SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Wednesday, 11 November 2015
दिवाळी बाजारपेठेवर चिनी आक्रमण
दिवाळी बाजारपेठेवर चिनी आक्रमण Tuesday, November 10th, 2015 गेल्या दोन दशकांपासून चिनी घुसखोरी ही फक्त सीमेपुरतीच मर्यादित नाही तर त्यांनी हिंदुस्थानी बाजारपेठाही काबीज करायला सुरुवात केली. सणातील फटाक्यांची मागणी लक्षात घेऊन चिनी फटाके मोठ्या प्रमाणावर हिंदुस्थानी बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत. हिंदुस्थानी फटाक्यांच्या तुलनेत चिनी फटाके सुरक्षिततेच्या तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक धोकादायक आहेत. त्यामुळे हे फटाके आपण टाळावेत. चिनी फटाक्यांवर बंदी आणूनही देशी फटाक्यांच्या बाजारपेठेस १००० कोटींचा तोटा झाला असल्याची माहिती अॅासोचेमने दिली आहे. अॅयसोचेमने सांगितले की, सरकारने बेकायदा फटाके उत्पादकांवर कारवाई केली असून चीनमधून येणार्या फटाक्यांवरही बंदी घातली आहे, पण चीनमधून फटाक्यांची आयात सुरूच आहे. त्यामुळे फटाके उद्योगाला फटका बसला आहे. गेल्या दोन दशकांपासून चिनी घुसखोरी ही फक्त सीमेपुरतीच मर्यादित नाही तर त्यांनी हिंदुस्थानी बाजारपेठाही काबीज करायला सुरुवात केली. सणातील फटाक्यांची मागणी लक्षात घेऊन चिनी फटाके मोठ्या प्रमाणावर हिंदुस्थानी बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत. हिंदुस्थानी फटाक्यांच्या तुलनेत चिनी फटाके सुरक्षिततेच्या तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक धोकादायक आहेत. चिनी फटाक्यांमध्ये क्लोरेट आणि परक्लोरेटचा या विषारी केमिकलचा वापर करण्यात येतो. एकूणच चिनी फटाके बनवताना हलक्या प्रतीचा व हानीकारक कच्चा माल वापरला जात असल्याने ते आपल्या फटाक्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. हिंदुस्थानात फटाक्यांची निर्मिती करताना पोटॅशिअम परक्लोरेटचा वापर करण्यावर बंदी आहे. या कायद्यात काळानुसार बदल होण्याची गरज आहे. जेणेकरून हिंदुस्थानी फटाके जागतिक उत्पादनांशी स्पर्धा करू शकतील. परदेशातून येणार्या कंटेनरची चौकशी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कस्टम विभागाचे रडगाणे असते. बहुतेक माल नेपाळमार्गे किंवा समुद्रमार्गे हिंदुस्थानात येतो. हिंदुस्थान हा सणांचा देश आहे. या वर्षी रक्षाबंधनाकरिता ७५ टक्के राख्या चिनी बनावटीच्या होत्या. गणेशमूर्तीच्या बाजारपेठेत चीनने घुसखोरी पूर्वीच केलेली आहे. मोठ्या प्रमाणात साजर्याट केल्या जाणार्याे उत्सवांना हेरून, आकाशकंदील, दिवे, विविध भेटवस्तूंनी हिंदुस्थानी बाजारपेठ चीनने व्यापली आहे. मागच्या दिवाळीत चिनी विक्रेत्यांनी हिंदुस्थानी बाजारपेठेत १८०० कोटी रुपयांचा नफा कमावला होता. फराळाचे पदार्थ वगळता दिवाळीच्या सर्व वस्तूंमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. ‘मेड इन चायना’ वस्तूंनी हिंदुस्थानात जम बसवला आहे. त्यांनी आतापर्यंत देशी बाजारपेठेतील २०-२५ टक्के वाटा पटकावला आहे. किमती कमी असल्याने हिंदुस्थानी विक्रेते व ग्राहकांची चिनी वस्तूंना पसंती लाभत आहे. हिंदुस्थानी बाजारपेठेत मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून देवांच्या तसबिरी ते पूजेच्या साहित्यापर्यंत चीनची घुसखोरी आहे. आपली बाजारपेठ चिनी वस्तूंनी ओसंडून वाहते आहे. चीन खास हिंदुस्थानकरिता वस्तू बनवून आपल्या लहान, मध्यम उद्योगांना पद्धतशीरपणे बरबाद करत आहे. रंगीबेरंगी बाहुल्या, बॅटबॉल, चावीची खेळणी, टेडीबेअर या सगळ्या आपल्याकडच्या खेळण्यांमध्ये चीनने घुसखोरी करत वर्चस्व निर्माण केले. त्यामुळे हिंदुस्थानी खेळण्यांची मागणी घटली आहे. खेळण्यांचे मार्केट ८० टक्के चिनी बनावटीच्या खेळण्यांनी भरले आहे. ‘सेंटर फॉर सायन्स अॅआण्ड एन्व्हायर्न्मेंट’ प्रमाणे चिनी बनावटीच्या ५७ टक्के खेळण्यांमध्ये प्रमाणाबाहेर विषारी रसायने आढळली होती. पालकांनी एकत्र येऊन या खेळण्यांवर बंदी घालण्यासाठी दबाव आणला पाहिजे. हिंदुस्थानचे याआधीचे ‘बाय चायनीज’ धोरण त्या देशाच्या पथ्यावरच पडत आहे. हिंदुस्थानातील वीज क्षेत्रातील कंपन्या चिनी उत्पादकानुसार बदल करीत आहेत आणि ते हिंदुस्थानी उत्पादकांकडे दुर्लक्ष करीत आहेत. चिनी कंपन्यांसाठी हिंदुस्थान ही मोठी बाजारपेठ बनली आहे. स्वदेशीची भाषा नष्टच झाली आहे. त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे लोकांनी स्वदेशी वस्तूच खरेदी करायला हव्यात दिवाळीतही त्याचेच पालन करायला पाहिजे. चिनी वस्तू या लघुउद्योगांतून बनविल्या जातात. चिनी स्त्रिया या वस्तू घरी बनवतात. त्यामुळे त्यांची किंमत अत्यंत कमी आहे. आपल्या उद्योजकांची मानसिकताच बदलली आहे. चिनी वस्तू जर स्वस्तात मिळतात तर आपण त्या वस्तू कशाला बनवायच्या? या विचाराने आपण चिनी वस्तूंचे कंटेनरच्या कंटेनर खरेदी करतो वा स्मगलिंग करतो, त्यावर आपले लेबल लावतो आणि बाजारात विकतो. त्यात भरपूर पैसे कमावतो. पण यामुळे आपण चिनी अर्थव्यवस्थेला हातभार लावतो आहोत. आपल्याकडे बेकारी वाढलेली आहे. सामाजिक सुरक्षितता धोक्यात येत आहे. चीनशी जर आपल्याला मुकाबला करावयाचा असेल तर आपणही त्यांच्याप्रमाण लघुउद्योग निर्माण करावयाला पाहिजे. त्यासाठी स्वस्तात जागा, भांडवल, कच्चा माल उपलब्ध करून दिले पाहिजे. कर कमी केले पाहिजेत. यामुळे आपणसुद्धा दर्जेदार वस्तू बनवू शकू. मागचे सरकार याबाबत पूर्णपणे निष्क्रिय होते. आता हा सर्व प्रकार रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेऊन हिंदुस्थानी लघुउद्योग उत्पादनाला चालना देण्याची गरज आहे. आज चीन प्रचंड आर्थिक मंदीच्या सावटाखाली आहे. त्यामुळे चीनने त्यांच्या मुद्रेची किंमत ३० टक्के कमी केली आहे. जागतिक अर्थतज्ज्ञांचे मत आहे की, चीन स्वत:च्या उत्पादनांच्या किमती कमी करून आर्थिक मंदीचा सामना करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे हिंदुस्थानी आणि इतर देशांच्या बाजारपेठेत चिनी उत्पादने अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होतील. हीच खरी वेळ आहे चीनला आर्थिकदृष्ट्या झोपवण्याची. ब्रिगेडियर हेमंत महाजन - See more at: http://www.saamana.com/lekh/diwali-bajarpethevar-chini-akraman#sthash.jAJpOZOU.dpuf
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment