काश्मीरमध्ये आंदोलकांनी फोडले जवानाचे डोळे- पॅलेट गन किती हानीकारक?
जम्मू-काश्मीरमधील आंदोलकांनी सुरक्षा अधिका-याचे डोळे फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शफाकत अहमद असे या सुरक्षा अधिका-याचे नाव आहे.
Strike in Kashmirश्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील आंदोलकांनी सुरक्षा अधिका-याचे डोळे फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शफाकत अहमद असे या सुरक्षा अधिका-याचे नाव आहे. त्यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
एसएसपी श्रीगर येथील सुरक्षा अधिकारी अहमद यांना १४ जुलै रोजी आंदोलकांनी बेदम मारहाण करून त्यांचे डोळे फोडले. त्यानंतर तेथील वाहनही जाळले, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत २ हजार नागरिक आणि १५०० पोलीस कर्मचारी, सुरक्षा दलाचे कर्मचारी जखमी झाले आहेत. तर पुलगाव येथील दमहल हांजी पोरा पोलीस ठाण्यावर हल्ला करून आंदोलकांनी ७० रायफली पळवल्याचेही प्रसारमाध्यमांनी सांगितले.
पॅलेट गन किती हानीकारक?Jul 19 2016 8:54PM
काश्मीरमध्ये पॅलेट गनच्या वापरावर त्वरित बंदी आणावी, अशी मागणी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. पॅलेट गनवरून मानवाधिकार संघटनांनी गहजब माजविला आहे; परंतु अप्रत्यक्षपणे आपण हिंसक फुटीरतावाद्यांचे समर्थन करीत आहोत आणि सुरक्षा दलांचे मानवाधिकार विसरत आहोत, हे या संघटनांच्या आणि नेत्यांच्या गावीही नाही.
काश्मीर खोर्याित हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानी याचा खात्मा केल्यापासून आतापर्यंत सुरक्षा दले आणि समाजकंटकांच्या दरम्यान चारशेहून अधिक वेळा झटापटी झाल्या आहेत. लष्कर आणि सुरक्षा दलांवर दगडफेक करणे हे काश्मीरमधील समाजकंटकांचे नेहमीचे हत्यार आहे. दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्यात तेथील तरुण इतके तरबेज आहेत, की लष्कराला आणि सुरक्षा दलांनाही ते घाबरत नाहीत. असे असूनही लष्कर आणि सुरक्षा दले त्यांच्याविरुद्ध अशा हत्यारांचा वापर करतात, जी जीवघेणी नाहीत. पॅलेट गन हे त्यातील प्रमुख हत्यार असून, आता त्यावरही प्रश्न्चिन्ह लावले जात आहे. 2010 मध्ये समाजकंटकांवर झालेल्या गोळीबारात 50 युवक मारले गेले होते. तेव्हापासून या बंदुकीचा वापर सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी जीवघेणी शस्त्रे न वापरता अशा प्रकारच्या बंदुकांचा वापर करावा, असे पत्र पोलिसांना पाठविले होते. या निवेदनानंतर जबलपूर येथील शस्त्रास्त्र कारखान्याने राज्यातील पोलिसांना अशा प्रकारच्या रायफली पुरविण्यास सुरुवात केली, जी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यास सक्षम असतील; पण प्राणघातक नसतील. सुरक्षा दलांवर थेट हल्ले करणार्याा जमावाला पांगविण्यासाठी त्यांना पॅलेट गन चालवावीच लागेल आणि ती चालविलीच पाहिजे. त्यावर आक्षेप घेणे साफ चूक आहे. एखाद्या दहशतवाद्याच्या समर्थनार्थ लोक एकजूट दाखवितात, सुरक्षा दलांवर हल्ले करतात, दगडफेक करतात, ते पाहता सुरक्षा दलांकडे दुसरा पर्यायच राहत नाही.
प्राणहानीचा धोका नाही
वाढत्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वरभूमीवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील आघातक शस्त्रांचे आधुनिकीकरण करण्यात आले. या शस्त्रांची यादी खूप मोठी आहे. अश्रुधूर सोडणारी यंत्रे असलेली वाहने, स्फोट घडविणारी काडतुसे, बेशुद्ध करणारे ग्रेनेड यात समाविष्ट आहेत. याखेरीज पोलिसांना अंगसंरक्षण देणारे बॉडी प्रोटेक्टर, पॉलीकार्बोनेट शीट, पॉलीकार्बोनेट लाठ्या, हेल्मेट, बुलेटप्रुफ बंकर, पंप अॅ्क्शन बंदुका, वॉटर कॅनन, अँटी-राएट रायफली तसेच रबरी आणि प्लास्टिकच्या गोळ्यांचाही पुरवठा करण्यात आला आहे. आघातक अस्त्रांच्या या यादीत आता डाय-मेकर ग्रेनेड आणि रंगीत पाण्याच्या कॅननसुद्धा समाविष्ट झाल्या आहेत. पोलिस पॅलेट बंदुका आणि पेपर स्प्रेचाच वापर अधिक करतात. पॅलेट एक प्रकारचे छर्रे असतात. ते गर्दीच्या दिशेने सोडले जातात. हे छर्रे समाजकंटकांच्या शरीरात घुसतात. यामुळे कोणतीही प्राणहानी होण्याचा धोका नाही. शरीरात घुसलेले छर्रे केवळ शस्त्रक्रियेद्वारेच काढता येतात. छर्रे घुसल्याने होणार्याा जखमा भरून येण्यास 2-3 आठवड्यांचा अवधी लागतो. पोलिसांवर आणि सुरक्षा दलांवर पेट्रोल बाँब आणि दगड फेकणार्यां ना एवढे तरी सहन करावेच लागणार.
