Total Pageviews

Wednesday, 17 July 2013

CHINA PUMPS FAKE CURRENCY NOTES INTO INDIA

बनावट नोटांची ‘घुसखोरी’ घुसखोरी, हेरगिरी, सायबर घुसखोरी, हॅकिंग, नक्षलवादी-माओवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि पैशांची छुपी मदत अशा गोष्टी चीन करीत असतोच. त्यात बनावट नोटांच्या घुसखोरीचीही भर पडली. चीन काय किंवा पाकिस्तान काय, दोन्ही देशांचे शेपूट हिंदुस्थानबाबत नेहमीच वाकडे राहिले आहे. पुन्हा चिनी माकडे आणि पाकडे यांच्यापुढे शेपूट हलविण्याची आमच्या राज्यकर्त्यांचीही सवय गेलेली नाही. पंडित नेहरूंच्या कॉंग्रेसपासून आताच्या सोनिया मॅडमच्या कॉंग्रेसपर्यंत प्रत्येक सरकारने ना चिनी ड्रॅगनचे शेपूट आवळले ना पाकड्यांचे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांच्या हिंदुस्थानविरोधी कारवाया सुरूच असतात. मग ती घुसखोरी असेल, नाही तर हिंदुस्थानी भूभाग हडप करणे असेल. वास्तविक, चीनमध्येही इस्लामी दहशतवाद्यांची, धर्मांधांची डोकेदुखी वाढत आहेच पण हिंदुस्थान हा ‘समान शत्रू’ असल्याने चीन आणि पाकिस्तान हिंदुस्थानविरोधी कारस्थाने हातात हात आणि गळ्यात गळे घालून करीत असतात. आता तर बनावट हिंदुस्थानी नोटांच्या ‘घुसखोरी’तही चीनने पाकड्यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणण्यासाठी चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याची माहिती हिंदुस्थानी गुप्तचर संस्थांना मिळाली आहे. अमली पदार्थांचे व्यापारी, तस्कर, दहशतवादी, शेजारी देशांमधून हिंदुस्थानात येणारे गरीब घुसखोर अशा विविध मार्गांचा वापर बनावट नोटा हिंदुस्थानात पाठविण्यासाठी केला जात आहे. म्हणजे आतापर्यंत पाकिस्तानातील कराची आणि लाहोर हे हिंदुस्थानी बनावट नोटांचे उगमस्थान होते, मात्र आता त्यात चीनच्या हॉंगकॉंग आणि झिंजियांग या शहरांचीही भर पडली आहे. घुसखोरी, हेरगिरी, सायबर घुसखोरी, हॅकिंग, नक्षलवादी-माओवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि पैशांची छुपी मदत अशा गोष्टी चीन करीत असतोच. त्यात बनावट नोटांच्या घुसखोरीचीही भर पडली. हिंदुस्थानी भूभागच नव्हे तर हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेवरही ‘डल्ला’ मारण्याचा चिनी माकडांचा हेतू या नवीन खेळीमागे आहे. हिंदुस्थानचा सुमारे ४३ हजार १८० चौरस किलोमीटर भूभाग यापूर्वीच चीनने बळजबरीने घशात घातला आहे. हिंदुस्थान-चीन सीमा प्रश्‍नाचे भिजत घोंगडे अडीच दशकांपासून तसेच आहे. आमचे राज्यकर्ते पाकिस्तानप्रमाणेच चिन्यांबाबतही कचखाऊ असल्याने ‘चोर तो चोर वर शिरजोर’ या पद्धतीने चीन आपल्याशी वागत असतो. म्हणजे आधी पाकिस्तान, नंतर बांगलादेश आणि आता चीन असे सगळेच बनावट नोटांच्या माध्यमातून हिंदुस्थानी अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे उद्योग ‘एकदिलाने’ करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी बनावट नोटांची तस्करी बांगलादेशमार्फत होत होती. या नोटांची फॅक्टरी बांगलादेशात असल्याचे उघड झाले होते. म्हणजे जी तस्करी पूर्वी नेपाळमार्गे होत असे ती आता बांगलादेश, चीनमार्गे होत आहे. आमचे राज्यकर्ते मात्र आजही ‘हिंदी-चिनी भाई भाई’च्या हँगओव्हरमधून बाहेर आलेले नाहीत. ‘चायना मेड’ उत्पादनांमार्फत हिंदुस्थानी बाजारपेठ काबीज करायची, माओवादी-नक्षलवाद्यांमार्फत हिंदुस्थानच्या अंतर्गत सुरक्षेला सुरुंग लावायचा, सीमा भागात घुसखोरी करून सीमा वाद तापवत ठेवायचा, नेपाळसह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या हिंदुस्थानच्या शेजारी राष्ट्रांना कवेत घेऊन हिंदुस्थानची नाकाबंदी करण्याचे डावपेच लढायचे आणि आता बनावट नोटांची ‘घुसखोरी’ करीत आमच्या अर्थव्यवस्थेलाही ‘लक्ष्य’ करायचे. चिनी माकडांचे हे उपद्व्याप वाढतच चालले आहेत आणि आमचे राज्यकर्ते फक्त चीनचे दौरे करण्यात समाधान मानत आहेत. चीन कुरापतखोर आहेच. त्यामुळे आपणही कुरापतखोर व्हावे असे नाही. मात्र चिन्यांच्या कुरापती आणि उचापतींना लगाम घालण्याचे धाडस आमचे राज्यकर्ते आता तरी दाखविणार का, हाच खरा प्रश्‍न आहे. आज देशभरात अनेक ठिकाणी बनावट नोटा चलनात आहेत. या बनावट नोटा पसरवणारी टोळी ही अत्यंत सफाईदारपणे या नोटा बाजारपेठेत चलनात आणते. देशातील या बनावट नोटांवर भाष्य करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव म्हणाले, ”बनावट नोटांचा देशात सर्वत्रच सुळसुळाट सुरू आहे, ही बाब खरी आहे. बँकिंग तंत्रात बनावट नोटांची घुसखोरी मोठ्या प्रमाणावर झाली असून, ती रोखण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये विशेष पोलिस यंत्रणा स्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे.” ते इंदौर येथे पत्रकारांशी बोलत होते. या विशेष पोलिसांना बनावट नोटांसंदर्भात प्रशिक्षण देखील देण्याची आवश्यकता आहे, तसेच वाढत्या चिटफंड, तसेच बोगस वित्तीय संस्थांवर नियंत्रण मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुब्बाराव म्हणाले, ”विशेषतः ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांनी जास्त व्याजदर किंवा मोठी रक्कम परतफेडीत मिळेल, या आमिषापोटी फसवणूक करणार्‍या अर्थ संस्थांपासून लांब राहिल्यास आर्थिक फसवणुकीचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळण्याची शक्यता आहे.”

No comments:

Post a Comment