Total Pageviews

Thursday, 1 December 2011

KASAB INDIAS SON IN LAW

http://www.esakal.com/esakal/20111128/5110824265837717925.htm

कसाबवरील खर्च एक अब्जावर जाणार
फासावर लटकण्यासाठी किमान चार-पाच वर्षे लागण्याची शक्यता
दहशतवादाचे भयाण सावट केवळ भारतावरच नव्हे, तर जगभर सगळीकडेच पडलेले आहे. गेल्या दशकभरात ६६ देशांतील लाखो दहशतवाद्यांना अटक करण्यात आली दहशतवाद्यांना न्यायालयांनी शिक्षाही सुनावल्या. भारताची परिस्थिती मात्र उलटी आहे. भविष्यात दहशतवादी हल्ले होऊ नयेत याकरिता उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा २६/११च्या हल्ल्यानंतर वेळोवेळी सरकारकडून केला गेला. मात्र गेल्या तीन वर्षांत सातहून अधिक दहशतवादी हल्ल्यांना देश सामोरा गेला. गेल्या तीन वर्षांतील या हल्ल्यांपैकी, पुण्यातील जर्मन बेकरीवरील दहशतवादी हल्ला वगळता, अन्य एकही हल्ल्यांतील आरोपींना अटक दूरच, परंतु त्यांनी त्यांची ओळख पटवणेही शक्य झालेले नाही.
१३ फेब्रुवारी २०१० रोजी जर्मन बेकरीवर हल्ला झाला. मात्र या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या सात आरोपींपैकी केवळ एकालाच गजाआड करण्यात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला करण्यात यश आले. एवढेच नव्हे, तर या हल्ल्यानंतर २९ मार्च २०१० रोजी नवी दिल्लीतील मेहरौली येथे, १७ एप्रिल २०१० रोजी बंगळुरू येथील चिन्नास्वामी मैदानात, सप्टेंबर २०१० रोजी दिल्लीतील जामा मशिदीवरील गोळीबार आणि बाँबहल्ला करण्यात आला. त्यानंतर डिसेंबर २०१० रोजी वाराणसी येथील शितला घाट येथे, २५ मे २०११ रोजी नवी दिल्लीच्या उच्च न्यायालय परिसरात आणि १३ जुलै २०११ रोजी मुंबईत तिहेरी बॉम्बस्फोट घडविण्यात आले. परंतु या सर्व प्रकरणांमध्ये संशयितांचाही छडा लागलेला नाही. सर्व तपास अद्याप कागदावरच आहे. प्रत्यक्ष हाती काहीच लागलेले नाही
कसाब जिवंत ठेवण्यासाठी ५० कोटी रुपये
१९९३ च्या मुंबई बॉंबस्फोट खटल्याचा निकाल जाहीर होण्याला तब्बल १६ वर्षांपेक्षा अधिक काळ लागला होता. शिवाय त्यातल्या १२३ पैकी १०० आरोपी दोषी ठरले आणि १२ जणांना फाशीची शिक्षा झाली होती. भारतीय तपासयंत्रणा आणि न्याययंत्रणेची त्यामुळे जगभर टिंगलही झाली होती. कसाबवर दाखल झालेल्या खटल्यास विशेष न्यायालयाने त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. मुंबई उच्च न्यायालयाने त्याची ही शिक्षा कायम केली. त्याने आता त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नसल्याने, त्याला जिवंत ठेवण्यासाठी राज्य सरकारला आतापर्यंत ५० कोटी रुपयांचा खर्च गेला असावा.
खटला सुरु होण्यापूर्वी आणि खटला सुरू झाल्यावर कसाबला जिवंत ठेवण्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगात विशेष कक्ष बांधण्यात आला. या कक्षाबाहेर इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाचे जवान गस्तीसाठी ठेवण्यात आले. तुरुंगात राज्य राखीव पोलीस दलाच्या विशेष पथकावर कसाबच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती. कसाबवर दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे तुरुंगाबाहेर कडेकोट बंदोबस्त अद्यापही कायमच आहे. याशिवाय अचानक हल्ला झाल्यास तो उधळून लावायसाठी बुलेटप्रूफ मोटारही तुरुंगाबाहेर सतत सज्ज आहे. इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाने पाठवलेले कोट्यवधी रुपयांचे बिल येताच, गृह मंत्रालयाने हे पथक माघारी पाठवायचा निर्णय घेतला.
कसाबला जिवंत ठेवायसाठी दररोज .५० लाख रुपये इतका प्रचंड खर्च होतो. राजा-महाराजांच्यापेक्षा अधिक त्याची बडदास्त ठेवली जाते. कसाब तुरुंगाच्या अधिकाऱ्यांच्याकडे मटण-चिकन, पुलाव असे जेवणही मागत असल्याचे उघडकीस आले होते. देशाच्या या शत्रूला जिवंत ठेवायसाठी झालेला हा खर्च जनतेने भरलेल्या करातूनच झाला आणि होत आहे. त्याला कशासाठी जिवंत ठेवायचे?
संसदेवरच्या हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार अफझल गुरु याच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करून सहा वर्षे झाली. त्याने राष्ट्रपतींच्याकडे केलेल्या दयेच्या अर्जाचा निर्णय होत नसल्याने, त्यालाही अद्याप जिवंत ठेवण्यात आले आहे. कसाब-अफझल गुरुवर केंद्र आणि राज्य सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. पण देशातली गरीब जनता मात्र महागाईच्या कराल वणव्यात होरपळते आहे. गरीबांना प्रचंड महागाईमुळे दोन वेळचे अन्नही मिळत नाही आणि देशाचे वैरी मात्र असे तुरुंगात पोसले जातात.
- वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता
मुंबई उच्च न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात कसाबने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, ही सुनावणी 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. उच्च न्यायालयात ज्याप्रकारे या खटल्याची सुनावणी झाली, तशीच न्यायालयीन प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात असेल. त्यामुळे खटल्याची सुनावणी दरदिवशी जरी झाली तरी त्यासाठी अंदाजे एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
कसाबने विनंती केली तर त्याला उच्च न्यायालयात ज्याप्रमाणे राज्य मोफत विधी सहाय्य समितीचा वकील (लीगल एड) दिला होता. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीसाठी वकिलाची व्यवस्था केली जाईल. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या लीगल एड पॅनेलच्या वरिष्ठ वकिलाची नियुक्ती केली जाईल. या वकिलाला केंद्र सरकारकडून मानधनही दिले जाईल.
१०० कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित
देशभरातील तुरुंगांमध्ये हजारो कैदी अक्षरशः कोंबून ठेवले जात असून त्यांना शौचालये, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि आरोग्याच्या आवश्यक सुविधाही पुरविल्या जात नाहीत. तुरुंग ओसंडून वाहात असताना मुंबईतील ऑर्थररोड तुरुंगात कसाबसाठी मोठय़ा आकाराचा स्वतंत्र बुलेटप्रूफ सेल तयार करण्यात आला आहे. बाँबहल्ल्यानेही या सेलला धोका पोचविता येणार नाही, अशी त्याची रचना आहे.
पुढील वर्षअखेर किंवा काही नवीन मुद्दे उपस्थित झाल्यास दीड-दोन वर्षांत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपेल. त्याला फाशीची शिक्षा झाल्यास राष्ट्रपतींकडे दयेच्या अर्जाचा मार्ग त्याला खुला आहे. एकदा त्याने अर्ज केला की फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करता येत नाही. अफझल गुरूच्या दयेच्या अर्जावर निर्णय होण्यात अनेक वर्षे उलटली. कसाबच्या बाबतीत लवकरात लवकर पावले टाकली, तरी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दयेच्या अर्जप्रक्रियेसाठी चार-पाच वर्षे लागण्याची शक्यता आहे.
या कालावधीत त्याला ऑर्थररोड तुरुंगातच ठेवले जाणार आहे. त्याचा सेल, जेजे रुग्णालयातील विशेष कक्ष आणि सुरक्षारक्षकांवरील खर्च पाहता दररोज किमान साडेतीन लाख रुपये लागतात. त्यामुळे कसाब फासावर लटकेपर्यंत त्याच्यावर १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणे अपेक्षित असून, एखाद्या कैद्यावरील खर्चाचा हा विक्रमच ठरणार आहे. घरच्या गरिबीमुळे केवळ दीड लाखांच्या आमिषाने हे कृत्य केल्याची कबुली कसाबने न्यायालयात दिली. पण परदेशी नागरिक असलेल्या कसाबला फासावर लटकेपर्यंत अब्जावधी रुपये सरकारला मोजावे लागणार आहेत.
दहशतवादी हल्ल्यातील बळींसाठी १६ कोटी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवादी अजमल कसाबवर गेल्या तीन वर्षात करदात्यांच्या पैशातून राज्य शासनाकडून तब्बल १०० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू असतानाच, या दहशतवादी हल्ल्याची शिकार बनलेल्यांसाठी मात्र केवळ १६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याचाच अर्थ अजमलला शिक्षा सुनावण्यात होत असलेला विलंब पाहता अजमल हा राज्य शासनासाठी पांढरा हत्तीच बनला आहे.
कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईपर्यंत राज्य आणि केंद्र सरकारला त्याला पोसावेच लागेल. त्याची बडदास्त राखण्यापेक्षा तुरुंगात सामान्य कैद्याप्रमाणे त्याला ठेवावे, म्हणजे जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी होणार नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपतींच्याकडे आलेल्या फाशीच्या कैद्यांच्या दयेच्या अर्जावर वर्षोनुवर्षे निर्णय घेतला जात नाही. राष्ट्रपतींच्याकडे शिफारशी पाठवण्यासाठी अतिविलंब होत असल्यानेच, या दहशतवाद्यांना पोसले जाते. फाशीच्या कैद्यांच्या दयेच्या अर्जाचा निर्णय तडकाफडकी व्हायला हवा. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीच्या प्रचारातही विरोधी पक्षांनी अफझलला जिवंत का ठेवले? हा प्रचाराचा मुद्दा केला होता. पण सरकारने या दहशतवाद्यांना जिवंत ठेवायचा दयाळूपणा दाखवल्यानेच, कोट्यवधी रुपयांचा चुराडा सुरुच आहे, हे थांबणार तरी कधी?
जे झाले ते झाले पण मुंबई उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या कसाबच्या बाबतीत जनतेची नम्र विनंती. 'अतिथी देवो भव' या परंपरेनुसार त्याला उदार मनाने क्षमा करावी, त्याला येथील नागरिकत्व सन्मानाने बहाल करावे, धर्मानुसार सर्व हक्क त्याला प्रदान करावेत, त्याला मुख्य प्रवाहात आणावे, निवडणूक लढवू द्यावी आणि जिंकून आणावे, त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा राष्ट्रासाठी सदुपयोग करून घ्यावा, संसदेत आसनस्थ झाल्यावर तो मुंबईवर पुन्हा हल्ला करूच शकणार, नाही कारण त्याची मानसिकता आमूलाग्र बदललेली असेल
 
प्रतिक्रिया मी तर म्हणतो सचिन...आणि कोण असेल ते...यांना भारतरत्न देण्यापेक्षा अजमल कसाब यालाच देवून टाकावा..तेवढेच बाकी राहिले आहे...इकडे गरीब जनता महागाईने जळते आहे आणि हे आपले लाड पुरवताहेत या हरामखोराचे..फाशी का देत नाही आहेत याला? हा खर्चाचा तपशील माहीत असुनही...26/11/2008 लाच गोळ्या घालायला हव्या होत्या कसाबला.. आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय, नव्हे नव्हे इथे तर कुत्र दळतंय आणि आंधळ पीठ खातय लाज वाटत नाही काय ? कसब देशाचा जावई आहे बिर्याणी तर त्यला रोजच मिळायला पाहिजे .......आरे लाज तरी वाटली पाहिजे मंत्र्यांना ............शी मी पण टाकू का संसदेवर बॉम्ब (जेंव्हा भ्रष्टाचारी लोक जमा झाले असतील ). म्हणजे मला पण अशीच छान वागणूक मिळेल. शिवाय अतिरेक्या कडून मिळणारा पैशात माझे नातेवाईक आराम जगातील मला हि असाच १५ २० वर्षे मिळतील. असं रोज महागाई भ्रष्टाचार रोजची फालतू राजकारणी लोकांची बडबड ऐकण्या पेक्षा हे काही वाईट नाही. कीड तरी जाईल मोठे हत्ती मेले तर. काय कराव खरच कला नाही या लोकांच. कृपया कसाबचे लग्न करून द्या. इतकी राजेशाही बडदास्त आणि स्वरंक्षण कधीहि मिळणार नाही तसेच घर-ग्रहस्तीची, महागाईची पण फिकीर नाही. ........ सरकार चे डोके ठिकाणावर आहे काय? देवा...... लाज वाटते मला भारतीय म्हणवून घेण्याची आता :( कापूस शेतकर्यांना देण्या साठी पैसे नाहीत. पण कसब ला पोसण्य साठी आहेत. नालायक कॉंग्रेसचा धिक्कार असो कसाब ला जेल मध्ये ठेवण्या पेक्षा राष्ट्रपती भवनात का ठेवत नाही. किमान दोघांचा सुरक्षेचा खर्च एकत्र होईल तेवढाच पैसा कानिमोली अन कलमाडी ला मिळेल चित्रपट kadha !पुस्तके लिहा, अण्णा ना उपोषणासाठी बसावे , कसाब ला रामलीला वर समोर फाशी द्या ..... आमरण उपोषण .............जय हिंद ........ अरे समीर ,तुझा पुणेरी शहाणपणा दाखवलास का? सोनी वर नवी सिरीयल बनवा 'कसाब का स्वयंवर' अजून किती काळ सहन करायचे हे.. लादेनची किती चौकशी केली अमेरिकेने ?? हे जगाला माहितीच आहे.. तो वरून विचार करत असेल कि अमेरिकेऐवजी जर भारतावर हल्ला केला असता तर म्हातारपण व्यवस्थित गेले असते .. द्या मत अजून त्या नालायक कॉंग्रेसला! हे वाचून एवढा त्रास होतोय.. पण ह्या सरकारला का नाही कळत हे..... का आपली घटना असी लिहिली आहे ती आपण का बदलत नाही आहोत...... कोण कोण आवाज फोडणार ह्याला आम्ही आमच्या पोटाची खळगी भरायची का हे उद्योग करत बसायचे... घामाचे पैसे मिळतात आम्हाला फुकटात कुठून लाच नाही मिळत..... अजून दीड वर्षात राष्ट्रपती बदलतील आणि तो पर्यंत कसाब चा निकाल लागेल म्हणजे नवीन राष्ट्रपतीकडे क्षमेचा अर्ज करता येईल, न्यायालीन निर्णयासाठी एवढा वेळ का याचे कारण जनतेला द्यावे कसाबला बिग बॉसमध्ये कधी घेणार? तेवढाच त्याचा तुरुंगात ठेवायचा खर्च कमी होईल. यादाकाद्चीत जर का कसाबला फाशी दिलीच तर दिग्विजय सिंघ बरलेल , " माननीय कसाब यांचा दफनविधी सम्मानपूर्वक केला जाईल " कॉंग्रेस सरकार १० दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येईल ! जीव जळतो माझा.... तो पाकिस्तान विरोधात एक पुरावा जरी असला तरी तो खुनी आहे..माझे मत आहे कि त्यला अजून ५० वर्ष जिवंत ठेवा आणि रोज मरू द्या पण त्यचा खरचं जरा कमी करा. त्यचा सौरक्षण साठी त्यला अशा रूम मध्ये ठेवा ज्याचे दार फक्त hydrogen bomb टाकल्यावर उघडेल. त्यात काय विशेष ???? ये तो होना हि था ...... माझी पर्वाची comment ह्यांनी टाकलीच नाही ..... अजून बऱ्याच वर्षांनी, एक म्हातारा पाकिस्तानी बरेच वर्षं Indian जेल मध्ये आहे हे पाहून त्याला सोडून देतील... दहशतवादी अजमल कसाबवर गेल्या तीन वर्षात करदात्यांच्या पैशातून राज्य शासनाकडून तब्बल १०० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू असतानाच, या दहशतवादी हल्ल्याची शिकार बनलेल्यांसाठी मात्र केवळ १६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जय हो ! जय हो !...... आपला तो जावई आहे म्हणून सरकार येवडा खर्च करत आहे . लाज वाटत आहे कसाब जिवंत आहे त्याची . आपल्याकडे athithi देवो भाव पद्धत आहे...आणि पाहुण्यांचा खर्चच असा vichar करणे आपल्या शिस्ताचारात बसत नाही. जय जय रघुवीर समर्थ मेरा भारत महान माधुरी घोष said: कडे बघा ज्यांनी त्यांना त्रास दिला त्या त्या लोकांना USA ने मारून टाकले. उगीच वेळ आणि पैसा अजिबात वाया जाऊ दिला नाही. आपल्या useless सरकार ने शिकवा त्यांच्या कडून काहीतरी. मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही कारण तुम्ही लोक प्रसिद्ध करत नाहीत........... त्याच्यावर होणार्या खर्चा ऐवजी दवाखाने, शाळा उघडू शकतात. जागा असेल तर आम्ही पण येतो कि मग तिहार मध्ये ....फुकटची बिर्याणी तरी मिळेल ,,, कसबाला सुखात ठेवायाला तो या सरकारचा जावई आहे.तो पण साखां.लाज वाटते.या सरकारची(भारतीय असण्याची लाज वाटत आहे आज ) आपन सरकारची भ्रष्ट्चारीसाठी नवीन idea आहे. काही दिवसांनी बातमी येईल कसाब घोटाळा प्रकरण १०० कोटीचा गैर व्यवहार त्याच्यामध्ये महारष्ट्र सरकार ५०% आणि केंद्र सरकार ५०% वाट असणार. सरकारने आता क्साबचे लग्नसुधा लावून द्या म्हणजे कसे पाहुणा नाराज नाही झाला पाहिजे. मी आता tax भरणार नाही..काय करायचे आहे ते करा. त्यापेक्षा त्याला लगेच भर चौकात फाशी दिली असती आणि हा पैसा जे या हल्ल्याला बळी पडले त्यांना दिला असता तर निदान जखमेवर निदान मलम लावल्या सारखे तरी झाले असते. मला वाटत कसाब आता म्हातारा होऊनच मरणार... आरे निदान पोलीस आणि लष्कराच्या मनोधैर्याचा तरी विचार करा... समजा कसाबला फाशी दिलीच तर दिग्विजय सिंघ म्हणतील , " माननीय कसाब यांचा दफनविधी सम्मानपूर्वक केला जाईल " राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येईल ! कॉंग्रेस सरकारने त्याचा पाहुणचार उत्तमपणे केला आहे पुढेहि करत राहील.सरकार त्याचा दफनविधीचा सर्व खर्च करेल ! तसेच त्याच्या परिवाराला सेर्वोतोपारी मदत , सरकारी नोकरी देण्यात येईल ! आम्ही सावरकरांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी नाही करणार पण कसाबची नक्की करण्यात येईल. भव्य स्मारक उभारण्यात येईल ! एखाद्या रस्त्याला नाव देऊ ! कसाबच्या घरी सात्वन देऊ ! कसाब ची मुलाखत घ्या,आणि भारतात कसे वाटते ते विचारा . लोक उपासमारीने मेले तरी चालतील पण कसाबवरचा खर्च कमी करू नका. पैसे कमी पडले तर tax वाढवा पण त्याला सुखात ठेवा ..I Agree आणखी काय काय पहावे लागणार आहे ! तिकडे २६/११ च्या हल्ल्यात मरण पावलेल्या मृत कुटुंबीयांचे पूर्ण पैसे मिळाले नाहीत कसाब १०० कोटी गिळून बसला म्हणजे याचा अर्थ असा कि दहशतवादी सरकारच्या मुलीनी ठेवलेला नवरा आहे नक्कीच दिग्विजय सिंघ कसाब जिवंत राहू दे तसेच त्याला उदंड आयुष्य लाभू दे म्हणून रोज देव पाण्यात ठेवत असतील ! खरच कोणी देईल का या प्रश्नाचे उत्तर कशाला त्याला जिवंत ठेवता त्या कासाबला ? उद्या आणखीन एक कसाब आलातर काये करणार हा बोला कोणी देईल का या प्रश्नाचे उत्तर? कसाब अफझल गुरु, हे दोघे हि कांग्रेसचे जावई असल्यासारखे त्यांचे लाड पुरवले जात आहेत, कांग्रेस जो पर्यंत सत्तेत आहे तो पर्यंत या दोघांना शिक्षा होईल असा विचार करणे पण सोडून द्या... मतांचे राजकारण, दुसरे काय? अतिथी देवो भव' या परंपरेनुसार त्याला उदार मनाने क्षमा करावी, त्याला येथील नागरिकत्व सन्मानाने बहाल करावे, धर्मानुसार सर्व हक्क त्याला प्रदान करावेत, त्याला मुख्य प्रवाहात आणावे, निवडणूक लढवू द्यावी आणि जिंकून आणावे, त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा राष्ट्रासाठी सदुपयोग करून घ्यावा, संसदेत आसनस्थ झाल्यावर तो मुंबईवर पुन्हा हल्ला करूच शकणार, नाही कारण त्याची मानसिकता आमूलाग्र बदललेली असेल. भिकारडी सरकार आहे. त्याला जिवंत ठेवायला पैसे आहे पण गरीब जनते साठी नाही. धिक्कार!!!! त्याचे encounter करून टाका आपल्या राजकर्त्यांना कसाब बरोबर फासी द्यायला पाहिजे.हरामखोर राज्कार्त्यामुळे देशाची अशी अवास्त झाली आहे. समीर पुणेकर said: लेखकाने इतके उद्विग्न होऊन लेख लिहिला आहे कि त्यांचा रक्तदाब वाढला असेल असे वाटते , भारतात कायदा आहे , व्यवस्था आहे याचा जगभरात व्यवस्थित संदेश जात आहे. आणि फाशीची शिक्षा झालेले आणखी शेकडो आरोपी पडून आहेत , ब्रिगेडियर पदावरील माणसाने असा संयम सोडणे खचितच उचित नाही, कसब ला फाशी देण्या पेक्षा तो पळून जात असताना त्याला गोळ्या घालणे हा निश्चित मार्ग आहे येथे उहापोह करणे योग्य वाटत नाही, परंतु हे होणे सहज शक्य आहे, उगीच हताश होणे काय फायद्याचे ? या सरकारने अजून कसाबा वर खर्च करावा.शेतकरी मरू दे . गाढवापुढे (सरकारपुढे) वाचली भागवतगीता (राज्यघटना).....संसदेतला गोंधळ बारा होता....... ह्या सगळ्याला वैतागूनच पवारांच्या थोबाडीत मारली गेली होती. तेव्हा मात्र सगळ्यांनी अरे अरे केलं. कशाला त्याला जिवंत ठेवता त्या कासाबला भर चौकात सगळ्या समोर फाशी द्यायला पाहिजे कासाबला आणि त्यांच्या संघटनेला असे वाटत असेल कि आपण काहीही केले तरी action होण्यास वेळ लागतो आणि ते अजून विद्रोही विचार करतात असे किती जनता आहे कि त्या हमल्यात दुखावली गेली आहे त्यांचावर पैसे खर्च करा आणि कसाब विषय मिटवा.मी तुमच्या मताशी सहमत आहे याबाबतीत विचार नाही action पाहिजे . आपल्या देशात शिक्षा द्यायचा अधिकार केवळ आणि केवळ न्यायपालिकेलाच आहे त्यामुळे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्य न्यायलय किती वेळ लावणार ह्याचा हिशोब राजकारणी लोक किंवा पोलिसांकडे मागणे पूर्णपणे चुकीचे आहे. हा लेख सर्वोच्य न्यायालय दिरंगाई करते आहे म्हणून लिहिला आहे ते चांगलेच झाले, कासाबला चिकन आणि मटन बिर्याणी देण्यात येणार नाही हे न्याय्लायाच निकाल मात्र इथे वगळला गेला त्याच आश्चर्य वाटला. कधी कधी मला हाच doubt येतो कि या कसबाला आपल्या राजकारण्यांनीच भारतात आणला आहे. त्याला भासावर देऊन जनतेला आणि अतिरेक्यांना दाखवून द्या कि भारतावर वाकडी नजर टाकली तर काय हलत होईल. डोळे मिटआ आणि म्हणा "दत्त दत्त दत्त"... लोक उपासमारीने मेले तरी चालतील पण कसाबवरचा खर्च कमी करू नका. पैसे कमी पडले तर tax वाढवा पण त्याला सुखात ठेवा भारतीय असण्याची लाज वाटत आहे आज न्यायालीन ज्या पद्धती प्र०सिजर आहे बदलायचे सरकार मनावर कधी घेणार?अतिर्क्यासाठी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यावर आणि त्यावर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब करण्यासाठी वेळेचे बंधन का नाही? राष्ट्रपतींना तसे काय काम असते?आणि असले तरी हे महत्वाचे नि सरकारी पैशाची बचत करणारे काम पहिल्यांदा पाहायला नको का?सध्या पैश्ची उधळपट्टी हवी तशी चालू आहे आणि सरकारला कोण विचारणार पण न्यालयात जाऊन सरकारला धडा शिकवावा लागेल

