बाबा-अण्णा एकमेकाला पूरक ठरावेतराजेश कालरा Friday June 03, 2011 याला चमकोगिरी म्हणा अथवा चाणक्यनीती किंवा तुम्हाला हवे ते नाव ठेवा, पण कपिल सिब्बल आणि दिग्वीजयसिंह जोडीने लोकपाल विधेयक आणि परदेशात बड्यांनी दडवलेली अगणित संपती हे दोन मुख्य विषय जणू काही, अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्यातील फुटकळ संघर्ष आहे असे चित्र निर्माण केले आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे अण्णा आणि बाबा हे या दोन्ही मुद्यांबाबत तीव्र संघर्ष करत आहेत हे लक्षात घेता सिब्बल आणि सिंह यांच्या कौशल्याला दाद द्यावीशी वाटते.सिब्बल आणि सिंह या जोडीने या सर्व मामल्यात राजकारण खेळत, अण्णा आणि बाबा या, भ्रष्टाचार आणि काळा पैसा या आघाड्यांवर लढ्यातील अग्रणींच्या अनुयायांच्या मनात गोंधळ उडवून दिला आहे. जणू काही अण्णा आणि बाबा ही दोन भावंडे भांडत आहेत, परंतु त्यांना नेमके काय हवे आहे हे समजत नाही असे चित्र सिब्बल आणि सिंह यांनी निर्माण केले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्णा आणि बाबा यांना सत्ता हवी आहे असे यामुळे वाटू लागले आहे. नेमके या वेळी, सुजाण सरकार, भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर पडण्याची संधी दवडत आहे असे दिसते आहे.प्रसिद्धी माध्यमे याला बळी पडत आहेत असे मी म्हणणार नाही, परंतु त्यांना यामागील राजकारण समजत नाही. गोंधळ उडवून देणारे माध्यमांचा, त्यांच्या फायद्यासाठी पुरेपूर लाभ उठवत आहेत. यामुळे सामान्य माणूस चक्रावला आहे. भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न अकाली बघणारा हा माणूस पुन्हा एकदा उदास बनला आहे. भ्रष्टाचाराची कीड कधी आणि कशी नष्ट होईल याचा तो विचार करत आहे आणि ज्यांना देश भ्रष्टाचारीच रहावा असे सतत वाटते त्यांना सिब्बल आणि सिंह जोडी आपले उद्दीष्ट साध्य करीत आहे याचा आनंद वाटत असावा.आता तर अधिकाधिक लोक, अण्णा आणि बाबा यांच्यातील मतभेदांबाबत उघडपणे बोलतान दिसत आहे. बाबा रामदेव खास विमान करून दिल्लीला गेले तेव्हा ज्येष्ठ मंत्री त्यांच्या स्वागतासाठी कसे उभे होते याचीही आता चर्चा होते आहे. नागरी संघटनांमध्येच लोकपाल विधेयकावरून कसे मतभेद आहेत याचीही आता चर्चा झडते आहे. त्यांच्यात, पंतप्रधान आणि न्यायाधीशांना लोकपाल विधेयकात घ्यायचे की नाही यावर एकमत नाही असेही आता बोलले जाते आहे. यातच, भर पडली आहे ती, सनसनाटी बातम्यांच्या शोधात असलेल्य माध्यमांची. कोणाचेही बोललेले एखादे वाक्य उचलायचे आणि त्यातून वाद निर्माण करायचा असे त्यांनी सध्या चालवले आहे.बाबा रामदेव नेमके काय म्हणाले आणि माध्यमांनी त्याला कसे वेगळे स्वरूप दिले हे मी बघितले आहे. लोकपालांच्या चौकशीच्या अधिकारात पंतप्रधानांना घ्यावे की नाही याबाबत त्यांनी नागरी संघटनांच्या भूमिकेच्या विरोधी भूमिका घेतली अहे सांगितले जाते, मी ती चर्चा नीट ऐकली. बाबा रामदेव सतत भूमिका घेत होते की, या प्रश्नावर चर्चा होणे आवश्यक आहे. लोकपालाच्या कार्यक्षेत्रात पंतप्रधान यावेत ही कल्पना त्यांनी फेटाळून लावली असेही मला कधीही वाटले नाही.ही बाबही आपण सोडून देऊया. अण्णा आणि बाबा नेमके काय म्हणत आहेत याकडे आपण लक्ष देऊया. अण्णा लोकपाल विधेयक तयार करण्यात गुंतले आहेत, तर बाबा रामदेव परदेशात भारतीयांनी साठवलेला प्रचंड काळा पैसा परत आण्ण्यासाठी संघर्ष करीत आहेत. या दोन्ही बाबी एकमेकाला पुरक आहेत, एकमेकाला छेद देणा-या नाहीत. ते समान ध्येयासाठी लढत आहेत, एकमेकाला शह देण्याचा त्यांचा उद्देश नाही असे मला वाटते. हा त्यांचा एकत्रित लढा आहे. पण राजकाण्यांनी याला कसे स्वरूप दिले बघा.पुढ्यात वाकून त्यांचे स्वागत करत त्यांनी बाबांच्या विश्वासाहतेर्ला धक्का दिला आहे, बाबांची विश्वासार्हता अजिबात यामुळे वाढेल असे मला अजिबात वाटत नाही.मी नेहमीच भूमिका मांडत आलो आहे की, नागरी संघटनांना हवे तसे लोकपाल विधेयक मंजुर करणे राजकारण्यांच्या हिताचे नाही, या विधेयकाला आहे त्या स्वरूपात आम्ही पाठिंबा देऊ असे प्रमुख विरोधी पक्ष भाजपा सांगत असला तरी, तसे करणे त्यांना परवडणार नाही कारण त्यांचीही अनेक लफडी यामुळे बाहेर पडतील. यामुळे सिब्बल आणि सिंह यांचे काम अधिक सोपे झाले आहे. त्यांना अडचणीत आणणे ही आता आपली जबाबदारी आहे
No comments:
Post a Comment