देशातील जुन्या नामवंत विद्यापीठांपैकी एक अलिगढ
मुस्लिम विद्यापीठातील एका घटनेवरून सध्या देशात वादळ उठले आहे. अतिरेकी मन्नान
वानी पोलिस चकमकीत मारला गेल्यानंतर त्याच्यासाठी नमाज-ए-जनाजा आयोजित करणे, तेथे आझादीच्या घोषणा देणे हा प्रकार नुकताच घडला. एएमयु विद्यापीठ
प्रशासनाने तत्काळ तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले. यापैकी पोलिसांनी दोन
विद्यार्थ्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात
केली. आणखी काही विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कोण आहे हा
मन्नान वानी? मन्नान हा एएमयुमध्ये पीएच. डी.चा विद्यार्थी
होता आणि तो काश्मीरचा राहणारा होता. याच वर्षी तो विद्यापीठातून गायब झाला आणि
हिजबुल मुजाहिदीन संघटनेत सहभागी झाला.
वाहिन्यांवर त्याचे, हातात एके-47 घेतलेले छायाचित्र झळकल्यानंतर सुरक्षा दलेही
सतर्क झाली. काश्मीर खोर्यात कुपवाडा येथे तो सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत
मारला गेला. मन्नान वानीचे कृत्य हे देशद्रोहीच होते, यात शंका नाही. पण, त्याच्या मृत्यूचे भांडवल
करीत काही काश्मिरी विद्यार्थ्यांनी त्याचा नमाज-ए-जनाजा आयोजित केला आणि तेथे
आझादीच्या घोषणा दिल्या. या घोषणाही समाजमाध्यमे आणि वाहिन्यांवर दाखविल्या जात
आहेत.
मन्नान हा हिजबुलसोबत आला आहे, याची कबुली स्वत: हिजबुलचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने दिली आहे.
प्रश्न असा की, मन्नान वानीचा एएमयुमध्ये शिकणार्या काश्मिरी
विद्यार्थ्यांना एवढा पुळका का?
पोलिस घटनेच्या वेळचे
सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि जे चेहरे त्यात स्पष्टपणे दिसत आहेत, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. आता या विद्यार्थ्यांनी धमकी दिली
आहे की, ज्या दोन विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे आरोप
लावण्यात आले आहेत, त्या दोघांनाही सोडून द्यावे. तसेच ज्यांना अटक
करण्यात आली वा निलंबित करण्यात आले, त्या सर्व कारवाया परत
घ्याव्यात.
अन्यथा विद्यापीठातील बाराशे विद्यार्थी येत्या 17 ऑक्टोबरला आपल्या पदव्या परत करतील. 17 ऑक्टोबरला एएमयुचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांची जयंती आहे.
म्हणजे हे प्रकरण वाढणार. वास्तविक पाहता जम्मू-काश्मिरातील युवक राष्ट्रीय
प्रवाहात यावेत, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे आणि देशासाठी योगदान
द्यावे, यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात
येतात.
शिक्षण संस्थांमध्ये काही जागा त्यांच्यासाठी
आरक्षित ठेवण्यात येतात. पण,
कुत्र्याचे शेपूट वाकडे
ते वाकडेच! या म्हणीनुसार काश्मीर खोर्यातील बहकलेले युवक आपला हेका सोडण्यास तयार
नाहीत. अशा लोकांना खोर्यात परत पाठविण्याची गरज आता निर्माण झाली आहे. हा
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असताना, जम्मू-काश्मिरातील नेत्या
आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी मन्नान वानीला ठार मारण्यावर दु:ख
व्यक्त करून राजकारण सुरू केले आहे. मेहबुबा मुफ्ती या पाकिस्तानधार्जिण्या म्हणून
ख्यातीप्राप्त आहेत. त्याच काय,
फारुख अब्दुल्ला तर
पाकिस्ताचा थेट पक्षच घेणारे नेते आहेत! ‘‘आझाद काश्मीर तुम्हारे
बाप का है क्या?, पाकिस्तानके पासभी अॅटम बॉम्ब आहे,’’ अशी मुक्ताफळे याच फारुख अब्दुल्लाने उधळली होती. सध्या मेहबुबा
मुफ्ती या मैदानात आल्या आहेत. या बाईंनी एक सल्लाही दिला आहे. काश्मीर खोर्यातील
विद्यार्थी दहशतवादाचा मार्ग अनुसरत आहेत. ही एक गंभीर समस्या असल्याने भारताने ‘पाकिस्तान’सह सर्व पक्षांसोबत बोलणी करावी व यावर उपाय
शोधावा.
