Total Pageviews

Saturday, 9 April 2011

INDIA & ANNA HAJARE AGAINST BAD GOVERNANCE STORY 5

INDIA AGAINST BAD GOVERNANCE STORY 5
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS
MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/
क्रिकेट
वेडा देश आणि क्रिकेटचे काळे अन्तरन्गगेली चार वर्षे पाहिलेलं विश्वविजयाचं स्वप्न भारतानं अखेर साकार केलं. १९८३मध्ये कपिलदेवच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटपटूंच्या हातात वर्ल्डकप विसावला .फायनल मॅच बघण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील, श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा राजपक्षे अशा बड्या व्यक्तिमत्त्वांसह बॉलिवूडचे अभिनेते अन् अभिनेत्री यांनी वानखेडेवर फायनलसाठी उपस्थिती लावली होती. केंदीय मंत्री कपिल सिबल, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, माजी परराष्ट्रमंत्री शशी थरूर त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर उपस्थित होती. व्यावसायिक मुकेश अंबानी अन् त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी कॉपोर्रेट बॉक्समध्ये हजेरी लावली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या बॉक्सच्या तिकिटाची किंमत पाच कोटी रुपये ठेवलीय.३३,१०० पैकी विक्रीसाठी चार हजार तिकिटे वर्ल्ड कपची अंतिम लढत बघायची असेल तर दीड लाख रूपये मोजण्याची तयारी ठेवा. या सामन्याचे तिकीट या दराने विकले गेले .
इस्ट - वेस्ट स्टँडः किमान १८ हजार (प्रत्यक्ष दर ,५००) ,नॉर्थ स्टँडः किमान ३६ हजार (प्रत्यक्ष दर ५०००) ,सचिन तेंडुलकर स्टँडः किमान ८५ हजार (प्रत्यक्ष दर १५,०००) ,वेस्ट अव्हेन्यूः सव्वा लाख ( प्रत्यक्ष दर ३७,५००) ,व्हीव्हीआयपी तिकीटः अडीच लाख (प्रत्यक्षात विक्रीसाठी नाही)
तिकीटासाठी धडपडणा-यांमध्ये राजकारण्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत अनेक जण होते . यात काही बुकीही सामील झाले होते. पोलीसनी स्पष्ट केले होते की, तिकीटांचा काळाबाजार रोखणे याला आमचा अग्रक्रम नाही . तिकिटांचे दर वाढण्यामागे एक कारण वानखेडे स्टेडियमची क्षमता ३३,१०० आहे. यापैकी विक्रीसाठी अवघी चार हजार तिकिटे होती. बाकीची सर्व तिकिटे विविध क्लब्जना, तसेच खास निमंत्रितांना दिली गेली होती. त्यामुळे सामान्य क्रिकेटप्रेमींना घरी बसून तिकीट पाहण्यातच धन्यता मानावी लागली.भारत-पाकिस्तान सामन्यात १७ हजार कोटीचा सट्टा अटीतटीच्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताची सुरुवात दणक्यात झाली. पण सामन्याची गणिते सतत बदलत होती आणि तसेच बदलत होते बुकींचे भावही. सुमारे १७ हजार कोटीचा सट्टा लागलेल्या या मॅचमध्ये दोन्ही देशांच्या भावात सतत चढउतार होत असला तरी अखेरपर्यंत भारतच बुकींचा फेव्हरीट होता. पण सामन्याचा निर्णय होईपर्यंत बुकींच्या दरात सतत चढ उतार होत होती. सामन्यात बुकींचे दान अचूक पडले असले तरी सामन्यात सतत रस्सीखेच सुरु असल्यामुळे कोणत्याही क्षणी ही गणित उलटसुलट होतील अशी स्थिती अखेरपर्यंत कायम होती.