SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Tuesday, 12 July 2016
झाकीर नाईकचा खेळ! editorial newspaper
झाकीर नाईकचा खेळ!
Monday, July 11th, 2016
महाराष्ट्रासह हिंदुस्थानातील ‘शांतता’ नष्ट व्हावी, समाजात, देशात फूट पडावी, अराजक निर्माण करून येथेही ‘इस्लामिक स्टेट’चे राज्य यावे, असे मनसुबे इस्लामी धार्मिक प्रचारातून व्यक्त होत असतात. अशावेळी सरकारने डोळ्यांवर कातडे ओढून बसणे योग्य नाही. झाकीर नाईक हाच देशविघातक खेळ खेळत आहे. हे महाशय सध्या म्हणे परदेशात आहेत. हिंदुस्थानात उतरताच त्यांना अटक व्हायला हवी. धर्मांध दहशतवादास प्रेरणा देणारे असे लोक जनतेच्या संतापास बळी पडणार असतील तर सरकारने देशद्रोह्यांचा बचाव करू नये! हे आमचे सांगणे जहाल असले तरी राष्ट्रीय हित व राष्ट्रीय सुरक्षेसाठी योग्यच आहे!
झाकीर नाईकचा खेळ!
हिंदुस्थानातील कायदा म्हणजे खेळखंडोबाच झाला आहे. विशेषत: दहशतवाद, राष्ट्रद्रोहासारख्या गुन्ह्यातही या खेळाला बहार येते तेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा होतो. सध्या झाकीर नाईक प्रकरणात तसा तो होताना दिसत आहे. पाकिस्तानात अजहर मसूदसारखे धर्मांध लोक घसा फोडून, शिरा ताणून जे विष पेरतात तेच ‘शांततेचे समाजकार्य’ डॉ. झाकीर नाईकसारखे लोक पडद्यामागे राहून करीत आहेत. ढाका येथील दहशतवादी हल्ला ज्या माथेफिरू तरुणांनी केला त्यामागे झाकीर नाईकची प्रेरणा होती हे आता सिद्ध झाले आहे. कल्याण शहरातील जे चार तरुण ‘इस्लामिक स्टेट’ची वाट धरते झाले तेसुद्धा झाकीर नाईकचेच ‘हस्तक’ असल्याची माहिती समोर आली आहे. तरीही राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा, मुंबईचे पोलीस फक्त चौकशीचीच थेरं करताना दिसत आहेत. संपूर्ण हिंदुस्थानात धर्मांध राष्ट्रद्रोही शक्तींना खतपाणी घालण्याचे काम हे झाकीर नाईक अनेक वर्षे करीत आहेत व त्यांचा ‘धार्मिक शांतते’चा संदेश काय होता हे ढाक्यातील हल्ल्यानंतर उघड झाले आहे. मुंबईसह देशभरात इस्लामिक संमेलने घेऊन झाकीर नाईक माथेफिरू धर्मांधतेचे विष पेरत होता व त्याची तक्रार याआधी शिवसेना, सनातन, हिंदू जनजागृती समितीतर्फे करूनही कारवाई झाली नाही. ‘सनातन’ या संस्थेबाबत एक न्याय व झाकीरच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला वेगळा न्याय हा प्रकार कायद्याचा मुखवटा फाडणारा आहे. ‘सनातन’च्या आश्रमात व साधकांकडे काही धार्मिक साहित्य मिळाले व ते
प्रक्षोभक असल्याचा दावा
