Total Pageviews

Tuesday, 7 June 2011

RAMDEV BABA ANNA HAZARE & CORRUPTION

हवाय् उद्धारकर्ता! - अण्णा हजारे, बाबा रामदेव यांना लाभलेल्या लोकप्रियतेचे रहस्य कायबाबा रामदेव यांच्यापासून सरकारला मुक्ती मिळणे कठीण आहे. मी थायलंडमध्ये असताना तेथील वर्तमानपत्रातून बाबांविषयी भरपूर छापून येत होते. त्यांचे आयुष्य कसे आहे, त्यांचे पतंजली योगपीठ, त्यांचे प्राणायाम याविषयीही लिहून येत होते. 46 वर्षाचे बाबा रामदेव हे योगगुरू म्हणून कसे ओळखले जातात. त्यांचे भारतातील दोन कोटींहून अधिक टी.व्ही. वरील दर्शक त्यांचे चॅनेलवरील कार्यक्रम बघून आपल्या दिवसाची सुरुवात कशी करतात याची वर्णनेही तेथे वाचावयास मिळत होती. याशिवाय योग आणि मेडिटेशनच्या नेटवर्कच्या माध्यमातून ते कोटय़वधी रुपये कसे कमवीत आहेत हेही तेथील वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले होते. बाबा रामदेवांनी भारतातील राजकारण्यांना कसे भयभीत केले आहे याविषयीचा सहा कॉलम अहवाल त्यांच्या फोटोसह स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केला होता. दिल्लीच्या रामलीला मैदानावर असलेल्या उपोषण मंडपात मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वी लिहिलेला तो अहवाल होता. सरकारच्या त्या कृतीचे तीव्र पडसादही येथील वृत्तपत्रातून नंतर उमटले. सरकारने केलेल्या दमनचक्राची चित्रे तेथील चॅनेल्सवरूनही पहावयास मिळाली.
बाबा रामदेव यांच्या आंदोलनापासून खूप दूरवर असल्यामुळे माझ्या मनात दोन प्रश्न ताबडतोब उभे झाले. सध्या भ्रष्टाचार विरोधात सुरुवातीला अण्णा हजारे यांनी आणि आता बाबा रामदेव यांनी उभारलेल्या आंदोलनाला एवढा व्यापक प्रमाणात पाठिंबा मिळण्याचे कारण काय? .
या वर्षाच्या सुरुवातीला भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णा हजारे यांनी आमरण उपोषण सुरू केले तेव्हा अशातर्‍हेची आंदोलने देशाचे स्वास्थ्य बिघडविणारी असतात अशी त्यावर टीका करण्यात आली होती. अशा तर्‍हेने आंदोलन करणार्‍या लोकांच्या मागे लोकांचे पाठबळ नसते. तेव्हा उपोषणाला बळी पडून उपोषणकत्र्याच्या मागण्या पूर्ण करणे हे एकप्रकारचे ब्लॅकमेल करण्यासारखे आहे असेही या आंदोलनांच्या संदर्भात म्हटले गेले होते. या सर्व पाश्र्वभूमीवर बाबा रामदेव यांनी आपले उपोषण सुरू केल्यावर त्याला लोकांचा व्यापक पाठिंबा मिळणार आहे असा अंदाज सरकारला का आला नाही?
अलीकडच्या काळात जी जनमत सव्रेक्षणे घेण्यात आली त्या प्रत्येकात भ्रष्टाचाराविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती. अशा स्थितीत एखाद्या करिष्मा असलेल्या व्यक्तीने या विषयावर आंदोलन करण्याचे ठरविले तर त्याला लोकांचे समर्थन मिळणे अपेक्षित होते. पेट्रोलचे वाढते दर आणि वाढती भाववाढ यामुळे मध्यमवर्ग अगोदरच हतबल झाला आहे. त्याच्या चेहर्‍यावरील चकाकी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे शायनिंग इंडियाचे त्याला आकर्षण वाटेनासे झाले आहे. मग जी माणसे दारिद्रय़रेषेखाली आहेत त्यांच्याविषयी तर बोलायलाच नको.
या पाश्र्वभूमीवर टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा यामुळे काही लोक भरपूर कमाई करीत आहेत तर काहींना जगणे असहय़ झाले आहे असे वाटून लोकांमध्ये चीड निर्माण होणे स्वाभाविक म्हणावे लागेल. तेव्हा या चळवळी अविवेकी आहेत हे कुणीही मान्य करणार नाही. लोकांचा नेत्यांवरचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे आपल्या मदतीला एखादा उद्धारकर्ता धावून येईल याची लोक आतुरतेने वाट बघत आहेत. असा देवदूत किती लोकांर्पयत पोचू शकेल यावरच त्याची मदत करण्याची क्षमता मोजली जाणार आहे.
बाबा रामदेव यांचेशी चर्चा करताना सरकारला लोकांच्या या भावनेची जाणीव होती असे दिसत होते. या चर्चेमुळे सरकारविषयी लोकांच्या मनात सद्भावना निर्माण झाल्या होत्या. पण बाबा रामदेव यांच्यावर मध्यरात्री कारवाई केल्यामुळे सरकारविषयीच्या सर्व सद्भावना धुळीस मिळाल्या. ही कृती कुणाच्या इशार्‍यावरून करण्यात आली हे स्पष्ट झालेले नाही. पण सरकारचे विभिन्न विभाग परस्परांच्या विरुद्ध काम करीत आहेत असेच चित्र पहावयास मिळाले. या घटनेमुळे सरकारची प्रतिमा मात्र धुळीस मिळाली आहे. आता सरकारने आंदोलनकत्र्यासोबत कितीही तडजोड केली तरी सरकार हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध नाखुषीनेच कारवाई करण्यास तयार झाले आहे असा जो समज लोकांच्या मनात निर्माण झाला आहे तो कायम राहणार आहे.
स्वतर्‍ची प्रतिमा स्वच्छ राखण्यासाठी सरकारला भ्रष्ट व्यक्तींच्या विरुद्ध तातडीने कारवाई करावी लागेल. राजकारणात बुद्धीपेक्षा भावना अधिक महत्त्वाच्या असतात. लोकांना जर खायला अन्न मिळत नसेल तर सगळ्या जगात हीच परिस्थिती आहे असे सांगून लोकांचे समाधान करता येणार नाही. लोकांना काय वाटते तेच महत्त्वाचे असते. याचा प्रत्यय थायलँडमध्येही येत आहे. तेथे पुढील महिन्यात 3 जुलैला निवडणुका होणार आहेत. थायलंडदेखील भाववाढीच्या संकटाचा सामना करीत आहेत. अन्न, पेट्रोल, वीज आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू कमालीच्या महाग झाल्या आहेत. त्यामुळे थायलंडमध्ये बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. ‘‘भ्रष्ट लोकांना संसदेत प्रवेश देऊ नका’’ अशातर्‍हेचा प्रचार तेथे होताना दिसला. थायलंडचे माजी पंतप्रधान थिंगलुक शिनावात्रा हे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे स्वतर्‍हून विजनवासात गेले आहेत. त्यांची बहीण गरिबांचा कैवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात यंदा उतरली आहे. ती लोकांशी जुळलेली आहे. तिच्याजवळ करिष्मा आहे. भारतीय राजकारण्यांना थायलंडपासून बरेच काही शिकण्यासारखे आहे 
 
 

No comments:

Post a Comment