Total Pageviews

Wednesday, 1 June 2011

POLICE LOOTING STUDENTS ARRSTED

आयआयटीच्या विद्यार्थ्याला भीती दाखवून त्याच्याकडून खंडणी गोळा करणा-या तीन रेल्वे पोलिसांना अटक झाली आहे.

गेल्या शुक्रवारी हा विद्यार्थी उन्हाळयाच्या सुट्टीनंतर परतत असताना दादरच्या मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक सहावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाइलमध्ये अश्लील चित्रफीत असल्याचा आरोप करून या तिघांनी त्याला बेडया घालण्याच्या धमक्या दिल्या आणि त्याच्याकडून आठ हजार रूपये वसुल केले.

प्रारंभी हा विद्यार्थी तक्रार करण्यास घाबरत होता. त्याचे प्राध्यापक, सहकारी विद्यार्थी आणि पालक यांनी त्याला धीर देऊन पोलीस अत्याचाराविरूद्ध उभे ठाकण्याचे महत्त्व पटवले. अखेर परवा सोमवारी त्याने तक्रार नोंदवली. त्या आधारे आर.डी. सावंत, श्रीकांत वाघमारे आणि आर. एन. पंज्हवानी यांना अटक झाल्याचे रेल्वेचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे की दादर येथे टॅक्सीवाल्यांची मनमानी चालते तिकडे मात्र पोलीस दुर्लक्ष करतात. फलाटावर हे टॅक्सीवाले, हिजडे, भिकारी यांचा वावर असतो त्याकडेही पोलीस कानाडोळा करतात असाही आरोप प्रवासी करत आहेत. या विद्यार्थ्याने धैर्य दाखवले तसेच पोलिसांच्या जाचाला तोंड द्यायला लागलेल्यांनी दाखवावे आणि पुढे यावे असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले

No comments:

Post a Comment