आपल्या देशात कॉंग्रेससह सर्वच बेगडी निधर्मी पक्षांनी मुस्लिमांना ‘मोअर दॅन इक्वल’चा दर्जा कधीच दिला आहे तरीही कॉंग्रेसवाले मुस्लिमांच्या समान संधींचा गळा काढत आहेत ते निव्वळ लोकसभा निवडणुकीतील मतांच्या बेगमीसाठीच. मुस्लिमपे्रमाचा हा ‘कॉंग्रेजी’ पान्हा म्हणजे कॉंग्रेसवाल्यांचे नेेहमीचे पुतनामावशीचे प्रेम आहे हे निदान आता तरी येथील मुस्लिमांनी ओळखावे.
मुस्लिमप्रेमाचा ‘कॉंग्रेजी’ पान्हा!
कॉंग्रेसला मुस्लिमप्रेमाचा उमाळा असाही बारा महिने चोवीस तास येत असतोच. त्यात आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे आणि देशभरात कॉंग्रेस विरोधाची प्रचंड लाट असल्याने तो पक्ष तोंडावर आपटणार हे निश्चित आहे. त्यामुळे निदान परंपरागत मुस्लिम व्होट बँक तरी आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी कॉंग्रेस पक्ष हातपाय मारत आहे. मुस्लिमांसाठी ‘समान संधी आयोग’ स्थापन करण्याचा यूपीए सरकारचा निर्णय हा त्याचाच एक भाग आहे. केंद्र सरकारने गुरुवारी या आयोगाला मंजुरी दिली. हा आयोग म्हणे शिक्षण आणि नोकर्यांमधील मुस्लिमांच्या अनुशेषाचा अभ्यास करणार आहे. थोडक्यात, हा नेहमीप्रमाणे कॉंग्रेसवाल्यांचा ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ अशातलाच प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका आश्वासनाचा तुकडा कॉंग्रेस सरकारने मुस्लिमांपुढे फेकला आहे. आतापर्यंत कॉंग्रेसवाल्यांनी हेच केले आहे आणि येथील मुस्लिमदेखील आजपर्यंत या कॉंग्रेजी नक्राश्रूंना फसत आले आहेत. हा देश हिंदूंचा असला, हिंदू समाज येथे बहुसंख्याक असला तरी कॉंग्रेजी कृपेमुळे लाड होतात ते ‘अल्पसंख्य’ मुस्लिमांचे. येथील मुस्लिम सुशिक्षित, सज्ञान होऊ नये असे कुणीही म्हणणार नाही. किंबहुना, तो
खर्या अर्थाने सज्ञान
व्हावा, देशाच्या मुख्य प्रवाहात त्याने सामील व्हावे आणि राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावून स्वत:चीही उन्नती साधावी. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काळात सोयी-सवलती, राजकीय कृपादृष्टीचा अखंड वर्षाव होत असूनही येथील बव्हंश मुस्लिम समाज धर्मांध मुल्ला-मौलवींच्या, इस्लामी कर्मठपणाच्या आणि ढोंगी राजकारण्यांच्या जोखडातून दूर होण्यास तयार नाही. मागील सहा दशकांत हिंदुस्थानी मुस्लिमांचे कॉंग्रेस व इतर बेगडी धर्मनिरपेक्ष पक्षांनी काय कमी लाड केले! कोट्यवधींचा ‘सच्चर’ आयोगाचा मलिदा मुस्लिमांना दिला गेला, सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षणाचे वायदे केले गेले. एवढेच नव्हे तर धर्मांध मुस्लिमांनी श्रीनगरमध्ये तिरंगा जाळला, घटना पायदळी तुडविली, मुंबईच्या ‘अमर जवान ज्योती’ स्मृतिस्थळाची मोडतोड केली तरी त्याविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत राज्यकर्त्यांनी दाखवली नाही. मात्र कायद्यापासून तुमच्या त्या धर्मनिरपेक्षतेपर्यंत सगळेच दांडपट्टे हिंदूंवर सपासप चालविले जात असतात. ‘या देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क येथील मुस्लिमांचा आहे’ असे या देशाचे खुद्द पंतप्रधानच जाहीरपणे सांगतात. हिंदूंच्या
अमरनाथ यात्रेसाठी सवलती न देणारे
राज्यकर्ते हज यात्रेच्या अनुदानापोटी शेकडो कोटी खर्च करतात. एकीकडे मुस्लिमांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे मदरसे, स्वतंत्र मुस्लिम शाळा, महाविद्यालये, विद्यापीठेही स्थापन करायची. कुठल्याच इस्लामी देशात नाहीत एवढ्या प्रचंड प्रमाणात सवलती आणि मानपान हिंदुस्थानातील मुस्लिमांना वर्षानुवर्षे मिळत आहे. लोकशाहीत सर्व समान असे फक्त म्हणायचे; प्रत्यक्षात हिंदूंना पायाखाली तुडवायचे आणि मुस्लिमांना डोक्यावर बसवून मिरवायचे असेच सर्वत्र सुरू आहे. इंग्रजीमध्ये ‘ऑल आर इक्वल, बट सम आर मोअर इक्वल दॅन अदर्स’ असे एक वाक्य आहे. आपल्या देशात कॉंग्रेससह सर्वच बेगडी निधर्मी पक्षांनी मुस्लिमांना ‘मोअर दॅन इक्वल’चा दर्जा कधीच दिला आहे. मुस्लिमांचे नेते, मुल्ला-मौलवी तर तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क असल्याच्या मिजाशीतच वागत असतात. तरीही कॉंग्रेसवाले मुस्लिमांच्या समान संधींचा गळा काढत आहेत ते निव्वळ लोकसभा निवडणुकीतील मतांच्या बेगमीसाठीच. मुस्लिमप्रेमाचा हा ‘कॉंग्रेजी’ पान्हा म्हणजे कॉंग्रेसवाल्यांचे नेेहमीचे पुतनामावशीचे प्रेम आहे हे निदान आता तरी येथील मुस्लिमांनी ओळखावे
No comments:
Post a Comment