Total Pageviews

Thursday 19 November 2015

COL SANTOSH MAHADIK LAID TO REST

सातारा- अवघ्याआठशे ते हजार लोकवस्ती असलेल्या सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावात भूमिपुत्र भारतमातेच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या कर्नल संताेष महाडिक यांना अखेरचा निराेप देण्यासाठी गुरुवारी सकाळपासून हजाराेंच्या संख्येने जनसमुदाय जमला हाेता. ‘शहीद कर्नल महाडिक अमर रहे’च्या घाेषणांनी सारा गाव दुमदुमत हाेता. अवघ्या सहा वर्षांच्या स्वराजने जेव्हा आई स्वाती आणि नऊ वर्षांची बहीण कार्तिकीच्या देखत आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थितांच्या भावनांचा अक्षरश: बांध फुटला. ‘माझ्या काळजाचा तुकडा गेला..’ असा संताेष यांच्या माताेश्री कालिंदीबाई यांनी फाेडलेला हंबरडा जणू अासमंत चिरून गेला. भारतमातेचा हा सुपुत्र आपली अाई कालिंदी, जिच्याकडे संताेष दत्तक गेले हाेते, ती माउली बबई यांच्यासह ज्या शाळेने देशभक्तीचे बाळकडू पाजले, त्याच मातृरूपी वास्तूच्या प्रांगणात अनंतात विलीन झाला. पोगरवाडी येथे गुरुवारी दुपारी १२ वाजता शहीद संतोष महाडिक यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव बुधवारी रात्रीच सातारा येथे आणले हाेते. गुरुवारी सकाळी लष्कराच्या सजवलेल्या वाहनातून पार्थिव पोगरवाडीला नेण्यात आले. वेशीपासून कर्नल महाडिक यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या न्यू इंग्लिश हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात अंत्यसंस्काराच्या चौथऱ्यापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात अाली. छाेट्याशा गावाच्या रस्त्यावर जागोजागी आदरांजली वाहणारे फलक तर होतेच, पण पोगरवाडीतल्या प्रत्येक घरासमोर आणि सुमारे दोन किमीपर्यंत फुलांच्या पायघड्या अंथरलेल्या होत्या. युद्ध जिंकून परतणाऱ्या विजेत्याप्रमाणे गावातील प्रत्येक घरासमाेर रांगाेळी काढून या वीर जवानाला निरोप देण्याची तयारी करण्यात अाली होती. मात्र, प्रत्येकाच्या मनात आपला सेनानी, गावात रमणारा बाळा गमावल्याची अपार खंतही दिसत हाेती. ठिकठिकाणी पार्थिवावर फुले उधळली गेली, औक्षण करण्यात आले. अखेरीस सुमारे दीड तासाने अंत्ययात्रा शाळेच्या प्रांगणात केलेल्या चौथऱ्यापर्यंत आली. हजारो जणांचा समुदाय साश्रुनयनाने कर्नलना निरोप देण्यासाठी थांबला होता. Related • वीरपुत्राला पोगरवाडीत अखेरचा सलाम, शहीद कर्नल संतोष महाडिक अनंतात विलिन • कर्नल महाडिक शहीद, वाचा चित्तथरारक चकमक, धोनीला शिकवले पॅराग्लायडिंग • शहीद कर्नल संतोषवर साताऱ्यात अंत्यसंस्कार, महिलांनी लावले नाही कुंकू चौथऱ्यापासून काही अंतरावर लष्कराच्या तिन्ही दलांच्या जवानांनी संताेष यांचे पार्थिव खांद्यावर घेतले. या वेळी लष्कराच्या बँड पथकाने बिगुलवर अंत्यसंस्काराच्या वेळी वाजवली जाणारी ‘लास्ट पोस्ट’ ही धून वाजवली. युद्धात पराक्रम गाजवलेला जवान शहीद झाल्यावर तो विश्रांतीसाठी जात असल्याची भावना या धुनीमधून अत्यंत गंभीरपणे प्रतीत होत होती. त्याच वेळी मंत्रोच्चारणात कर्नल महाडिक यांचा मुलगा स्वराज याने अबोध, निरागसपणे पित्याला मुखाग्नी दिला. मुलगी कार्तिकीला आपल्या वडिलांबरोबर काहीतरी अघटित घडले आहे याचा अंदाज आल्याने ती आईला कवटाळून हमसून हमसून रडत हाेती. वातावरण सुन्न झाले होते. याच वेळी ‘माझ्या काळजाचा तुकडा गेला...’ असा हंबरडा संताेष यांच्या अाई कालिंदीबाईंनी फाेडला अन्ी उपस्थितांच्या अश्रूंच्या बांध फुटला. संताेष यांचे बंधू जयवंत, अजय, भगिनी विजया, नातेवाइकांनाही भावना आवरणे अवघड झाले, तर दुसरीकडे संतोष पंचत्वात विलीन झाले. २१ लष्करी जवानांनी प्रत्येकी तीन फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना दिली. माझी मुले देशासाठी देईन, वीरपत्नीचा पर्रीकरांना शब्द संरक्षणमंत्रीमनोहर पर्रीकर यांनी सकाळी आरे येथे जाऊन वीरपत्नी स्वाती यांची भेट घेतली. ‘कर्नल महाडिक यांचे काम अतुलनीय आहे. महाडिक कुटुंबावर आलेला प्रसंग पेलता येणारा आहे, मात्र भारत सरकार, लष्कर आणि देश तुमच्याबरोबर आहे,’ असा विश्वास देत पर्रीकर यांनी महाडिक कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी स्वाती यांनी ‘माझ्या पतीप्रमाणे माझी दोन्ही मुले लष्करातच सेवा करतील,’ असे ठामपणे सांगून कर्नल महाडिक यांनी कुटुंबीयांच्या मनात बिंबवलेल्या देशप्रेमाची जणू साक्षच दिली. पोगरवाडी येथे पालकमंत्री विजय शिवतारे, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे शाहू महाराज, खासदार उदयनराजे भोसले, लष्कराच्या वतीने अॅडमिरल पवार, जिल्हाधिकारी अश्विन मुद््गल तसेच पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मनीगामच्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल संतोष महाडिक शहीद झाले. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील पोगरवाडी गावचे रहिवासी होते. दहशतवादविरोधी लढ्यात यापूर्वी शौर्यपदक देऊन सरकारच्या वतीने त्यांचा गौरवही करण्यात आला होता. दरम्यान, श्रीनगरच्या आर्मी बेस कॅम्पवर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सकाळी ठेवण्यात आले होते. सातारा जिल्ह्यातील मुळागावी त्यांचे पार्थिव आज संध्याकाळी आणले जाणार आहे. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कर्नल महाडिकांच्या नेतृत्वात अशी उघडण्यात आली होती धाडसी मोहिम कुपवाडामधील हाजीनाका जंगलात असलेल्या डोंगराळ भागात काही दहशतवादी दबा धरुन बसले होते. त्यांच्याजवळ मोठा शस्त्रसाठा आणि जिवनावश्यक वस्तू होत्या. काश्मिरसह देशात काही तरी मोठा घातपात करण्याचा त्यांनी कट रचला होता. काही दिवसांपूर्वी याच दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका तुकडीवर हल्ला केला होता. तेव्हापासून हे दहशतवादी लष्कराला चुकवीत होते. या दहशतवाद्यांना शोधण्याची मोहिम 41 राष्ट्रीय रायफल्सला सोपविण्यात आली होती. कर्नल महाडिक हे ४१ राष्ट्रीय रायफल रेजिमेंटमध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. हाजीनाका जंगलातील डोंगराळ भागात अतिशय बिकट परिस्थिती आहे. दाट जंगल, उभे पर्वत, खोल दऱ्या आणि प्रचंड थंडी. दीड दिवसांच्या शोध मोहिमेनंतर महाडिक यांच्या टीमला दहशतवाद्यांचा ठावठिकाणा लागला. त्यांनी दहशतवाद्यांवर जोरदार प्रहार केला. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. यात महाडिक यांनी दहशतवाद्यांना जेरीस आणले. आता दहशतवाद्यांचा खातमा अगदी निश्चित होता. पण एक गोळी महाडिक यांच्या डोक्याला लागली. यात ते जबर जखमी झाले. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आले. लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. धोनीलाही शिकवले पॅराग्लायडिंग पोगरवाडीतील महाडिक कुटुंबीयांचा पारंपारिक दूध विक्रीचा व्यवसाय होता. पण त्यात संतोष यांचे कधी मन रमले नाही. काही तरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसवत नसे. संतोष उत्तम गोलकिपर होते. त्यांना बॉक्सिंग, ट्रेकिंग आणि घोडेस्वारी आवडायची. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला ऑगस्ट महिन्यात पॅराग्लायडिंग शिकवले होते. मित्रांनी जाग्या केल्या आठवणी त्यांच्याबद्दल बोलताना कर्नल गिरी कोल्हे म्हणाले, की संतोषला कधी मरणाची भीती वाटली नाही. देशासाठी सर्वोच्च बलिदान करण्याची त्याची तयारी होती. बऱ्याच वेळा तो तसे बोलूनही दाखवायचा. त्याचे शब्द कधी खरे ठरतील असे मला वाटले नव्हते. सैनिकी शाळेचे मुख्याध्यापक कॅप्टन एस. मुजुमदार म्हणाले, की लष्कराबाबत संतोष कायम उत्साहाने बोलायचा. लष्करात येण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन द्यायचा. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या समारंभासाठी येण्याचे आश्वासन त्याने दिले होते. कर्नल महाडिक यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सध्या त्यांचे कुटुंब काश्मिरातील उधमपूरमध्ये राहायला होते. त्यांचा मुलगा 5 तर मुलगी 11 वर्षांची आहे. का घेतला जातोय दहशतवाद्यांचा शोध - सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी घुसखोरी करुन पाकिस्तानातील काही दहशतवादी काश्मिरमध्ये आले आहेत. काश्मिरमधील घनदाट जंगलांमध्ये त्यांचा शोध घेतला जात आहे. - गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मिरमध्ये घुसखोरीच्या 70 घटना घडल्या होत्या. यात 65 दहशतवादी एलओसी ओलांडण्यात यशस्वी झाले होते. - 2013 मध्ये घुसखोरीच्या 91 घटना घडल्या होत्या. त्यात 97 दहशतवादी भारतीय भूमिवर दाखल होण्यात यशस्वी झाले होते एनडीएमधून प्रशिक्षण महाडिक यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये झाले होते, तर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले होते. एनडीएमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची लष्करात निवड झाली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे

No comments:

Post a Comment