SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Saturday, 20 July 2013
CHINA FAKE INDIAN CURRENCY
पाकिस्तान चीनची भारतात बनावट नोटांची ‘घुसखोरी’
घुसखोरी, हेरगिरी, सायबर घुसखोरी, हॅकिंग, नक्षलवादी-माओवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि पैशांची छुपी मदत अशा गोष्टी चीन करीत असतोच. त्यात बनावट नोटांच्या घुसखोरीचीही भर पडली. चीन काय किंवा पाकिस्तान काय, दोन्ही देशांचे धोरण भारताबाबत नेहमीच वाकडे राहिले आहे. १९४७ पासुन पाकिस्तान आणि चीन यांच्या भारताविरोधी कारवाया सुरूच असतात. मग ती घुसखोरी असेल, नाही तर भूभाग हडप करणे असेल. वास्तविक, चीनमध्येही इस्लामी दहशतवाद्यांची, धर्मांधांची डोकेदुखी वाढत आहेच पण भारत हा ‘समान शत्रू’ असल्याने चीन आणि पाकिस्तान भारतविरोधी कारस्थाने हातात हात आणि गळ्यात गळे घालून करीत असतात. आता तर बनावट भारतिय नोटांच्या ‘घुसखोरी’तही चीनने पाकच्या पावलावर पाऊल टाकले आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणण्यासाठी चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याची माहिती भारतिय गुप्तचर संस्थांना मिळाली आहे. अमली पदार्थांचे व्यापारी, तस्कर, दहशतवादी, शेजारी देशांमधून भारतात येणारे घुसखोर अशा विविध मार्गांचा वापर बनावट नोटा भारतात पाठविण्यासाठी केला जात आहे. आतापर्यंत पाकिस्तानातील कराची आणि लाहोर हे भारतिय बनावट नोटांचे उगमस्थान होते, आता त्यात चीनच्या हॉंगकॉंग आणि झिंजियांग या शहरांचीही भर पडली आहे.
पाकिस्तान पाठोपाठ आता चीन
आज देशभरात अनेक ठिकाणी बनावट नोटा चलनात आहेत. या बनावट नोटा पसरवणारी टोळी ही अत्यंत सफाईदारपणे या नोटा बाजारपेठेत चलनात आणते. देशातील या बनावट नोटांवर भाष्य करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव म्हणाले, बनावट नोटांचा देशात सर्वत्रच सुळसुळाट सुरू आहे, ही बाब खरी आहे. बँकिंग तंत्रात बनावट नोटांची घुसखोरी मोठ्या प्रमाणावर झाली असून, ती रोखण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये विशेष पोलिस यंत्रणा स्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे.या विशेष पोलिसांना बनावट नोटांसंदर्भात प्रशिक्षण देखील देण्याची आवश्यकता आहे.
लेह-लडाख आणि ईशान्य भारतातील नागरिकांसारखीच चेहरेपट्टी असलेल्या चिनी नागरिकांचाही बनावट नोटा भारतात पाठवण्यासाठी उपयोग करुन घेतला जात आहे.भारतीय गुप्तचरांनी दिलेल्या माहितीआधारे बिरगंज येथे रणजीत झा याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये लपवलेल्या तब्बल ३० लाखांच्या बनावट नोटा सापडल्या. या सर्व नोटा त्याला हाँगकाँगमधून पाठवण्यात आल्या होत्या. आतापर्यंतच्या तपासातून पाकिस्तानातील कराची, लाहोर तर चीनच्या हाँगकाँग आणि झिंजियांगमधून मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा भारतात पाठवल्या जात आहे.
एका केंद्रावरच ३२ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त
यावर्षी या विषयाकडे लक्ष वेधले जाण्याचे मुख्य कारण म्हणजे दिल्लीच्या एका केंद्रावरच ३२ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त होणे. हे कार्यालय संसद मार्गावर आहे व त्याचे नियंत्रण दिल्ली पोलिसांच्या वतीने करण्यात येते. गेल्यावर्षी शासनाच्या सर्व केंद्रामधून जमा झालेली रक्कम सतरा कोटी व यावर्षी पहिल्याच महिन्यात जमा झालेली रक्कम ३२ लाख रुपये. देशातील सर्व ठिकाणी म्हणजे निरनिराळ्या बँकांमधून जमा झालेले बनावट नोटांचे आकडे गोळा करण्याचे काम सुरु आहे.या केंद्रात नोटांची परीक्षणे चालतात. हजारो एटीएम व चार हजार ठिकाणी सेंटरमधून काही अब्ज रुपयांचा व्यवहार चालतो. नोटांच्या अर्धवट व सदोष चाचणीमुळे या नोटा पकडल्या जात नाहीत.तेलगीच्या काळात पाकिस्तानने नोटापेक्षाही अधिक मुद्रांक म्हणजे स्टॅपपेपर भारतात घुसविले आहेत. याबाबत नोटांवरील खुणांचे विश्लेषकाचे म्हणणे असे की, भारतातील नोटांच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने पाकिस्तानने भारतीय नोटांची छपाई केली आहे. सर्वसामान्यपणे भारतीय नोटेपेक्षा पाकिस्तानात तयार झालेली नोटच अधिक चांगली वाटते. जगात आज जेथे म्हणून भारताच्या बनावट नोटा तयार करण्याचा प्रयत्न झाला त्यात अजून कोठेही न ओळखता येणारी बनावट नोट तयार झालेली नाही. म्हणजे बनावट नोट नक्की ओळखता येते. तरीही भारताच्याच चलनात आज सर्वात अधिक बनावट नोटांची घुसखोरी झाली आहे.पाक आणि चीनच्या या हालचाली पाहता भारतापुढचे बनावट नोटांचे आव्हान दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे गृह आणि संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
देशद्रोह्यांच्या सहकार्यामुळेच भारतीय नोटांच्या साच्यांची नक्कल
अलिकडेच दिल्लीत ३७ लाख रुपयांच्या बनावट भारतीय नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. जप्त केलेल्या रकमेत हजाराच्या अनेक बनावट नोटा होत्या. या जप्ती नंतर थोड्याच दिवसांत भारत-नेपाळ सीमेवर आणखी ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. चीनमधून पाठवण्यात आलेल्या या नोटा नेपाळमार्गे तस्करी करुन भारतात आणण्यात आल्या होत्या. भारतीय नोटांच्या निर्मितीत देशद्रोह्यांची घुसखोरी झाली आहे. देशद्रोह्यांच्या सहकार्यामुळेच पाकिस्तानने भारतीय नोटांच्या साच्यांची नक्कल तयार केली आणि मोठ्या प्रमाणावर बनावट भारतीय नोटा छापल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.बनावट नोटांच्या प्रकरणात सीबीआय देशभर चौकशी करत आहे. या चौकशीसाठी सीबीआयने नोटांची निर्मिती प्रक्रिया समजून घेतली आहे. या चौकशीअंती सीबीआयचे पथक नोटांच्या निर्मितीत देशद्रोह्यांची घुसखोरी झाल्याच्या निष्कर्षावर आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नोट निर्मितीसाठी २००५ मध्ये नव्याने मंजूर केलेल्या साच्यांची पाकने देशद्रोह्यांच्या मदतीने नक्कल तयार केली आहे. हे नक्कल केलेले साचे वापरुन पाकने बनावट नोटा छापायला सुरुवात केली असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीतून पुढे आल्याचे सीबीआयने सांगितले.बनावट नोटांच्या प्रकरणात सीबीआयच्या नेतृत्वाखाली केंद्रीय महसूल गुप्तचर (डीआरआय), रिझर्व्ह बँकेचे निवडक अधिकारी आणि सीएफएसएल यांचे विशेष पथक संयुक्तपणे चौकशी करत आहे.
अर्थव्यवस्था अस्थिर करण्याच्या उद्देशाने चीनमार्गे भारतात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पाठवण्यात येत आहेत, अशी माहिती रॉ, आयबी, महसूल गुप्तचर विभाग व सीबीआयकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या अहवालात देण्यात आली आहे. भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी चीनसह सात देशांतून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा भारतात पाठवल्या जात आहेत. यात बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, नेपाळ, थायलंड, मलेशिया व श्रीलंका आदी देशांचा समावेश आहे. गुप्तचर यंत्रणेने नेपाळच्या मदतीने दोन दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी नागरिकाला काठमांडूत अटक केली. त्याच्याकडून ५५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्या नोटा चीनमार्गेच आणल्या गेल्या होत्या.चीनच्या माध्यमातून दक्षिण-पूर्व आशियाई देशांत अमली पदार्थांची तस्करी केली जाते. याच मार्गाने आता बनावट नोटा पाठवून भारतीय विकासात अडथळे आणण्याचा उद्योग केला जात आहे. थायलंडचे ऑपरेटर खूप चांगल्या प्रकारे बनावट बनवू शकतात. तेथून त्या नोटा चीनमार्गे भारतात पाठवल्या जात आहे.
पाकिस्तान चिनने बनवले बनावट नोटांचे आंतरराष्ट्रीय जाळे
पाकिस्तानात बनावट नोटा छापल्या जातात व सात देशांमधील ऑपरेटर्सच्या माध्यमातून वितरित केल्या जातात. वेगवेगळ्या मार्गांनी या नोटा भारतात पाठवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात. देशातील विविध भागांत दडून बसलेले एजंट या नोटा बाजारात पेरतात. सहा देशांतील २८ गँगस्टर्स बनावट नोटांचे जागतिक जाळे संचालित करत आहे.
