Total Pageviews

Friday 15 July 2016

बुरहान कुणी महात्मा होता की शहीद?


बुरहान कुणी महात्मा होता की शहीद? हा जमाव तोच आहे, जो पुरात अडकला म्हणून गेल्या वर्षी सैनिकांसह केंद्र सरकारची सारी यंत्रणा त्याच्या मदतीला धावून गेली होती? एका दहशतवाद्याच्या खातम्यानंतर रस्त्यावर उतरलेली ही संतप्त काश्मिरी जनता तीच आहे, जिच्या सुरक्षेसाठी सरकार वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करते? हा परिसर तोच आहे, जो ‘आमचा’ असल्याचे सिद्ध करण्यासाठी शेजार्यांकशी भांडण अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर धडपड चालली आहे आमची? संकटाच्या काळात पाठीशी ठामपणे उभे राहत आपल्या सरकारने दिलेली मदत विसरून, सर्वांच्या नाकावर टिच्चून हा जमाव एका दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंच्या संख्येने गर्दी करून उपस्थित राहतो अन् सरकार चालवणारी हतबल यंत्रणा यातील कुणाचेच काहीच बिघडवू शकत नाही, हा कशाचा परिपाक आहे? आपल्या समाजातला एक तरुण सीमेपलीकडे जोपासल्या जाणार्याव दहशतवादाचे धडे घेत त्यांच्या खेम्यात सामील होतो, यावर कुणाचाच आक्षेप नसतो. पण, देशविरोधी कृत्यात सहभागी असल्याच्या कारणावरून तो मारला गेला की, मात्र खोर्याुतील तमाम जनता त्याला मारणार्या, यंत्रणेविरुद्ध दंड थोपटून उभी राहते. आपल्याच सरकारविरुद्ध मोर्चे काढते. सुरक्षेची जबाबदारी उचलणार्याक आपल्याच पोलिसांवर दगडफेक करते. त्या दगडफेकीच्या प्रत्युत्तरात झालेला गोळीबार अन् त्यात गावकर्यांषचे दगावणे यावरून सार्यांआचा संताप पुन्हा अनावर होतो. यात, मेलेल्यांच्या चितेवर राजकारणाच्या भाकरी भाजायला कुणीतरी कायम सरसावलेला असतो, ते वेगळेच. एक बुरहान वानी मारला गेल्याने काही काश्मिरातील दहशतवाद संपणार नाही, ही ओमर अब्दुल्लांच्या तोंडची भाषा राजकारणाच्या त्याच घसरलेल्या पातळीची ग्वाही देते अन् वानीच्या अंत्यसंस्काराला जमलेला काश्मिरी जनतेचा जमाव स्वत:च्या देशभक्तीवर स्वत:च प्रश्नअचिन्ह उभे करतो. वयाच्या पंधराव्या वर्षीच घरातून पळून गेलेल्या बुरहानने, स्वत:ला एका दहशतवादी संघटनेच्या स्वाधीन केलेले असते. अवघा बावीस वर्षांचा असताना तो हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बनलेला असतो. ज्या काश्मीरच्या पुलवामा परिसरातील एका छोट्याशा गावात जन्म झाला, त्याच परिसराविरुद्ध पेटून उठायला त्याला धर्माचे एक कारण पुरेसे असते. त्याने हिजबुल मुजाहिदीनचे सदस्य बनण्यासाठी आपल्या समाजातील तरुणाईला सोशल मीडियावरून केलेल्या जाहीर आवाहनावरही काश्मिरी जनतेला कधी आक्षेप नोंदवावासा वाटत नाही. त्याने दक्षिण काश्मिरातील सुमारे तीस तरुणांना या दहशतवादी संघटनेत सहभागी करून घेतल्याची वार्ताही इथल्या नागरिकांसाठी नाही म्हणायला अभिमानाचाच विषय असते. धर्माच्या नावाखाली आपल्या गावचा पोरगा आपल्याच देशाविरुद्ध लढायला मैदानात उतरला असल्याच्या बाबीचीही इथे कुणाला खंत वाटत नाही. पण, हाच बुरहान सैनिकांच्या गोळीबारात मारला गेला की मात्र, सारे लोक अश्रू ढाळायला पुढे आलेले असतात. तेव्हा त्यांचा संताप अनावर झालेला असतो. त्या वेळी त्यांना, हा तमाम काश्मिरी जनतेवरील अन्याय असल्याची प्रचीती आलेली असते. मग आपल्या सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरतानाही लोकांना कसलीच भीती वाटत नाही अन् सुरक्षा यंत्रणेवर दगडफेक केल्याची जराही खंत तिला वाटत नाही. बुरहानच्या मृत्यूनंतर गेले काही दिवस काश्मिरातील रस्त्यांवर सुरू असलेल्या तमाशाने अनेक प्रश्नन निर्माण केले आहेत. काश्मिरातील जनता नेमकी कुणाच्या बाजूने आहे, हेच स्पष्ट करून घेण्याची वेळ या जमावाने आणली आहे. सैनिकांच्या गोळीबारात ठार झाला तो बुरहान काय एखादा सत्पुरुष