून तो अब्जाधीश झालेला नाही. त्याच्या श्रीमंतीचे गूढ हसन अलीची कसून चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल. आतापर्यंत हसन अलीने पैशाच्या जोरावर सार्‍या शासकीय यंत्रणा विकत घेतल्या आणि आपला काळा धंदा लपवला. हसनअलीला यंत्रणांकडूनसॉफ्ट कॉर्नर भारतातील
भारतातील
आजवरचा सर्वात मोठा करचोर म्हणून सध्या हसन अलीचे नाव गाजत आहे. त्याने किती कर बुडवला त्याचा अंदाज अजूनही आलेला नाही. प्राप्तिकर खात्याने त्याच्यावर ४० हजार कोटींची प्राप्तिकराची दंडाची आकारणी केली होती. आता तो आकडा ६२,००० पर्यंत वाढल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमातून दिल्या आहेत. त्याच्या काळ्या संपत्तीची आणि देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार्‍या कारनाम्यांची चौकशी अजून सुरू आहे. हसन अलीची मात्र खास न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. जामीन मान्य करताना तपासासंदर्भात अनेक शंका संबंधित न्यायाधिशांनी उपस्थित केल्याचे प्रसिद्धी माध्यमे सांगत होती. मुळात या हसन अलीला हात लावायला कोणी धजावत नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. त्याच्यावर काय कारवाई करणार त्याचा जाब देण्यास फर्मावले तेव्हा आदल्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने बोलावून त्याचा जाबजबाब घेतला. त्याला अटक केली. दुसर्‍या दिवशी न्यायालयात तसे सांगितले. तेव्हापासून अंमलबजावणी संचालनालयाने त्याचा रिमांड मागायचा आणि अलीच्या गुन्ह्यांचा योग्य अभ्यास करताच रिमांड मागितल्याबद्दल सत्र न्यायालयाने नाराजी व्यक्त करायची असा आटापाट्याचा खेळ रंगला होता. अब्जावधींचा कर बुडवणार्‍या हसन अलीसाठी न्यायालयाने पक्त ७५ हजाराचा जामीन पुरोसा ठरवला! हसनअलीकडे असलेला म्हणून सांगितला जाणारा पैसा बडय़ा राजकारण्यांचा असावा, त्यामुळे हसनअलीवर कारवाई केली तर पंचाईत होते .काही राजकारणी, उद्योगपतींचा पैसा तो सांभाळतो आणि त्यांच्या सूचनेनुसार तो हवा तसा वापरला जातो. त्यामुळेच हसनअलीला यंत्रणांकडूनसॉफ्ट कॉर्नर जात आहे. त्यामुळे दिल्लीतील सत्तेच्या वर्तुळातून चाव्या फिरल्याशिवाय हसनअलीला कोणी हातही लावणार नाही. बड्या धेंडांबाबत कायद्याचा अंमल वेगळ्या प्रकारे केला जातो, या जनतेच्या समजुतीवर हसन अली शिक्कामोर्तब होत आहे. कायद्यापुढे सगळे समान असतात. प्रत्यक्षात भारतात तरी कायदा पाळतो तोसामान्य असतो आणि जो कायदा मोडतो तोअसामान्य ठरतो. मोठ्या माणसाने वाहतुकीचा सिग्नल तोडला, भर रस्त्यात दंगामस्ती केली, एखाद्या महिलेला छेडले तरी त्याला अडवण्याची हिंमत कायद्याचे संरक्षक करणार नाहीत. अधिक कायदे मोडण्याची जिद्द दाखवणारा तो मोठा . सत्ता-संपत्तीच्या जोरावर उपद्रवशक्ती दाखवणार्‍यापुढे या देशातील कायदा लुळापांगळा असतो, हेच सत्य अशा घटनांतून अधोरेखित होते काळा पैसा परदेशातून पुन्हा मिळविण्याबाबत चर्चा सुरू असतानाच हा पैसा देशाबाहेर नेणाऱ्या व्यक्ती मात्र आपल्या देशामध्ये मोकाटपणे फिरताना दिसतात. संसदेमध्ये विरोधी पक्ष या काळ्या पैशाबाबत चर्चा करतात, ते आणण्यासाठी सरकार काहीही प्रयत्न करीत नसल्याबद्दल गोंधळही घालतात. पण देशामधून हवाला मार्गाने असा पैसा बाहेर नेणाऱ्यांबद्दल कोणीच काही बोलत नाही. त्यामुळेच हसन अलीसारखी माणसे या सगळ्या व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून मोकाटपणे फिरतात; इतकेच नव्हे, तर सेलिब्रिटी स्टेटस मिळवून ऐषोरामात जगतातही. या बाबतीत आपले कायदे किती कुचकामी आहेत, याची कबुलीच एक प्रकारे आपली व्यवस्था देत असते. काही वर्षांपूवीर् हसनअली प्रकरण अगदी पहिल्यांदा उजेडात आले, तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. अगदी पुण्या-मुंबईच्या रेसकोर्सवरही दररोज हजेरी लावणाऱ्यांना तोपर्यंत हसनअलीची ओळख होती ती म्हणजे काही घोड्यांचा मालक आणि रेसकोर्सवर जुगार खेळणारा व्यापारी अशीच. तो राहत असलेली सदनिका उच्चभ्रूंच्या