Total Pageviews

Saturday, 6 October 2018

#Pakistan become the fifth #largestnuclearpower in the world part 2



भयावह दिशेने पाकिस्तान
अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प
यांनी पुन्‍हा एकदा पाकिस्‍तानला फटकारले आहे. पाकिस्‍तान म्‍हणजे दहशतवाद्यांसाठी
स्‍वर्ग आहे
. पाकचे लोक स्‍वत: दहशतवादाने पीडित आहेत. दहशतादाविरोधात
लढण्यासाठी पाकने आपली कटिबद्‍धता पूर्ण करावी
, असे
ट्रम्‍प यांनी पाकला सुनावले. त्याचवेळी भारताबरोबर संबंध अधिक दृढ करण्याचे संकेत
दिले.
 
डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी आज आपली नवे अफगाण
धोरण जाहीर केली. यामध्ये भारताबरोबर संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच अफगाणिस्‍तानला
आणखी मदतीचे आश्‍वासन दिले. भारताबरोबर अमेरिकेचा अब्‍जावधी डॉलरचा व्यापार आहे.
आता भारताने आम्‍हाला अफगाणिस्‍तानात मदत करावी
, असा आशावाद ट्रम्‍प यांनी व्यक्‍त केला. त्यामुळे पाकच्या समस्यांत आता भर
पडणार आहे.
पीओकेमध्‍ये पाकिस्तान विरोधात संताप व्‍यक्‍त
करत स्‍वातंत्र्याच्‍या घोषणा देण्‍यात आल्‍या. पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळावे
, या मागणीसाठी येथील जनता रस्‍त्‍यावर उतरली आहे. या
रॅलीत जनतेने पाकिस्‍तानकडून देण्‍यात येणारी अमानुष वागणूक
, अत्‍याचार, अन्‍यायाविरोधात आवाज उठवला. पीओकेमध्‍ये
यापुर्वीही जनतेने आपला रोष व्‍यक्‍त केला आहे.
 या
रॅलीत हजारो युवक सहभागी झाले
.स्‍वातंत्र्य मिळण्‍याची मागणी
करत मोर्चेकर्‍यांनी पाक सरकारच्‍या अत्‍याचारांचा विरोध केला.
चालू वर्षी पाकिस्तानात २८४ दहशतवादी हल्ले
दहशतवादाची फॅक्टरी म्हणून ओळखला जाणारा आणि
गेल्या ६० वर्षांपासून भारतात असुरक्षितता
, अशांतता पसरवण्यासाठी प्रयत्नशील असणारा आपला शेजारी देश पाकिस्तान हा
सध्या दहशतवादी हिंसाचाराने ग्रासलेला आहे. चालू वर्षी पाकिस्तानात २८४ दहशतवादी
हल्ले झाले. या रक्तरंजित हिंसाचाराच्या आगीमध्ये होरपळत असताना दुसरीकडे विकासाचे
गाजर दाखवून भरपूर गुंतवणुकीचे आमीष देऊन चीन पाकिस्तानला आपल्या कह्यात ओढत आहे.
चीनचे एकूण आर्थिक आक्रमण पाहता येणार्या
काळात पुढील दहा वर्षांच्या काळात पाकिस्तान
चीनचा ३४ वा प्रांत बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 पाकिस्तानमध्ये २००३ ते २०१७ या चौदा
वर्षांमध्ये  दहशतवादाने थैमान घातले आहे.
या
हिंसाचारामध्ये आतापर्यंत २१ हजार ८८२
सामान्य नागरिक
, ६हजार ७८७ सैनिक, ३३ हजार ७०४ दहशतवादी असे एकूण ६५ हजार ३७३ जण ठार झालेले आहेत. यावरून
पाकिस्तानमधील भीषण दहशतवादाची कल्पना येते. 
प्रत्येक वर्षी पाकिस्तानात पाच ते सहा हजार सामान्य नागरिकांचा दहशतवादी
कृत्यात बळी जातो.
दहशतवाद्यांचे तीन गटांत विभाजन -
पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तीन गटात विभाजन
करता येईल. पहिला गट म्हणजे आंतरराष्ट्रीय दहशतवादी. यामध्ये अल कायदा
, तालिबान अशा संघटनांचा समावेश होतो. या संघटना जगभरात
कुठेही जाऊन जिहाद करू शकतात. अलीकडील काळात त्यामध्ये आयसिसची भर पडली आहे.
दुसरे म्हणजे पाकिस्तानच्या विरोधात असणारे दहशतवादी गट. यामध्ये बलुचिस्तान आर्मी, सिंध लिबरेशन आर्मी, तहरिके पाकिस्तान यांचा समावेश
होतो. हे गट प्रामुख्याने पाकिस्तानविरोधी आहेत. 
त्यांची ताकद प्रचंड आहेत.
तिसरा गट आहे तो जैश ए मोहम्मद, लष्करे तोयबा, हिज्बुल
मुजाहिदीन यांचा. हे गट पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांचा पाठिंबा असलेले आहेत. या
गटांचा वापर भारताविरुद्ध दहशतवादी कृत्ये करण्यासाठी होतो. या गटांना पाकिस्तानी
लष्कर आपले महत्त्वाचे सामरिक हत्यार समजते.
मात्र सर्वच गटांचे आपसात संबंध असतात. हे गट
एकमेकांना शस्त्रास्त्रांची
, पैशांची
मदत करतात. केवळ जिहादच्या माध्यमातून आपला हेतु साध्य होइल असे त्यांचे मत
असल्यामुळे हे गट परस्परांना सहकार्य करत असतात.
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी लष्कराने या
दहशतवादी गटांविरोधात लष्करी अभियानाला सुरुवात केली आहे. मात्र हे अभियान
पाकिस्तानविरोधात असलेल्या दहशतवादी गटांच्याच विरोधात आहे. पाकिस्तानी सैन्याला
या  दहशतवादी हल्ल्यांचा बराच फटका बसला
आहे. गेल्या १३ वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास पाकिस्तानी लष्कराचे ६७८७
सैनिक मारले गेले आहेत. प्रत्येक वर्षी मारल्या जाणार्या
सैनिकांची संख्या जवळजवळ ७०० ते ८०० आहे.
यामध्ये उच्च अधिकारीही मारले गेले आहेत. तसेच लष्करी तळांवरही अनेकदा हल्ले झाले
आहेत. फ्रंटरिअर फोर्स या पाकिस्तानातील पॅरामिलिटरी फोर्सचे खूप मोठे नुकसान या
हल्ल्यांत झाले आहे. पाकिस्तानच्या नौदल आणि हवाईदलाच्या तळांवरही  हल्ले केले गेले आहेत. 
झर्ब ए अज्ब मोहीमेला फारसे यश मिळाले नाही.
पाकिस्तानच्या लष्कराने या दहशतवाद्याविरोधात
झर्ब-ए-अज्ब ही मोहिम हाती घेतली आहे.सर्वसाधारणपणे पाकिस्तानचे ८५ टक्के सैन्य हे
भारत पाक सीमेवर आणि केवळ १५ टक्के सैन्य अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर असते. आता
मात्र ५० टक्के सैन्य भारतीय सीमेवरून कमी करून ते दहशतवादी्विरोधी अभियानासाठी
वापरले जात आहे. ऑपरेशन झर्ब ए अज्बमध्ये पाकिस्तानी सैन्य
, हवाईदलाची फायटर जेट,
हेलिकॉप्टर गनशिप्स
, तोफखाना यांसारख्या मोठ्या
शस्रास्रसामग्रीचा वापर करत आहे. भारतीय सेन्याने अशा प्रकारे मोठ्या
शस्त्रास्त्रांचा कधीही वापर केलेला नाही. केवळ आपल्या सैनिकांच्या वैयक्तिक
हत्यारानेच दहशतवाद विरोधी अभियान लढले जाते. जबरदस्त फायर पॉवरचा वापर केल्याने
अनेक निरपराध नागरिक मारले जातात. त्यामुळे दहशतवाद वाढतो. पाकिस्तानी सैन्याने
संयुक्त राष्ट्र परिषदेत सांगितल्यानुसार
, झर्ब-ए-अज्बमुळे
त्यांच्या देशातील दहशतवाद कमी झालेला आहे. मात्र तसे काहीही झालेले दिसून येत
नाही. चालू वर्षी तेथे हिंसाचार वाढलेला आहे आणि त्यातील हिंसाचार आणि दहशतवादी
हल्ले नॉर्थ वेस्ट फ्रंटिअर प्रोव्हिन्स आणि बलुचिस्तान भागात होतात. काही
दहशतवादी हल्ले कराचीमध्ये होतात. पाकिस्तानचा महत्त्वाचा प्रांत असणार्या
पंजाबमध्ये आजवर दहशतवाद
कमी असायचा
;  मात्र
२०१७ मध्ये लाहोर आणि सिंध प्रांतात आत्मघातकी हल्ले सुरु झाले आहेत. म्हणजे
आजमितीला पाकिस्तानातील सिंध आणि पंजाब या दोन्ही शांत प्रांतात दहशतवाद पसरला
आहे. पंजाबच्या विधानसभेवर झालेल्या हल्ल्यामध्ये सैन्याचे अधिकारीही मारले गेले
होते. पाकिस्तानात या काळात २८४ दहशतवादी हल्ले झाले असल्याचे साऊथ एशिया टेररिझम
पोर्टलच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. याचाच अर्थ झर्ब ए अज्ब मोहीमेला फारसे यश
मिळाले नाही.
राजकीय अस्थिरता -
हा सर्व हिंसाचार आणि दहशतवादाचे थैमान सुरू
असतानाच पाकिस्तानात राजकीय उलथापालथ होत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य आणि
राजकीय पक्ष यांच्यात ग्रुहयुध्द सुरु आहे. पाकिस्तानची न्यायव्यवस्था नेहमीच
तेथील सैन्याला मदत करते. त्यामुळे पाकिस्तानातील हिंसाचार हा येत्या काही दिवसांत
वाढणार आहे.
भारतावर परिणाम-
सध्या तर पाकिस्तानात एवढे राजकीय अस्थैर्य आहे की पुढच्या वर्षीचे सोडून
द्या
, येत्या सहा महिन्यात
तेथे काय होईल याचासुद्धा अंदाज बांधता येत नाही. एक बाब स्पष्ट केली पाहिजे की
पाकिस्तानात लष्करशाही असो व लोकशाही
, `भारतविरोधफारसा कमी होत नाही.
त्या देशाच्या डीएनएमध्येच
`भारतविरोधमुरला आहे. पाकिस्तानवरील अमेरिकेचा दबदबा कमी झालेला आहे.
मात्र चीनच्या पाठिंब्यांमुळे पाकिस्तानला सध्या जोश चढलेला असल्याने काश्मिरमधील
हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक परिक्षेत्रामुळे पाकिस्तान काश्मिरमध्ये
हिंसाचार वाढवून शिरजोर होण्याचा प्रयत्न करणार असे चित्र दिसते. गुप्तचर खाते आणि
इतर देशांच्या मदतीने हे हल्ले रोखण्याचा प्रयत्न भारताने केला पाहिजे. 

No comments:

Post a Comment