Total Pageviews

Sunday 12 June 2011

EDITORIAL IN SAMANA ON RAMDEV BABA

पडद्यामागची नवी हुकुमशाही!सत्य सांगणार्‍यांनी मृत्यूला घाबरू नये!
कालपर्यंत दहशतवाद आणि बॉम्बच्या धमाक्यांनी देश हादरत होता. आता जंतरमंतर, राजघाट, रामलीला मैदानावरील उपोषणांनी देशाला हादरे बसू लागले. बाबा, महाराज, बुवा वगैरे लोक देशाला वेठीस धरतात. हे लक्षण चांगले नाही. भ्रष्ट राज्यकर्ते नष्ट व्हायलाच हवेत. त्यांची जागा बेजबाबदार लोकांनी घेऊ नये. पाकिस्तानातील सूत्रे अतिरेकी संघटनांकडे तशी हिंदुस्थानची सूत्रेउपोषण’वाद्यांकडे असे घडले तरअराजक’ निर्माण होईल. छातीवर गोळ्या झेलण्याची तयारी नसलेल्यांनी सेनापती बनू नये!
हरिद्वारचे बाबा रामदेव उपोषणाला बसले. त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून अण्णा हजारे राजघाटावर उपवासाला बसले त्यांच्या उपोषणाभोवती देशाचे सर्व राजकारण आज गिरक्या मारताना दिसत आहे. हिंदुस्थानच्या लोकशाहीची आणि राजकारणाची इतकी अवहेलना आणि दुरवस्था झालेली आहे की सर्वसामान्य माणसाचा या विषयातील रसच नाहीसा होत चालला आहे. हरिद्वारचे एकबाबा’ उठतात दिल्लीच्या रामलीला मैदानावर येऊन भ्रष्टाचार, काळा पैसा याविरुद्ध उपोषणास बसतात. त्यांच्या उपोषणाने अस्वस्थ झालेले सरकार त्यांच्याशी आधी चर्चा करते, मागण्या मान्य करते त्यानंतर अहंकाराचा अग्नी डोक्यात गेलेले बाबा उपोषण सोडत नाहीत तेव्हा मध्यरात्री पोलीस त्या मांडवात घुसून उपोषणकर्त्यांवर लाठीमार करून पळवून लावतात. हे सर्व प्रकरण आता तापले आहे भारतीय जनता पक्षासह सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी हरिद्वारच्या बाबा रामदेवांचे नेतृत्व स्वीकारून आपण कमजोर असल्याचे मान्य केले आहे. देशाला अराजकाकडे नेणारे हे उद्योग आहेत. कॉंग्रेस हा पक्ष राहिलेला नसून एकटोळी’ बनली आहे हे आता पुन्हा सिद्ध झाले आणि विरोधी पक्ष म्हणजे एकमेकांशी कसलाच संवाद नसलेले नेते असेही चित्र दिसते.पुन्हा उपोषण कशासाठी?
भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णा हजारे यांचे एक जोरदार उपोषण झाल्यानंतर रामदेवबाबांनी पुन्हा त्याच प्रश्‍नासाठी उपोषण का करावे सरकारने रामदेवबाबांशी चर्चेचे नाटक का करावे? अण्णा हजारे यांच्याविरोधात आणखी एक फौज उभी करावी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात दुफळी माजवावी हीच त्यामागची खेळी. त्या खेळात रामदेवबाबांचा वापर झाला असावा, पण नंतर सरकारचे त्यांच्यावर नियंत्रण राहिले नाही. काळा पैसा ही राष्ट्रीय संपत्ती आहे असे जाहीर करा सर्व काळा पैसा परदेशातून हिंदुस्थानात आणा ही बाबांची मागणी. यावर लालू यादव यांचा टोला असा की, ‘स्वीस बँकेतला काळा पैसा पुन्हा हिंदुस्थानात हवा असेल तर रामदेवबाबांनी स्वीस बँकेबाहेर आंदोलन करावे!’ यादव म्हणतात ते खरे आहे. काळा पैसा हाच स्वीस बँकेची ताकद आहे ती मूठ दिल्लीत उपोषणाला बसून ढिली करता येणार नाही. काळा पैसा म्हणजे काय? कर चुकवून दडवून ठेवलेला हा पैसा. तो नोटांची बंडले भरून, बॅगा भरून विमानात बसून स्वीस बँकेत भरणा करण्यासाठी कोणी नेत नाही. स्पेक्ट्रम घोटाळ्यातला पैसा इकडे कोणी रोख रकमेत स्वीकारलेला नाही बोफोर्सच्या दलालीतला पैसाही कॉंग्रेसवाल्यांनी इकडे स्वीकारला नाही. तो परस्पर परदेशी बँकांत जमा होतो. हे सर्व रोखणारे कायदे आपल्या देशात आजही आहेत. पण त्या कायद्यांची अवस्था विकलांग, पक्षघात झालेल्या वृद्धासारखी झाली आहे.धर्मस्थानी काळा पैसा
काळा पैसा हा मुद्दा महत्त्वाचा आहे, पण तो मांडायचा कोणी? सर्वच धर्माचे धर्माचार्य आज हजारो, कोटींच्या इस्टेटी बाळगून आहेत ही सर्व संपत्ती बेहिशेबी आहे. राजकारणी उद्योगपती धनसंचय करतात त्यासाठी स्वीस बँकेची निवड करतात. पण आता धर्मगुरू म्हणवून घेणारेही तेच करतात. सर्वाधिक संपत्ती, मंदिरे, वक्फबोर्ड मिशनर्‍यांची अध्यात्म सांगणार्‍या बाबा महाराजांची आहेत. खुद्द रामदेवबाबांच्या संस्थेची संपत्ती पंधरा हजार कोटींची. आज त्यांची मासिक उलाढाल 1100 कोटींची आहे. राजकारण्यांच्या संपत्तीकडे आता त्यांनी का बोट दाखवायचे? ‘सामान्य’ माणसाचे जीवन जगावे असे आता संन्याशालाही वाटत नाही. झेन फकीर लिंची याला कुणीतरी विचारलं की, ‘‘तुझी साधना कोणती आहे?’’ तो म्हणाला की, ‘‘जेव्हा भूक लागते तेव्हा मी जेवून घेतो. जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी पितो, जेव्हा झोप येते तेव्हा झोपी जातो.’’ तो प्रश्‍नकर्ता म्हणाला, ‘‘पण हे तर सारे सामान्य लोक करतात.’’ तेव्हा लिंची म्हणाला, ‘‘मी कोण असामान्य लागून गेलो आहे! मी सामान्याहूनही सामान्य आहे.’’ तो माणूस म्हणाला, ‘‘मग काय फायदा?’’ लिंची म्हणाला, ‘‘फायदा खूप आहे! मी संतुष्ट आहे... आणखी काय फायदा हवा?’’ या देशात कोणीही संतुष्ट नाही. सत्ताधारी नाही, विरोधी पक्ष नाही, उद्योगपती नाही आणि धर्मकारणीही नाही. संतुष्ट नसणे हेच काळ्या पैशाचे मूळ आहे.आकडा काय तो सांगा!
देशात नेमका किती काळा पैसा आहे? रामदेवबाबा त्यांना पाठिंबा देणारेज्ञानी’ लोक जी अक्कल पाजळत आहेत ती पाहिली की देशाच्या मूर्खपणाची कमाल वाटते. या देशात 400 लाख कोटी काळा पैसा असल्याचे रामदेवबाबा सांगतात. हा आकडा आपण सगळ्यांनी कोठून आणला? रामदेवबाबा त्यांच्या समर्थकांनी असे जाहीर केले की, हा सर्व काळा पैसा हिंदुस्थानात आणला तर देश कर्जमुक्त होईलच, पण देशातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येकी 1 लाख रुपये देता येतील. काळा पैसा आणून जनतेला वाटायचा हे वाक्य टाळीला चांगले आहे सध्या अशाच टाळ्या दिल्लीतील सर्वच उपोषणकर्त्यांना मिळत आहेत. भ्रष्टाचार हा भस्मासूर आहे त्याविरुद्ध राजकीय पक्ष आणि नेत्यांनीच लढा द्यायला हवा. रामदेवबाबा त्यांच्या उपोषणकर्त्या समर्थकांवर पोलिसांनी जो राक्षसी हल्ला केला त्याचा धिक्कार व्हायलाच हवा. कॉंग्रेस राज्यकर्त्यांची ही नामर्दानगीच आहे. हे नामर्द शासन जितके काळ सत्तेवर राहील तितका देशही अधिक नामर्द होईल. रामदेवबाबा अण्णा हजारे भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतात म्हणून त्यांना डोक्यावर घेतले जाते. पण शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे लोकनेते भ्रष्टाचाराविरुद्धरान’ उठवतात सरकारशी झगडा करतात ते सर्व बाबा आणि अण्णांच्या उपोषणापेक्षा कमी नाही. नेत्यांची लढाई सुरूच असते लोकांनी नेत्यांचेच ऐकायला हवे. उद्या सत्तापरिवर्तनानंतर बाबा आणि महाराज आश्रमात बसतील रिमोटकंट्रोल बनून देश चालवतील तेव्हा जगात आपले हसे होईल.नेतृत्व नाही!
देशाचा सगळ्यात मोठा शत्रू दहशतवाद नसून भ्रष्टाचार हाच आहे. दहशतवादाचा उगमही भ्रष्टाचारातून झाला. कायदे आहेत ते कुचकामी ठरले. कारण नेत्यांनीच स्वत:चा भ्रष्टाचार झाकण्यासाठी कायदे कमजोर बनवले. देश आज नेतृत्वहीन झाला आहे सर्वच राजकीय पक्षांनी विश्‍वासार्हता गमावली म्हणूनच अण्णा हजारे रामदेवबाबांना महत्त्व मिळालेे. राजकारण्यांनी नेत्यांनी हा त्यांचा पराभव मानायला हवा. पण शेवटी नेता हा नेताच असतो. रामदेवबाबा यांनी पोलिसांपासून बचाव करण्यासाठी रामलीला मैदानातून पलायन केले. महिलांच्या गराड्यात महिलेच्या वेषात ते पळून गेले. पोलीस गोळ्या घालतील अशी भीती त्यांना वाटली. रामदेवबाबांनी पळून जाण्यापेक्षा पोलिसांच्या गोळ्या झेलण्याची दंडुके खाण्याची तयारी ठेवायला हवी होती. पोलिसांच्या दडपशाहीने बाबा त्यांच्या साथीदारांना रडू कोसळले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीसाठी अनेक तरुण शहीद झाले. त्यांनी पोलिसांची पर्वा केली नाही. रामदेवबाबांनी ती का करावी? पण स्वत:च्या शरीरातील रक्ताचा एकही थेंब सांडतासेनापती’ बनायचे आहे. अण्णा हजारे प्रत्येक भाषणात सांगतात, ‘महाराष्ट्राच्या मंत्र्याने मला मारण्याची सुपारी दिली होती.’ या सुपारीच्या प्रेमात पडता लोकांना नवा विचार द्या. अनेक खून पचवून त्या रक्ताचे हात स्वत:च्या कपड्यांना पुसणारे लोक राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. हजारे यांनी या सामान्यांच्या हत्या खुनांकडेही आपुलकीने पाहावे. स्वत:च्याच प्रेमात पडलेले बाबा, महाराज समाजसेवक देशात अराजक निर्माण करीत आहेत. कारण देश नेतृत्वहीन झाला आहे. देश चालवू नका!
सरकार आणि विरोधी पक्ष कुचकामी ठरल्यानेबाबा’ अण्णां’सारखी सत्ताबाह्य केंद्रे निर्माण झाली ही सत्ताबाह्य केंद्रेच देश, सरकार न्यायालये चालवीत आहेत. उपोषणाला बसून सरकारला हुकूम देणे हा संसदेचा, लोकशाहीचा अपमान आहे तसा अपमान होणे हे अफझल गुरूने संसदेवर केलेल्या हल्ल्याइतकेच भयंकर आहे. त्यापेक्षा या सर्व लोकांनी थेट राजकारणात पडून संसदेत निवडून यावे. देशाचा कारभार हातात घ्यावा लोकशाही मार्गाने हुकूमशाही गाजवावी. कोणत्याही जबाबदारीशिवाय सत्ता गाजविणे हे ढोंग आहे. रामदेवबाबा एका बाजूला उपोषण करतात दुसर्‍या बाजूला 11000 लोकांची सशस्त्र फौज निर्माण करण्याची भाषा करतात. यावर सरकारने दम भरताच ते पलटी मारतात. स्वत:चे आर्थिक साम्राज्य सर्वच बाबा-महाराज उभे करतात. त्यांच्या प्रवचनांसाठी निराशेच्या गर्तेत सापडलेले हजारो लोक गर्दी करतात. त्या गर्दीतून लढणारे निर्माण होत नाहीत. उपोषण हे गांधीजींनी दिलेले हत्यार आहे. ते विनोबा भावेंनी धारदार बनवले. विनोबांचे एक वचन शेवटी देतो हा विषय थांबवतो. ‘सत्य सांगितल्याबद्दल येशूला सुळावर चढविले गेले नि गांधींवर गोळ्या झाडल्या गेल्या. तसेच भाग्य मलाही लाभले तर मला फार आनंद होईल. लोक सुळावर चढवोत की गोळ्या झाडोत, मी सत्य हे सांगणारच!’ जो मृत्यूला घाबरत नाही तोच सेनापती त्यालाच सत्य सांगण्याचा अधिकार आहे! रामदेवबाबांना हा अधिकार आता उरला आहे काय? 

No comments:

Post a Comment