लॉगिन I रजिस्टर I ई-पेपर I भारत वाणी I सायकल रॅली
Tarun Bharat Like Minded
Updated at: 25/02/2014 01:18:18
मुख्य पृष्ठआमच्याबद्दलतभा परिवारजाहिरातवितरण संपर्क करीयर मागील अंक
तुमचे शहर निवडा -- शहर -- नागपूर अमरावती यवतमाळ अकोला वाशीम बुलढाणा खामगाव वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपुर गडचिरोली मुंबई पुणे
काश्मिरात सात अतिरेक्यांना कंठस्नान
तारीख: 24 Feb 2014 21:27:08
लष्कराची मोठी कारवाई
सहा तासांपर्यंत सुरू होती चकमक
वृत्तसंस्था
श्रीनगर, २४ फेबु्रवारी
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील दर्दपुरा भागात लष्करी जवानांनी आज एका भीषण चकमकीत पाकधार्जिण्या सात अतिरेक्यांना कंठस्नान घातले. त्यांच्याजवळून अत्याधुनिक शस्त्रे व स्फोटकांचा प्रचंड साठा ताब्यात घेण्यात आला.
लोलाब भागातील दर्दपुरा येथे अतिरेकी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर गस्तीवर असलेल्या लष्करी जवानांनी या भागाची चौफेर नाकेबंदी केली. जवानांना पाहताच अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांनीही गोळीबार केला. दुपारी अडीचच्या सुमारास उडालेली ही चकमक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. लष्कराने केलेली यावर्षीची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
मोठ्या संख्येत असलेल्या अतिरेक्यांचा हल्ला परतावून लावताना जवानांनी सात अतिरेक्यांना यमसदनी धाडले. या भागात आणखीही काही अतिरेकी लपले असल्याची शक्यता असून, त्यांचा मुकाबला करण्यासाठी जवानांची अतिरिक्त कुमक येथे दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी सात अतिरेक्यांचे मृतदेह आढळून आले, तिथेच मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारुगोळा आणि शक्तिशाली स्फोटकेही आढळून आली. सर्व शस्त्रे व स्फोटके जवानांनी ताब्यात घेतली आहे, असे प्रवक्ता म्हणाला.
या अतिरेक्यांनी अलीकडेच पाकव्याप्त काश्मिरातून भारतात घुसखोरी केल्याची माहिती आहे. भारतात मोठे हल्ले करण्यासाठी ते आपल्या स्थानिक साथीदारांसोबत संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते. पण, त्याआधीच त्यांच्याबाबतची माहिती मिळाल्याने, त्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले, असे प्रवक्त्याने सांगितले
No comments:
Post a Comment