Total Pageviews

Sunday, 9 September 2012

LOVE JIHAD CARELESS PARENTS

 
आई दुबळी होतेय... आरतीश्यामल जोशी
एका धर्मांध मुस्लिम मवाल्याच्या प्रतापाने संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्र हळहळला. या जिहादचा सामना करण्यासाठी घराघरात बालवयातच आपण हिंदू असल्याची जाणीव करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी पालकांची आहे.
समाजसेविका ऍड. अपर्णा रामतीर्थकर यांनी संभाजीनगरातील एका व्याख्यानात तमाम आईंवर आसूड ओढले होते. तुम्ही आई आहात का नटी? तुमचे कपडे पाहा, अवतार पाहा, जिन्स, टॉप घालून मिरवणारी आई तिच्या मुलींवर काय संस्कार करणार असा खोचक सवाल त्यांनी विचारला होता. त्यांचा हा सवाल अंतर्मुख करायला लावणारा आहे.
कंफर्टेबल फिलच्या नावाखाली आज कपडे घालण्याबाबत नंगानाच सुरू आहे. आपण कोणत्या समाजात राहतोय, आपले सहकारी कोण आहेत, त्यांच्या नजरा कोठे आहेत याकडे महिलांचे भानच नाही. स्त्री-पुरुष समानतेचा तर ओव्हरडोस झाल्यामुळे आपण करतोय तेच बरोबर, असा मॉडर्न स्त्रीचा समज झालाय. २ वर्षांच्या मुलीची पाठ झाकण्याऐवजी बांधलेले बंद, पाय, पोट आणि अर्धेअधिक अंग उघडे असा पोषाख घालून लहानपणीच तिची लाज मारून टाकली जाते. ही मुलगी मोठी ंझाल्यावर कोणता पोषाख परिधान करेल, याचा विचार न केलेला बरा. अंगभर पंजाबी ड्रेस घातलेली बाई समाजात ताई होते, तर घट्ट जिन्स, टॉप घालणारी माघारी आयटम ठरते, हे सत्य आपण नाकारून चालणार नाही. दहा काळ्या चौकोनात एक लाल चौकोन उठून दिसतो. त्याचप्रमाणे भडक, अर्धवट कपड्यांतील आपल्या मुलीवर नराधमांची नजर पडणार नाही, याची काय शाश्‍वती?
दिवसभर वेळ नसणारी आई संध्याकाळी थकून भागून आल्यानंतर मुलांची विचारपूस करण्याऐवजी त्यांच्यासोबत टीव्हीवर राम-प्रियाचं काय होईल किंवा मोना परत येईल किंवा नाही अशा मालिका पाहत बसते. चॅनलवाले टीआरपीचे गणित मांडताना अनैतिक संबंधांचे उदात्तीकरण करतात; पण यातून नाते किती तकलादू आहे, हेच आपण नकळत मुलांना शिकवत नाही का? यामुळेच अबॉर्शन, एस्ट्रा मॅरिटिअल अफेअर, हनिमुन असे शब्द आता शाळकरी मुलांनाही माहीत झाले आहेत.
पालक मुलांमध्ये मनमोकळा संवाद घडायला हवा. टीव्हीकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा रिमोटवर कंट्रोल करणे गरजेचे आहे.
असेच कंट्रोल इंटरनेट आणि मोबाईलच्या बाबतीत हवे. लव्ह जिहादला बळी पडलेल्या बहुतांश मुलींनी अनेक महिने त्या कुराणचे वाचन करत असल्याचे मान्य केले आहे. एका मुलीने इंटरनेटवरून कुराणचे धडे घेतल्याचे समोर आले आहे. मुलगी एकटी कोठे जाते, तिचे मित्र-मैत्रिणी, शाळा, कॉलेजचे आणि ट्युशनचे शिक्षक, प्राध्यापक कोण आहेत, रिक्षावाला कोण आहे याची संपूर्ण माहिती पालकांनी ठेवायला हवी. तिला कोण काय गिफ्ट देतेय, ती वाढदिवस कोठे साजरा करते? यावर गुपचूप नजर ठेवायला काय हरकत आहे? मुलांना मोबाईल, इंटरनेटच्या सुविधा दिल्या म्हणजे आपली जबाबदारी संपली असे पालक समजतात. पण येथून नवीन जबाबदारी सुरू होते. मुलांचा जगाशी संपर्क सुरू होत असल्याने अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. या माध्यमांमुळे तर शत्रू घरात येऊन ठेपला आहे. ते कोणाशी चॅट करतात, फेसबुक, आर्कुटवर त्यांचे कोण मित्र आहेत, त्यांच्या ई-मेल लिस्टमध्ये फोनबुकमध्ये कोण-कोण आहेत, त्यांना कोणाचे मेसेज येतात, ते कोणाशी बोलतात, मित्र उठसूट त्यांना कशासाठी फोन करतात याची माहिती घेण्याची पालकांना गरज भासत नाही का? अनेकदा मुली विवस्त्र अवस्थेत वेबकॅमेर्‍यासमोर पोज देतात. खासगी फोटो पाठवतात. याद्वारे त्यांना ब्लॅकमेलही केले जाण्याचा धोका आहे. दरवेळी घरातून बाहेर पडताना मुली तोंडाला कपडा कशासाठी लावतात? याबाबत पालक कधीच शंका का घेत नाहीत?
जेंष्ट समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनीही मुलींच्या असभ्य वर्तनावर कडक शब्दात प्रहार केला होता. मुलींनो, स्वत:ला सांभाळा, अर्धनग्न अवस्थेत बाहेर पडणार असाल, तर याद राखा! आमची मुलंही मेलेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत? अशा कठोर शब्दात त्यांनी मुली व आईंना समज दिली होती. हे शब्द आपण लक्षात ठेवायला हवेत.

No comments:

Post a Comment