औरंगाबादमध्ये घडलेला ‘लव्ह जिहाद’-
निखिल भुते
औरंगाबादमध्ये घडलेल्या घटनेने ‘लव्ह जिहाद’ची दबक्या आवाजात सुरू असलेली चर्चा जाहीरपणे उच्चरवात सुरू झाली आहे. जिहाद म्हणजे काफिरांविरुद्धचे धर्मयुद्ध... युद्धाचा अन् प्रेमाचा काय संबंध? पण कट्टरपंथी धर्मांधांनी दुबळ्या कायद्याचा फायदा घेत हिंदू मुलींना नासविण्याचा हा किळसवाणा प्रकार सुरू केला आहे. तो थांबविणे जागरूक तरुणाईच्याच हाती आहे.माणुसकी उजागर करणारी निरंतर तेवत असणारी ज्योत म्हणजे प्रेम...! प्रेम कसं, कुठे, कुणासोबत होईल याचा काही नेम नसतो. प्रेमाला धर्माची, भाषेची, प्रांताची, जातीचीही आडकाठी नसावी. किंबहुना या सर्वांच्या पलीकडे असतं तेच खरं प्रेम. मात्र, लव्ह जिहाद नावाचा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार आंधळ्या कट्टर धर्ममार्तंडांकडून राबविला जातो आहे. जिहाद म्हणजे धर्मयुद्ध... वेडेपणानं लढण्यासाठी जगभरात ‘सैनिक’ तयार करण्यात येतात. हे युद्ध लढताना मरणं आलं तर थेट ‘जन्नत’मध्ये जाणार, असं बिंबविण्यात येतं... आता प्रेमाचा अन् या धर्मयुद्धाचा थेट संबंध जोडून परधर्मियांवर सूड उगविण्याचा, त्यांना बाटविण्याचा प्रकार सुरू आहे.
हा प्रकार अलीकडेच आला असे वाटत असेल पण ही मोघली प्रवृत्ती आहे. ‘अशीच आमुची आई असती...’ असे म्हणत सुभेदाराच्या सुनेची सादर पाठवणी करणारे शिवबा वेगळे अन् यांचा धर्म बाटवायचा म्हणून हल्ला केला की घरा घरातून ओढून स्त्रिया बाटविणारे मोघल सरदार वेगळे. आज ‘लव्ह जिहाद’च्या नावाने हीच प्रवृत्ती दिसते आहे. आमीर खान ने ‘सत्यमेव जयते्’मध्ये आंतर जातीय, धर्मीय विवाहांवर चर्चा केली पण ‘लव्ह जिहाद’ हा विषय सोयीस्कर टाळला.
नव्याने हा प्रकार साधारणपणे पाच एक वर्षांपूर्वी उघडकीस आला. सुरुवातीला दक्षिण भारतात या विकृतीने स्वतःचे जाळे पसरविले. त्यानंतर हळूहळू त्यांनी आपला मोर्चा उर्वरित भारताच्या दिशेने वळविला. नुकत्याच काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत घडलेल्या घटनेने हे लोण आता महाराष्ट्रात देखील पसरल्याचा प्रत्यय आला.
काय घडले औरंगाबादेत?एका सिंधी कुटुंबातील मुलगी ८ ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाली. पोटचा जीव असा अचानकरीत्या बेपत्ता झालेल्या पालकांनी सुरुवातीला पोलिसांकडे जाणे टाळले. अखेर मुलीचा प्रश्न आहे. समाजात बदनामी होईल, या
भीतीने त्यांनी उचललेले ते पाऊल एका दृष्टीने बरोबर होते. मात्र, बरेच दिवस होऊनही मुलीचा काहीच पत्ता लागत नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांच्या ‘सो कॉल्ड’ कर्तव्यतत्परतेचा अनुभव इथेही आलाच. अखेर कसाबसा तपास सुरू झाला आणि २५ ऑगस्ट रोजी मुलगी सापडली. तपासाअखेर असे आढळले की, ती मुलगी एका मुस्लिम तरुणासोबत पळून गेली होती. औरंगाबादेतच राहणार्या एका मुस्लिम तरुणासोबत तिचे मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पळून गेल्यावर सर्वप्रथम तिचे धर्मांतरण करण्यात आले. तसेच तिचे नाव देखील बदलविण्यात आले. त्यानंतरच त्यांनी निकाह केला व मुंबईला पळून गेले. मुलगी सापडल्यावर आई-वडिलांनी मुलीचा ताबा मागितला. तेव्हा बुरखा घालून आलेल्या मुलीने मी या माणसाला ओळखतच नाही, असे सांगून विवाह नोंदणी पत्र आणि निकाहनामा माता-पित्यांच्या तोंडावर फेकला.
जन्मदात्या आई-वडिलांना ओळखण्यासही नकार ती का देते? प्रत्यक्षदर्शी सांगतात की तिच्या हालचाली यांत्रिक होत्या. संमोहनात वावरत असल्यागत ती वाटत होती. सोबतच लव्ह जिहाद सारख्या विष कालविणार्या मनोवृत्तीचा प्रभाव देखील या घटनेवरून येऊ शकतो.
प्रेम करा, पण असली थेरं नकोकुणी कुणावर प्रेम करावं. कुणी कुणाशी लग्न करावं याबाबत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. प्रेम, लग्न हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे त्याबाबत एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा दबाव टाकू शकत नाही. जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी लोकशाही असलेल्या भारतासारख्या धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभाववाल्या देशात असा प्रकार होणार देखील नाही. पण याचा अर्थ असे नव्हे की, कुण्या एका धर्माने धर्मांतरासारखा खेळ प्रेम नावाच्या गोंडस दिखाव्याखाली खेळावा. प्रेमाच्या नावाखाली मुलींना फसवून त्यांचं धर्मांतर करायचं, मुलं बाळं झाली की, तिला बेवारस अवस्थेत सोडून द्यायचं ह्याला प्रेम म्हणायचे का?
फेसबुकवर त्या संदर्भात एक बातमी टाकण्यात आली आहे. लव्ह जिहाद करून हिंदू तरुणींना जाळ्यात ओढा. निकाह करा अन् सहा अपत्य झाली की त्यांचा त्याग करा, असा फतवाच काढण्यात आल्याचे ही बातमी म्हणते. लव्ह जिहादसाठी तयार असणार्या तरुणांना धार्मिक स्थळाकडून पोरींना जाळ्यात ओढण्यासाठी ‘निधी’ देखील
देण्यात येतो, अशीही एक बातमी मागे प्रकाशित झाली होती.
प्रत्येकच धर्माने प्रेम ही भावना सर्वोच्च मानली आहे. मग इतक्या उच्च भावनेला धर्मांतरासारखे विकृत स्वरूप देऊन कुठला धर्म पाळल्या जातोय्? पूर्वी प्रेमासाठी बलिदान दिल्याच्या अनेक धटना घडायच्या, आता मात्र प्रेमासाठी हत्या चालू आहेत. आई-वडिलांना ओळखण्यास नकार देणारी ती मुलगी आणि तिला आपल्या जाळ्यात ओढून प्रेमांध करणार्या या तरुणाला प्रेमाचा खरा अर्थच कळू शकत नाही.
रोड रोमिओंचा हैदोसआज कित्येक लहान-मोठ्या गावांमध्ये, शहरांमध्ये लव्ह जिहादच्या बळी ठरलेल्या मुली दिसून येतील. किती तरी मुली वेश्या व्यावसायात ओढल्या गेल्या आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात ग्रुपने फिरणे. हिंदू मुलींशी सलगी करणे, मैत्री करणे. स्टायलिश कपडे, नवनवीन गाड्या, मोबाईल याद्वारे मुलींसमोर शायनिंग मारत त्यांना स्वत:कडे आकर्षित करायचं. मुलीचा विश्वास जिंकून तिला घरच्यांविरूद्ध बंड करण्यास प्रवृत्त करायचं. मुलीने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास धर्मांतर करून निकाह करायचा. एखाद्या मुलीने घरच्यांविरूद्ध बंड करण्यास नकार दिला तर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यास देखील कमी करायचे नाही. बरं निकाह झाल्यावर काही महिन्यांतच तिला बेवारस अवस्थेत सोडून द्यायचे किंवा आखाती देशांमध्ये त्यांना विकून देण्याचे कारस्थान या रोडरोमिओंकडून होत असते. प्रेमाच्या जाळ्यात फसणार्या मुली बरेचदा अल्पवयीन देखील असतात.
हायस्पीड व्यवस्थायाबाबतीत कायद्याचा विचार केल्यास कायद्याने आंतरधर्मीय विवाहास कसलीही मनाई नाही. निकोप प्रेमभावनेने लग्न होत असेल तर याला कायदाच काय कुणाचीच हरकत नसते. प्रत्येक सज्ञान व्यक्तीला असलेले प्रेमविवाहाचे स्वातंत्र्य कुणीही नाकारलेले नाही. परंतु आतापर्यंत घडलेल्या प्रत्येक घटनेत हिंदू मुलगी मुस्लिमासोबत पळून गेल्यावर धर्मांतर झाल्याचेच दिसते. प्रेम विवाहात धर्म आवश्यक आहे का? इतक्या ताबडतोब धर्मांतर कसे काय होते? निकाह होत नाही तोच विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळून जाते. मुलगी बेपत्ता झाल्याच्या दोनच दिवसात ओळखपत्रे तयार कशी काय तयार होऊन जातात? इतके सगळे ७-८ दिवसांत उरकणे एकट्या तरुणास कसे काय शक्य होते? साधा शेताचा सातबारा मिळवण्यासाठी, किंवा कुठले प्रमाणपत्र मिळविण्यसाठी दहा ते पंधरा दिवस सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. जगताना तर सरकारी व्यवस्थेमुळे हाल होतातच. मात्र, घरचं कुणी मेल्यावर त्याच्या मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी पालिकेच्या पायर्या झिजवाव्या लागतात. अशा ‘व्हेरी व्हेरी स्लो’ अवस्थेत असलेली व्यवस्था अचानकरीत्या ‘हाय स्पीडने’ कशी काय कामाला लागते? अगदी अज्ञानी व्यक्ती देखील या मागे असलेले गौडबंगाल समजू शकतो ते पोलिस का समजून घेत नाही? या प्रकारच्या तरुणांच्या पाठीशी कोण उभे आहे? हा साधा संशयही आपल्या पोलिस यंत्रणेला येवू नये हे आठवे आश्चर्यच आहे. हा दहशतवादच आहे.
नव्या बाटलीत जुनी दारूलव्ह जिहाद किंवा रोमिओ जिहाद सारखे जे धर्मांध प्रकार सुरू आहेत ते काही नवीन नाहीत. एक प्रकारे नव्या बाटलीत जुनीच दारू आहे. जुन्या दार-उल-हरब (युद्धभूमी)चे दार उल-इस्लाम (शांतताभूमी) मध्ये रूपांतर करण्यासाठी पुकारल्या जाणार्या धर्मयुद्धास ‘जिहाद’ म्हणतात. जगभरातील काफिरांविरुद्ध ‘जिहाद’ पुकारणार्या अनेक इस्लामी संघटना कार्यरत आहेत. असा जिहाद करणार्यांना जिहादी म्हटले जाते. अल्लाच्या दरबारात त्यांना मानाचे पान मिळते, स्वर्गात अनेक सुखे उपभोगायला मिळतात, याचे वर्णन इस्लामी धर्मग्रंथात भरभरून केले आहे. ‘जन्नत’ची प्राप्ती होण्यासाठी हे मुजाहिद (धर्मयोद्धे) जीव घ्यायलाही मागेपुढे बघत नाही. आता आधुनिक युगात मध्ययुगीन नाटके चालणार नाहीत हे लक्षात आल्यावर ‘जिहाद’साठी नवीन फंडे शोधायला सुरुवात झाली आणि एक नामी हत्यार त्यांना मिळाले. आक्रमकांच्या परंपरेतील ठेवणीतले हे हत्यार म्हणजे काफिरांच्या स्त्रिया पळवून त्यांना मुसलमान करणे, त्यांच्यामार्फत लोकसंख्या वाढवणे हे होय. याच युक्तीला ‘जुन्या बाटलीत नवी दारू’ या उक्तीप्रमाणे ‘लव्ह जिहाद’ किंवा ‘रोमिओ जिहाद’ असे नाव देण्यात आले आहे.
लक्षवेधी आकडेवारीलव्ह जिहाद या मानसिक विकृतीचा प्रकार सर्वप्रथम दक्षिण भारतातल्या केरळमध्ये निदर्शनास आला. एका सांख्यिकीनुसार गेल्या ४ वर्षांत प्रेमप्रकरणानंतर ३००० ते ४००० धर्मबदलाची उदाहरणे आहेत. अन्य एका सांख्यिकीनुसार अशाप्रकारे २८०० मुली अन्य धर्मात धर्मांतरित झाल्या आहेत. या आकडेवारीवरून या प्रकरणाची भीषणता समजू शकते.
दोष कुणाचा?या प्रकरणांमध्ये दोष कुणाला द्यावा हा देखील गंभीर आणि चिंतनीय प्रश्न आहे. विभक्त कुटुंबपद्धतीच्या नादी लागलेल्या कुटुंबपद्धतीला दोष द्यावा की दोघेही कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्या कारणाने मुलांकडे लक्ष न देणार्या पालकांना द्यावा. आज अनेक मध्यमवर्गीयांच्या हातात मुबलक पैसा खेळतो आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येते असा काहीसा गैसरमज आपला होऊन बसला आहे. मुलांना चांगल्या शाळा-महाविद्यालयात टाकणे, नामाकिंत ट्युशनमध्ये ऍडमिशन दिल्याने तसेच मुलांचे हट्ट विना तक्रार पूर्ण केल्याने पालकांची जबाबदारी संपून जाते का? आपली मुलगी कुठे जाते? काय करते? कुणाला मॅसेजेस करते याचा तपास करण्यासाठी सुद्धा पालकांकडे वेळ नाही का? काही विकृत मंडळी धर्मांधतेच्या नावाखाली नको ते प्रकार करताहेत आणि आपण षंढ असल्यासरखे कुठवर पाहत राहणार? अखेर दोष कुणाचा हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. तरुण-तरुणींनी, त्यांच्या पालकांनी विचार करण्याची गरज आहे, कुठे चाललाय् आपला समाज?
यावर तरुणाईने सावध असायला हवे. आपल्या सोबत शिकणार्या मुलींच्या संदर्भात आपण जागरूक असायला हवं. त्यांना योग्य वेळी सावध करण्याची आपली मित्र किंवा मैत्रीण म्हणून जबाबदारी आहे. हे युद्ध आहे आणि तरुणाईच्या हळव्या, कोमल भावनांवर ते खेळलं जात असेल तर मग आपण सावध राहूनच त्यावर मात करता येइल. ‘लव्ह जिहाद’ च्या विरोधत तरुणींनी संघटित होणे, ही काळाची गरज आहे. लव्ह जिहादच्या तडाख्यात सापडलेली तरुणी घरच्यांचं ऐकणार नाही पण तिच्या ग्रुप मधल्या मित्र-मैत्रिणींनी तिला समजावले तर ती नक्कीच ताळ्यावर येईल. तेव्हा एकसंध आणि जागरूक व्हा... एवढेच!!
No comments:
Post a Comment