नक्षलवादाचे आव्हान: चीनचे भारताशी छुपे युध्द -
ब्रिगेडिअर हेमंत महाजन, युध्द सेवा मेडल प्रकरण १ समावलोचन
भारताची अंतर्गत, बाह्य सुरक्षा आणि इतर आव्हाने
1965 व 1971 च्या अपमानकारक पराभवाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानचे राष्ट्रपती जनरल झिया आणि कुख्यात आयएसआय यांनी संयुक्तपणे भारतात अस्थैर्य माजवण्याची एक दीर्घकालीन योजना आखली. या योजनेला पाकिस्तानच्या काराकोरम पर्वतावरून के प्लॅन असे संबोधले गेले. भारतात द्वेषाची बीजे रोवून जातीय व धार्मिक तणाव निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य भाग होता. यातूनच स्वतंत्र खलिस्तानची मागणी, काश्मीरचे विभाजन करण्याचाही डाव रचला गेला. पहिले शत्रू असलेल्या दोन राष्ट्रांमध्ये युद्ध सीमेवर दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यामध्ये व्हायची. आपले पाकिस्तान आणि चिनशी 1947, 1962, 1965, 1971 आणि 1999 साली सीमेवर युद्ध झाले. अशा युद्धांमध्ये फक्त सीमेवरच्या सामान्य नागरिकांवर युद्धाचा परिणाम व्हायचा. आता पाकिस्तान आणि चीनने नव्या प्रकारचे युद्ध सुरू केले आहे. या युद्धात भारतात घुसखोर पाठवून देशाच्या वेगवेगळ्या भागात आतंकवादी कारवाया करण्यात येत आहे. युद्ध आता सामान्य भारतीय़ जनतेच्या विरुद्ध लढले जात आहे.पाकिस्तान चीनने नव्या प्रकारचे युद्ध 2009 सालामध्ये सामान्य नागरिक, सुरक्षा कर्मचारी तसेच दहशतवादी सर्व मिळून तब्बल 2600 हून अधिक जणांना दहशतवादी कारवायात प्राण गमवावे लागले. 2010 रोजी हीच संख्या 2600 च्या जवळपास आहे. तर गंभीररीत्या जखमी झालेल्यांची संख्या 10,000 हून अधिक आहे.हे ८८ सालापासुन चालु आहे. यावरूनच आयएसआयच्या दहशतवादी कारवायांची भयानकता स्पष्ट होते. काश्मीर नव्या प्रकारचा दहशतवादजम्मू - काश्मीर भारतापासून तोडण्याचा प्रयत्न झाल्याचा इतिहास ताजा आहे. 1989 मध्येच जम्मू-काश्मीर भारताला गमवावा लागला असता असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. वास्तविक तत्कालिन पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग यांनी देखील आशा सोडली होती. परंतु राष्ट्राच्या जमिनीचा इंच-इंच तुकडा संरक्षित राखण्याच्या आपल्या घटनात्मक कर्तव्याला जागून लष्कर ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी शत्रूला हुसकावून लावले.
1988
साली काश्मीरमध्ये 6000-7000 आतंकवादी होते. प्रत्येक वर्षी 2000-3000 नवीन आतंकवादी आत प्रवेश करायचे. प्रत्येक वर्षी 2500-3000 आतंकवादी सैन्या करुन काश्मीरमध्ये मारले जात होते. सध्या शिल्लक राहिलेल्या आतंकवाद्यांची संख्या ३00च्या आसपास असावी. हे सगळे करताना गेल्या 22 वर्षांत प्रत्येक वर्षी 20-25 ऑफिसर्स आणि 400-750 सैनिक आपल्या प्राणांचे बलिदान करतात. आता खोट्या बातम्या पसरवून सामान्य काश्मिरी लोकांना भडकावणे सुरू आहे. ईशान्येला घुसखोरीचा कर्करोग?भारतामध्ये सर्रास सुरू असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधात बोलायला ईशान्य भारतातील राज्य सरकारे, केंद्र सरकार काही राजकीय पक्ष, नोकरशाही, वृत्तपत्रे तयार नाही. आज देशामध्ये 4 कोटी बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. घुसखोरीमुळे गुन्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात वाढ ,देशभरात बेरोजगारीत वाढ आणि त्यातून दहशतवादाकडे आकृष्ट होणे याचे प्रमाण वाढले आहे. बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे हिंदूबहुल आसामला मुस्लिमबहुल राज्य होण्याची भीती वाटू लागली आहे.त्यातून एखादा बांगलादेशी 2020 मध्ये आसामचा मुख्यमंत्री होऊ शकेल.
स्लीपर सेलमपासून ते कडव्या दहशतवाद्यांपर्यंतचे जाळे खोलवर पाकिस्तान कडून मिळणाऱ्या चिथावणीमुळे स्लीपर सेलमपासून ते कडव्या दहशतवाद्यांपर्यंतचे जाळेच देशाच्या विविध भागांत कार्यरत आहे. भरकटलेल्या तरुणांना पाकिस्तान संघटनांनी आपल्या जाळ्यात ओढले, त्या भरकटलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणणे हे आव्हान आहे.सरकार, पोलीस यंत्रणा, समाज, जागे राहण्याखेरीज पर्याय नाही.सर्वांत महत्त्वाचा उल्लेखनीय मुद्दा असा की, आतंकवाद्यांची मुळे पाकीस्तान, बंगला देश आणि चीनमध्ये आहेत. आतंकवादाची लढाई आपल्याला देशांतर्गत, सीमेवरती आणि पाकीस्तान, बांगलादेशच्या आत जाऊन लढावी लागेल. आपल्या देशात प्रत्येक वर्षी 2000-2500 भारतीय नागरिक आतंकवादी धरण्यामध्ये मारले जातात.
अंतर्गत सुरक्षेचा सर्वांत मोठा धोका नक्षलवाददेशाच्या सुरक्षेला सर्वांत मोठा धोका नक्षलवादापासून आहे. आज 35-40% भागावर नक्षलवादाचे आधिपत्य आहे. दरवर्षी 1500-1600 नक्षली हल्ले होतात. प्रत्येक वर्षी 750-1000 सामान्य माणसे हिंसाचारात मारली जातात. प्रत्येक वर्षी नक्षलवादी 10,000 कोटी रूपयांची खंडणी वसूल करीत असावे. आतापर्यंत नक्षलवाद्यांनी 3500-5000कोटी रूपयांची भारतीय संपत्ती बरबाद केली आहे. सरकारने सुरू केलेेले आपरेशन ग्रीन हंट सध्या ङ्गजियो ओर जिने दोङ्घ या अवस्थेत आहे. घोषणाबाजी करण्याशिवाय सरकार फारसे काही करताना दिसत नाही. हे सगळे आपल्याला माहीतच आहे.
नक्षलवादाचे आव्हान, चीनचे भारताशी छुपे युध्द या पुस्तकात नक्षलवादी आव्हानांच्या वेगवेगळ्या पैलुची समिक्षा केली आहे. पण जास्त महत्त्वाचे आहे की आता आपल्याला काय करता येईल. अनेक विचारवंत अत्यंत निर्लजपणे नक्षली चळवळीचे खुले समर्थन करतात.नक्षली चळवळीचे अंतरंग, इतिहास, आजचे स्वरूप, सरकारचा नाकर्तेपणा, उपाययोजना अशा विवीध पैलूंचा मी या पुस्तकात आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. देशविरोधी नक्षलवादाच्या विरूध्द जनजागृती करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यात किती यश मिळाले, हे आपण आणि वाचकांनी ठरवायचे.
भारतीय नेतृत्वाचा भर कृतीपेक्षा घोषणांवरच अधिक असल्याचे दिसते. दहशतवाद्यांशी थेट सामना करण्यापेक्षा निषेध करण्यावरच आपली नेतेमंडळी भर देतात. यामुळे एक सॉफ्ट स्टेट, अशी भारताची प्रतिमा तयार होत आहे.
काश्मीरमध्ये चाललेले छुपे युद्ध, ईशान्य भारतात चाललेली बंडखोरी आणि बंगालदेशीकरण, माओवाद आणि बाकी देशात होणाऱ्या आतंकवादी घटना यांचा एकमेकांशी फारच घनिष्ट नाते आहे. चीन आणि पाकिस्ताननी हे आपल्या देशाविरुद्ध चालवलेले छुपेयुद्ध आहे. आपल्या शत्रूंना ही कल्पना आहे की अशा युद्धांमुळे भारताचे तुकडे करणे सोपे नाही. पण यामुळे आपल्या देशाची प्रगतीचा वेग कमी होतो आणि आपल्या देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण होते. आपले चीनशी 2020 पर्यंत युद्ध होण्याची शक्यता आहे. त्या आधी आपण देशाच्या आतील अंतर्गत सुरक्षेच्या समस्येवर पूर्णपणे मात करायला हवी. नाहीतर आपल्याला एकाच वेळी चीन, पाकिस्तान आणि माओवाद्यांच्या विरुद्ध युद्ध करण्याची वेळ येऊ शकते.
पुस्तकात मान्ड्लेले काही महत्वाचे मुद्दे१. दहशतवादी, नक्षलवादी,बांगलादेशी घुसखोरांच्यामुळे देशाच्या एकसंधतेला मोठा धोका
२. आयएसआयच्या कारवायांनी रक्त बंबाळ भारत
३. आयएसआय ची दहशतवादी 52 प्रशिक्षण केंद्रे कार्यरत
४. 3000-3500 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत
५. भारत सॉफ्ट स्टेट
६. जम्मू आणि काश्मीरमधून नव्या प्रकारचा दहशतवाद
७. काश्मीर वार्ताहर समिती आणि राष्ट्रविरोधी प्रचार
८. काश्मीरमध्ये खोट्या बातम्या
७. लष्करी विशेषाधिकार कायदा आणि बिनबुडाचे मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे आरोप
८. ईशान्य भारतातील बंडखोरी-घुसखोरीचा कर्करोग?
९. बांगलादेशामध्ये बंडखोर कॅम्प्स 150 दहशतवादी गट आणि 15000 हजार दहशतवादी
१०. बांगलादेशी घुसखोरीमुळे या राज्यातील बांगलादेशी मुस्लिमांच्या संख्येत 30 टक्यांनी वाढ
११. भारताच्या इतर भागात फैलावलेला दहशतवाद
नक्षलवादाचे आव्हान: चीनचे भारताशी छुपे युध्द -ब्रिगेडिअर हेमंत महाजन, युध्द सेवा मेडल NACHIKET PRAKASHAN ,24 YOGSHEM,LAY OUT,SNEH NAGAR WARDHA ROAD NAGPUR -PIN 440015,TELE-0712-2285473,9225210130 ,
email-nachiketprakashan @gmail.com,
www.nachiketprakashan.wordpress.com
No comments:
Post a Comment