Total Pageviews

Sunday, 19 June 2011

EATING JUNK FOOD

आपण कचरा खातोय चैताली भोगले
 काही फॅशनेबल फास्ट फूड जॉइंट्समध्ये जाऊन बसण्यासारखा स्टेटस सिम्बॉल नाही की आपल्या एरवीच्या राहणीमानाशी त्याचा कुठे मेळ बसत. पण रेल्वेच्या प्रवासाने एक उपरी गोष्ट आपल्या पचनसंस्थेचा भाग बनवली आहे हे खरं आहे. प्लीज, तिकडे बघू नकोस, तो कचरा आहे.’पण मला भूक लागली आहे.’हे बघ त्यात प्रिझर्वेटिव्ह्ज आणि मिठाचं प्रमाण अतोनात असतं. तब्येतीला चांगलं नसतं ते.’ पण मला भूक लागली आहे.’पण आज डबा तर व्यवस्थित खाल्ला होतास.’त्याला पाच तास उलटून गेले आहेत, घरी पोहोचायला खूप वेळ आहे आणि आता मला भूक लागली आहे.’दोन तास लागतील फक्त घरी पोहोचायला, तेवढंसुद्धा थांबता येत नाही तुला? मला भूक लागली आहे.’तुझं असं वागणं बघूनच त्यांनी किमती वाढवल्यात..’मला भूक लागली आहे.’प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत उभं राहिताना मनाशी चांललेल्या द्वंद्वामधले हे संवाद ती विशिष्ट ट्रेन येईपर्यंत लांबवता येऊ शकतात. पण प्रत्यक्षात घडतं एकच. एक-दोन मिनिटं उरली असताना पावलं स्टॉलकडे वळतात आणि तिथे लावलेल्या वेफर्स नाहीतर तत्सम पदार्थाच्या पाकिटांतलं एक पाकीट विकत घेतलं जातं. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर असे तीन तरी स्टॉल्स. ते बायकांच्या डब्याजवळ मुद्दामहूनच ठेवलेले असावेत अशी शंका येण्याइतपत आपण महिला ग्राहक तिथे घुटमळत असतो. आणि प्रत्येक स्टॉलवर लाल, हिरव्या, निळ्या, पिवळ्या पाकिटांतल्या जंक फूडच्या माळा लटकलेल्या आणि लेडीज कंपार्टमेंट येण्याच्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या बायकांकडे पाहावं तर प्रत्येकीच्या हातामध्ये त्यातलं एक पाकीट आणि त्यातले पदार्थ तोंडात टाकण्याचं काम यांत्रिकपणे चाललेलं असतं किंवा मग डब्यात स्थानापन्न झाल्यानंतर बॅगेतून हळूच बाहेर काढलेलं पाकीट फस्त करण्याची सुरुवात होते. या पदार्थाची नावं दहा रुपयांत जगाची सैर घडवण्याचा दावा करणारी. अमेरिकन चीज अँड ओनियन, कॅरेबियन शुगर अँड स्पाइस, स्पॅनिश टोमॅटो आणि असंच काही काही. त्यात भारतीय जिभेला रिझवण्यासाठी कुठे देसी झटका असतो, कुठे चाट स्पेशल फ्लेवर असतो. थोडय़ा थोडय़ा दिवसांनी यात कोणत्या ना कोणत्या प्रकाराची आणि चवींची भर पडत असते आणि त्या प्रत्येकाला तितकाच उठाव असतो. त्यात आणि पाच पाच रुपयांना मिळणा-या मूगडाळी, पॉपकॉर्न, मसालेदार शेंगदाणे, असेही पर्याय असतात. किंवा अत्यंत अस्वच्छ अशा भोवतालात कांदा, कोथिंबीर, लिंबू कापत बसलेल्या भैय्याच्या स्टॉलवरून येणारा ताज्या भेळेचा वासही त्या संध्याकाळच्या विशिष्ट वेळी भलताच हवाहवासा वाटतो..मुलींनो आणि बायांनो तुम्ही कचरा खात आहात.’ पोटात ढकललेला प्रत्येक वेफरचा तुकडा, प्रत्येक मसालेदार टेढीमेढी काडी किंवा बेक केलेल्या पावाचे फ्लेवर्ड तुकडे हीच गोष्ट ओरडून ओरडून सांगत असतात. का खातो आपण इतका कचरा? घरी तर सगळ्यांनी तिन्ही त्रिकाळ सगळ्यांनी घरचं, सुग्रास, सगळ्या प्रकारची आहार मूल्य असणारंच खावं याबद्दल आग्रही असतो. मग थोडा विचार आपल्याही भुकेचा का करता येऊ नये? डबा खाऊन पाच तास उलटल्यावर लागणारी भूक प्रचंडच असते आणि घरी पोहोचायला खरोखरीच खूप वेळ असतो हा युक्तिवाद बरोबर आहे. पण त्यालाही काकडी, गाजर, एखादं फळ किंवा असे काही आरोग्याला चांगले पर्याय शोधता येतातच. मग वेफर्सच्या पाकिटांमध्ये अशी कोणतीखास बात’ असते की त्यांचं टेम्प्टेशन टाळता येत नाही. रेल्वेच्या प्रवासाने आपल्याला आता या गोष्टीचं व्यसनच लावलंय बहुधा. रेल्वेने प्रवास करणा-या नोकरदार, मध्यमवर्गीय, मध्यमवयीन बायकांना. व्यसन हा शब्दच त्याच्यासाठी योग्य ठरावा. त्या पाकिटांचं हे असं फंकी असणं खरं तर लहान मुलांना डोळ्यांसमोर ठेवून बनवलेलं असणार, पण आपल्या मुलांना ज्या गोष्टींपासून दूर ठेवावं असं आपल्याला वाटतं त्यांच्या -या टार्गेट आपणच बनत आहोत की. हा काही फॅशनेबल फास्ट फूड जॉइंट्समध्ये जाऊन बसण्यासारखा स्टेटस सिम्बॉल नाही की आपल्या एरवीच्या राहणीमानाशी त्याचा कुठे मेळ बसत. पण रेल्वेच्या प्रवासाने एक उपरी गोष्ट आपल्या पचनसंस्थेचा भाग बनवली आहे हे खरं आहे.नोक-याबिक-यांसाठी आपण मोठय़ा आवेशात घराबाहेर पडलो -या, पण त्या कामाने थकल्यावर, आपापल्या ऑफिसातल्या छक्क्यापंज्यांशी आपापल्या कुवतीनुसार सामना केल्यावर, घरच्या जबाबदा-यांची ओझी वाट पाहत असताना, वाटेत एखाद्या ठिकाणी थांबूनश्रमपरिहार’ करायची सोय आणि मोकळीक नसते. भूक आणि खाण्याच्या वेळा यांची गणितंही बिघडत चाललेली. त्याची पोकळी ही पाकिटं भरून काढताहेत की काय? जगभरातल्या सव्‍‌र्हेनी वेळोवेळी हे सिद्ध केलंय की ताणतणावामध्ये आणि विशेषत: बायकांकडून जंक फूड खाल्लं जाण्याचं प्रमाण वाढत असतं. जंक फूड हाका मारत राहतं. त्याने अपेक्षितकिक’ मिळत नाही कदाचित पण आपल्यापुरतं एक जग तरी तयार होतं. चकचकीत रंगाचं स्टायलिश पाकीट उघडलं की ते संपेपर्यंत ते पाकीट आणि आपण एवढंच जग उरतं. समाधान देणारं. आपण मिळवलेला पैसा खर्च करण्याच्या कुवतीबद्दलचं समाधान, वस्तू विकत घेण्याचं, निवडीचं स्वातंत्र्य, जिभेचे चोचले पुरवता येण्यातलं आणि तयार करता एखादा पदार्थ आयतं पोटात ढकलता येण्यातलं सुख. पण विकत मिळणारी प्रत्येक गोष्ट आजकाल आपल्यालाच विकत घेत, गुलाम बनवत चालली आहे हे जितक्या लवकर आपल्या लक्षात येईल तितकं बरं नाही का
 
‘..







No comments:

Post a Comment