वस्तीत असली, तरीही या माणसाकडे एवढी दौलत असेल असा अंदाज कोणालाच नव्हता. इन्कम टॅक्स आणि संबधित खात्यांना या व्यक्तीबाबत सगळ्यात पहिल्यांदा माहिती मिळाली ती एका हवाला व्यवहारामधून. जगाच्या कोणत्याही देशात चोवीस तासांत पैसे पोहोचविण्याची ख्याती असलेला माणूस म्हणजे हसनअली ही त्याची नवीन ओळख होती. अगदी सुरुवातीला त्याच्यावर छापा पडला, तेव्हा त्याने ३५ हजार कोटी रुपयांचा कर बुडविला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्या वेळेस अनेकांना तो धक्काच होता. या घटनेला आता तीन वषेर् झाली. त्यानंतर हसन अलीबद्दलचा तपास मंदावला. याचे प्रमुख कारण म्हणजे त्याने ज्यांचे पैसे परदेशामध्ये नेले होते, त्यांची नावे घेणे याबाबत तपास करणाऱ्या कोणत्याच यंत्रणेला परवडणारे नव्हते. साहजिकच पहिल्यांदा कारवाई झाल्यानंतर थेट हॉस्पिटलचा रस्ता धरणारा हसन अली त्यानंतर राजरोस फिरू लागला. मध्ये कधी तरी हसन अलीचे काय झाले असा प्रश्न कोणी तरी विचारायचे आणि उत्तर मिळता तो प्रश्न हवेत विरूनही जायचा.एवढा
पैसा आला कोठून याची नवनवीन उत्तरे संसदेच्या मागच्या अधिवेशनाच्या दरम्यान स्विस बँकेत खाते असलेल्यांची यादी विकिलिक्सने जाहीर केली. त्यामध्ये हसन अलीचे नाव नव्हते. पण केंदीय अर्थमंत्री प्रणव मुखजीर् यांनी एका पत्रकार परिषदेत हसन अलीच्या तीन खात्यांमध्ये असलेले पैसे केव्हाच काढून घेण्यात आल्याची माहिती दिली. ते पैसे नक्की कोठे गेले याविषयी, तसेच ते अडविण्यासाठी केंद सरकारने नक्की काय केले, याची माहिती मात्र त्यांनी टाळली. अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात जनहित याचिका दाखल करून घेतानाच हसन अलीसारख्या करबुडव्यांची सरकार एवढी काळजी का घेत आहे असा प्रश्न विचारला, तेव्हा यंत्रणा काहीशी हलली. हसन अलीला सरकार अटक का करीत नाही, असा प्रश्न विचारून कोर्टाने त्याबाबतच्या सुनावणीची तारीख निश्चित केल्यानंतर शेवटच्या दिवशी धावपळ करून त्याला ताब्यात घेतले गेले. पण ताब्यात घेतल्यानंतरही हसन अली स्वत:ची गाडी चालवीत पोलिसांबरोबर गेला. पुन्हा एकदा त्याने या देशाची व्यवस्था आपल्याला काहीच करू शकत नाही, अशी चपकारच जाहीरपणे लावली. अखेर सुप्रीम कोर्टाने हसन अलीला दहशतवाद विरोधी कायद्यातील कलमे का लावली जात नाहीत, असा प्रश्न उद्विग्नपणे विचारला. हसन अलीकडे एवढा पैसा आला कोठून याची नवनवीन उत्तरे सरकारी बाबू देत आहेत. प्रारंभी फक्त हवाला व्यवहार आणि घोड्यांचा व्यापारी असलेला हसन अली आता शस्त्रास्त्र पुरवठा करणाऱ्यांचा एजंटही बनविण्यात आला आहे. दहशतवाद्यांना शस्त्रे पुरविण्यामध्येही त्याचा हातभार असल्याचे सांगण्यात येत आहे. कुविख्यात अदनान खागोशी या शस्त्रपुरवठादाराचा तो हस्तक असल्याचेही तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. असे असूनही आजपर्यंत त्याच्यावर आजपर्यंत याबाबतचा एकही गुन्हा दाखल झालेला नाही. नऊ अब्ज डॉलरची रक्कम खागोशीच्या खात्यातून त्याच्या स्विस बँकेतील खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात आल्याची माहिती इंटरनेटवर अगदी सहजपणे उपलब्ध आहे. इतकेच नव्हे, तर हसन अलीने लंडनमध्ये याबाबत केलेले प्रतिज्ञापत्रही इंटरनेटवर मिळते. पण २००३ मधील या कागदपत्रांची माहिती आपल्या यंत्रणेला २०११पर्यंत सापडत नाही. हसन अलीला त्याच्या आयुष्यात एकही व्यवसाय फायद्यामध्ये करता आलेला नाही .आजही हसन अलीचे वकील तो निष्पाप असल्याचा दावा करत आहेत. असे नक्की किती हसन अली या देशाच्या व्यवस्थेला चकवून आपले उखळ पांढरे करून घेत असतील आणि त्यांना नक्की कोणाचा आशीर्वाद असेल, याची कल्पना करतानाही सामान्य माणसाचा गोंधळ उडतो. सुप्रीम कोर्टाच्या ठाम भूमिकेमुळे या प्रकरणात आशेचा किरण दिसत आहे. अन्यथा ''हसन अलीचे काय झाले?' एवढा प्रश्न विचारणेच आपल्या हातात आहेMOB 09096701253, TELE-020-26851783,E
MAIL-hemantmahajan12153@yahoo.co.in

No comments:

Post a Comment