सीबीआय, राष्ट्रीय तपास यंत्रणा, मुंबई-गोव्याचे पोलीस करतात, पण झाकीर नाईकची प्रक्षोभक भाषणे, त्याचे साहित्य म्हणजे सरळ सरळ हिंदुस्थानच्या फुटीरतेला खतपाणी घालणारीच आहेत. प्रत्येक मुसलमानाने दहशतवादी असायलाच पाहिजे, असा ‘शांती’ संदेश देणार्यार झाकीर नाईकला एव्हाना बेड्या ठोकून कसाबच्या कोठडीत डांबायला हवे होते. झाकीर नाईकचा जो काही ‘पीस टीव्ही’ म्हणून प्रचार टीव्ही आहे त्यावर जगभरात बंदी घालून त्याची सर्व यंत्रणा कठोरपणे मोडून काढण्याची हिंमत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रातील मोदी सरकारने दाखवायला हवी. झाकीर नाईक म्हणजे कुणी शांततेची कबुतरे उडविणारा समाजसेवक नाही व त्याच्या मनातील हेतू स्पष्ट आहे. पाकिस्तानातून दाऊद इब्राहिम, टायगर मेमन यांना फरफटत आणण्याच्या वल्गना आता बंद कराव्यात व झाकीर नाईकसारख्या अस्तनीतल्या सापांना ठेचले पाहिजे. मुसलमानांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येण्यापासून डॉ. झाकीरसारखे लोकच रोखत आहेत. मुसलमानांच्या डोक्यातील द्वेष व अंधकार अधिक स्फोटक करण्याचे पाप हे लोक करीत आहेत. मुसलमानांना नरकात ढकलून स्वत:ला ‘मसिहा’ बनविण्याचा त्यांचा प्रयत्न हिंदुस्थानात नवे अराजक व पाकिस्तान निर्माण करण्याचा आहे. ढाक्यातील हल्ल्यानंतर झाकीर नाईकचा खरा चेहरा समोर आला. हैदराबाद येथे ‘इस्लामिक स्टेट’चे अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले. तेथे जे माथेफिरू पकडले गेले त्यात हैदराबाद ‘इसिस’चा म्होरक्या इब्राहिम यजडा याने झाकीर नाईकच्या शिबिरात दहा दिवसांचे ट्रेनिंग घेतले होते. झाकीरच्या शिबिरातील हे
‘शांतता कार्य’
असेल तर अशा बिळांनी हिंदुस्थान साफ भुसभुशीत झाला आहे हे मान्य केले पाहिजे. देशातला काळा पैसा मोदींचे सरकार आणायचा तेव्हा आणेल, पण झाकीर नाईक याच्या महान शांतता कार्यास अर्थपुरवठा करणारे जे कोणी समाजसेवक आहेत त्यांना सर्वात आधी सुरुंग लावला पाहिजे. ‘सनातन’सारख्या हिंदुत्ववादी संघटनांचा सध्या जो छळ सुरू आहे तो पाहता डॉ. झाकीर नाईक यांचे ‘सैतानी’ डोके त्यामागे आहे काय अशीही शंका येऊ लागली आहे. ‘आप’सारख्या लोकांनी तर ‘सनातन’विरोधात उघडलेली मोहीम डॉ. झाकीरच्या बाबतीत थंड पडली आहे. जणू डॉ. झाकीर हा ‘आप’वाल्यांचा झुंजार कार्यकर्ताच आहे. महाराष्ट्रासह हिंदुस्थानातील ‘शांतता’ नष्ट व्हावी, समाजात, देशात फूट पडावी, अराजक निर्माण करून येथेही ‘इस्लामिक स्टेट’चे राज्य यावे, असे मनसुबे इस्लामी धार्मिक प्रचारातून व्यक्त होत असतात. अशावेळी सरकारने डोळ्यांवर कातडे ओढून बसणे योग्य नाही. झाकीर नाईक हाच देशविघातक खेळ खेळत आहे. हे महाशय सध्या म्हणे परदेशात आहेत. हिंदुस्थानात उतरताच त्यांना अटक व्हायला हवी. झाकीर नाईकच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. कराचीतील दाऊदच्या घराबाहेर तेथील पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्ताप्रमाणेच हा प्रकार दिसतो. धर्मांध दहशतवादास प्रेरणा देणारे असे लोक जनतेच्या संतापास बळी पडणार असतील तर सरकारने देशद्रोह्यांचा बचाव करू नये! हे आमचे सांगणे जहाल असले तरी राष्ट्रीय हित व राष्ट्रीय सुरक्षेसाठी योग्यच आहे!
