Total Pageviews

Wednesday 15 June 2011

TIRING OUT ANNA HAZARE IN WORTHLESS DEBARE EDITORIAL SAMANA

हुकूमशाही कॉंग्रेसचीही!रामदेवबाबांचे आंदोलन चिरडल्यामुळे कॉंग्रेसवाल्यांची मनगटे जरा जास्तच फुरफुरू लागली आहेत त्यांनी आपल्या तोफा अण्णा हजारे यांच्या दिशेने वळवल्या आहेत. बाबांचे मांजर केल्यावर त्यांनी अण्णांचे कबुतर करण्याचे ठरवले आहे. लोकपाल बिलाच्या मसुद्यावरून कॉंग्रेस पक्ष अण्णा हजारे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. अण्णा हजारे लोकशाही मार्गाने निवडून आलेले हुकूमशहा आहेत अशा प्रकारची जहाल टीका प्रणव मुखर्जी यांनी केली आहे. मात्र अण्णा हजारे जंतरमंतर रोडवर प्रथम उपोषणास बसले सरकारने त्यांच्यासमोर गुडघे टेकले तेव्हा अण्णा हजारे हे हुकूमशहा असून देशाची संसद सार्वभौम असल्याचा साक्षात्कार प्रणवबाबूंना का झाला नाही? हिंदुस्थानात संसदीय लोकशाही पद्धत आहे. त्यामुळे ज्यांना देशाची सत्ता कारभार ताब्यात ठेवायचा आहे त्यांनी लोकशाही मार्गाने केंद्रात निवडून यायला हवे स्वत:च्या नेतृत्वाखाली बहुमताचे सरकार निवडून आणले पाहिजे. जर त्यांना हुकूमशाही हवी असेल तर त्यांनी आपल्याला बहुमतासाठी लागणारे खासदार निवडून आणावेत हव्या त्या पद्धतीने कारभार करावा. दिल्लीत सध्या सोनिया गांधी तेच करीत आहेत. गुजरातेत नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशात मायावती आता तामीळनाडूत जयललिता त्याच संसदीय हुकूमशाही पद्धतीने कारभार हाकीत आहेत. मोदी, ममता, जयललिता, मायावती वगैरेंनी उपोषणे करून सरकारला ब्लॅकमेल करून सत्तेवर नियंत्रण ठेवलेले नाही. त्यातही मोदी मायावती यांच्यावर सध्या जबरदस्त टीका आरोप सुरू आहेत. ते कुणाला जुमानत नाहीत, ‘हम करे सो कायदा’ असे त्यांचे वर्तन आहे असे त्या टिकेचे स्वरूप आहे. मात्र त्यांना अशा पद्धतीने वागण्याचा जनादेश गुजरातच्या किंवा उत्तर प्रदेशच्या जनतेने दिला आहे. जनतेला नको असेल तर मोदी-मायावतींचा पराभव ती करू शकते. प्रश्‍न इतकाच आहे की, सध्या रामलीला मैदानावर किंवा जंतरमंतरवर बसून उपोषणे करायची त्यांना प्रसिद्धी माध्यमांनी जोरदार प्रसिद्धी द्यायची असे जे सुरू आहे त्यामुळे एकजात सर्व राजकीय पक्ष नेते जनतेच्या लेखी नालायक ठरविण्यात आले आणि कोणतीही जबाबदारी नसलेले लोक पुढारीपण मिरवत आहेत. अण्णा हजारे त्यांच्या एनजीओ टोळीने देशातील भ्रष्टाचार मिटविण्यासाठी आंदोलन केले अण्णा हजारे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. जनलोकपाल विधेयक मंजूर झाले तर काही प्रमाणात भ्रष्टाचारास आळा बसेल अशी अफवा पसरविण्यात आली आहे या लोकपालाच्या कक्षेत पंतप्रधानही यावेत अशी हजारे त्यांच्या मंडळाची मागणी आहे. सीबीआयला पंतप्रधानांची चौकशी करण्याचा अधिकार आहे तर लोकपालाच्या कक्षेत येण्यास विरोध कशाला? असे हजारे मंडळाचे म्हणणे आहे प्रणव मुखर्जींनी ते साफ फेटाळून लावले आहे. अटलबिहारी पंतप्रधान असताना तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या मुखर्जींनी पंतप्रधानपद लोकपालाच्या कक्षेत असावे या मताचा पुरस्कार केला होता वाजपेयींनी त्यास होकार दिला होता, पण आता मुखर्जी यांनी पलटी मारली भूमिका बदलली. मुखर्जी विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांचे मत वेगळे होते आता सत्तेवर आहेत म्हणून वेगळे, हा दुटप्पीपणा झाला. मनमोहन सिंग यांच्या स्वच्छ कारभाराच्या बाबतीत कॉंग्रेसवाले साशंक आहेत असा या विरोधाचा अर्थ घ्यायचा काय? मनमोहन सिंग यांच्या स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचे सर्व पुरावे सध्या तिहार तुरुंगात सुरक्षित आहेत. हे पुरावे सहजासहजी नष्ट करता येणार नाहीत. हजारे त्यांच्या मंडळाने आता पंतप्रधानांना लोकपालांच्या कक्षेत आणण्याचा हट्ट कायम ठेवला तर सरकार हजारे यांच्यात मोठी चकमक होईल. अण्णा हजारे यांनी १६ ऑगस्टपासून उपोषणाचा बार पुन्हा उडविण्याचा निर्धार व्यक्त केला. बाबा उपोषण करून दमले. सरकारनेच त्यांना दमवून जेरीस आणले. आता अण्णांचाही बाबा करू अशा आवेशात कॉंग्रेसवाले आहेत. दिग्विजय सिंग या माथेफिरूने अण्णा हजारे यांना हिंदुत्ववाद्यांचे एजंट वगैरे म्हटले आहे. कॉंग्रेस पक्षाला हिंदुत्व ही शिवी वाटते हिंदू म्हणजे दुश्मन वाटतो. त्यामुळे अण्णा हजारे यांच्यावर हिंदुत्ववाद्यांचा ठपका ठेवून त्यांनी मुसलमानांचे लांगूलचालन केले आहे. देशद्रोही धर्मांध मुसलमानांचे एजंट असण्यापेक्षा हिंदुत्ववाद्यांचे एजंट असणे ही गोष्ट केव्हाही चांगली. एका विदेशी महिलेची गुलामी पत्करून सत्तेची हाडके चघळत बसण्यापेक्षा तर ते कधीही चांगले. अण्णा हजारे हे कुणाचे एजंट आहेत हा मुद्दा नसून त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध पुकारलेले आंदोलन हा महत्त्वाचा विषय आहे. कॉंग्रेसवाल्यांनी सत्ता मिळविण्यासाठी ती टिकविण्यासाठी सर्वांनाच भ्रष्ट केले आहे. खुद्द सोनिया गांधी त्यांचे इटालियन कुटुंबही हिंदुस्थानातील भ्रष्टाचार काळ्या धनाचे सूत्रधार आहेत त्यांच्या विरोधातही अण्णा महाराजांनी बोंब मारली पाहिजे, पण सोनिया सोडून त्यांनी सगळ्यांनाच आरोपी बनविले दिग्विजय सिंग यांच्या माथेफिरू वक्तव्याची तक्रार सोनिया गांधींकडे केली हा तर मोठा विनोदच म्हणायला हवा. अण्णा हजारे यांनी त्यांचे आंदोलन कसे चालवावे, हा त्यांचा प्रश्‍न. भ्रष्टाचार हा मुद्दा आहे, पण त्या मुद्द्यास मतपेटीतून गुद्दा देता आला तरच कॉंग्रेसचा भ्रष्टाचार संपेल. अण्णा हजारे यांनी कितीही हुकूमशाही चालवली तरी कॉंग्रेसवाले बधणार नाहीत. कारण ते हुकूमशहांचे बाप आहेत. बाबा रामदेवांना त्यांनी धारातीर्थी पाडले. आता अण्णा हजारे यांना दमविण्याची खेळी सुरू आहे.

No comments:

Post a Comment