होता की संत-महात्मा? की देशासाठी प्राणार्पण केलेला शहीद? देशविरोधी कृत्यात सहभागी असताना मरण पावलेला तरुण ‘आपल्या’ भागातला होता, एवढेच एक कारण त्याच्या मृत्यूनंतरची हळहळ व्यक्त होण्यामागे असेल, मनातली ती सल व्यक्त करण्यासाठीच अलोट गर्दी बुरहानच्या अंत्यसंस्काराला जमली असेल, तर मग दहशतवादाच्या वाटेने चाललेल्या ‘आपल्या’ भागातल्या पोरांना आवर घालण्याची जबाबदारी कुणाची, याचेही उत्तर या जमावाने दिले पाहिजे. पण, इथे तर चित्र वेगळेच आहे. पोरं दहशतवाद्यांच्या खेम्यात सामील होईपर्यंत सारे चिडिचुप! त्याने तिकडून चालवलेल्या उपद्रवालाही कुणाची ना नसते. तो सीमेपलीकडील लोकांच्या तालावर नाचत आपल्याच देशाविरुद्ध उभा ठाकला, तरी त्याबाबत कुणी चकार शब्द काढत नाही. फक्त तो भारतीय सैनिकांच्या कारवाईत मारला गेला की, मात्र संताप अनावर झाल्याची नौटंकी करत हा जमाव रस्त्यावर उतरतो दरवेळी. अफझल गुरू असो की बुरहान, काश्मीरच्या खोर्याचत वाढलेल्या या तरुणांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जमलेली गर्दी अन् मोठ्या संख्येतील त्या जमावाच्या माध्यमातून व्यक्त झालेला क्षोभ, हा त्यांच्यावरील प्रेमापेक्षाही स्वकीयांविरुद्धची मनातली गरळ ओकण्यासाठी साधले गेलेले निमित्त ठरल्याचेच प्रकर्षाने जाणवते. अशा घटना घडल्या की, कर्फ्यू, दगडफेक, लाठीमार, गोळीबार, दोन्ही बाजूच्या लोकांचे मृत्यू आणि मग संतापाच्या वाढलेल्या तीव्रतेत पुन्हा कर्फ्यू, दगडफेक, लाठीमार, गोळीबार... दर वेळी हेच चक्र. दर वेळी हाच तमाशा! हे खरेच आहे की, ही पोरं आपलीच आहेत. बंदुकींच्या टोकांवर त्यांचे जीव जावेत, हे कुणालाच पटणार नाही. पण, वाट चुकलेल्या या पोरांवर अन्याय होऊ नये याची शक्य तेवढी काळजी घेण्याचा अन् समजुतदारी दाखवण्याचा ठेका फक्त सरकारने आणि सैनिकांनीच घेतला आहे का? काश्मिरी जनतेची काहीच जबाबदारी नाही? कुणाच्या हक्काचा लढा लढायला निघाली आहेत ही पोरं? अन् कुणाविरुद्ध? पंधरा वर्षाचा असताना बुरहान घरातून निघून गेला. काय केले त्याच्या आईवडिलांनी? मुस्लिम तरुणांना हिजबुल मुजाहिदीनच्या सदस्यत्वाचे आवतन तो जाहीरपणे देत राहिला, काय केले त्याच्या गावकर्यांदनी? धार्मिक कट्‌टरतेची ग्वाही देत आपल्या भागातल्या अन्य तरुणांनाही त्याने या फुटीरतावादी संघटनेत सहभागी करून घेतले. काय केले सबंधितांच्या पालकांनी? दहशतीपायी हा प्रदेश सोडून जाण्याची वेळ आलेल्या पंडितांना इथे पुनर्वसित करण्याच्या निर्णयाविरुद्ध तो विषवमन करीत राहिला, तेव्हा कुणालाच राग व्यक्त करावासा वाटला नाही? कुणी आवर घातला आपल्या पोरांना? कुणी समजूत काढली त्यांची? कुणी बखुटं धरून घरात परत खेचून आणलं त्यांना? ते जाऊ द्या, यातील एकाने तरी आपल्या घरातला मुलगा हरवल्याची नोंद पोलिस दफ्तरी केली होती? एकीकडे घरातलं पोर धर्मासाठी लढायला निघाल्याचा अभिमान बाळगायचा. उद्या तो आपल्याच्या मुलुखाविरुद्ध दंड थोपटून उभा राहणार असल्याच्या वास्तवाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करायची अन् कारवाईत तो मारला गेला की, मात्र छाती बडवत रस्त्यावर उतरायचे, पोलिसांनीच अत्याचार केल्याची आवई कायम उठवत राहायची, ही कुठली तर्हा झाली? सर्वांच्या नाकावर टिच्चून या तरुणांनी दहशतवादी खेमे गाठायचे, धर्मासाठी लढायला समोर येण्याचे आवाहन आपल्या बांधवांना खुशाल करायचे आणि तरीही इथल्या सरकारने, सैनिकांनी काहीच करायचे नाही? डोळ्यांदेखत घडणारा हा प्रकार मुकाट सहन करायला भारतीय सैनिकांचे दल म्हणजे षंढांची फौज वाटली का यांना? ज्यांना मान्य नाही त्यांनी खुशाल रस्त्यावर येऊन निदर्शनं करावीत, पण दहशतवाद असाच ठेचावा लागतो, हेच वास्तव आहे- कितीही धगधगते असले तरीही...!

No comments:

Post a Comment