पाकिस्तानला या बाईने मध्ये आणण्याचे कारण काय? केंद्र सरकारने कित्येकदा शांततेसाठी प्रयत्न, चर्चा केल्या आहेत. पण, त्याचे फलित काय? जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा विघटनवादी नेता यासीन मलिक तर
कुख्यात दहशतवादी हाफीझ सईद याच्यासोबत पाकिस्तानात एका व्यासपीठावर दिसला होता.
त्या वेळी कॉंग्रेसचे सरकार होते. याच हाफीझ सईदने भारताचे तुकडे करण्याची धमकी
दिली आहे. विघटनवादी नेता मीरवैज उमर फारुख याने म्हटले आहे की, मन्नान वानी आणि त्याच्या दोन सहकार्यांच्या मृत्यूची बातमी ऐकली
आणि खूपच दु:ख झाले. मन्नान वानीच्या ‘शहादत’ला सलाम करण्यासाठी खोर्यातील जनता बंद पाळणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये असे अनेक स्वयंभू नेते आहेत, ज्यांनी शांतताप्रक्रियेत
नेहमी खोडा घातला आहे. सप्टेंबर 2016
मध्येच केंद्रीय
गृहमंत्री राजनाथिंसह यांनी,
बुरहान वानी चकमकीत मारला
गेल्यानंतर उसळलेला हिंसाचार शमविण्यासाठी देशातील 20 राजकीय
पक्षांचे 30 सदस्यीय शिष्टमंडळ घेऊन श्रीनगरला दोन दिवस भेट
दिली होती. खोर्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी व सर्वांनीच मते जाणून
घेतली होती. पण, त्याला ना मेहबुबाने नंतर प्रतिसाद दिला, ना विघटनवाद्यांनी. हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत! कारण, यांना पाकिस्तानकडून मलिदा मिळत असतो आणि तो मलिदा खाऊन हे केंद्र
सरकारवर भुंकत असतात. सुरक्षा दलांवर हल्ले करीत असतात. त्यामुळे मेहबुबा अथवा
अब्दुल्ला यांच्या विधानांची दखल घेण्याची गरज नाही. सरकारने गेल्या दोन वर्षांत
उचललेली पावले अतिशय योग्य आहेत.
दहशतवाद्यांनी शरण यावे अथवा मृत्यूस तयार
राहावे, असा खुला संदेश त्यांनी दहशतवादी व
विघटनवाद्यांना तर दिलाच, सोबतच सुरक्षा दलांनाही पूर्ण मोकळीक दिले.
त्यामुळेच गेल्या दोन महिन्यांत 300
पेक्षा अधिक
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. त्यामुळे आता चर्चा वगैरे
करण्यात काहीही अर्थ नाही. कारण,
देश तोडणार्या, देशात असंतोष,
हिंसाचार माजविणार्या
शक्ती लपलेल्या आहेत. त्यांना हुडकून त्यांना त्यांची जागा दाखवणे, हाच एकमेव उपाय आहे. अलीकडे पाकिस्तानपोषित संघटनांकडून
विद्यापीठांना आपले लक्ष्य केल्याचे दिसत आहे. आधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात
फेब्रुवारी 2016 मध्ये याच काश्मिरी विद्यार्थ्यांनी- ‘‘अफजल तेरे खून से इन्कलाब आयेगा’’. ‘भारत
तेरे टुकडे होंगे-इन्शा अल्लाह,
इन्शा अल्लाह’’ असे नारे दिले होते. यात काश्मिरी विद्यार्थी उमर खालीद, अनिर्बाण भट्टाचार्य, कन्हैया कुमार यासह अनेक
विद्यार्थी आघाडीवर होते. या घोषणा देणार्या जेएनयुच्या विद्यार्थ्यांना त्या वेळी
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी,
कम्युनिस्ट आणि अन्य
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळेच हे श्वान चेकाळले आहेत.
जेएनयुमधील हे लोण नंतर अनेक विद्यापीठांत पसरले. आता ते अलिगढ मुस्लिम
विद्यापीठात पोचले आहे. वाचकांना स्मरत असेल की, अफझल गुरूला फाशी
दिल्यानंतर ज्यांनी भारताच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या, त्याचे अनेक नालायक वाहिन्यांनी समर्थन केले होते.
भारतात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क घटनेनेच
बहाल केला आहे, असे त्यांचे म्हणणे. हीच भूमिका त्यांनी
पाकिस्तान, सौदी अरब, इराण आणि अन्य मुस्लिम
राष्ट्रांमध्ये घेऊन दाखवावी,
म्हणजे
अभिव्यक्तिस्वातंत्र्य काय चीज असते, याची प्रचीती येईल. या
वाहिन्या आणि काही माध्यमे का ओरडत असतात? कारण, या वाहिन्यांना मुस्लिम देशांकडून देणगी मिळते व त्यामुळेच त्या
देशद्रोह्यांची तळी उचलत असतात. कम्युनिस्ट आणि कॉंग्रेसधार्जिण्या वाहिन्या आणि
पत्रकारांनी तर कन्हय्या कुमार याला अटक का केली म्हणून एकच अकांडतांडव केले होते.
आता मन्नान वानीला सुरक्षा दलांनी मारले, तर काश्मीर खोर्यातील
सर्व नेत्यांनी दु:ख व्यक्त केले. याचा अर्थ काय? आज असे राजकीय पक्ष, भारतविरोधी पत्रकार आणि तथाकथित मानवतावादी नेत्यांना योग्य धडा
शिकविण्याची वेळ आली आहे. जो कॉंग्रेस नेता मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन ‘‘ये मोदी को पहले हटाना होगा,’’ असे
जाहीर विधान करतो, यावरून कॉंग्रेस पक्षाने किती नीचतम पातळी गाठली
आहे, हे सहज लक्षात येते. या मणीचा नेताच जर
जेएनयुमध्ये जाऊन देशद्रोह्यांचे समर्थन करीत असेल, तर मग मणी काय, दिग्विजय काय,
सारेच नेते तसेच वागतील
ना. कसेही करून सत्ता मिळवायची,
दंगली घडवायच्या, जाती-धर्मात फूट पाडायची, हे कॉंग्रेस पक्षाचे
जुनेच धोरण आहे. या अशा प्रवृत्तींना जागीच ठेचून काढण्याची गरज आहे. दुसरा उपाय
नाही.
आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे
ब्रिगेडिअर हेमंत महाजन
माझ्या
या पुस्तकाला वर्ष २०१६ चे ग्रंथोज्जनक पारितोषिक मिळाले आहे.
Available
with Madhavi Prakashan,Dattakuti,1416,Sadashiv
Peth,Pune-411030,Maharashtra,Tele-020-24474762,020-24475372,MOB-09325097494.E
Mail-madhavipublisher@gmail.com http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5688672128450325048
या विडियो च्या माध्यमाने प्रत्येक
आठवड्यात देशाच्या सुरक्षा करता महत्वाच्या असलेल्या विषयांवर डिफेन्स एक्सपर्ट किंवा देशाच्या सुरक्षेचे तज्ञ यांचे कॉमेंट्स दिले जातील जर
आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांकडे पाठवावा आणि यु
ट्यूब वरती खालती सबस्क्राईब नावाचं बटण आहे तिथे क्लिक करा व त्यामुळे या पुढचे
येणारे व्हिडिओ ऑटोमॅटिकली आपल्या इनबॉक्समध्ये येथील जय हिंद
No comments:
Post a Comment