अंतिम सामन्यावर 40 हजार कोटींचा सट्टा विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मुंबईत सुरक्षा यंत्रणांनी "फिल्डिंग' लावली असतानाच बुकींनीही सामन्यासाठी अधिकाधिक नफा कमविण्यासाठी रणनीती आखली . या सामन्यासाठी 40 हजार कोटींचा सट्टा लागला असून सट्टेबाजांनी भारताला झुकते माप दिले . भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये अपेक्षेप्रमाणे भारत जिंकल्यामुळे सट्टा घेणाऱ्या बुकींना मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्या सामन्यातील तोटा भारत-श्रीलंकेच्या सामन्यात भरून काढण्यासाठी बुकींनी अहमदाबाद, गोवा येथे आश्रय घेतला त्यांचा मुख्य कारभार दक्षिण आफ्रिकेतून चालला. अंतिम सामन्यात सचिन आपले शंभरावे शतक झळकावेल यासाठीही मोठ्या प्रमाणात सट्टा लागला असून त्याला 5 रुपयांचा भाव देण्यात आला आहे. हा सट्टा कानुनी करुनवर्ल्डकपच्या, यावर कर लाऊन सरकारी उत्पन्न का वाडवत नाही वानखेडेवर जादा वीजपुरवठा फायनल मॅचसाठी वानखेडे स्टेडियमला सतत झळाळत ठेवण्यासाठी बेस्टतफेर् शनिवारी तीन मेगावॉट इतका प्रचंड वीज पुरवठा केला गेला. मॅचच्या दिवशी वीज पुरवठा खंडीत होऊ नये म्हणून बेस्टने स्टेडियममध्ये खास कंट्रोल पॅनल तयार केला . मॅच अत्यंत महत्त्वाची असल्याने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न केला गेला. ही विज जर शेतकर्याना पुरवली असती तर जास्त चान्गले पिक येउन सामन्या माणसाला दीलासा मिळाला असता.अभूतपूर्व बंदोबस्त भारत
विरुद्ध श्रीलंका या दोन संघात होणा-या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्या साटी वानखेडे स्टेडियम आणि खेळाडूंचा निवास असलेल्या ताज हॉटेलसह अवघ्या मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण मुंबई नो फ्लाइंग झोन म्हणून जाहीर करण्यात आला . पोलिसांव्यतिरीक्त एनएसजी, क्युआरटी, फोर्स वन, सीआयएसएफ आणि लष्कर, नौदल, हवाई दलाने सुरक्षेसाठी कंबर कसली .
स्टेडियमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात आला . तिकीट आणि आयकार्ड दाखवल्याशिवाय आत शिरता आले नाही. एकदा आत शिरले की बाहेर येता आले नाही. व्हीव्हीआयपी व्यक्तींव्यतिरीक्त कोणाचीही वाहने स्टेडियमपर्यंत सोडण्यात आली नाहीत. ठिकठिकाणी फायर ब्रिगेडची पथके आणि मल्टी स्पेशालिटी अम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या . पोलिसानी सैन्याच्या तिन्ही दलांशी समन्वय साधून काम केले .गेट वेवरील ताज हॉटेलात क्रिकेटपटू उतरले. त्यामुळे ताज आसपासचा सर्व परिसर रिकामा केला गेला . पर्यटकांवर बंदी घातली. समुद्रातल्या बोटी बंद करून लांब नेल्या. ताजच्या परिसरात कुणीही फिरकू शकले नाही. वानखेडे ताज परिसराची लष्करी छावणीच झाली . १८० सीसी टीव्ही कॅमेरे बसवून संशयितांवर नजर ठेवली . पण हा जो बंदोबस्त क्रिकेटच्या निमित्ताने दिसणार आहे तो क्रिकेटची जत्रा संपल्यावर दूर होणार जनता पुन्हा राम भरोसे राहणार. या देशातील राज्यकर्ते क्रिकेटपटूंचीच जान तेवढी महत्त्वाची इतरांचें जीव म्हणजे पालापाचोळा असे आता वाटू लागले आहे. पोलिसांच्या या बंदोबस्तालाही वर्ल्ड कप पुरस्कार द्यावाच लागेल.हा अभूतपूर्व बंदोबस्त 'नक्षली दहशती वीरुध का करत नाही ?सामन्याच्या दरम्यान मासेमारी आणि बल्क एसएमएसवर बंदी होती.कोळी समाजानी आता काय करायचे ?
