Total Pageviews

Sunday 28 July 2013

PATRIOTSM WHAT IT MEANS

राष्ट्रभक्तीची सच्ची भावना रुजविण्याचा प्रयत्न करणे जरुरी६०५
स्वातंत्र्य
मिळाले आणि तेव्हापासून अनेक व्याख्यांचं स्वरूप बदलायला लागलं. प्रभात फेऱ्या काढणं, राष्ट्रभक्तीपर गीतं म्हणणं, सत्याग्रह, सूतकताई, प्रसंगी ब्रिटिश सरकारच्या पोलिसांच्या लाठ्या खाणं, तुरुंगात जाणं, साधी रहाणी स्वीकारणे, ग्रामोद्धार, अबलोद्धार, अस्पृश्योद्धार इत्यादींसाठी काम करणे ही स्वातंत्र्याआधीची देशभक्ती होती. सरकारी नोकरी करणं हीही त्यावेळी देशभक्तीच होती. सध्या देशप्रेम हे आपण केवळ सोयीने वापरण्याची, स्वातंत्र्य सैनिक आणि लष्करावर सोपवलेली बाब आहे. आजच्या काळात तुम्ही देशभक्तीची व्याख्या कशी कराल?'कोणत्याही भारतीयास देशभक्ती शिकविण्याची गरज नाही. परंतु, आपल्या भारतामध्ये देशभक्तांचे काही प्रकार आहेत. ज्याला आपण देशभक्ती म्हणतो, त्याचा आणि आपल्या दैनंदिन आयुष्याचा संबंध असा कितीसा असतो? देशभक्ती या शब्दाचं वजन आपण कोणत्या मापात तोलतो, हे तपासून पाहण्याची गरज आहे. अनेक वेगवेगळ्या रंगीत समस्या समोर असताना आपण देशभक्ती या संकल्पनेचा अर्थ काय लावतो, हे पाहिल्याखेरीज या समस्यांच्या निराकरणासाठी अत्यंत आवश्यक असणारं "देशभक्तीचं टॉनिक' उपलब्ध होणार नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. नक्की काय केलं म्हणजे माणूस देशभक्त होतो,हे पहाणे आवश्यक आहे. भारताने पाकिस्तानला क्रिकेटच्या सामन्यात हरवले (किंवा हल्ली ऑस्ट्रेलियाला!) की आपल्या देशावरील प्रेमाला उधाण येते. या देशाच्या सर्व समस्या जणू सुटल्या आहेत, उत्साहाला सीमा रहात नाही, चर्चा होते, घोषणा होतात, आरोळ्या दिल्या जातात, गाणी वाजतात, नाच होतो, देशावरील आपले प्रेम सगळ्या जगाच्या निदर्शनास येते. भारतामध्ये चित्रपटामधून देशभक्ती शिकविण्याची एक पद्धत आहे. "बॉर्डर' पाहिला, की आपण सैनिक होतो, "रंग दे बसंती' पाहिला की व्यवस्थेवर बोलायला आपण पात्र ठरतो,
देशभक्तांचा प्रकार मेणबत्त्या लावण्यापासून ट्वीटर आणि फेसबुक वापरण्यापर्यंत वेगवेगळी देशभक्तीची कर्तव्ये बजावताना दृष्टीस पडतो आहे. कुठे लोकपाल आंदोलनासाठी मेणबत्त्या लावा, कुठे मुक्या प्राण्यांसाठी मेणबत्त्या लावा, कुठे शहिदांसाठी मेणबत्त्या लावा, मेणबत्त्या मात्र पेटल्या पाहिजेत, भाषणे झाली पाहिजेत.
मेणबत्त्या लावून देश सुधारणार नाही, चित्रपट पाहून देश सुधारणार नाही, क्रिकेट पाहून तर आशाच नको.आपापलं काम व्यवस्थित करणं हीच देशभक्ती ' प्रत्येकाने आपापलं काम व्यवस्थित करणं हीच आजच्या काळातली देशभक्ती आहे.ज्यानं त्यानं आपापलं काम व्यवस्थित करणं म्हणजे काय करणं? साध्या साध्या हजारो कामांची यादी करता येईल. रस्त्यानं नीट आणि वेग मर्यादित ठेवून वाहन चालवणं, रस्ता क्रॉस करणाऱ्यांना रस्ता ओलांडू देणं, आपल्या वाहनाची धडक बसून कोणी पडणार नाही, जखमी होणार नाही, मरणार नाही अशी सावधगिरी बाळगणं, रस्त्यांवरचे दिवे लावणं आणि सूयोर्दयाला ते बंद करणं, शिक्षकांनी नीट शिकवणं, परीक्षकांनी उत्तरपत्रिका नीट तपासून परीक्षांचे निकाल वेळच्या वेळी लावणं, सरकारी कार्यालयातली काम नियमानुसार करणं, लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे, अशी पाटी सरकारी कार्यालयात लावण्याची पाळी येणं, अचानक संप अथवा बंद पुकारून सामान्य माणसांना वेठीला धरणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामं भराभर संपवणं, मंत्री वगैरे लोकांनी 'वरकमाई' चा मोह धरणं, अर्थमंत्र्यांनी निवडणुकीकडे लक्ष ठेवून अर्थसंकल्प बनवणं, अशी हजारो कामेरस्त्यावरील
सिग्नल पाळणं ही देशभक्ती आहे, रस्त्यावर थुंकणं ही देशभक्ती आहे, स्त्रियांचा आदर करणं ही देशभक्ती आहे, दिलेला शब्द पाळणं ही देशभक्ती आहे, दिलेली वेळ पाळणं ही देशभक्ती आहे, भ्रष्टाचारास उत्तेजन देणं ही देशभक्ती आहे, लाच देणं ही देशभक्ती आहे, सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं ही देशभक्ती आहे, आपल्याआधी लोकांचा विचार, ही देशभक्ती आहे, रस्त्यावरील वाहतूक अडवून लग्नाच्या मिरवणुकीत नाचणं ही देशभक्ती आहे, चूक मान्य करणं ही देशभक्ती आहे, जात आणि प्रांतीयवादाचा पुरस्कार करणं ही देशभक्ती आहे, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं ही देशभक्ती आहे, मतदान करणं ही देशभक्ती आहे, योग्य उमेदवार निवडणं ही देशभक्ती आहे, स्वत:च्या क्षेत्रामध्ये वैध मार्गानं यशस्वी होणं, ही देशभक्ती आहे, वाद घालता काम करणं ही देशभक्ती आहे, इतिहासापासून शिकणं ही देशभक्ती आहे, गतकालातील गोष्टींवर वाद घालणं ही देशभक्ती आहे, स्वत:च्या कर्तव्यांप्रती जागरूक असणं ही देशभक्ती आहे, महाराज-बाबा-नेते-अभिनेते-कार्यकर्ते-पक्ष-धर्म-विचारसरणी अशा कोणाचेही स्तोम माजवणं ही देशभक्ती आहे, चांगल्या कामात कोलदांडा घालणं ही देशभक्ती आहे, स्वत:पलीकडे पाहणं ही देशभक्ती आहे आणि खरं सांगायचं तर "सुजाण नागरिक' बनण्याचा प्रयत्न करणं ही देशभक्तीच आहे. ज्या देशामधील नागरिक देशाचे नागरिक म्हणून घेण्यास पात्र असतात, त्या देशाला प्रगती करण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नसते. रस्त्यात अपघात घडला तर जखमी माणसाला तडफडून मरू न देणे,ही देशभक्ती आहे

No comments:

Post a Comment