लोंढे रोखा!
...नाहीतर पोलीसच दिसणार नाहीत
११ ऑगस्ट रोजी आझाद मैदान येेथील तोडफोडीत भाग घेणार्या एका मुस्लिम आरोपीला मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकार्यांनी गेल्या आठवड्यात बिहारमध्ये धाड घालून अटक केली आणि त्यास मुंबईत आणले. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘अमर जवान’चे शिल्प तोडणार्या या आरोपीला बिहारात जाऊन अटक करणार्या मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकार्यांचे कौतुक करण्याऐवजी त्यांनी आपल्या मुख्य सचिवामार्फत मुंबई पोलिसांनाच ‘‘पुन्हा आम्हाला न कळविता बिहारात घुसलात आणि कुणा बिहारींना आरोपी बनवून घेऊन गेलात तर तुमच्यावर अपहरणाचा गुन्हा नोंदवू’’, अशी धमकी एका पत्राद्वारे दिली. तेव्हा या देशाची किती परिस्थिती बिकट आहे हे दिसून येत आहे. मुंबईतील गुन्हेगारीत सर्वात जास्त यूपी-बिहारीच आहेत हे मुंबई पोलिसांचा क्राइम रेकॉर्ड बघितला तर दिसून येईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुस्लिमांना खूश करण्यासाठी, त्यांच्या मतांसाठी मुंबई पोलिसांना इशारा दिला, परंतु याचे दूरगामी परिणाम फार वाईट होणार आहेत हे कोण सांगणार आहे या राजकारण्यांना? ११ ऑगस्टच्या आझाद मैदान येथील दंग्यात भाग घेणारे बहुसंख्य आरोपी हे बिहारचे व मदरशांमध्ये शिकलेले आहेत. मदरशांमध्ये फक्त उर्दू व अरेबीच शिकविले जाते. बाकी त्यांना कोणती भाषा येत नाही. इस्लाम धर्माच्या पलीकडे त्यांना काहीही शिकविले जात नाही. अशाच धर्मांध मुस्लिम तरुणांना रझा अकादमीने मोर्चात उतरवून दंगा करावयास भाग पाडले. आता मुंबई पोलीस मागे लागल्यानंतर त्यांची पळापळ सुरू झाली आहे. शंभरच्या वर दंगेखोरांचे चेहरे कॅमेर्यात कैद झाले आहेत. त्यातील ५४ जणांना अटक करण्यात यश आले असून खून, खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, दंगल आदी गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेल्या आरोपींना आता सजाही अटळ आहे. मुल्ला-मौलवींनी दोन वेळेच्या रोजीरोटीचेही वांदे असणार्यांना दंगल करावयास लावली. आता बसा जेलमध्ये बोंबलत. धर्माच्या नावाने ओरडत. मदरशांमध्ये ‘लेक्चर’ देणारे, बे्रन वॉशिंग करणारे मुल्ला-मौलवी जेलमध्ये असणार्यांची सुटका करण्यासाठी येणार नाहीत. पोलिसांवर हल्ला करून त्यांच्या रायफली, पिस्तुले व काडतुसे पळविणार्या दंगलखोरांवर दोन दंगेखोर ठार झाल्याने खुनाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झाल्यास दंगलखोरांना सजा लवकर होईल, असे सांगण्यात येते. गुजरातमधील दंगलीत भाग घेणार्या माजी मंत्री व आमदारांना मरेपर्यंत जन्मठेप दिली जाते. तेव्हा मुंबईतील कायद्याचे संरक्षक व जनतेचे तारणहार यांच्यावर हल्ले करणार्यांना, महिला पोलीस शिपायांची अब्रू लुटणार्यांनाही जास्तीत जास्त सजा व्हावी अशी अपेक्षा करण्यात येत आहे. १९९२-९३ च्या मुंबईतील जातीय दंगलीनंतर दंगलखोरांनी पुन्हा दंगलीचे नाव घेतले नव्हते, परंतु आता हळूहळू पुन्हा मुंबईला जातीय रंग येऊ लागला आहे. १९९२-९३ च्या जातीय दंगलीनंतर जसे एकमेकांकडे संशयाने पाहिले जात होते तशी सध्या मुंबई शहराची परिस्थिती आहे. कधी भडका उडेल याची शाश्वती नाही. त्यासाठी पुन्हा एकदा मुंबईत सर्वधर्मीय सामोपचाराची मोहीम राबविणे गरजेचे आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह हे सारे प्रामुख्याने करतील यात कुणाला शंका नाही, असे एका अधिकार्याने सांगितले. परंतु fundamental Right च्या नावाखाली मुंबईत जी काही परप्रांतीयांची रोज घुसखोरी सुरू आहे ती आता कुठेतरी थांबली पाहिजे. देशात कुणाला कोठेही राहायचा, फिरायचा जरूर नव्हे त्यांचा मूलभूत हक्क आहे, परंतु या मूलभूत हक्काद्वारे कुठेही बेकायदेशीर ठाण मांडून बसावे, अनधिकृत झोपड्या उभाराव्यात, रस्ते, फूटपाथ अडवून करदात्या जनतेची कोंडी करावी असा होत नाही. रोजच्या परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे आज मुंबई पोलिसांना काम करणे मुश्कील झाले आहे. वाढते लोंढे, बांगलादेशी, झोपडपट्टी व फेरीवाले ही मुंबई पोलिसांच्या तणावाची खरी कारणे आहेत. मग कसे राहील त्यांचे मनोधैर्य? मुंबईतील अनधिकृत झोपड्या व फेरीवाल्यांना लगाम घालण्यात सर्व शासकीय यंत्रणांना अपयश आले आहे. त्यामुळेच खर्या मुंबईकरांची विशेषत: मुंबई पोलिसांची दैना झाली आहे. आपल्याकडे गरिबीचा, बेकारीचा बाऊ करून कुणालाही कुठेही झोपड्या उभ्या करू दिल्या जात आहेत. त्यात यूपी-बिहारचेच गुन्हेगार अधिक राहत आहेत. तेच लोक मुंबईत गुन्हे करतात आणि आपल्या प्रांतात पळून जातात. मग त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी यूपी-बिहारमध्ये जावे, नाहीतर कुठे जावे? माननीय उद्धव ठाकरे म्हणतात, ‘‘मुंबईची वाढती व्याप्ती पाहता आता मुंबईत परमिट सिस्टीम सुरू केली पाहिजे.’’ उद्धव ठाकरे म्हणतात तेच खरे आहे. नाहीतर या मुंबईत यादवी माजेल. पोलीस आताच मार खात आहेत, उद्या ते मार खायलाही दिसणार नाहीत. इतकी मुंबईत गर्दी वाढली आहे. धर्मांध आक्रमक झाले आहेत. धर्मांधांना पोलिसांचाच प्रमुख अडसर आहे. हिंदूंचा नाही. धर्मांध मुस्लिम म्हणतातही, पोलीस नसतील तर आम्ही हिंदूंना कच्चे खाऊन टाकू. तेव्हा आता परप्रांतीय लोंढे रोखले पाहिजेत. याच लोंढ्यातून बांगलादेशी मुंबईत येत आहेत आणि तेच आपल्या मुंबईची शांतता भंग करीत आहेत. हे आता आपल्या महाराष्ट्रातील देशप्रेमी मुसलमानांच्याही लक्षात आले आहे. आज आपल्यालाही ‘आधारकार्ड’ मिळालेले नाही, परंतु मीरा रोड, भाईंदर, ठाणे, मुंब्रा येथील बांगलादेशींच्या घरी ‘आधारकार्ड’ कधीच पोचले आहेत. मग हा देश कोणत्या दिशेने चालला आहे याचा विचार करा...नाहीतर पोलीसच दिसणार नाहीत
No comments:
Post a Comment