डिप्लोमसी आणि क्रिकेट पीचवर काश्मीर क्रिकेट डिप्लोमसीचे गुणगान सर्वत्र सुरू असताना, क्रिकेटच्या या पीचवर पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी काश्मीर प्रश्नाचा गुगली टाकण्याची संधी साधलीच. भारत-पाकिस्तान दरम्यानचा कळीचा काश्मीर प्रश्न तातडीने सुटावा, अशी अपेक्षा गिलानी यांनी बुधवारच्या भेटीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे व्यक्त केली. अर्थसंकल्पापेक्षा
आमदारांना कौतुक क्रिकेटचे! सरकारच्या सहकार्याची मदतीची गरज क्रिकेट सामने नियंत्रित करणार्‍या बीसीसीआयला तसेच वानखेडे स्टेडियमची मालकी मिरवणार्‍या मुंबई क्रिकेट असोसिएशनला नक्कीच आहे. त्यामुळे त्यांनी सरकारला तब्बल २५० तिकिटे देऊ केली. हे मोफत व्हीव्हीआयपी पास आहेत. पण त्यातही, या जागा चांगल्या नाहीत. जिथून सामना उत्कृष्ट दिसेल अशाच सीट दिल्या पाहिजेत, असे सरकारने बजावले. जी तिकिटे क्रिकेट संघटनेकडून मिळाली ती वाटताना अर्थातच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना प्राधान्य मिळाले. या दोघांना प्रत्येकी दहा तर मुख्य सचिव, क्रीडामंत्री यांना चार-चार तिकिटे देण्यात आली. अन्य सर्व मंत्र्यांना प्रत्येकी / निमंत्रणे, व्हीआयपी पास देण्यात आले. विधिमंडळ पदाधिकारी, विभागीय प्रधान सचिव, अशांचे नंबर त्यानंतर लागले. तरीही अनेक इच्छुक तिकिटांविना तळमळतच राहिले. आयसीसीला इन्कम टॅक्समधून सूट बैठकीत इतर अनेक विषयांबरोबर र्वल्डकप आयोजनात इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलला (आयसीसी) उत्पन्नावर इन्कमटॅक्समधून सूट देण्याचा प्रस्ताव होता. मंत्रिमंडळाच्या काही सदस्यांचा त्याला आक्षेप होता; मात्र भारताच्या विजयामुळे वातावरणात इतका उत्साह होता, की विरोध बाजूला ठेवून हा प्रस्ताव झटक्यात मंजूर झाला. शरद पवार यांनी मात्र या चचेर्च्या वेळी जवळपास मौन पाळले. त्यांच्या वतीने प्रस्तावाची फलंदाजी अवजड उद्योग मंत्री प्रफुल पटेल करीत होते. मोहालीच्या यशाने वातावरणावर इतका सकारात्मक परिणाम घडवला की गेले काही महिने अनेक संकटांचा सामना करणाऱ्या काँग्रेसच्या दृष्टीने ही मॅच मोठा दिलासा देणारी ठरली. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देऊन मनमोहन सिंग यांनी एकप्रकारे मोठी जोखीमच पत्करली होती. मात्र, भारताच्या विजयाने उभय देशांच्या तणावपूर्ण संबंधांना एक वेगळे वळण देण्याची सरकारला संधी मिळाली. पाच राज्यांच्या निवडणूकीपूवीर् ज्या उत्साहाने सोनिया आणि राहुल गांधी यांनी मोहालीत क्रिकेट मॅचचा आनंद लुटला त्याने चांगला संदेश सर्वत्र पोहोचला.क्रिकेटची सुटी' योग्य की अयोग्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचा-यांना वर्ल्ड र्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी फारशी धावपळ, दगदग करावी लागली नाही. कारण, या मंडळींवर मेहरबान होऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना एप्रिलला विशेष सुट्टी देऊन टाकली .