Total Pageviews

Saturday 21 November 2015

UK VISIT -NARENDRA MODI

422मोदी यांच्या ब्रिटन दौर्या पूर्वी भारत-ब्रिटन द्विपक्षीय संबंधांचा विचार करायला हवा. गेल्या दशकभराचा विचार केला, तर ब्रिटनचं भारतावर जणू एकतर्फी प्रेम होतं. भारताकडून ब्रिटनच्या प्रेमाला फारसा प्रतिसाद दिला जात नव्हता. युरोपीय संघांशी भारताचा होणारा व्यापार हा जगाच्या एकूण व्यापाराशी तुलना करता 19 टक्के आहे. त्यातही ब्रिटनचा मोठा वाटा आहे. भारतातील 13 कंपन्यांची ब्रिटनमध्ये मोठी गुंतवणूक असून त्यामुळं ब्रिटिशांना एक लाख दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे, तर ब्रिटनमधील कंपन्यांनी भारतातही मोठी गुंतवणूक केली आहे. त्यात सात लाख भारतीयांना रोजगार मिळाला आहे. गेल्या दहा वर्षांत मात्र दोन्ही देशांतील संबंध फारसे वाढत नव्हते. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून भारतात तीनदा आले, तरीही भारताच्या एकाही पंतप्रधानांनी ब्रिटनला भेट दिली नव्हती. मोदी यांनीही गेल्या पावणेदोन वर्षांत 27 देशांना भेटी दिल्या. भारतात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनीही आतापर्यंत ब्रिटनला भेट देण्याचं टाळलं होतं. या पार्श्वकभूमीवर आता मोदी यांनी दिलेल्या भेटीला आणि तिथं झालेल्या कराराला जास्त महत्त्व आहे. भारत-ब्रिटनमध्ये झालेल्या करारानुसार नऊ अब्ज पौंडाची (सुमारे 92 हजार कोटी रुपयांची) गुंतवणूक होणार आहे. विशेष म्हणजे मोदी यांच्या दौर्या च्या अगोदर भारतातील कररचनेबाबत तसंच येथील कारभाराबाबत टीका झाली होती. तसंच मूळच्या ब्रिटनमधील असलेल्या व्होडाफोन कंपनीला झालेल्या त्रासाबाबत या कंपनीनं टीका केली होती. मोदी यांनी त्यांच्या दौैर्यांच्या अगोदर भारतातील 15 क्षेत्रं थेट परकीय गुंतवणुकीसाठी खुली करून वेगळा संदेश दिला होता. लंडनमधील ऐतिहासिक सभागृहात उद्योजकांशी केलेल्या चर्चेच्या वेळी मोदी यांनी या निर्णयाचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. परदेशी उद्योजकांची भारतातील स्वप्नं करणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी असल्याचं सांगून मोदी यांनी उद्योजकांना आश्व स्त केलं. ज्या व्होडाफोननं भारतातील कररचनेबाबत सरकारविरोधात न्यायालयीन लढे दिले, त्याच व्होडाफोननं भारतात विस्ताराचा एक अब्ज पौंडाचा करार केला. त्याला कारण करार होण्यापूर्वी मोदी यांनी दिलेलं आश्वाजसन कारणीभूत असावं, असं मानायला जागा आहे. भारतातील कररचना पारदर्शक, दीर्घकालीन अंदाज बांधता येऊ शकणारी असेल, असं त्यांनी सांगितलं. लॉजिस्टिक, मनोरंजन तसंच अन्य क्षेत्रातही करार झाले. ब्रिटनमधील उद्योजकांना मोदी यांनी आणखी दोन आश्वा्सनं दिली. त्यात भारतात आता मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकतं. पाश्चिंमात्य राष्ट्रांच्या तुलनेत ते कमी मोबदल्यात मिळू शकतं. दुसरं आश्वािसन अतिशय महत्त्वाचं आहे. ते ब्रिटनमधील उद्योजकांना अधिक भावणारं असावं. जगातील सर्वंच राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांची गती मंदावली आहे. भारत हा जगातील एकमेव सर्वाधिक विकासगती असणारा देश आहे. त्याकडं दुर्लक्ष करणं कोणत्याही देशाला परवडणारं नाही. जागतिक मंदीचं वातावरण असताना भारतातील 40 कोटींचा मध्यमवर्ग कोणत्याही उद्योजकांना भुरळ घालू शकतो. तेच काम मोदी यांनी ब्रिटनच्या दौर्यारत केलं. भारताचे अनेक पंतप्रधान आतापर्यंत ब्रिटनच्या दौर्यािवर जाऊन आले; परंतु त्यापैकी कुणालाही ब्रिटनच्या संसदेत भाषण करता आलं नव्हतं. मोदी यांना ती संधी मिळाली. मोदी हे जगातील सध्याच्या नेत्यांत एकमेव चांगले वाक्पटू आहेत. त्यांची भाषणं सध्या गाजतात. ब्रिटनच्या खासदारही त्यांच्या भाषणावर लुब्ध झाले. फिरक्या घेत, विनोदाची पेरणी करीत त्यांनी या खासदारांना जिंकलं. भारतात किंवा ब्रिटनमध्येही बाहेर काहीही वातावरण असलं, तरी मोदी यांनी सर्वांना जिंकलं.

No comments:

Post a Comment