Total Pageviews

Saturday, 4 June 2011

OMAR ABDULLAH MORE IN DELHI LESS IN SHRINAGAR

VERY TRUE . FOR A CHANGE DIGVIJAY SINGH HAS SPOKEN THE TRUTH.
WHEN KASHMIR WAS BURNING DR FAROOKH WAS IN S AFRICA WARCHING CRICKET

ओमर अब्दुल्ला जम्मू-कश्मीरचा कारभार कधी सांभाळणार?दिग्विजय सिंग यांचा सवाल
नवी दिल्ली, दि. (वृत्तसंस्था ) - कॉंगे्रसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी आता जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या कार्यपद्धतीवर झोड उठवली आहे. ओमर हे बघावे तेव्हा दिल्लीतच असतात, कश्मीरचा कारभार कधी सांभाळणार, असा सवाल केला आहे. आपल्या या वक्त्यव्यामुळे दिग्विजय सिंग यांनी कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांची नाराजी ओढवून घेतली आहे.ओमर अब्दुल्ला यांच्याशी राहुल गांंधीचा खास याराना आहे. मात्र दिग्विजय सिंग यांनी ओमर यांना आपले लक्ष्य केले. ओमर यांचे कुटुंब दिल्लीत राहत असल्याने ते शनिवार, रविवार दिल्लीतच असतात. त्यांनी दिल्लीचा ओढा कमी करुन कामात लक्ष घालावे असा अनाहूतपणे सल्ला दिग्विजय सिंग यांनी दिला खरा. परंतु, ओमर हे राहुल गांधीचे खास मित्र असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांची चांगलीच गोची झाली. त्यांनी घाईघाईने एक प्रसिद्धपत्रक जारी करुन जम्मू-कश्मीरमधील पंचायत निवडणूका शांततेत पार पडल्याबद्दल ओमर यांच्यावर वारेमाप कौतुकांची उधळपट्टी करत मिडीयावरच पराचा कावळा केल्याचे खापर फोडले.

No comments:

Post a Comment