वर्ल्डकप फायनलदरम्यान कुठलाही घातपात घडू नये, यादृष्टीने मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवला. अनेक मोठे नेते आणि बड्या व्यक्ती या सामन्यासाठी येणार असल्यानं पोलिसांवर मोठी जबाबदारी होती. वानखेडे स्टेडियम आणि भोवतालच्या परिसरात दहा हजार पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात होते. सरकरानं सुट्टी जाहीर केल्यानं आणखी एक हजार पोलीस बंदोबस्तासाठी उपलब्ध झाले. एप्रिलला वर्ल्डकप फायनलमुळे सुटी जाहीर केल्याने राज्य सरकारच्या कर्मचा-यांना आता तीन दिवसांची सुट्टी मिळाली. कारण एप्रिलला रविवार आहे तर सोमवारी एप्रिल रोजी गुढीपाडव्याची सुट्टी आहे. आता 'क्रकेटची सुटी' योग्य की अयोग्य हा वादाचा विषय होईल. आपला देशच मुळी सुटीप्रिय आहे. आपल्याला सुटीसाठी कुठलेतरी निमित्त लागते. एप्रिल महिन्यात एकूण ३० दिवसात राज्य शासनाने दिलेल्या ११ सरकारी सुट्या आल्या आहेत. ४ एप्रिलला गुढीपाडवा, १२ एप्रिलला राम नवमी, १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर जयंती, १६ ला महावीर जयंती. २२ एप्रिलला गुड फ्रायडेची सुटी आहे. या शिवाय, चार रविवार आणि दोन सेकंड सॅटर्डे. म्हणजे एक तृतियांश महिना मजाच मजा ! वर्षोनवर्षे हे असेच सुरू आहे. अर्थात ही चंगळ केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. जगातल्या कुठल्याही देशात नाहीत एवढ्या सुट्या आपल्याकडे आहेत. वर्षाच्या ३६५ दिवसात साधारणपणे फक्त १९५ दिवस काम आणि १७० दिवस आराम असे ठळकपणे गणित आहे. ५२ रविवार, तेवढेच शनिवार अशा १०४ सुट्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना हक्काने मिळतात. या शिवाय, विशेष सुट्या , हक्काची रजा, किरकोळ रजा वेगळ्या. पगाराचे मिटर सारखे फिरत असते. सुट्या नसूनही काय उपयोग ? सुट्या नसतात तेव्हा शासकीय कार्यालयांमध्ये किती काम होते याचा कुणी अभ्यास केला आहे का?. नोकरीवाल्याचे ठीक आहे. पण हातावर पोट असणाऱ्यांचे काय ? सुट्यांमुळे करोडो रुपयांचे नुकसान होते. व्होट बँकेच्या राजकारणाने सुट्या वाढत चालल्या आहेत. आपल्याकडे मुळातच काम करण्याची वृत्ती कमी आहे. आपले काम प्रामाणिकपणे, करण्याची वृत्ती आणखी कमी . वर्षातून जवळपास निम्मे दिवस घरी बसणाऱ्या देशाला हे कसे परवडते ? सुटी घेऊनही पगार चालू असलेले आणि रोजगार नसल्याने रोजीरोटी बुडालेले ,हे चित्र देशाला कुठे नेते ? देश मोठा करायचा असेल तर सुट्यांना कात्री लागली पाहिजे. आता आयपील सुरु माहौल पाहता वास्तव विसरायला लावणारी क्रिकेट ही नशा होत चालली आहे . एका जाहिरातदाराने आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीची स्लोगन "इट क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट, स्लीप क्रिकेट' अशी केली होती. क्रिकेट हा केवळ खेळ राहता तो भारतीयांची जीवनशैली झाल्याचे निदर्शक अशी ती जाहिरात अतिरंजित वाटली असेलही; परंतु हा खेळ त्या जीवनशैलीच्याही पुढे गेला आहे. आता तर क्रिकेट आपल्या घरात, कार्यालयात, रस्त्यावर; जिथे जाऊ तिथे नजरेसमोर असावी, असे वाटू लागले आहे. जणू तोच सर्वांचा ध्यास अन्‌ तोच श्‍वासही झाला आहे!रोजच्या जगण्याचे प्रश्‍न सोडवू शकत नसतानाही क्रिकेटने आपणा सर्वांच्या आयुष्यात हे मध्यवर्ती स्थान कसे आणि का मिळविले, याचाही विचार या निमित्ताने करायला हवा. आता आजून ४२ दिवस आयपील सुरु राहणार आहे त्यामुळॆ आपण आपली सगळी दुखःऎ विसरणार.मेरा भारत महान.
http://brighemantmahajan.blogspot.com/MOB 09096701253, TELE-020-26851783  
सध्याचा
मुंबईतील
मंत्रिमंडळ
मोहालीतील

No comments:

Post a Comment