Total Pageviews

Sunday 12 June 2011

DANCING BY SUSHAMA SWARAJYA GOOD OR BAD ?

नाचता पण येईना...हारिस शेख Friday June 10, 2011 रामलीला मैदानावरचे बाबा रामदेव यांचे उपोषण आणि पोलिसांचा लाठीहल्ल्याने देशाचे राजकारण ढवळून निघाले. भाजपने बाबांची बाजू घेत राजघाट गाठले. तिथं कुणास ठावूक, भाजप नेत्या सुषमा स्वराज यांना नाचायची हुत्की आली अन् एका देशभक्तीपर गाण्यावर त्यांनी भांगडा केला. सुषमा स्वराज यांनी केलेला डान्स हा जणू आमची संस्कृती बुडविणारा प्रकार होता, अशा थाटात कॉंग्रेसने भाजपला फटकारले. कॉंग्रेस नेत्यांना त्यांनी केलेल्या नृत्य आणि भांगड्यात असंस्कृतपणा दिसला. कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी तर भाजप हा 'नाच्यां'ची पार्टी असल्याचे जाहीर करून टाकले. आम्ही कसे मोठे संस्कृती रक्षक आहोत या थाटात कॉंग्रेस पक्ष दिसत होता. भारतातासारख्या एकूण लोकसंख्येपैकी ३५ टक्के तरुणांची लोकसंख्या असलेल्या देशात एखाद्या नेता तरुणांसारखा वागत असेल, भांगडा करत असेल तर त्या नेत्याची खिल्ली उडवण्याची परंपरा येथेही कायम ठेवली गेली. एकीकडे जगभरातले राजकीय नेते तरुण, उत्स्फुर्तपणे वागत असताना भारतातल्या नेत्यांना याचे एवढे वावडे का हा या देशातील तरुणांना पडणारा प्रश्न आहे.
भारतीय राजकारणावर सध्या वयोवृद्ध नेत्यांची घट्ट पकड आहे. सध्या सत्तेवर असलेल्या काही नेत्यांच्या वयोमानावर नजर टाकूया. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (७६), पंतप्रधान मनमोहन सिंह (७८), अर्थमंत्री प्रणव मुखर्जी (७५), महाराष्ट्राचे राज्यपाल शंकरनारायणन (७९), तामिळनाडूचे राज्यपाल सुरजित सिंह बर्नाला (८५), केरळचे राज्यपाल रा. सू. गवई (८२), केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला (७३)... अशा या ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नेत्यांच्या हातात आमच्या देशाच्या सत्तेची सूत्र आहेत. देशातल्या कोट्यवधी तरुणांच्या आशा आंकाक्षा जाणून घेण्यात त्यांना रस असेल असं वाटत नाही. साहजिकच तरुण वर्गाला नृत्य करणं, ते करताना पाहणं यात रस असतो. त्यांना ते आवडतं. सध्या विविध टीव्ही चॅनल्सवर सुरु असलेल्या विविध प्रकारच्या डान्स कार्यक्रमांना तुफान प्रेक्षकवर्ग मिळतोय, यातून हे सिद्ध होतंय.
हरियाणवी-पंजाबी संस्कृतीत बालपण गेलेल्या सुषमा स्वराज यांनी राजघाटावर केलेला भांगड्यामागे कदाचित तरुण मतदारांशी समरस होण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. राजकीय पक्षांना निवडणुकीत तरुणांची मते तर हवी असतात. पण हेच पक्ष, त्यांची ध्येयधोरणे आखताना, तरुणांना ती आपलीशी वाटतील, अशाप्रकारचे प्रयत्न करताना दिसत नाही.नोव्हेंबर २०१० मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल भारत दौ-यावर आले होते. ओबामांच्या दौ-याची सुरुवात मुंबईतून झाली. कुलाब्यात होली नेम स्कूलला भेट दिली असताना तिथल्या मुलांसोबत ओबामा पती-पत्नीने कोळीगितावर धम्माल नृत्य केले होते. जगात सुपरपॉवर मानल्या जाणा-या अमेरिकेसारख्या देशाचे अध्यक्ष लहान मुलांमध्ये मिसळून नाचतोय, हे पाहून अनेकांना कुतूहल आणि आश्चर्य वाटलं. ओबामा नृत्य करतानाचे फोटो जगभरातील पहिल्या पानावर प्रकाशित झाले. ओबामा पतीपत्नीची ही एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. आमचे नेते मात्र एका विचित्र मानसिक अवस्थेत अडकलेले दिसतात. एखाद्या गोष्टीमुळे झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी अनेक जण नृत्य करून आपल्या भावना व्यक्त करतात. यात चुकीचे असे काही नाही. मुात नाचणे हा काही भारतात गुन्हा नाही. आणि राजकीय व्यक्तीने नाचू नये असा काही कुठे नियम नाही. भारताने नुकताच क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. याचा सर्व भारतीयांना प्रचंड आनंद झाला. तसेच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनाही आनंद साजरा करावासा वाटला. दिल्लीत त्या घराबाहेर पडल्या आणि कार्यकर्त्यांमध्ये मिसळून त्यांनी डान्सही केला होता. या कृतीतून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. दिग्विजय सिंह किंवा कॉंग्रेसचे नेते हे साफ विसरलेले दिसतात. सोनियांवर त्यावेळी भाजपने टीका केली नव्हती. मग सुषमा स्वराज यांच्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय?प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम राजकीय नेत्यांमुळे या देशातला तरुणवर्ग निराश झालेला आहे. अण्णा हजारे यांच्या जंतरमंतरवर झालेल्या पहिल्या उपोषणाच्या वेळी याचा प्रत्यय आला. वयोवृद्ध नेत्यांनी सत्तेची केंद्र वर्षानुवर्षे ब्लॉक केलेली आहेत. तरुणांसाठी रोजगार उत्पन्न होतील, त्यांच्या सर्जनशिलतेला वाव मिळेल अशी धोरणे आखताना सत्तेत बसलेली वयोवृद्ध मंडळी दिसत नाही. नृत्य, भांगडा सारख्या क्षुल्लक गोष्टीवर आक्षेप घेऊन निरर्थक वाद निर्माण करणा-या नेत्यांचा आजच्या तरुणांना किळस आलेला आहे

No comments:

Post a Comment