Total Pageviews

Tuesday 7 June 2011

KARUNANIDHI AS GUILTY AS KANIMOZI

सारे जमींपर केंद्र
 
 
 
सरकारने हस्तक्षेप केल्यामुळे अथवा उदासीनता दाखवल्यामुळेच कनिमोळी तुरुंगात आहे, असे द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचे म्हणणे आहे. कनिमोळी दोषी असेल तर मीही तितकाच दोषी आहे, असेही करुणानिधी म्हणाले. बरोबरच असावे त्यांचे म्हणणे. कारण पावणेदोन लाख कोटी रुपयांचा घोटाळा एका कनिमोळीमुळे अथवा राजामुळे होऊ शकेल, असे मानणे दूधखुळेपणाचेच ठरेल. फक्त ही उपरती करुणानिधी यांना आधी झाली असती तर त्यांच्या कन्याप्रेमाविषयी अधिक खात्री पटली असती. करुणानिधी अनेक दाक्षिणात्य राजकारण्यांप्रमाणे रंगतदार गृहस्थ. कनिमोळी ही त्यांच्या तिसऱ्या बायकोची कन्या. तिची आई- रजथीअम्मा यांच्याविषयी विधानसभेत बोलताना करुणानिधी यांनी मागे, ही माझ्या मुलीची आई, असे उद्गार काढले होते. त्यांची पहिली पत्नी पद्मावती विवाहानंतर लवकर निवर्तली. त्यांच्यापासून करुणानिधी यांना दोन मुले झाली. मुथू आणि अझागिरी. यातील मुथू सुरुवातीला राजकारणात होता, पण नंतर त्याने आपले बस्तान चित्रपटसृष्टीतच बसवले. धाकटा अझागिरी हा मनमोहन सिंग सरकारात रसायन खात्याचा मंत्री. केंद्रात मंत्री असूनही काही कामगिरी त्याच्या नावावर नसणे हीच त्याची मोठी कामगिरी. याचे आणि करुणानिधी यांच्या दुसऱ्या पत्नी दयाळू अम्मा यांचा ज्येष्ठ मुलगा स्टालिन याच्याशी उघड वैर. वडिलांचा वारसा कोणी चालवावा हा त्यांच्यातील वादाचा मुद्दा. स्टालिन याचा सख्खा भाऊ थामिझारासू आणि बहीण सेल्वी यांना राजकारणात फारसा रस नसावा. या सगळय़ांची सावत्र बहीण कनिमोळी हिच्याशी स्पर्धा. कारण ती एक तर शेंडेफळ आणि परत करुणानिधी यांची लाडकी. शिवाय कवयित्री. त्यामुळे एकेकाळी स्वत: कवी असलेल्याकरुणानिधी यांना कनिमोळी आपले वाङ्मयीन स्वप्न पुरे करेल असे वाटत असावे. पुन्हा या सर्वाचे मिळून आपली मामे भावडं, दयानिधी आणि कलानिधी आदींशी तणावाचे संबंध. या तपशिलावरून करुणानिधी यांच्या एकूण सगळय़ाच व्यवहारांची पुरेशी कल्पना येऊ शकेल. त्यांचा घरोबा हा एरवी कौटुंबिक मामला. त्याची इतरांनी दखल घ्यायचे काहीच कारण नाही. परंतु त्यांच्यातील कुटुंबकलह हा त्या राज्याच्या राजकारणाचा मुख्य कार्यक्रम बनल्यामुळे आणि केंद्रातील यूपीए सरकारलाही त्यामुळे धोका निर्माण झाल्यामुळे त्याची नोंद घेणे क्रमप्राप्त आहे. देशातील आतापर्यंतचा महाघोटाळा म्हणता येईल, असे दूरसंचार प्रकरण घडले, ते या कुटुंबकलहामुळे. कारण मारन बंधू यांच्या खाजगी टीव्ही साम्राज्यात आपल्याला पुरेसे स्थान मिळत नाही, अशी तक्रार कनिमोळी हिची होती आणि त्यातूनच तिला स्वत:चे वा स्वत:चे नियंत्रण असलेले खाजगी टीव्ही चॅनेल काढायची गरज वाटली. कलानिधी यांच्या टीव्ही चॅनेलने एक कथित पाहणी अहवाल सादर केला आणि त्यात बहुसंख्य तामिळ जनतेने करुणानिधी यांचे खरे वारस हे दयानिधी मारन आहेत, असे मत व्यक्त केल्याचे सांगितले गेले. या दोन कुटुंबांत खरी स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून. दूरसंचार घोटाळय़ाचे मूळ हे असे तामिळनाडूच्या कौटुंबिक राजकारणात आहे. यातूनच आपले स्वत:चे टीव्ही चॅनेल असावे, असे कनिमोळी यांना वाटले आणि कलाईग्नर वाहिनीचा जन्म झाला. त्यासाठी दूरसंचारमंत्री राजा यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले. -जी परवान्यांच्या व्यवहारांत जी लाच दिली गेली, ती या वाहिनीकडे वळवण्यात आली, असेही सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एरवी हा तपशील इतका उघडपणे बाहेर आला नसता. पण या प्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयाचाच दट्टय़ा असल्याने सीबीआय आदी चौकशी यंत्रणांना सत्य दडपणे जमलेले नाही आणि त्यामुळेच बिल्डर शाहिद बलवा असो, वा माजी दूरसंचारमंत्री राजा; या खात्याचे अधिकारी आदींना तिहारची हवा खावी लागली. या सगळय़ांच्या रांगेत आता कनिमोळी यांचे नातलग मारन कुटुंबीयही येऊन बसतील, अशी लक्षणे आहेत. या व्यवहारात अडकलेल्या एअरसेल या कंपनीचे माजी प्रमुख सी सिवसंकरन यांनी सीबीआयला दिलेल्या जबानीत दयानिधी मारन यांच्यावर ठपका ठेवला आहे. एअरसेल या कंपनीला जेव्हा नवीन परवाना मिळाला, तेव्हा दयानिधी मारन हे दूरसंचारमंत्री होते आणि मारन यांच्या दबावामुळेच आपल्याला या कंपनीतील ७४ टक्के भागभांडवल विकावे लागले, असा सिवसंकरन यांचा दावा आहे. सिवसंकरन यांचे हे भागभांडवल पुढे मलेशियातील मॅक्सिस गटाने विकत घेतले. त्याबाबतही गुप्तचर आणि अंमलबजावणी संचालनालयातर्फे चौकशी सुरू आहे. या चौकशीची व्याप्ती जसजशी वाढत आहे, तसतशी नवनवीन नावे समोर येत आहेत. या आधीच खाजगी क्षेत्रातील पाच कंपन्यांचे उच्चपदस्थ तिहार तुरुंगात हवा खात आहेत. आणखी किती जणांवर तशी वेळ येईल, याचा केवळ अंदाजच बांधला जात आहे. या पाश्र्वभूमीवर करुणानिधी यांच्यावर आपली लाडकी लेक कनिमोळी हिला गजाआड पाहण्याची वेळ आली. सोमवारी पत्रकार परिषदेत आपल्या लाडक्या लेकीच्या आठवणीने करुणानिधी गलबलले आणि सदैव काळय़ा चष्म्यात असलेल्या त्यांच्या डोळय़ांतून o्रुधारा वाहू लागल्या. एका बाजूला आपली लेक तुरुंगात जाताना पाहणे आणि दुसरीकडे आपले राजकीय साम्राज्य लयाला जाताना पाहणे, अशी दुहेरी संकटे चालून आल्याने करुणानिधी यांची अवस्था अधिकच करुण झाली असेल यात शंका नाही. त्यामुळे त्यांनी या सगळय़ा प्रकाराबद्दल मनमोहन सिंग सरकारला दोष दिला हे समजण्यासारखे आहे. तुरुंगाची हवा खाणाऱ्या आणि डासांच्या सहवासात रात्र घालवायची वेळ आलेल्या लेकीच्या अवस्थेविषयी बोलताना करुणानिधी यांनी फुलाची उपमा दिली. तुरुंगातील अवस्था कशी असते, याची तुम्हाला कल्पना आहेच. एखादे फूल तेथे ठेवल्यावर त्याच्या पाकळय़ा गळल्याशिवाय कशा राहतील, असे काव्यात्मक उद्गार करुणानिधी यांनी काढले. तेव्हा फूल हे भ्रष्टाचार करीत नाही, असे वार्ताहरांनी त्यांच्या निदर्शनास आणले किंवा काय, हे कळण्यास मार्ग नाही. आपली कन्या द्राविडी चळवळीतून तावूनसुलाखून निघालेली आहे आणि ती या साऱ्याला धैर्याने तोंड देईल, असाही विश्वास करुणानिधी यांनी व्यक्त केला. वास्

No comments:

Post a Comment