बांगलादेशातील घुसखोर बनावट चलनाचा वापर सर्वप्रथम येथील नागरिकत्त्व मिळवण्यासाठी करत आहे.पडकल्या गेलेल्या काही बांगलादेशी नागरिकांकडून पोलिस चौकशीत ही माहिती मिळाल्यानंतर तपास यंत्रणांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे.जागतिकपातळीवरील बनावट नोटांचा अभ्यास करणारया संस्था व महत्त्वाच्या नियतकालिकांनी भारतातील बनावट नोटांचा आकडा १२० लक्ष कोटीचा सांगितला आहे. प्रत्यक्षात भारतात वर्षाला काही कोटी रुपयेही सापडेनासे झाले आहेत. गेल्या एकाच महिन्यात संसद मार्गावर दिल्ली पोलिसांनी उघडलेल्या विशेष बनावट चलन तपासणी केंद्रात ३२ लाख रुपयांचे बनावट चलन जमा झाले होते. गेल्या तीन वर्षात तेथे पाच ते दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा होत होति. भारतीय रिझव्र्ह बँकेने यासंदर्भात सन २००१ साली परिपत्रक काढून प्रत्येक बँकेला या संदर्भात तपासणीचा स्वतंत्र विभाग काढण्यास सांगितले होते.
बनावट नोटांच्या वितरणाची यंत्रणा दाऊद कंपनीच्या हातून चालताना दिसत असल्याचा उल्लेख देशातील तपास यंत्रणा आणि जागतिक पातळीवरील नियतकालिके यांच्या निष्कर्षातून पुढे येत आहे. बांगलादेशी नागरिक येथे खोटे नागरिकत्त्व मिळवतात, तेव्हाच त्यांना कोठे ना कोठे नोकरी मिळते. नाही तर त्यांच्यावर वेठबिगार होण्याची वेळ येते. नागरिकत्वासाठी पश्चिम बंगालमधील एखाद्या शाळेतील शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, जन्मनोंदप्रमाणपत्र याला त्यादृष्टीने महत्व असते. पश्चिम बंगालमधे अशी प्रमाणपत्रे विकणारे अनेक एजंट आढळून येत असतात. या देशात येणारया विदेशी बनावट चलनाबरोबरच विदेशी नागरिकांची घुसखोरी हा या देशाला दुहेरी धोका असल्याने याकडे लक्ष दिले जात आहे. या नोटा बांगलादेशमार्गे भारतात येत असल्या तरी त्या तयार करण्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. किबहुना या सारया प्रयत्नात दरवर्षी नवे-नवे प्रयोग करण्याचे उपद्व्याप चिन व पाकिस्तानच करतअसतो.
राज्यकर्ते फक्त चीनचे दौरे करण्यात समाधान मानत आहेत
भारताच्या सव्वाशे लक्ष कोटीच्या बनावट नोटा तयार करणे आणि त्या निरनिराळ्या मार्गाने भारतीय चलनात घुसवणे, या सारयांमागे पाकिस्तानव चिन हे राष्ट्र असले तरी भारतातील तपास यंत्रणा त्यादेशाला जागतिक पातळीवर आरोपीच्या पिजरयात उभी करू शकलेली नाही आणि अन्य मार्गाने उत्तरही देऊ शकलेली नाही. भारत भूभागच नव्हे तर भारतिय अर्थव्यवस्थेवरही ‘डल्ला’ मारण्याचा चिनी हेतू या नवीन खेळीमागे आहे. सुमारे ४३ हजार १८० चौरस किलोमीटर भारतिय भूभाग यापूर्वीच चीनने बळजबरीने घशात घातला आहे. -चीन सीमा प्रश्नाचे भिजत घोंगडे अडीच दशकांपासून तसेच आहे. आमचे राज्यकर्ते पाकिस्तानप्रमाणेच चिन्यांबाबतही कचखाऊ असल्याने ‘चोर तो चोर वर शिरजोर’ या पद्धतीने चीन आपल्याशी वागत असतो.आधी पाकिस्तान, नंतर बांगलादेश आणि आता चीन असे सगळेच बनावट नोटांच्या माध्यमातून भारतिय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे उद्योग करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी बनावट नोटांची तस्करी बांगलादेशमार्फत होत होती. या नोटांची फॅक्टरी बांगलादेशात असल्याचे उघड झाले होते. जी तस्करी पूर्वी नेपाळमार्गे होत असे ती आता बांगलादेश, चीनमार्गे होत आहे. आमचे राज्यकर्ते मात्र आजही ‘हिंदी-चिनी भाई भाई’च्या मधून बाहेर आलेले नाहीत. ‘चायना मेड’ उत्पादनांमार्फत भारतिय बाजारपेठ काबीज करायची, माओवादी-नक्षलवाद्यांमार्फत भारताच्या अंतर्गत सुरक्षेला सुरुंग लावायचा, सीमा भागात घुसखोरी करून सीमा वाद तापवत ठेवायचा, नेपाळसह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या भारताच्या शेजारी राष्ट्रांना कवेत घेऊन भारताची नाकाबंदी करण्याचे डावपेच लढायचे आणि आता बनावट नोटांची ‘घुसखोरी’ करीत आमच्या अर्थव्यवस्थेलाही ‘लक्ष्य’ करायचे. चिनीचे हे उपद्व्याप वाढतच चालले आहेत आणि आमचे राज्यकर्ते फक्त चीनचे दौरे करण्यात समाधान मानत आहेत. चीन कुरापतखोर आहेच. चिन्यांच्या कुरापती आणि उचापतींना लगाम घालण्याचे धाडस आमचे राज्यकर्ते आता तरी दाखविणार का, हाच खरा प्रश्न आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment