Total Pageviews

Monday, 20 June 2011

TRIBUTE TO OSAMA BIN LADEN

ओसामाचे पुण्यस्मरण शिरीष पारकर Monday June 20, 2011 ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जगभर छापून आलेल्या प्रतिक्रिया खोट्या होत्या. आत त्या घटनेला महिना उलटून गेलाय. त्यानिमित्त थोर अरेबियन संत मा. ओसामा बिन लादेन यांच्या निधनाबद्दल व्यक्त झालेल्या या -याखु-या प्रतिक्रिया...मोडून पडला संसार मोडला नाही कणा
बंदुकीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा
तुझी आठवण आली नाही, असा एकही दिवस गेला नाही. तीस वर्षांपुर्वी तू फुलवलेल्या दहशतवादाच्या रोपट्याचे आज एका वटवृक्षात रुपांतर झाले याचा आम्हाला अभिमान वाटतो. या पुढे आयुष्यातील प्रत्येक क्षण आम्ही तुझी आठवण काढून तुझ्या रक्तरंजित मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू...ठोsss ठोsss ठोsssआपले नम्र, तालिबान, अल-कायदा, आय. एस. आय., सिमी, लष्करे तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन, जैश--मोहम्मद, हमास आणि जगभर विखुरलेल्या अतिरेकी संघटना. सच्चा मित्र हरपला आता जगण्याला काहीच अर्थ राहिला नाही. मा. ओसामा यांच्या जाण्याने अमेरिकेच्या लष्कराचा तसेच पेन्टेगोनचा सच्चा मित्र हरपला. जागतिक दहशतवादामुळे अमेरिकेतील शस्त्रास्त्राच्या कारखान्यांना चांगले दिवस आणल्याबद्दल अमेरिका मा. ओसामा यांचे कायमचे ऋणी राहील. /११ च्या हल्ल्ल्यापेक्षाही हा धक्का मोठा आहे हे निश्चित.मा. जॉर्ज डब्लू.बुश. (माजी अमेरिकी राष्ट्रपती)जबतक सुरज चांद राहेगा ओसामा तेरा नाम रहेगा माझे तर डोकेच चक्रावले आहे. एक तर ओसामा गेल्याचे दु: आणि वर ओसामाचे बील पण माझ्यावरच फाटले. मला मिडीयाचे एक कळत नाही की ओसामानंतर माझा नंबर आहे तर मी कशाला ओसामाला मारून माझा पहिला नंबर (मरायला) लावेन. पण दहशतवाद या शब्दाची जादू इतकी की कोण कुठला सौदी मधला लादेन, मी इजिप्तचा दाउद भारताचा, पण अमेरिका विरोधातून एकत्र आलो. यालाच विविधतेमध्ये एकता असे म्हणतात. त्या नापाक हिंदूस्थानातील शोले चित्रपटातीलये दोस्ती हम नाहे तोडेंगे’ हे गाणे म्हणजे आमचे ध्येय धोरण होते. ओसामाने आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवर पाणी सोडले, दाउदने स्मगलिंगवर पाणी सोडले आणि मी तर डॉक्टरी पेशावरच पाणी सोडले. मला आमच्या या सर्व लोकांचे कौतुक अशासाठी वाटते की एक, दोन, तीन, नाही तर किमान तीस चाळीस दहशतवादी संघटनाना आम्ही जन्म दिला. डॉ. अल जवाहिरी (अल कायदा नं. आणि आता नं. ) अमेरिकेने घाई केलीओसामाच्या जाण्यामुळे एक मोठे प्रश्नचिन्हच माझ्यापुढे उभे राहिले आहे. भारतातील पाच राज्यांच्या निवडणूकांमुळे मुस्लीम मतांच्या करीता ओसामाच्या मृत्यूवर टीका पण करता येत नाही. खंरं म्हणजे ओसामा वैगेरे मंडळी चांगली होती त्या डेम्बीस आय.एस.आय ने त्याला आमच्याविरुद्ध फितवले. अमिरीकेनेपण घाईच केली. आम्ही बघा कसाबची आणि अफजल गुरुची कशी छान बडदास्त ठेवलेय. आतापर्यंत आम्ही भारतात दाउदविषयी प्रश्न विचारले की सांगत होतो की अमेरिका जर दुस-या देशात घुसून मुल्ला ओमर, अल जवाहिरी ओसामाला पकडू शकत नाही तर भारताला कसं काय शक्य आहे. आता मात्र दाउदकरीता हालचाल करावी लागणार हे निश्चित. मनमोहन सिंग (पंतप्रधानभारत )हे असे व्हायला नको होतेओसामा बीन लादेन आमच्या देशातच मारला गेल्यामुळे आमची पंचाईत झालीय खरी पण आमच्या मुल्ला मौलावीम्ना आम्ही पटवून देतोय की हे सर्व सीआयए आणि रॉ चे कारस्थान आहे कारण ओसामा हा अमेरिकेचा अथवा भारताचा शत्रू असेल पण पाकीस्तानचा तो नुसता मित्रच नव्हे तर तारणहार होता. १९८० च्या दशकात अफगाणीस्थानातील तालीबानांमुळे तसेच १९९० च्या दशकात सौदी अरेबीया मुळे आणि गेली दहा वर्षे ओपरेशन ओसामामुळेच पाकीस्तानला भरघोस आर्थिक मदत मिळून लंगडत का होइना पाकिस्तानी अर्थव्यवस्था तगली हे ओसामाजींचे श्रेय मानावेच लागेल. जागतिक दहशतवादाचे प्रेरणास्थान हे पाकेस्तानाची नवी ओळख म्हणजे, "बदनाम हुवे तो क्या हुवा नाम तो हुवा है" या म्हणीप्रमाणे आहे. आमचे राष्ट्रपती श्री आसिफ आली जरादारीसाहेबांचे सासरे श्री झुल्फेकार आली भूत्तो यांच्या म्हणण्यानुसार, ‘आम्ही (म्हणजे अर्थात पाकिस्तानी) हजार वर्षे गवत खाऊन उपाशी राहू पण दरवर्षी १०० अणुबॉम्ब नाक्केच बनवूच... इन्शाल्ला
-युसुफ रजा गिलानी (वजीरे आम पाकिस्तान
-
-

..........................

No comments:

Post a Comment