इराणने मंगळवारी पाकिस्तानातील जैश एल अदिल या बलुस्थान प्रांतातील दहशतवादी गटाच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.
इराणने मंगळवारी पाकिस्तान आणि इराकवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्याविरोधात पाकिस्तानने इराणला युद्धाचा इशारा दिला होता. तसंच, इराणने हद्दीचे उल्लंघन करून कुरापत काढली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पाकिस्तानने दिली होती. आता पाकिस्तानने इराणवर प्रतिहल्ला केला आहे. त्यामुळे, हमास-इस्रायल युद्धानंतर आता पाकिस्तान-इराण यांच्यात युद्ध पेटणार का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
इराणने मंगळवारी पाकिस्तानातील जैश एल अदिल या बलुस्थान प्रांतातील दहशतवादी गटाच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. त्यानंतर पाकिस्तानने इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला आणि इराणमधील आपल्या राजदूतांना त्वरित माघारी बोलावले. इतकेच नव्हे तर दोन्ही देशांतील नियोजित द्विपक्षीय कार्यक्रम आणि दौरेही त्वरित रद्द केले.
पाकिस्तानच्या दाव्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. जैश-अल-उदल ही इराण आणि पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेली दहशतवादी संघटना असून २०२१ मध्ये या दहशतवादी गटाची स्थापना झाली.
हेही वाचा >> “देश संरक्षणार्थ…”, इराणने पाकिस्तानावर केलेल्या हल्ल्यावरून भारताने स्पष्ट केली भूमिका!
दरम्यान, पाकिस्ताननेही आता इराणवर हल्ला केला असून इराणच्या बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवर लक्ष्य केलं आहे. पाकिस्तानने इराणवर २० क्षेपणास्रे डागली असल्याचं वृत्त आहे.
No comments:
Post a Comment