स्वामी असीमानंद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, समझोता एक्स्प्रेस, गृहमंत्री शिंदे ,भागवतांनी बॉम्ब फोडले!- सामना अग्रलेख
सीमेवर हिंदुस्थानी जवानांची मुंडकी उडवून देशाचा स्वाभिमान खतम करणार्या पाकड्या सैनिकांना अद्दल घडवायची हिंमत सत्ताधार्यांमध्ये नाही, पण मुसलमानी मतांसाठी हिंदूंना दहशतवादी ठरविण्याचे कारस्थान मात्र रटारटा शिजवले जात आहे. सरसंघचालकांनी ‘बॉम्बस्फोट’ घडविण्यास मान्यता दिली असा ‘पादरा’ स्फोट घडवून कॉंग्रेसवाले स्वत:ची उरलीसुरली लाजदेखील घालवून बसले आहेत.
म्हणे, भागवतांनी बॉम्ब फोडले!
पादर्यांचा स्फोट!!
लोकसभा निवडणुका जशा जवळ येतील तशा कोणत्या कटकारस्थानांचे फुसके स्फोट होतील ते सांगता येत नाही. असे फुसके स्फोट घडवून प्रतिक्रियांचा गडगडाट करणे हे तर हिंदुत्व विरोधकांचे कामच आहे. आताही कुठल्याशा एका इंग्रजी ‘मॅगझिन’ (मासिक हो!) मध्ये कुण्या एका स्वामी असीमानंदांची अती अती अती खळबळजनक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे व या खळबळजनक मुलाखतीने कॉंग्रेससह हिंदुत्ववाद्यांचे अनेक दुश्मन बेहद्द खूश झाले आहेत. समझोता एक्स्प्रेस, हैदराबादेतील मक्का मशीद आणि अजमेर दर्गा येथे झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना माहिती होती. मुस्लिम स्थळांवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या योजनेला त्यांनीच संमती दिली होती, असा दावा म्हणे या स्वामींनी या मुलाखतीत केला आहे. ही मुलाखत प्रसिद्ध होताच देशाच्या गृहमंत्र्यांनी जाहीर केले की, असीमानंदांच्या आरोपात तथ्य असू शकते. शिंदे यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे व हिणकस आहे. असीमानंद यांची मुलाखत व त्यानंतर निर्माण केलेली वावटळ म्हणजे एक राजकीय बनाव आहे. हिंदू- मुसलमानांत भानगडी लावून देशात दंगलीची परिस्थिती निर्माण करण्याचे हे कारस्थान आहे. असीमानंद यांच्या नावाने छापलेली मुलाखत खरी आहे काय? हा पहिला प्रश्न. असीमानंद यांची मानसिक स्थिती मुलाखत देण्याइतपत ठीकठाक आहे काय? हा दुसरा प्रश्न. समझोता एक्स्प्रेस प्रकरणात यापूर्वी असीमानंद यांना आरोपी केलेच होते व त्यांना प्रचंड यातना देऊन छळ करून
तपास यंत्रणांनी जे निर्घृण अत्याचार केले
त्यामुळे असीमानंद हे जवळजवळ गलितगात्रच झाले, पण पोलिसांच्या तपासात असीमानंद यांनी अशा प्रकारची कोणतीही माहिती दिल्याचा पुरावा नाही. त्यामुळे एका ‘मॅगझिन’मध्ये जे आले त्यावर विश्वास कसा ठेवायचा? अशा प्रकारची कोणतीही मुलाखत असीमानंद यांनी दिली नसल्याचा खुलासा त्यांच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे कॉंग्रेस, डावे, बेगडी निधर्मीवादी या देशात किती खोटारडे राजकारण करीत आहेत हे कळून येईल. यापूर्वी गृहमंत्री शिंदे यांनी संघपरिवार, हिंदुत्ववादी संघटना दहशतवादी शिबिरे चालवीत असल्याचा भन्नाट आरोप केला होता. अर्थात त्यानंतर त्यांना माघारच घ्यावी लागली. संघ परिवार जर दहशतवादी प्रशिक्षणाची शिबिरे चालवीत असल्याचा साक्षात्कार या सरकारला होत असेल तर मग हिंदुस्थानात उच्छाद मांडणार्या अल कायदा, लष्कर-ए-तोयबा, सीमी, आयएसआयसारख्या हिरव्या संघटना इकडे काय आरोग्य शिबिरे, चष्मावाटप शिबिरे आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करून समाजसेवा करीत आहेत काय? याचे उत्तर सरकारने द्यायला हवे. ‘२६/११’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात काही पोलीस अधिकार्यांना मरण पत्करावे लागले, पण दिग्विजय सिंगसारख्या लोकांनी त्यांच्या वीरमरणाचेही राजकीय भांडवल केले व या हत्या हिंदुत्ववादी संघटनांनीच घडवून आणल्याचे बकवास विधान केले. हा तर
भंपकपणाचा कळसच
म्हणावा लागेल. कसाब व त्याच्या पाकिस्तानी टोळीस हिंदुत्ववाद्यांनीच सुपारी दिली व दाऊद इब्राहिम याने कराचीत संघाची शाखा सुरू केली आहे, असे विधान त्यावेळी कुणी केले असते तरी आम्हास आश्चर्य वाटले नसते. आता तर हे लोक असेही म्हणू लागतील की, अफझल गुरू व त्याच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला होता तो अटलबिहारी वाजपेयींची मंजुरी घेऊनच! राजकीय स्वार्थ, बेगडी धर्मनिरपेक्षता आणि हिंदूद्वेषाने आंधळी झालेली ही भंपक मंडळी या देशाला सर्व बाजूंनी रसातळाला नेण्याचेच काम करीत आहे. वास्तविक, हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्वाचा विचारच देशाला तारू शकतो. राष्ट्रवादी मुसलमानांनी आता तरी राष्ट्रीय प्रवाहात सामील होऊन या देशातील मुस्लिमांचा फक्त ‘खेळणे’ म्हणून वापर करणार्या कॉंग्रेससारख्या पक्षांना धडा शिकविण्याची गरज आहे. सीमेवर हिंदुस्थानी जवानांची मुंडकी उडवून देशाचा स्वाभिमान खतम करणार्या पाकड्या सैनिकांना अद्दल घडवायची हिंमत सत्ताधार्यांमध्ये नाही, पण मुसलमानी मतांसाठी हिंदूंना दहशतवादी ठरविण्याचे कारस्थान मात्र रटारटा शिजवले जात आहे. सरसंघचालकांनी ‘बॉम्बस्फोट’ घडविण्यास मान्यता दिली असा ‘पादरा’ स्फोट घडवून कॉंग्रेसवाले स्वत:ची उरलीसुरली लाजदेखील घालवून बसले आहेत. अशा कोडग्यांचा धिक्कार करून तरी काय उपयोग
No comments:
Post a Comment