Total Pageviews

Saturday, 20 July 2013

PAK HINDUS UNSAFE IN PAKISTAN


पाकिस्तानात हिंदू महिलांवर सर्वाधिक अत्याचार-अमेरिकन आयोगाच्या अहवालातील खुलासा
 कट्टरपंथीय दहशतवादाने पोखरलेल्या पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समाजातील महिला आणि त्यातही प्रामुख्याने हिंदू मुली सर्वाधिक असुरक्षित असल्याचे अमेरिकेने तयार केलेल्या एक अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाकमध्ये सर्वाधिक बलात्कार हिंदू तरुणींवर केले जात असून शीख, ख्रिश्‍चन, अहमदिया आणि शिया समुदायाची अवस्थाही अतिशय बिकट आहे.
आंतरराष्ट्रीय .धार्मिक स्वातंत्र्याच्या मुद्दय़ावर नेमण्यात आलेल्या अमेरिकन आयोगाच्या अहवालानुसार पाकमध्ये गेल्या १८ महिन्यांत हिंदू तरुणींवर बलात्काराच्या ७ घटना समोर आल्या आहेत, तर हिंदू समुदायावर हल्ला केल्याच्या १६ घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत जाणीवपूर्वक लक्ष्य करून शीख समुदायावरही तीनवेळा हल्ले करण्यात आले आहेत. 'पाकिस्तान धार्मिक हिंसा प्रोजेक्ट' या नावाने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार हिंदू समुदायानंतर ख्रिश्‍चन समाजातील तरुणींवर सर्वाधिक बलात्काराची प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या १८ महिन्यांत ५ ख्रिश्‍चन मुलींवर अत्याचार करण्यात आले, तर या दीड वर्षाच्या कालावधीत ख्रिस्ती समुदायावर तब्बल ३७ वेळा हल्ले करण्यात आले. यामध्ये ११ जण मृत्युमुखी पडले, तर ३६ जण जखमी झाले. अमेरिकेच्या अहवालानुसार, या कालावधीत धार्मिक हिंसाचाराच्या २0३ घटना घडल्या असून, यामध्ये ७१७ जणांचा मृत्यू झाला, तर १८00 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक संख्या शिया मुस्लिमांची (६३५) आहे. पाकिस्तानमध्ये जातीय दंगली, सांप्रदायिक हिंसाचार वाढतच चालला असून, मुस्लिम धर्माचाच एक भाग असलेला शिया पंथ या हिंसाचाराचा मोठा बळी ठरला आहे, तर मुस्लिमेतर धर्मामध्ये हिंदू नागरिकांवर अनन्वित अत्याचार करण्यात येत आहेत.
पाकमध्ये महिलांची आणि त्यातही हिंदू समाजातील स्त्रियांची स्थिती इतकी भयानक आहे की, एकट्या महिलेने घराबाहेर पडणेही अशक्य आहे. नेहमीच अस्थिर असणार्‍या खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये तर एकट्या महिलेने बाजारात जाण्यावरच बंदी घालण्यात आली असून, कट्टरवाद्यांनी स्थानीय प्रशासन आणि पोलिसांकडे हा निर्णय लागू करण्याची मागणी केली आहे. पाकमध्ये हिंदू, शीख, ख्रिश्‍चन, अहमदिया, शिया या समाजाचे धार्मिक स्वातंत्र्य पायदळी तुडवले जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment