Total Pageviews

Friday 28 February 2014

INDIANS VOTE OR BANGLADESHI WILL FORM GOVT

बांगलादेशी हिंदूंची वंचना संपणार कधी? ब्रिगेडियर हेमंत महाजन बाकी देशात मतदारांच्या संख्येत १.५ टक्के वाढ झाली आहे, पण आसामचे मतदार याच काळात १६ टक्के वाढले आहेत. अर्थात ही वाढ बांगलादेशी घुसखोरांमुळे झाली आहे. यामुळेच आज आसामची मुख्य विरोधी पक्ष आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक पक्ष (AUDF) हा बांगलादेशी घुसखोरांचा पक्ष आहे. त्यांचे १८ आमदार आहेत. घुसखोरी अशीच चालू राहिली तर २०२० पूर्वी एक बांगलादेशी आसामचा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे, मात्र बांगलादेशमधून आसाममध्ये आलेल्या १.४३ लाख हिंदूंना अजूनही मतदानाचा अधिकार दिला गेलेला नाही. बांगलादेशातून स्थलांतर करून आलेल्या आणि निर्वासितांच्या छावणीतील हिंदू बांधवांना देशात आसरा देणे आपले कर्तव्य असल्याचे नरेंद्र मोदी यांनी आसाम येथील एका जाहीर सभेत सांगितले. अन्य देशांत अन्यायाला तोंड देत असलेल्या हिंदूंविषयी हिंदुस्थानची निश्‍चितच काही तरी जबाबदारी आहे. अन्याय झालेले हे हिंदू बांधव हिंदुस्थानशिवाय दुसरीकडे कुठे जाणार, असा सवालसुद्धा मोदींनी या सभेत उपस्थित केला. आगामी निवडणुकांमध्ये भाजप सत्तेत आल्यास सरकार या स्थलांतरित हिंदूंना आसरा देईल व त्यांचे योग्यप्रकारे पुनर्वसन करेल असे आश्‍वासन नरेंद्र मोदींनी या सभेमध्ये दिले आहे. सुरुवातीच्या काळात पाकिस्तानातून स्थलांतर करून हिंदुस्थानात आलेले हिंदू राजस्थान आणि गुजरातमध्ये आश्रय घेत होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात या स्थलांतरितांचे देशातील अन्य भागांत पुनर्वसन करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या गेल्या. आसाम सरकार मतांच्या राजकारणासाठी निर्वासितांच्या छावणीतील हिंदूंच्या मानवी हक्कांवर गदा आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. स्थलांतरित हिंदूंना अधिकृतरीत्या मतदान करण्याचा हक्क द्यावा अशी विनंती निवडणूक आयोगाला केली आहे. २०१२ मध्ये झालेल्या जनगणनेची आकडेवारी सरकारने अजून जाहीर केलेले नाही. काही तरी लपवायचा प्रयत्न चालला आहे. आसामच्या वृत्तपत्रांच्या हवाल्यानुसार आसामची ३५-४० टक्के लोकसंख्या बांगलादेशी आहे. बाकी देशात मतदारांच्या संख्येत १.५ टक्के वाढ झाली आहे, पण आसामचे मतदार याच काळात १६ टक्के वाढले आहेत. अर्थात ही वाढ बांगलादेशी घुसखोरांमुळे झाली आहे. यामुळेच आज आसामची मुख्य विरोधी पक्ष आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक पक्ष (ळइ) हा बांगलादेशी घुसखोरांचा पक्ष आहे. त्यांचे १८ आमदार आहेत. घुसखोरी अशीच चालू राहिली तर २०२० पूर्वी एक बांगलादेशी आसामचा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे, मात्र बांगलादेशमधून आसाममध्ये आलेल्या १.४३ लाख हिंदूंना अजूनही मतदानाचा अधिकार दिला गेलेला नाही. त्यासाठी अर्थातच कॉंग्रेसी मुख्यमंत्री तरुण गोगोईंचे सरकारच जबाबदार आहे. १९४७ साली फाळणीनंतर अस्तित्वात आलेल्या पूर्व पाकिस्तानात हिंदूंची संख्या ३४ टक्के होती. त्यानंतर बांगलादेशच्या निर्मितीनंतर ही टक्केवारी घटत गेली. हिंदूंवर सातत्याने होत असलेले अत्याचार, जीवाच्या भयाने झालेली स्थलांतरे असे अनेक मुद्दे ही घट होण्यास कारण ठरले. बांगलादेश सरकारची अधिकृत आकडेवारी आज हिंदू ९ टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे दर्शवते. जे उरले आहेत ते जीव मुठीत धरून ढकलत आहेत. फाळणीनंतर आणि बांगलादेशच्या निर्मितीनंतर इथल्या हिंदूंची आर्थिक स्थिती खालावत गेली आणि जीवनाच्या सर्व अंगांवर त्याचा परिणाम होत गेला. फाळणीच्या वेळी पूर्व पाकिस्तानमधल्या सुमारे ७० टक्के जमिनीवर हिंदूंचा मालकीहक्क होता, मात्र बांगलादेश निर्मितीनंतर ‘एनिमी प्रॉपर्टी ऍक्ट’सारखा भयंकर कायदा अस्तित्वात आला. या कायद्याचा दुरुपयोग करत सुमारे ६२ लाख एकर जमीन सरकारने गिळंकृत केली. हिंदूंच्या जमिनींवर अतिक्रमणेही झाली. ती हताशपणे बघण्यावाचून तेथील हिंदूंपुढे कोणताही पर्याय नव्हता. सरकारच जिथे शत्रू म्हणून अवहेलना करत होते तिथे दाद तरी कोणाकडे मागायची? पिढ्यान्पिढ्या याच प्रदेशात राहत असणार्‍या हिंदूंना शत्रू समजण्याचे आणि त्याबरहुकूम त्यांच्याशी दुर्वर्तन करण्याचे बांगलादेश सरकारचे हे धोरण पूर्णपणे चुकीचे आहे. १९७१ साली पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. या निर्मितीनंतरही हिंदूंच्या वाट्याला आलेले भोग संपलेले नाहीत, वंचना संपली नाही. अलीकडेच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर उसळलेला हिंसाचाराचा आगडोंब आणि हिंदू धर्मीयांची झालेली अमानुष कत्तल त्याची साक्ष आहे. बांगलादेशात हिंदूंच्या मानवाधिकारांचे खुलेआम उल्लंघन होते आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरही अल्पसंख्य हिंदूंना अल्पसंख्याकांचे गार्‍हाणे ऐकून घ्यायला तिथे हिंदुस्थानसारखे अल्पसंख्याक मंत्रालयच अस्तित्वात नाही. शेख हसिना यांच्या मंत्रिमंडळात एकही हिंदू मंत्री नाही. गरज आहे ती तेथील हिंदूंवरील अत्याचार रोखण्याची. त्यासाठी हिंदुस्थान सरकारने बांगलादेशातील सरकारवर दबाव आणावा. हिंदुस्थानकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांना मिळते. ३००० बांगलादेशी विद्यार्थ्यांना या वर्षी शिष्यवृत्ती दिली गेली आहे, मात्र हिंदुस्थानात येणारे सर्व विद्यार्थी हे मुस्लिम धर्मीय आहेत. एकही हिंदू तरुण शिक्षणासाठी हिंदुस्थानात येत नाही. बांगलादेशातील अधिकाधिक हिंदू मुले उच्च शिक्षणासाठी इकडे येतील, यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न व्हायला हवेत. हिंदुस्थानकडून बांगलादेशींना जर शिष्यवृत्ती दिली जाऊ शकते तर ती मुस्लिमांना का, हिंदूंना का नाही, असा सवाल हिंदुस्थान सरकारला केला पाहिजे. बांगलादेशातील हिंदूंना हिंदुस्थानने मदत करायला हवी. तमाम हिंदुस्थानींनी आपला वाटा उचलायला हवा. हिंदूंची अनेक महत्त्वाची मंदिरे बांगलादेशात आहेत. त्यांना भेट देण्यासाठी हिंदुस्थानींनी बांगलादेशात जायला हवे. पर्यटनाच्या माध्यमातून तिथल्या हिंदूंशी स्नेह निर्माण झाला तर त्यांची स्थिती सुधारण्याची आशा करता येईल. hemantmahajan12153@yahoo.co.in

No comments:

Post a Comment