SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Monday, 4 May 2015
#GoHomeIndianMedia
गो होम इंडियन मीडिया...नेपाळी जनतेचा 'ट्विटर' संताप
May 4, 2015, 04.06PM IST
नेपाळमध्ये २५ एप्रिलला झालेल्या भूकंपाच्या जखमा भळभळत असताना आणि या तीव्र दुःखातून तेथील जनता सावरण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय प्रसारमाध्यमांनी मात्र भूकंपाचे कव्हरेज करताना असंवेदनशीलतेचा कळस गाठला, असा संताप नेपाळी जनतेने ट्विटरवर व्यक्त केला. काल दिवसभर #GoHomeIndianMedia हे ट्रेंडिंग ट्विटरवर होते. रविवारी दिवसभरात सुमारे १ लाख ४४ हजार ट्विट पडले होते.
भूकंपात कुणाचा संसार उद्ध्वस्त झालाय तर कुणाचे संपूर्ण कुटुंबच काळाने हिरावून नेलंय. अनेकांना बेघर व्हाव लागलंय तर अनेकांचा अद्याप शोधच लागलेला नाही. अशा या विनाशकारी भूकंपाच्या खोलवर झालेल्या जखमा अंगावर झेलत जगण्यासाठी धडपडणाऱ्या नेपाळमधील नागरिकांना मदत करण्याऐवजी भारतीय प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी 'कव्हरेज'मध्येच गुंतले होते. त्यांच्यातील संवेदनशीलता हरवली होती. भूकंपपीडितांच्या समोर 'बूम' धरण्यातच त्यांनी धन्यता मानली होती. हा सर्व प्रकार सुरक्षा दलाच्या जवानांसमोरच चालला होता. असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे पीडितांना ते 'तुम्हाला कसे वाटते?' असे प्रश्न विचारत होते. या सर्व प्रकारावर नेपाळवासियांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे.
भारतीय लष्कराचे जवान आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान कशा प्रकारे बचाव आणि मदतकार्य करण्यात आघाडीवर आहेत, याचेच वृत्त प्रसारित करून भारताची पाठ थोपटण्याचे काम भारतातील इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मिडियाने केले, असा आरोप नेपाळमधील नेटकऱ्यांनी ट्विटरवर केला.
अनेकांनी भारतीय प्रसारमाध्यमे कमालीची असंवेदनशील आहेत, अशी टीका ट्विटरवरून करत ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या नैतिकता गमावलेल्या वृत्तांकनातून प्रसारमाध्यमांनी नेपाळ आणि भारतातील संबंधांचा चुराडा केला, अशी प्रखर टीका करतानाच 'भारतीय प्रसारमाध्यमांनो, आता तुमची गरज वाटत नाही, तुम्ही परत जा' असे टि्वट केले.
भूकंप झाला त्यानंतर काही तासातच भारतीय वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी नेपाळमध्ये पोहोचले. त्यांनी दाखवलेल्या बातम्यांमधून नेपाळमधील उद्ध्वस्त चित्रण सर्व जगाने पाहिले. त्यामुळे तातडीने सर्व स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला, अशी सकारात्मक प्रतिक्रिया काहींची होती. आम्ही आधीच भूकंपाने खचलोय, त्यात तुमच्यामुळे त्रासलो आहोत, तुमचा प्रसारमाध्यमांचा 'भूकंप' आता थांबवा!, असे एकाने ट्विट केले आहे.