पॅलेट हे ‘नॉन लीथल’ हत्यार आहे. म्हणजेच प्राणघातक नसलेले. जेव्हा स्वतःचा जीव टांगणीला लागलेला असेल, तेव्हा हल्लेखोरांविरुद्ध अशी हत्यारे वापरायची नाहीत, तर मग काय वापरायचे, असा प्रश्नव सुरक्षा दलांतील जवान उपस्थित करतात. अशा उग्र जमावावर लाठीमाराचा उपयोग होऊ शकत नाही. याखेरीज ‘नॉन लीथल’ हत्यारांच्या भात्यात अश्रुधुराचाही समावेश आहे; परंतु दंगलखोरांनी त्यावर उपाय शोधून काढला आहे. अश्रुधुराचे नळकांडे फुटण्याच्या आतच ते त्यावर ओले पोते टाकतात. त्यामुळे अश्रुधूर कुचकामी ठरतो. याखेरीज आणखी एक अस्त्र आहे. त्याला ‘मिरची बाँब’ म्हणतात. मूळ नाव ‘आलियोरेजन’ असे आहे. हे गोळे जमावावर फेकल्यास अंगाची आग होते; परंतु गर्दी मोठी असल्यास मोजक्याच लोकांवर त्याचा असर होत असल्याने हे हत्यारही कुचकामी ठरते. शेकडो लोक चाल करून आल्यावर काय करणार? नाइलाजाने पॅलेट गनचा वापर करावा लागतो. एकदा फायर केल्यावर पॅलेट गनमधून शेकडो छर्रे उडतात. ते रबराचे आणि प्लास्टिकचे असतात. शरीराच्या ज्या भागात ते घुसतात तेथे जखमा होतात. या बंदुकीचा पल्ला 50 ते 60 मीटर असतो.
कमरेखालीच फायरिंग
दंगलखोरांवर शक्यतो पुढून फायरिंग करू नये, असा सुरक्षा दलांचा प्रयत्न असतो; परंतु सामान्यतः झटापटी आमनेसामनेच होतात. त्यावेळी गोळीबार कमरेखालीच केला जातो, असा सुरक्षा दलांचा दावा आहे; परंतु छर्रे कसेही सुटत असल्याने कधीकधी ते कमरेच्या वरही लागू शकतात. साध्या बंदुकीतून सोडलेली गोळी सरळ रेषेत प्रवास करते; मात्र छर्रे सर्वत्र पसरतात आणि कुठेही लागू शकतात. सुरक्षा दलांचे म्हणणे खरे मानल्यास अंतिम हत्यार म्हणूनच पॅलेट गनचा वापर केला जातो. गर्दीतून सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकले जात आहेत. दगड फेकले जात आहेत. आतापर्यंत केवळ केंद्रीय राखीव दलातीलच 300 हून अधिक जवान जखमी झाले आहेत. अनेक पोलिसांची डोकी फुटली आहेत. एकदा तर जमावाने पोलिसांसह जीप नदीत फेकली. पोलिसांचा बुडून मृत्यू झाला. अशा स्थितीतही पोलिसांनी पॅलेट गन वापरू नये की काय? जमावावर थेट गोळीबार तर करता येत नाही. गर्दी पांगविण्यासाठी पॅलेट गनचा वापर जगभर केला जातो. अर्थात, त्याविरुद्ध इतके आवाज उठत असताना कदाचित त्यालाही पर्याय शोधला जाईल. गर्दीही नियंत्रणात येईल आणि सुरक्षा दलांचेही नुकसान होणार नाही, असा नवा पर्याय असू शकतो. अमेरिकेत आफ्रिकी वंशाच्या नागरिकांनी उग्र आंदोलन केल्यावर अशाच पॅलेट गनचा वापर केला गेला होता. इस्रायलमध्ये पॅलिस्टिनी आंदोलकांविरुद्ध अशाच बंदुका वापरल्या जातात. याखेरीज अर्जेंटिना, बोलिव्हिया, इजिप्त आणि कॅनडामध्येही पॅलेट गनचा वापर जमाव पांगविण्यासाठी केला जातो. रशिया आणि युक्रेनसारख्या काही देशांमध्ये तर आत्मसंरक्षणासाठी अशी हत्यारे वापरण्याची मुभा सर्वसामान्य नागरिकांनाही असते. अशा बंदुका वापरण्यामागे कोणाचाही प्राण जाऊ नये, हा हेतू स्वच्छ दिसत असेल तर त्यावरून एवढा गहजब करण्याचे कारणच काय, असा प्रश्नो उपस्थित होतो.
कायद्याचीही अनुमती
पॅलेट बंदुकांमुळे जखमी झालेल्या लोकांची संख्या अधिक असल्यामुळे काश्मीर खोर्याात अशा बंदुकांचा वापर करावा की करू नये, अशी चर्चा सुरू झाली आहे. अशीच चर्चा जगभरातील अनेक देशांमध्ये सुरू आहे. ‘आघातक शस्त्र’ हा शब्द हेतूपुरस्सर वापरून अशा हत्यारांचा जीवघेणा परिणाम लपविण्यात येत असल्याचाही आरोप काही जण करीत आहेत. दुसरीकडे, या हत्यारांना सक्षम पर्याय जम्मू-काश्मीर पोलिसांकडे उपलब्धच नाही. नोव्हेंबर 2014 मध्ये अशा बंदुकांचा वापर बंद करण्यात यावा, यासाठी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अनेक जनहित याचिका फेटाळताना पोलिसांना आत्मसंरक्षणाचा असलेला हक्क मान्य करून त्यासाठी अशा बंदुकांच्या वापराची अनुमती दिली होती.
No comments:
Post a Comment