झाकिर नाईकची विषवल्ली
इस्लामचा धर्मोपदेशक आणि मुंबईस्थित इस्लामिक रीसर्च फाऊंडेशनचा संस्थापक झाकिर नाईक याच्या भाषणांची, त्याच्या कार्यकलापांची चौकशी करण्याचे आदेश राज्य व केंद्र सरकारने दिले, ही एक दिलासा देणारी बाब आहे. कुणाच्या भाषणावर बंदी आणण्याची मागणी झाली की, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे ठेकेदार आरडाओरड सुरू करतात; पण झाकिरच्या बाबतीत अजून तरी तसे झाले नाही. कारण झाकिरच्या भाषणांवर बंदी घालण्याची मागणी बर्यााच मुल्ला-मौलवींनी या आधीच केली आहे आणि मुल्ला-मौलवींच्या विरुद्ध प्रगतिशील बौद्धिक मंडळींची जीभ वळत नसते. झाकिर नाईक इस्लामी अतिरेक्यांचे प्रेरणास्थान असल्याचे उघड झाल्यानंतर नेमकी कुठली बाजू घ्यावी, याचा संभ्रम कदाचित या प्रगतिशील मंडळींमध्ये असावा. हैदराबाद येथे इसिसचे मोड्युल उघडकीस आल्यानंतर दोन आरोपी- रोहन इम्तियाज व इब्राहिम यझदानी यांनी स्पष्टच सांगितले की, झाकिर नाईकच्या भाषणांमुळे आम्ही प्रेरित झालो आहे. ढाका येथे नुकताच जो दहशतवादी हल्ला झाला, त्यातील अतिरेकीदेखील झाकिरच्या भाषणांनी प्रभावित झालेले होते. त्यामुळे एरवी सर्वसामान्यांच्या गावीही नसणारा हा ५१ वर्षीय धर्मोपदेशक आज ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. झाकिर नाईक नेहमीच्या मुल्ला-मौलवींसारखा दिसत नाही. सुटाबुटात, टाय लावून इंग्रजीत बोलत असतो. त्यामुळे शिक्षित मुस्लिमांवर त्याचा नकळत परिणाम होत आहे. झाकिरने उपनिषद, गीता, पुराण यांचा अभ्यास केला आहे. बायबलची अनेक वचने त्याला तोंडपाठ आहेत. आपल्या भाषणात तो या श्लोाकांचा, वचनांचा संदर्भ देत असतो आणि या सर्वांपेक्षा इस्लाम किती श्रेष्ठ आहे, हे पटवून देतो. झाकिर हिंदू, ख्रिश्चकन धर्मांवर टीका करून मुस्लिम धर्माचा प्रचार करतो, याला कुणी आक्षेप घेऊ शकणार नाही. भारतात तर नाहीच नाही. परंतु, त्याची भाषणे काळजीपूर्वक ऐकली तर असे लक्षात येते की, अतिशय चलाखीने तर्क देऊन ही व्यक्ती दहशतवादाला खतपाणी घालत आहे. मानवी व्यवहारासंबंधी कुराणमध्ये ज्या काही आज्ञा वा वचने आहेत, ती तशीच्या तशी आजही आचरणात आणली पाहिजे, यावर झाकिरचा आग्रह असतो. अगदी सोपे उदाहरण द्यायचे, तर लहानपणी शाळेत शिकविलेले ‘जॅक ऍण्ड जिल, वेण्ट अप द हिल’ हे बडबडगीतदेखील इस्लामला मंजूर नाही. कारण त्यात मुलगा व मुलगी एकत्र पाणी आणण्यासाठी गेले आहेत. भिन्न लिंग व्यक्तींनी एकत्र येऊन बागडणे इस्लामला मान्य नाही, म्हणून झाकिर ही कविता इस्लामविरोधी आहे म्हणून जाहीर करतो. इस्लामच्या श्रेष्ठत्वाबाबत झाकिर जे तर्क देतो ते इतके निर्बुद्ध असतात की, ऐकून हसावे की रडावे हेच कळत नाही! हे सर्व सांगण्याचा उद्देश हाच की, यातून झाकिर याची बौद्धिक पातळी लक्षात यावी. परंतु, झाकिर इथेच थांबत नाही. दहशतवादी कृत्यात सामील होण्यासाठी जी मानसिकता लागते, ती घडविण्यात झाकिरच्या भाषणांचा फार मोठा हात आहे, हे आता लक्षात आले आहे. २०१० साली इंग्लंड व कॅनडाने झाकिरच्या प्रवेशावर बंदी घातली होती. सध्या झाकिरची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर फिरत आहे. त्यात त्याने ओसामा बिन लादेनचे समर्थन केले आहे. त्यात तो म्हणतो- जर तो (ओसामा) इस्लामच्या शत्रूंविरुद्ध लढत असेल, तर मी त्याच्या सोबत आहे. तो काय करतो, हे मला माहीत नाही. मी त्याला व्यक्तिश: ओळखत नाही. जर तो जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी अमेरिकेला हादरवत आहे, तर मी ओसामाच्या बाजूने आहे. प्रत्येक मुस्लिम दहशतवादी झाला पाहिजे. जर तो दहशवाद्यांवर दहशत निर्माण करीत आहे, तर तो इस्लामचे अनुकरण करीत आहे, असे समजावे. झाकिरची शब्दरचना इतकी चतुराईने केलेली असते की, कुठलाही कायदा त्याला कचाट्यात पकडू शकत नाही. मात्र, त्याच वेळी मुसलमान तरुणांपर्यंत योग्य तो संदेश पोचविण्यात तो यशस्वी ठरतो. मानवी बॉम्ब बनून आत्मघात करण्याच्या संदर्भातही त्याचे विचार प्रभावी ठरतात. मानवी बॉम्ब कल्पना इस्लामला मंजूर आहे, असे तो म्हणतो. अर्थात परिस्थितीची तशी मागणी असेल तर... म्हणजे जर ते इस्लामच्या वा प्रेषित मोहम्मदच्या शत्रूंविरुद्ध युद्ध असेल तर... परंतु, व्यक्तिगत कारणासाठी आत्महत्या करणे इस्लामला मान्य नाही. यातही हीच चलाखी आहे. पण, इस्लामचे शत्रू कोण, हे कोण ठरविणार? झाकिरची ही भाषणे, चलाखी अनेक वर्षांपासून बिनबोभाट सुरू आहे. आता ती जगाच्या लक्षात येत आहे, इतकेच. भारतात तर जो कुणी हिंदू समाजाचे लचके तोडण्यास सिद्ध असेल, त्याला कवटाळणार्या गिधाडांची कमतरता नाही. त्यामुळेच कॉंग्रेसच्या खर्याइ स्वरूपाचे प्रतीक बनलेले दिग्विजयसिंह यांना झाकिरमध्ये मानवाचा शांतिदूत दिसतो. अश्लीपल चित्रपटनिर्माता महेश भट तर, झाकिरला इंग्लंडमध्ये प्रवेश नाकारला म्हणून अत्यंत अस्वस्थ होतात. इंग्लंडचा हा निर्णय अमानवी व राक्षसी वृत्तीचा आहे, असे म्हणत त्यांनी निषेध व्यक्त केला होता. दहशतवादी विचारसरणीचा प्रसार करण्यात झाकिर नाईकच्या भाषणांचा होत असलेला ‘अमूल्य’ उपयोग बघता, जहाल दहशतवादी हाफिज सईदने त्याच्या जमात-उद-दावाच्या वेबसाईटवर केवळ झाकिरच्या संस्थेचीच लिंक दिलेली असावी. आज सारे जग दहशतवादाच्या भीषण आगीत होरपळून निघत असताना, झाकिर नाईक आपल्या भाषणातून दहशतवादाचे तत्त्वज्ञान मुस्लिम तरुणांच्या डोक्यात प्रभावीपणे घुसवीत आहे आणि तरीही आम्हा भारतीयांना त्याच्यात शांतिदूताचा साक्षात्कार होतो, हे किती दुर्भाग्यपूर्ण आहे! झाकिर नाईकला कायद्याचा बडगा काय करेल तो करेल, परंतु, एक भारतीय म्हणून आम्ही आमचे काही कर्तव्य पार पाडतो की नाही? आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतलेला एक मुसलमान इतर धर्मातील ग्रंथांचा अभ्यास करून इस्लामच्या प्रचारासाठी बाहेर पडतो. त्याच्या तर्काला तोंड देण्यासाठी आमच्याकडे एकही विद्वान नसावा! आमच्यापैकी किती जणांनी उपनिषदे, गीता, पुराण इत्यादी वाचले आहे, अभ्यासले आहे? त्या उपटसुंभ झाकिरने गीता किंवा उपनिषदातील कुठला तरी श्लोाक आमच्या तोंडावर फेकून मारावा आणि आम्ही नाइलाजाने मान खाली घालून ते मान्य करावे, हे आम्हाला शोभण्यासारखे आहे का? तो जे विपरीत तर्क मांडत आहे, ते तिथल्यातिथे खोडून काढून त्याचे तोंड बंद करणे कोट्यवधी हिंदूंपैकी कुणालाही जमत नाही, ही खरी शोकांतिका आहे. आम्हाला आमच्याच दर्शनग्रंथांचा अभ्यास करण्याची लाज वाटते. कारण तसे केले तर समाज आम्हाला मध्ययुगीन, रानटी, मानवताविरोधी, प्रतिगामी, बूर्झ्वा ठरविण्याची भीती असते. सुशिक्षित हिंदूंमधील ही भीतीच झाकिर नाईकसारख्या विदूषकाची फार मोठी शक्ती आहे. ही वस्तुस्थिती हिंदू ज्या दिवशी समजून घेतील, त्या दिवशी झाकिर नाईकसारख्या वावदुकाला आळा घालण्यासाठी सरकारची गरज पडणार नाही!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment