SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Wednesday, 11 November 2015
सहिष्णुतेची ऐशीतैशी!- tarun bhart editorial must read
सहिष्णुतेची ऐशीतैशी!
आज दोन बातम्या आल्या आहेत. या दोन्ही घटनांवर सहिष्णुतेच्या नावाने गेल्या काही दिवसांमध्ये गळे काढणारे, रस्त्यावर उतरून थयथयाट करणारे बोलले पाहिजेत. चवताळून उठले पाहिजेत. सहिष्णुतेची प्रवचने देत सुटले पाहिजेत. पण अहो आश्चर्यम्. हे सगळे तथाकथित सहिष्णुतावादी दोन दोन पांघरुणे घेऊन झोपल्यासारखे गप्प आहेत. कानात बोळे घातले आहेत आणि डोळ्यावर जाड कातडे बहुधा ओढलेले दिसते आहे. एक बातमी आपल्या शेजारच्या कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारची आहे. तिथे सरकारच्या खर्चाने टिपू सुलतानची जयंती साजरी केली जाणार आहे. टिपू सुलतानने त्याच्या कार्यकाळात अनेकांना जबरदस्तीने धर्मांतरे करून मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला, असा आरोप आहे. टिपू सुलतान इंग्रजांशी लढला हे खरे आहे. मात्र, तो काही भारतीय जनतेला इंग्रज गुलाम बनविण्यासाठी आले आहेत म्हणून इंग्रजांच्या विरोधात लढला नाही, तर आपले राज्य हातातून निसटता कामा नये यासाठी लढला. आताच्या लोकशाहीत एक लोकनियुक्त सरकार केवळ एका समाजगटाला खुष करण्यासाठी एकेकाळी तलवारीच्या टोकावर धर्मांतरे करणार्या ‘पंथांध’ ‘जुलमी’ ‘प्रार्थनापद्धतीचा अतिरेकी आग्रह लादणार्या माणसाचे उदात्तीकरण करत आहे. इतकी असहिष्णुता माजली आहे, पण सहिष्णुतेचा कैवार घेणारे जणू आपण त्या गावचेच नाही अशा पद्धतीने चिडीचूप आहेत! दुसरी बातमी आयएसआयएस या अतिरेकी संघटनेची आली आहे. या जात्यंध दहशतवादी संघटनेच्या लोकांनी सिरियामध्ये दोनशे निरपराध बालकांना अर्धनग्न अवस्थेत जमिनीवर झोपवून एकापाठोपाठ त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या चालविल्या आणि त्यांना ठार मारले. निरपराध लहान मुलांवर अशा प्रकारे गोळ्या चालवून ठार मारणे ही सहिष्णुता आहे की असहिष्णुता? सहिष्णुतेच्या नावाने गळे काढणारे आता कोणत्या सहिष्णुतेचे कुलूप आपल्या तोंडाला लावून बसले आहेत. घटनेच्या बातम्या प्रसिद्ध होऊन अनेक तास उलटले तरी एकानेही या भयंकर घटनेचा एका शब्दाने निषेध केलेला नाही. टिपू सुलतान हा अत्याचारी होता. प्रार्थनापद्धतीच्या अतिरेकी आग्रहापोटी त्याने मुस्लिमांशिवाय अन्य प्रार्थनापद्धती असणार्यांवर अत्याचार केले. जबरदस्तीने त्यांना मुस्लिम प्रार्थनापद्धतीचा स्वीकार करायला भाग पाडले. इतकेच नाही तर अफगाणिस्तानमधील शासकांना भारतावर आक्रमण करून इस्लामशिवाय अन्य प्रार्थनापद्धती अवलंबिणार्या लोकांना संपविण्याचा इरादा स्पष्ट केला. असे असताना या टिपू सुलतानची जयंती एक सरकार लोकांच्या खर्चाने, सरकारी कार्यक्रम म्हणून साजरे करण्याचा कार्यक्रम आखते. या जयंतीचा विरोध करणार्यावर लाठ्या चालविल्या जातात. त्यापासून वाचण्यासाठी पळताना एकजण भिंतीवरून पडून मरण पावतो. तरीही या देशातल्या तथाकथित सहिष्णुतावाद्यांना त्याचे काहीच कसे वाटत नाही. खुद्द कर्नाटकात सहिष्णुतेचे गळे काढत पुरस्कार परत करणार्यांची संख्या सर्वाधिक होती. ती मंडळी आता काय करत आहेत? असहिष्णुतेचा अंधार देशात पसरल्याचा भास ज्यांना ऐन दिवाळीत होत होता, ते दीडशहाणे आता काय करत आहेत? हे सगळे सहिष्णुतावादी मुळात खरे सहिष्णुतावादी नाहीतच. त्यांची सहिष्णुतेची व्याख्याच असहिष्णू आहे. केवळ अल्पसंख्यकांचे लांगूलचालन आणि बहुसंख्यकांची उपेक्षा म्हणजे सहिष्णुता अशी त्यांची व्याख्या आहे. त्यामुळे अल्पसंख्यक कसेही वागले, तरी त्यांना त्यात असहिष्णुता दिसत नाही. त्या कसेही वागण्याला कोणी विरोध केला की मात्र यांचा संताप होतो, तिळपापड होतो, हे किंचाळत उठतात, हे पुरस्कार परत करण्याचा सात्त्विक संताप आल्याचा आव आणतात, हे मोर्चे काढत त्यात सहभागी होतात...! महाराष्ट्रात प्रतापगडाच्या पायथ्याशी जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला तेथे त्या आक्रमक, जुलमी, मूर्तिभंजक अफजलखानाचे थडगे आहे. या थडग्याचे उदात्तीकरण चालू झाले. तेथे अल्पसंख्यक मंडळी बांधकामे करत अफजलखानाचे स्मारक उभारू लागले. त्याला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी विरोध केला, तेव्हा महाराष्ट्रातील कॉंग्रेस सरकारच्या पोलिसांनी आंदोलनांवर बेदम लाठीमार केला. अनेकजण जखमी झाले. मात्र, सहिष्णुतावादी तेव्हा डाराडूर झोपले होते. अफजलखानाचे उदात्तीकरण करण्यात त्यांना आक्षेपार्ह काहीच वाटत नाही. कदाचित महाराष्ट्रात शिवी धर्माला सोयीचा इतिहास लिहिणारे अनैतिहासिक संशोधक जे उभे राहिले आहेत, ते अफजलखानाने महाराष्ट्रात आल्यानंतर अत्याचार केलेच नाहीत. मूर्ती फोडल्याच नाहीत. हा सगळा एका जातीने सोयीने इतिहास लिहिला आहे, असे अगाध संशोधनही करतील. शिवाजी महाराज एका जातीच्या वकिलाला मारायला पुढे झाले आणि मध्ये अफजलखान आल्याने तो मरण पावला, असेही लिहितील. सहिष्णुतेच्या चष्म्यातून या इतिहासाला मान्यता मिळेल. जिथे खरे संशोधन चालते तिथे हल्लेही केले, तरी यांच्या सहिष्णुतेला मुळीच धक्का बसणार नाही. हैदराबादच्या निजामाच्या काळात रझाकारांनी घराघरात अत्याचार केले. मराठवाड्यात, तेलंगणात अनेकांची हत्या झाली. अनेकांना घरातून पळून जाऊन सोलापूर, पंढरपूर, जामखेड, अहमदनगर येथे निर्वासित बनून राहावे लागले. निजामाने पाकिस्तानशी संधान बांधून भारतविरोधी कारवाया करण्याचे कारस्थान सुरू केले होते. अखेर पोलिस ऍक्शन झाली आणि रझाकारांना पळता भुई थोडी झाली. या घटना पाहणारे, अनुभवणारे लोक अजूनही मराठवाडा, कर्नाटक, तेलंगणात जिवंत आहेत. मात्र, उद्या आंध्र प्रदेशातील सरकार निजामाची जयंती सरकारी खर्चाने करू लागले आणि त्याला विरोध केला, तर मात्र हे तथाकथित सहिष्णुतावादी रस्त्यावर येतील. निजामाच्या समारंभाला विरोध करणे असहिष्णुता आहे म्हणून पुरस्कार पणाला लावतील. निरपराध दोनशे बालकांना किड्या-मुंग्यांसारखे ठार मारणारे कोणीही असोत, ते राक्षसाच्या पलीकडचे मानवतेचे दुष्मन आहेत. त्यांचा निषेध करावा तितका थोडा आहे. टिपू सुलतान, अफजलखान, औरंगजेब, निजाम यांचे उदात्तीकरण कोणी मतांच्या लाचारीसाठी करत असतील, त्यांचा कसून विरोध केला पाहिजे. मात्र, ज्यांची सहिष्णुता ही प्रासंगिक, राजकीय कारणाने उफाळून येते, सुपारी घेतल्यासारखी एखाद्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधून सक्रिय होते त्यांचेही सहिष्णुतेचे सोंग अशा प्रसंगात उघडे पडते, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंच्या विरोधात, देशहिताच्या विरोधात जेव्हा असहिष्णू, पक्षपाती व्यवहार होतो, तेव्हा हे सगळे राजकीय पोटशूळ उठल्यामुळे सहिष्णुतेचा कांगावा करणारे चिडीचूप बसतात! कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, जनता दल अशा मल्टिकम्युनल पक्षांची सरकारे असलेल्या राज्यात काहीही झाले, तरी सहिष्णुता धोक्यात येत नसते. कुठे महिलांवर अत्याचार होवोत, कुठे कष्टकर्यांना गळा चिरून मारले जावो, कुठे एकाच वेळी पाऊणशे पोलिसांची हत्या होवो की कुठे लोकांना आपली घरेदारे सोडून परागंदा होण्याची वेळ येवो. तेथे जर भाजपा वगळता अन्य पक्षांची सरकारे असतील, तर सहिष्णुता संकटात सापडत नाही. खुद्द सरकारने जरी तशा प्रकारच्या कारवाया केल्या, सरकारमधील मंत्र्याच्या बायकोने जरी मंत्र्याच्या विरोधात घरगुती हिंसेचा आरोप केला, तरीही तेथे सहिष्णुतेला धक्का लागत नाही. यांना ही असहिष्णुता वाटतच नाही. त्यांना हा सर्वधर्मसमभाव वाटतो. या प्रकारच्या पक्षपाती सहिष्णुतेचा अतिरेक झाल्यानेच या देशातील सामान्य माणूस या ढोंगी सहिष्णुतावाद्यांच्या बाजूने कधीही उभा राहात नाही. राहाणारही
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment