धर्मालाही जात चिकटवू नका. सगळ्याच जातीधर्मांत गरिबी व मागासलेपण आहे. देशाचे नागरिक म्हणून त्या गरीबांकडे पहा, हीच आमची भूमिका आहे.
किती कराल लांगूलचालन?
इथे हिंदूही राहतात!
राजकीय फायद्यासाठी कॉंगे्रस पक्ष काय करील व कोणत्या थराला जाईल ते सांगता येत नाही. विशेषत: मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळण्याच्या बाबतीत आम्ही हे सांगत आहोत. गेल्या अनेक वर्षांत कॉंगे्रसने मुसलमानांच्या दाढ्या इतक्या वेळा कुरवाळल्या आहेत की जणू कॉंग्रेसचे घरटे त्या दाढीतच वसले आहे. त्या दाढीतून आपले मुंडके बाहेर काढून केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी मुस्लिमांसाठी आणखी नव्या आरक्षणाची घोषणा केली आहे. मागासवर्गीय मुस्लिमांना इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) २७ टक्के आरक्षण कोट्यांत आरक्षण देण्याचा विचार सरकार करीत असल्याची बांग सलमान खुर्शीद यांनी ठोकली आहे. हे सर्व कशासाठी? तर उत्तर प्रदेशात होणार्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांची मते खेचण्यासाठी. म्हणजे एक प्रकारे ही मुसलमानांना दिलेली लाचच आहे. आता आमचा प्रश्न त्या निवडणूक आचारसंहितावाल्यांना आहे, मुसलमानी मतांसाठी सुरू असलेली ही लाचखोरी निवडणूक आयोगाच्या कोणत्या नियमात बसते? की कॉंगे्रसला सर्व गुन्हे माफ? इकडे महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकरी हमी भावासाठी रस्त्यावर उतरला आहे, पण कापसाला भाव देण्याची वेळ आली तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एका सुरात म्हणाले, ‘कसे करायचे? काय करायचे? महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरू असल्याने कापसाचा हमी भाव जाहीर करता येत नाही.’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे नाकर्ते आहेत व नाकर्त्यांना कामे टाळण्यासाठी निमित्त हवे असते. नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने कॉंगे्रस - राष्ट्रवादीस ते मिळाले व त्यांनी शेतकर्यांच्या तोंडास पाने पुसली. उत्तर प्रदेशात निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत हे खरे. पण त्या कोणत्याही क्षणी होतील. प्रचाराचा धुरळा उडाला आहे व राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष आचारसंहिता लागू नसली तरी कॉंगे्रस पक्षाने अशा घोषणा करताना भान ठेवायला हवे. पण नैतिकता व आचार विचारांशी कॉंगे्रसचा संबंध आता उरलाय कुठे? मुसलमानी मतांसाठी त्यांनी बेभानपणे नव्या आरक्षणाची घोषणा करून टाकली. या देशात जणू सर्व धोरणे व योजना फक्त मुसलमानांच्याच लांगूलचालनांसाठी राबविल्या जात आहेत व त्याबद्दल कोणी खास आवाज उठवताना दिसत नाही. ‘रिटेल’च्या प्रश्नावर गेल्या पंधरा दिवसांपासून संसद ठप्प झाली आहे व ‘रिटेल’ व्यापारी सडकेवर उतरला आहे. पण मुसलमानांना निवडणुकीच्या तोंडावर ज्या ‘घाऊक’ सवलती व
आरक्षणाचा शिरकुर्मा
दिला जात आहे तो रिटेलपेक्षा धोकादायक आहे. रिटेलमध्ये परदेशी गुंतवणूकदार देश लुटणार आहेत, तर या ‘घाऊक’ लांगूलचालनात स्वदेशी राज्यकर्ते संपूर्ण देशाची सुंता करणार आहेत. ‘सच्चर’चा बोजा आधीच देशाच्या शिरावर पडला आहे. त्यात आता या नव्या ‘ओबीसी’ आरक्षणाचा हिरवा तुरा कपाळी लावला जात आहे. मागास मुस्लिमांच्या नावाखाली ही लयलूट सुरू आहे. मग या देशात फक्त मुस्लिमच मागास आहेत काय? सवलती व आरक्षणे त्यांना देताना जरा देशभरात उपासमारी, बेकारीने मरणार्या इतर जनतेकडेही लक्ष द्या. ज्या घाईघाईने मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला जात आहे तीच घाई सरकारने देशातील कापूस उत्पादक शेतकर्यांना ‘हमी भाव’ देण्याबाबत दाखवली असती तर त्यांच्या हेतूवर कोणी शंका घेतली नसती. सलमान खुर्शीद म्हणतात, मागास मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण देण्याचे आश्वासन कॉंग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. त्याची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. मग निवडणूक जाहीरनाम्यांत इतरही आश्वासने दिली होती त्यांच्या पूर्ततेचे काय? रोटी, कपडा, मकान, रोजगार, देशाची सुरक्षा, महागाई कमी करणे, भ्रष्टाचारमुक्त शासन देणे वगैरे वगैरे अनेक आश्वासनांची यादी होती. त्यातले एकही आश्वासन पूर्ण न करता कॉंगे्रसने फक्त मुस्लिम लांगूलचालनाबाबत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे ठरवलेले दिसते. कॉंगे्रसचे सरकार बनावट व ढोंगी आहे. राजकीय मतलब व सत्ता यापलीकडे देशहित हा प्रकार त्यांच्यासाठी गौण आहे. मागास मुस्लिमांना ‘ओबीसी’त आरक्षण दिल्याने शिक्षण संस्था आणि सरकारी नोकर्यांत त्यांना राखीव जागा ठेवाव्या लागतील. सध्या तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रात अशाप्रकारचे मुस्लिम आरक्षण आहे. पण आंध्रातील या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारले आहेत. गमतीचा भाग आणि कॉंगे्रसची उलटी खोपडी कशी चालते ते पहा. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती व कॉंगे्रसमधून विस्तव जात नाही. पण मुस्लिम लांगूलचालनाच्या बाबतीत मात्र त्यांची हातमिळवणी आहे. मायावती यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना २४ नोव्हेंबर रोजी पत्र लिहून मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याक समुदायातील मागास जातींना आरक्षण लागू करण्याची मागणी या पत्रातून मायावतींनी केली होती व एरवी मायावतींवर टीका करण्याची एकही संधी न सोडणार्या कॉंगे्रसने ही मागणी मान्य केली. मायावतींच्या राज्यात उत्तर प्रदेश कसा मागास राहिला, तेथील लोक कसे भिकारी बनले व महाराष्ट्रात जाऊन कसे भीक मागत आहेत ते युवराज राहुल गांधी सांगतच आहेत. पण याच भिकार्यांतील
फक्त ‘मुस्लिमां’ना सोयी
सवलती, आरक्षण देण्याचा घाट कॉंगे्रसने घातला आहे. मुसलमानांच्या लांगूलचालनाचा हा कडेलोट आहे. मुस्लिम आरक्षणाची बोंब वारंवार मारून कॉंग्रेसवाले येथील मुस्लिमांना देशाच्या मुख्य प्रवाहापासूनच तोडत आहेत. अशाच विषारी विचारांचा प्रसार कॉंग्रेसने केल्यामुळेच देशाची फाळणी झाली होती. आताही मुस्लिम आरक्षणाच्या घोषणा वारंवार करून कॉंग्रेसवाले त्याच विषारी विचारांची पेरणी मुस्लिम समुदायात करीत आहेत. त्यामुळे आधीच या देशाशी एकरूप न झालेला हा समाज मुख्य प्रवाहापासून आणखी दूर जाईल आणि या देशाची दुसरी फाळणी होईल अशी भीती आम्हाला आता वाटत आहे. अर्थात, त्या सलमान खुर्शीद महाशयांना या धोक्याशी काही देणेघेणे असण्याची शक्यता नाही. मुस्लिम मतांसाठी ते उद्या हिंदुस्थानचे नाव पाकिस्तानही करतील! दुसर्या त्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी. त्या तर बोलून-चालून विदेशीच आहेत. त्यांना हिंदुस्थानचा पाकिस्तान झाला काय, बांगलादेश झाला काय किंवा इटली झाला काय? त्यांचे काय बिघडणार आहे? आता म्हणे त्या इशरत जहां चकमक प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याचा आदेश गुजरातच्या न्यायालयाने दिला आहे. शेवटी ही सीबीआय तरी कोण आहे? सीबीआयला सत्ताधारी कॉंग्रेसच्या हातातील बाहुलेच म्हटले जाते ना! आणि ती इशरत जहां तरी कोण होती? ‘२६/११’ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार डेव्हिड हेडलीने अमेरिकेला दिलेल्या जबाबात या इशरतचा उल्लेख ‘लश्कर-ए-तोयबा’चा मानवी बॉम्ब असाच केला आहे. कॉंग्रेसवाले हेडली आणि त्याचा हा जबाबही खोटाच ठरवतील. कारण प्रश्न मुस्लिम मतांचा आहे. अर्थात या देशात हिंदू राहतात आणि ते बहुसंख्य आहेत हे कॉंग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवावे. दुर्दैव इतकेच की हा बहुसंख्य हिंदू पेटून उठत नाही. तो श्वास घेतो तो फक्त जगण्यासाठी. त्याच्या श्वासातून ठिणग्या बाहेर पडायला हव्यात. त्या पडत नाहीत म्हणूनच कॉंग्रेसची ही मुस्लिमप्रेमाची थेरं सुरू आहेत. देशाला दुसर्या फाळणीकडे नेणारी मुस्लिम आरक्षणाची बांग कॉंग्रेसचेच केंद्रीय कायदामंत्री ठोकत आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या आवारात उभे राहून हिंदू हिताची बात करणारा एकही कॉंगे्रस नेता दिल्लीत नाही, पण लखनौचे शिया धर्मगुरू कलबे सादिक यांच्या संस्थेत उपस्थित राहून सलमान खुर्शीद यांनी मुस्लिम आरक्षणाची बांग बिनधास्त ठोकली. हे धाडस हिंदू मंत्र्यांत व पुढार्यांत कधी येणार? पोटाला जात नसते. धर्मालाही जात चिकटवू नका. सगळ्याच जातीधर्मांत गरिबी व मागासलेपण आहे. देशाचे नागरिक म्हणून त्या गरीबांकडे पहा, हीच आमची भूमिका आहे. पण राष्ट्रहितास विचारतोय कोण? सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची घरटी मुस्लिमांच्या दाढीत बांधली असल्याने राष्ट्रहित हरवले आहे

No comments:
Post a Comment