Total Pageviews

Sunday, 24 May 2015

PDP GOVT & AMARNATH YATRA IN KASHMIR

अमरनाथ यात्रेच्या मुद्द्यावरून होणारा विरोध काही नवीन नाही. गेल्या वर्षी ङ्गुटीरतावाद्यांनी बालटाल येथे हिंसाचार माजवून यात्रेकरूंमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. २००८मध्येदेखील यात्रेचा कालावधी ५५ दिवसांऐवजी कमी करून, तो १५ दिवस करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात हिंसाचार माजविण्यात आला. यात्रेकरूंच्या सुविधांसाठी अमरनाथ देवस्थान मंडळाला उपलब्ध करून देण्यात आलेली ४० एकर जमीन ङ्गुटीरवाद्यांना पाहवली नाही. ङ्गुटीरतावाद्यांना खूश करण्यासाठी तेव्हा तत्कालीन सत्ताधार्‍यांनी त्वरित जमीन आवंटन रद्द करून टाकले होते. मात्र, त्या तुलनेत उर्वरित भारतात मुसलमानांच्या प्रकरणात सेक्युलर पक्षांमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अधिकाधिक सुविधा देण्याची स्पर्धा सुरू होते. अमरनाथ यात्रेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा काश्मीर खोर्‍यात पाकपोषित ङ्गुटीरतावादी नेत्यांनी डोके वर काढले आहे. अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याची त्यांनी मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून अमरनाथ यात्रेत अडथळे आणण्याचे प्रयत्न होत आहेत. वास्तवात ङ्गुटीरवादी कट्टरपंथी त्या प्रत्येक प्रतीक व परंपरेला नष्ट करण्याचा कुटील प्रयत्न करीत आहेत, ज्या भारताच्या कालजयी सनातन संस्कृतीच्या वाहक आहेत. अमरनाथ यात्रेच्या मुद्द्यावर सेक्युलर पक्षांची उदासीनता आणि ङ्गुटीरवादी नेत्यांचा प्रखर विरोध एका विशिष्ट मानसिकतेने प्रेरित आहे. ही मानसिकता हिंदू आणि हिंदुस्थानच्या सनातनी संस्कृतीच्या विरोधात केंद्रित आहे. अमरनाथ यात्रेला अपशकुन करण्याचे अभियान काही नवीन नाही. खोर्‍यातून काश्मीरच्या मूळ संस्कृतीचे प्रतीक असलेल्या काश्मिरी पंडितांना बंदुकीच्या बळावर पळवून लावल्यानंतर इस्लामी कट्टरवाद्यांचे एक लक्ष्य पूर्ण झाले आहे. खोरे ‘काङ्गीर मुक्त’ (हिंदुरहित) झाले आहे. हिंदूंची बहुतांश प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत; परंतु, काही प्रमुख आराध्य स्थळे अद्यापही बचावली आहेत. ते ‘कुङ्ग्र’चे प्रतीक असल्यामुळे जिहादींच्या रडारवर आहेत. अमरनाथ यात्रेला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष विरोध याच मानसिकतेचे उदाहरण आहे. ही महंमद घोरी आणि गजनीची ‘गाजी मानसिकता’ आहे, जिने हिंदूंची आराध्य स्थळे चिरडून टाकली. सोमनाथ मंदिर वारंवार लुटण्यात आले. ही बख्तियार खिलजीची मानसिकता आहे, जिने विश्वविख्यात नालंदा विद्यापीठ जाळून खाक करून टाकले. ही युवा अकबर आणि त्याचा पालक बैरम खानची मानसिकता आहे, जिने हिंदू राजा हेमचंद्र विक्रमादित्याची अतिशय क्रूरपणे हत्या केल्यानंतर त्यांचे वडील आणि नातेवाईकांची कापलेली शिरे मीनार बनविण्याच्या कामात आणली. ही तीच जहांगिरी मानसिकता आहे, जिने गुरू अर्जुनदेवांचा वध केला होता. ही जकारिया खानची मानसिकता आहे, जिने इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल वीर बालक हकीक रायचे मस्तक धडावेगळे केले. ही औरंगजेबी मानसिकता आहे, जिने काशी आणि मथुरेतील मंदिरे उद्ध्वस्त करून, तिथे मशिदी उभारल्या. ही औरंगजेबी मानसिकता आहे, जिने गुरू तेगबहादूरांचे अतिशय क्रूरपणे शिरकाण केले. ही ती मानसिकता आहे जिने शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह यांच्या दोन निष्पाप वीरपुत्रांना जिवंतपणे जमिनीत चिणून टाकले. ही तीच मानसिकता आहे, जिने शूरवीर बंदासिंहच्या शरीराची अतिशय क्रूरपणे शकले उडविण्यापूर्वी त्यांच्याच डोळ्यासमोर त्यांच्या पुत्राची खांडोळी करून टाकली. आपल्या ५० वर्षांच्या राजवटीत मोगल बादशाह औरंगजेबने काश्मीरमध्ये १४ सुभेदार नियुक्त केले. त्यातील सुभेदार इफ्तियारखान सर्वाधिक स्वामिभक्त निघाला, ज्याने १६७१ ते १६७५च्यादरम्यान काश्मिरातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले आणि तलवारीच्या बळावर त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. मोगलांच्या भीषण अत्याचारांमुळे भयभीत झालेले काश्मिरी पंडित पं. कृपाराम यांच्या नेतृत्वात शीख गुरू तेगबहादूर यांच्याकडे गेले आणि त्यांना मोगलांपासून आपले रक्षण करण्याची विनंती केली. गुरूंनी त्यांच्या प्राणांचे रक्षण करण्याचा निर्धार केला आणि यासाठी हौतात्म्य पत्करले. नंतर या धर्मयुद्धात गुरू गोविंदसिंहासह त्यांचे चारही वीरपुत्र, तसेच असंख्य गुरुसेवक शहीद झाले. ही तीच मानसिकता आहे, जिने १९४७मध्ये भारतमातेची रक्तरंजित ङ्गाळणी केली आणि लक्षावधी नागरिकांना आपल्या स्वत:च्याच देशात निर्वासित बनविले. ही तीच मानसिकता आहे, ज्यामुळे पाकिस्तानात हिंदू-शिखांची लोकसंख्या जी ङ्गाळणीपूर्वी २४ टक्के होती, आज ती केवळ दोन टक्के आहे. ङ्गाळणीनंतर पाकिस्तानाच्या भूमीत ४२८ मंदिरे होती, याच मानसिकतेमुळे आज त्यातील केवळ २६ मंदिरे अस्तित्वात आहेत. याच मानसिकतेमुळे ज्या बांगलादेशात हिंदू-शिखांची लोकसंख्या ३० टक्के होती, आज त्यात घट होऊन, केवळ ७.८ टक्केच शिल्लक राहिली आहे. ही तीच मानसिकता आहे, जिने काश्मीर खोर्‍यातून तेथील मूळ वंशाच्या, काश्मिरी पंडितांना खोरे सोडून जायला भाग पाडले. हीच मानसिकता आज शिया-सुन्नी किंवा सुन्नी-शियाच्या नावाखाली आपल्याच धर्मबांधवांची कत्तल करीत आहे, एवढेच नव्हे, तर गैरमुस्लिमांना रक्तपाताच्या बळावर नष्ट करण्यास आतुर झाली आहे. आज त्या मानसिकतेचा बीभत्स चेहरा आमच्या समोर इसिसच्या रूपात समोर आहे, जो यजीदी ख्रिश्चनांची व शियांची कत्तल करून क्रूरतेचा कळस गाठत आहे. अमरनाथ यात्रेच्या मुद्द्यावरून होणारा विरोध काही नवीन नाही. गेल्या वर्षी ङ्गुटीरतावाद्यांनी बालटाल येथे हिंसाचार माजवून, यात्रेकरूंमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. २००८मध्येदेखील यात्रेचा कालावधी ५५ दिवसांऐवजी कमी करून, तो १५ दिवस करण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात हिंसाचार माजविण्यात आला. यात्रेकरूंच्या सुविधांसाठी अमरनाथ देवस्थान मंडळाला उपलब्ध करून देण्यात आलेली ४० एकर जमीन ङ्गुटीरवाद्यांना पाहवली नाही. ङ्गुटीरतावाद्यांना खूश करण्यासाठी, तेव्हा तत्कालीन सत्ताधार्‍यांनी त्वरित जमीन आवंटन रद्द करून टाकले होते. मात्र, त्या तुलनेत उर्वरित भारतात मुसलमानांच्या प्रकरणात सेक्युलर पक्षांमध्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अधिकाधिक सुविधा देण्याची स्पर्धा सुरू होते. येथे तर सरकारी पैशाने मुसलमानांना हजची यात्रा करण्यासाठी मक्का-मदिना येथे पाठविण्यात येते. मात्र, मानससरोवर यात्रा किंवा अमरनाथ यात्रेत हिंदूंना मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्याचा विचारही सेक्युलर राज्यकर्त्यांच्या मनात येत नाही. हजची यात्रा करणार्‍यांसोबत डॉक्टर्स, परिचारिका, हज अधिकारी, हज सहाय्यक एवढा मोठा लवाजमा असतो. मक्का-मदिना येथे ९० खाटांचे इस्पितळ आणि १८ आरोग्य केंद्रांच्या व्यवस्थेबरोबरच १७ रुग्णवाहिका हज यात्रेकरूंच्या सेवेत तत्पर असतात. अमरनाथ यात्रेच्या वेळी सरकारी खर्चाने, अशा प्रकारच्या सुविधा का उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. राजस्थान हिंदुबहुल आहे आणि येथील अजमेर शरीङ्ग येथे दरवर्षी उरूस आयोजित करण्यात येतो, दिल्लीतील हजरत निजामुद्दीन औलियाचा दर्गा, मुंबईतील हाजी अलीचा दर्गा, उत्तराखंडमधील कलियार शरीङ्ग, तामिळनाडूत नागौर दर्गा इत्यादीसह अन्य कित्येक दर्गे देशात आहेत, जेथे हिंदूही श्रद्धापूर्वक नमन करतात. कुठल्याही मुस्लीम आराधना स्थळी कधीही बहुसंख्यक हिंदूंकडून कुठलाही उधम अथवा उत्पात माजविला जात नाही. मात्र, अमरनाथ यात्रेबाबतच प्रत्येक वेळी विरोध कशासाठी?

No comments:

Post a Comment