On 28/11/2011 03:19 PM vijay said:
On 28/11/2011 03:21 PM MANGESH NARAWADE said:
On 28/11/2011 03:22 PM Punekar said:
On 28/11/2011 03:23 PM Kedar Bhatlawande said:
On 28/11/2011 03:24 PM Vips said:
On 28/11/2011 03:34 PM nil said:
On 28/11/2011 03:37 PM kavita said:
On 28/11/2011 03:46 PM Nitin said:
On 28/11/2011 03:50 PM sandeep shinde said:
On 28/11/2011 03:56 PM Dev said:
On 28/11/2011 03:56 PM
On 28/11/2011 03:59 PM patil said:
On 28/11/2011 04:04 PM gautam tarade said:
absolutely right.....i am totally agree with u sir... I just wanted to know that is there any way though which our honourable president will come to know this fact...? can anybody convey this message to her????????????
On 28/11/2011 04:04 PM arvind sardeshpande said:
On 28/11/2011 04:07 PM vani said:
I agree : '
On 28/11/2011 04:05 PM riya said:
On 28/11/2011 04:23 PM Ravi said:
On 28/11/2011 04:25 PM Sumit said:
On 28/11/2011 04:26 PM Mahesh Gubbyad said:
On 28/11/2011 04:34 PM manoj said:
On 28/11/2011 04:37 PM Deepa said:
On 28/11/2011 04:37 PM patil s said:
On 28/11/2011 04:37 PM Mahesh Gubbyad said:
On 28/11/2011 04:46 PM nana phadnvis said:
On 28/11/2011 04:58 PM vaibhav said:
On 28/11/2011 05:05 PM pranay said:
On 28/11/2011 05:09 PM ganesh jambhale said:
On 28/11/2011 05:13 PM me said:
On 28/11/2011 05:13 PM pratik ghatki said:
On 28/11/2011 05:28 PM Pankaj W said:
On 28/11/2011 05:29 PM
USA
On 28/11/2011 05:29 PM Shrinivas said:
On 28/11/2011 05:33 PM Narendra said:
On 28/11/2011 05:37 PM avinash said:
On 28/11/2011 05:43 PM pandu said:
On 28/11/2011 05:44 PM Nilesh said:
On 28/11/2011 05:51 PM kedar said:
On 28/11/2011 05:57 PM abhijit said:
On 28/11/2011 05:57 PM SARVESH(USA) said:
On 28/11/2011 07:24 PM tomindie said:
On 28/11/2011 07:52 PM Arman said:
On 28/11/2011 08:00 PM Rajesh Puranik said:
On 28/11/2011 08:08 PM soni said:
On 28/11/2011 08:18 PM nilkanath said:
On 28/11/2011 08:27 PM Jivan said:
On 28/11/2011 08:28 PM Sudhir said:
On 28/11/2011 08:58 PM Amol said:
On 28/11/2011 09:04 PM Tejas said:
On 28/11/2011 09:26 PM PRakash said:
On 28/11/2011 09:31 PM mahesh said:
On 28/11/2011 10:09 PM ShreeVishnuRaje said:
On 28/11/2011 10:11 PM sk said:
On 28/11/2011 10:20 PM Swati said:
On 28/11/2011 10:22 PM Hajir Ho! said:
On 28/11/2011 10:27 PM asha said:
On 28/11/2011 10:39 PM jayadip said:
On 28/11/2011 11:30 PM mohan said:
On 28/11/2011 11:37 PM rajan said:
On 29/11/2011 12:50 AM PRAVIN said:

No comments:

Post a Comment