Total Pageviews

Tuesday, 9 June 2015

breaking new- म्यानमारमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खातमा

भारतीय लष्कराने पहिल्यांदाच देशाची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून म्यानमारच्या सीमेत प्रवेश करून भारताविरुद्ध कट रचणा-या दहशतवाद्यांच्या खातमा केला आहे. भारतीय लष्कराचे अशाप्रकारचे हे पहिलेच क्रॉस बॉर्डर ऑपरेशन ठरले आहे. मागील आठवड्यात मणिपूरमधील चांदेलमध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ही कारवाई केली आहे. या मोहिमेमध्ये म्यानमारच्या लष्कराने भारतीय लष्कराला मदत केली. भारतीय सेनाने आज (मंगळवारी) झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या मोहिमेसंदर्भातील माहिती दिली. मणिपूरमध्ये चांदेल येथे चार जूनला दहशवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला होता. या हल्ल्यात २० जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये हाय अॅलर्ट घोषित करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्करातील अधिका-यांनी दिली. भारतीय लष्कराच्या गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार काही दहशवाद्यांनी भारतीय सिमेमध्ये घुसखोरी करून पुन्हा चांदेलसारखा हल्ला करण्याचा कट रचला होता. चांदेलमध्ये हल्ला करणा-या दहशतवाद्यांनीच पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्लॅन आखल्याची पक्की खबर मिळताच भारतीय लष्कराने कारवाई करत भारताने हा प्लॅन उधळून लावला. आम्हाला हा हल्ला होणार याची पक्की माहिती मिळताच आम्ही लगेचच आम्ही हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचे लष्कराच्या अधिका-यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी भारतीय सेनेने नागालॅण्ड आणि म्यानमारच्या सीमेवर दोन वेगवगेळ्या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईमध्ये अनेक दहशवादी मारले गेल्याचे कळते मात्र त्याबद्दलची कोणतीही पक्की आकडेवारी उपलब्ध नाही. भारतीय आणि म्यानमार सेनेने केलेल्या या संयुक्त हल्ल्यामध्ये दहशवाद्यांच्या ठिकाणांचे नुकसानही झाले आहे. भविष्यातही अशा दहशदवादीविरोधी संयुक्त मोहिमा राबवण्यास भारत उत्सुक असल्याचे लष्कराने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात 4 जूनला झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे चीनच्या लष्कराचा हात असल्याचा दावा करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या दोन अधिकाऱ्यांनी मणिपूर हल्ल्याची जबाबदारी घेणारी अतिरेकी संघटना एनएससीएन (खापलांग)च्या संपर्कात होती. फोन इंटरसेप्ट आणि लोकेशन डिटेल्सच्या आधारे एका अधिकाऱ्याने हा दावा केला आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या मते, केंद्राबरोबर शस्त्रसंधी उल्लंघन करणाऱ्या अतिरेकी संघटनेने चीनच्या लष्कराच्या निर्देशानुसार हा हल्ला केला आहे. चंदेल जिल्ह्यातील या हल्ल्यात 20 जवान शहीद झाले होते. परराष्ट्र आणि गृहमंत्रालयाला दिली होती माहिती अधिकाऱ्याने सांगितले की, 10-11 एप्रिलला दिल्लीत परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि म्यानमारच्या अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली होती. अधिकाऱ्याने हेही सांगितले होते की, अतिरेकी संघटना उल्फाचे नेते परेश बरुआ यांनी एनएससीएन लीडर एस.एस. खापलांगला केंद्राबरोबरची शस्त्रसंधी मोडण्यासाठी राजी केले होते. उल्फा लीडर परेश बरुआही चीनी लष्कराच्या निर्देशानुसार अतिरेकी कारवाया करत असल्याचीही चर्चा आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, "अतिरेकी संघटना म्यानमारमध्ये ट्रान्सपोर्ट बिझनेस आणि अफूचा व्यवसाय करत आहेत. आम्ही राज्य सरकारला यासंबंधीचे फोटोही पाठवले आहेत, असेही ते म्हणाले. खापलांग आणि बरुआच्या संपर्कात चीनी अधिकारी खापलांग आणि बरुआ दोगेही टागा (म्यानमार) पासून रुली आणि कुन्मिंग (दोन्ही चीनच्या युनान प्रांतात) दरम्यान येत जात असतात. दोघांवरही चीनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क असल्याचा आरोप आहे. गुप्तचर सुत्रांच्या मते, चीनच्या लष्करातील माजी अधिकारी मुक यान पाओ हुआन यांनी म्यानमारच्या कचिन प्रांतात असॉल्ट रायफल फॅक्ट्री लावली आहे. पूर्वेत्तर राज्यांच्या अतिरेकी संघटनांना याच ठिकाणाहून शस्त्र पुरवठा केला जातो. ही फॅक्ट्री कचिन प्रांताच्या पांग्वा येथील असल्याचे सांगितले जात आहे. बर्मा कम्युनिस्ट पार्टीचे माजी नेते टिन यिंगही ही फॅक्टरी चालवण्यासाठी चीनच्या अधिकाऱ्यांना मदत करतात. 33 वर्षांतील सर्वात मोठा हल्ला या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद जाले होते. मणिपूरमध्ये गेल्या 33 वर्षांत झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. 1982 मध्ये अशाच प्रकारे 20 जवान शहीद जाले होते. त्यावेळी अतिरेकी कारवाया मोठ्या प्रमाणावर सुरू होत्या. त्याचबरोबर अतिरेक्यांनी रॉकेट लॉंचर्सचा वापर करण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. दोन अतिरेकी संघटना उल्फा (आय) आणि एनएससीएन (के) ने या हल्ल्याची सामुहिक जबाबदारी स्वीकारली आहे.

No comments:

Post a Comment