औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राने बांधले. त्याच महाराष्ट्रात औरंग्याची अवलाद निर्माण होत असेल तर सरकार झोपा काढते आहे काय?
सरकार झोपा काढते काय?महाराष्ट्रातील मुजाहिद्दीन- सामना अग्रलेख
सरकार झोपा काढते काय?महाराष्ट्रातील मुजाहिद्दीन- सामना अग्रलेख
महाराष्ट्रातील ४० तरुण गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता झाले आहेत. या तरुणांचे अचानक बेपत्ता होणे साधे नाही, तर देशाच्या सुरक्षेस घोर लागावा अशा प्रकारचे आहे. देशाच्या गुप्तचर यंत्रणेने जी माहिती समोर आणली आहे ती महाराष्ट्राची झोप उडविणारी आहे. बेपत्ता झालेले चाळीसेक तरुण हे पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांच्या प्रशिक्षणासाठी गेले आहेत, तर त्यातले काहीजण प्रशिक्षण वगैरे घेऊन ‘सुसज्ज’ स्थितीत हिंदुस्थानात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्यामागे इंडियन मुजाहिद्दीन नावाची दहशतवादी संघटना असल्याचेसुद्धा उघड झाले आहे. महाराष्ट्रातील ‘मुस्लिम’ तरुण हे मोठ्या प्रमाणात माथेफिरू बनून हिंदुस्थानविरुद्ध ‘जिहाद’ पुकारत असल्याच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. पाकिस्तान व बांगलादेशात दहशतवादी निर्माण करणारे कारखाने जोरात सुरू आहेत व त्या कारखान्यांना कच्चा माल पुरविणारे ठेकेदार महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत अनेक दहशतवादी हल्ले झेलले आहेत. महाराष्ट्रास जखमी व घायाळ करून हिंदुस्थानच्या नसांतील प्रखर राष्ट्रवाद व हिंदुत्ववाद नष्ट करण्याचे हे कारस्थान आहे व त्यासाठी महाराष्ट्रातील मुस्लिम तरुणांची निवड होत असेल तर राज्याचे सरकार, पोलीस, प्रशासन काय करीत आहे? महाराष्ट्रातील अनेक भागांत इंडियन मुजाहिद्दीनने हात-पाय पसरले आहेत व मुसलमानांची तरुण पोरे त्यांच्या कच्छपी लागली आहेत. मुंबईतील १९९२ च्या बॉम्बस्फोटांत स्थानिक मुस्लिमांचेच ‘हात’ पाकड्यांनी वापरले व त्यानंतरच्या मुंबईतील प्रत्येक बॉम्बस्फोटांचे धागेदोरे हे ठाणे, मुंब्रा, भिवंडी, मालेगाव, संभाजीनगर, परभणी, बीडमध्येच पोहोचले. मेमन कुटुंब हे मुंबईतले. पुणे बॉम्बस्फोटातील यासिन भटकळ, ख्वाजा युनूस व आता अबू जिंदाल हे सर्व तरुण महाराष्ट्रातलेच. इंडियन मुजाहिद्दीनचे नेतृत्व यासिन भटकळ करीत असून त्याने महाराष्ट्राच्या पोलिसांना ‘भटके’ बनवून स्वत:च्या मागे पळायला लावले. भटकळ जोपर्यंत सापडत नाही व मारला जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील तरुणांचे संशयास्पद पलायन सुरूच राहील. आता फक्त महाराष्ट्रातीलच ४० बेपत्ता तरुणांची आकडेवारी प्रसिद्ध झाली. कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, आसाम, जम्मू-कश्मीरसारख्या राज्यांतील असंख्य तरुण या ‘जिहादी’ कार्यासाठी मोठ्या प्रमाणात बेपत्ता झाले आहेत. इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेने मुस्लिम तरुणांना मोहिनी घातली आहे. त्यांना अनेक आमिषे व मोह दाखवून जाळ्यात ओढले जाते व शेवटी हिंदुस्थानविरुद्ध वापरले जाते. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील मुस्लिम तरुणही इंडियन मुजाहिद्दीनच्या मागे भरकटले आहेत व या भरकटलेल्या तरुणांनी भूमिगत होऊन देशाविरुद्ध जिहाद पुकारला आहे. देशाच्या गुप्तचरांकडे याबाबत फक्त माहिती आहे, पण कृतीचे काय? परदेशी बँकेत हिंदुस्थानचा भरपूर काळा पैसा कुजतो आहे, पण त्याचा देशाला उपयोग काय? तसाच हा प्रकार. मुळात हे माथेफिरू तरुण देशाच्या सीमा पार करून पाकिस्तानात पोहोचले कसे व तेथे दहशतवादाचा ‘कोर्स’ पूर्ण करून पुन्हा हिंदुस्थानात परतले कसे? हवेतून अदृश्य होऊन तर ते इकडे टपकले नाहीत ना? याचे उत्तर देशाच्या गृहमंत्र्यांनी द्यायला हवे. आझाद मैदानात हिंसाचार होणार असल्याच्या माहितीचा ढेकूण केंद्राने झटकला व महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या अंगावर फेकला, पण शेवटी केंद्र सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही? हिंदुस्थानच्या सीमांना भगदाडे पडली आहेत. संरक्षण व सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई आली आहे व मुसलमानांना घरजावयासारखे पोसले जात आहे या आमच्या म्हणण्यात काही अतिशयोक्ती आहे असे आम्हास वाटत नाही. मुसलमानांशी आमचे व्यक्तिगत भांडण नाही, पण सुक्याबरोबर ओलेही जळते व त्याचे चटके सगळ्यांनाच बसतात. पुन्हा त्या विरोधात सर्वसामान्य मुस्लिमांनी कधी हिमतीने आवाज उठवला आहे असेही दिसत नाही. एका ‘एसएमएस’वर आझाद मैदानावर पन्नास हजार तरुण जमतात कसे? यापैकी काही तरुण हे नक्कीच आगापिछा नसलेले असू शकतात, पण बहुसंख्य तरुणांचे आईबाप इकडे आहेत व त्यांनाही आपली पोरे नक्की कोणत्या मार्गास लागली आहेत हे कळू नये याचे आश्चर्य वाटते. तेथे हे सगळे ‘धर्म’ म्हणून एक असतात. मशिदी, मदरशांचा वापर हा सर्रास अशा धर्मांध गोतावळ्यांच्या देशविरोधी कारवायांसाठीच केला जातो. तेथेच तरुणांची डोकी भडकवून त्यांना ‘जिहाद’साठी सज्ज केले जाते व हा कच्चा माल नंतर पाकिस्तानात पाठवून त्यांचे इस्लामी बॉम्ब बनवले जातात. हे वर्षानुवर्षे सुरूच असले तरी हिंदुस्थानचे सरकार पाकड्यांशी फक्त ‘तिळगूळ घ्या गोड बोला’चेच धोरण अवलंबून देशाच्या सुरक्षेला गळफास लावीत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पाकिस्तानला जिहादसाठी लागणारा कच्चा माल पुरविण्यात आघाडीवर आहेत. औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राने बांधले. अफझल खानाचा कोथळा इथेच निघाला. त्याच महाराष्ट्रात औरंग्याची अवलाद निर्माण होत असेल आणि देशाच्या मुळावर उठली असेल तर सरकार झोपा काढते आहे काय
No comments:
Post a Comment