माध्यमांचा उतावळेपणा
नेपाळमध्ये सध्या सुरू असलेल्या बचावकार्याबाबत एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे, अशा आपत्तींच्या काळात माध्यमांकडून दाखवला जाणारा उतावळेपणा. काठमांडूमधील आपत्तीनंतर तेथे वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी भाऊगर्दी केली आहे. या प्रतिनिधींकडून जखमी झालेल्या, मृत पावलेल्या व्यक्तींवर अधिक फोकस केला जात आहे. तसेच पूर्ण कुटुंंब उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांच्या मुलाखती घेऊन तुम्हाला आता काय वाटते? भारत सरकारकडून तुम्हाला मदत मिळते आहे का, असे प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडण्यात येत आहे. अर्थात, हा प्रकार काही नवीन नाही. मध्यंतरी काश्मीरमध्ये आलेल्या पुरामध्ये भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरमध्ये बसलेले काही कॅमेरामन पाण्यातून बाहेर काढलेल्या अर्धमेल्या माणसांना तुम्हाला कसे वाटते आहे, असा प्रश्न विचारत होते. एखाद्या बाईटसाठी, टीआरपीसाठी अशा प्रकारे मरणाच्या दारातून परतलेल्या अथवा संकटात सापडलेल्या व्यक्तींवर प्रश्नांचा भडीमार करणे हे असंवेदनशीलतेचे आणि असभ्यतेचे दर्शन आहे. अशा परिस्थितीचे अवलोकन हे अतिशय काळजीपूर्वक होणे महत्त्वाचे आहे. भारतातील वृत्तवाहिन्यांनी सरकार किंवा सैन्यावर आरोप करण्यावर लक्ष केंद्रित करू नये, जसे येमेनमधे झाले. सगळे जग सैन्यदलाने येमेनमधे केलेल्या कामाचे कौतुक करत होते, पण काही वाहिन्यांचे प्रतिनिधी जनरल व्हीके सिंग यांच्याशी वादविवाद करण्यात गुंतले होते. देशाबाहेरचे आपले शत्रू अशा बातम्यांचा गैरवापर करतात.
भारताची प्रतिमा सांभाळा
भौगोलिक किंवा राजकीयदृष्ट्या नेपाळ हा केवळ आपला शेजारील देश आहे. या देशाशी आपले प्राचीन काळापासून मैत्रीचे, व्यापाराचे, सांस्कृतिक संबंध आहेत. म्हणून नेपाळ प्रलयंकारी भूकंपाने हादरला आणि या देशाचे उद्ध्वस्तपण प्रसारमाध्यमांतून जगापुढे आले, तेव्हा सामान्य भारतीयही मनापासून हादरला. भारतीयांचे क्लेश, वेदना मातीच्या हजारो टन ढिगार्यांखाली अडकलेल्या हजारो नेपाळी नागरिकांसाठी होत्या हे महत्त्वाचे.
नेपाळ आणि भारताचे ऐतिहासिक संबंध आहेत. आज लाखो नेपाळी भारतामध्ये रोजी-रोटीसाठी येतात. सगळ्या परिस्थितीमध्ये ते भारताचे मित्र राहतात. आज अशा गंभीर परिस्थितीमुळे इतर अनेक देश भारताप्रमाणेच नेपाळला मदत करायला तयार आहेत. यामुळे प्रत्येक देश आम्ही किती अधिक मदत केली हे दाखवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. खास करून चीनकडून हा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, भारताएवढी मदत भौगोलिक परिस्थितीमुळे कधीही चीन देऊ शकणार नाही. भारतामधून अनेक रस्ते नेपाळमध्ये जातात. असे रस्ते चीनमधून नेपाळला जात नाहीत. नेपाळमध्ये असलेल्या एकमेव विमानतळावर झालेल्या प्रचंड गर्दीमुळे तेथे विमानाने मदत पाठवणे अशक्य झाले आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे भारतीय सैन्याच्या अनेक तुकड्या यांत्रिक सामग्री घेऊन रस्तामार्गे गोरखपूरकडून नेपाळमध्ये अनेक ठिकाणी पोहोचलेले आहेत. प्रसारमाध्यमांनी येमेनसारखी चूक या वेळेस करू नये. नेपाळी लोकांना भारताविषयी अतिशय प्रेम असले तरी तेथील काही माध्यमे, काही संस्था आणि काही चीनप्रेमी नागरिक या कार्यादरम्यान अनावधानाने राहिलेल्या चुकांचा अधिक गवगवा करून, आपल्याला दोष देण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच या घटनेचे गांभीर्य ओळखून त्याचे अवलोकन सुयोग्यरीत्या करण्याचा आणि त्याचा भारताच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
परदेशी बचावपथकांनीही माघारी जावे!
नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूत कार्यरत असलेल्या परदेशी बचावपथकांनी आता परत जावे, अशी विनंती नेपाळ सरकारने केली आहे. काठमांडू आणि परिसरातील बहुतांश मदत आणि बचावकार्य पूर्ण झालेले आहे. आता उर्वरित काम येथील स्थानिक करू शकतात, असे माहिती मंत्री मिनेंद्र रिजल यांनी सांगितले
प्रसार माध्यमे पण आती करतात.. एखाद्या गोष्टीचे किती कवरेज करणार.. मान्य आहे तुमच्या कवरेज मुळे बचावकार्यात मदत झाली पण ब्रेकिंग न्यूज़साठी कळस गाठतात.. नेपाळवर संकट कोसळलय ते अख्य्या जगाला कळले आणि जग सुद्धा मदतीला धावून आले.. पण तुम्ही त्या भूकंपाचे भांडवल करू पाहत आहात.. हळूहळू त्यांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करू पाहत आहात तर साहजिकच त्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल.. आती करू नका..
भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये काही ठराविक लोकांचा जास्त भरणा आहे. पिढ्यानपिढ्या याच लोकांच्या हातात माध्यमे अडकलेली आहेत. या लोकांना जिथे भारतातील सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकऱ्यांचे दुःख समजले नाही. तर तेच लोक नेपाळमध्ये जाऊन कसं काय भूकंपपीडितांची दुःख समजून घेतील. या लोकांना संतुलित पत्रकारिता करण्याची क्षमता नाही. नरेंद्र मोदीने यांना वापरून घेतलं. आणि फेकून दिले. हे लोक सुधारणा र नाही. बरं झालं नेपाळी लोकांनी त्यांना चांगलं हाणलं नाही. आता तर इंग्रजांप्रमाणे या लोकांना भारत छोडो म्हणायची वेळ आलेली आहे.
मीडियाची चुक असेल नाही आहेच पण नेपळींची ही वृत्ती म्हणजे गरज सरो वैद्य मरो सारखीच की नाही
गरज सरो वैद्य मरो म्हणतात त्याप्रमाणे नेपाळ सरकारने आता परदेशातून आलेल्या मदत कार्य करणाऱ्या लोकांना मायदेशी परतण्यास सांगितले आहे. काठमांडू व आजूबाजूच्या भागात मदत कार्य पूर्ण झाले असून, परदेशातून आलेल्या मदत पथकांनी परत जावे. उरलेले काम आम्ही करू, असे माहिती मंत्री मिनेंद्र रिजाल यांनी सांगितले. आज बुद्ध पौर्णिमा असल्याने नेपाळमधील बौद्ध धर्मस्थळांना व धर्मशाळांना हजारो लोकांनी भेट दिली. खरेतर नेपाळची या गंभीर संकटाला सामोरे जाण्याची क्षमताच नव्हती. बाहेरील मदतीवरच शक्य तेवढे काम भागले तरीही नेपाळने ही भूमिका घेतली आहे. ढिगाऱ्यांखाली कुणी जिवंत असण्याची शक्यता नाही त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात येत असल्याचे नेपाळने यापूर्वीच जाहीर करून हात वर केले आहेत.
नेपाळमधील अनेक खेडय़ात अजून मदत पोहोचली नाही व भूकंप होऊन आठवडा झाला असताना आता तिथे कुणी जिवंत असण्याची शक्यता नाही असेही विधान नेपाळच्या मंत्र्यांनी केले होते व त्यानंतर तेथे तीनजणांना जिवंत बाहेर काढण्यात आल्याने त्यांचे हे वक्तव्य नियतीनेच खोटे ठरवले होते. तेथील अनेक भागात परदेशी स्वयंसेवक पोलिसांना मदत करीत आहेत व लष्करही मदत कार्यात आघाडीवर आहे. २५ एप्रिलच्या भूकंपानंतर तेथे ३४ देशांचे ४०५० मदत कार्यकर्ते काम करीत आहेत. तेथे औषधे व इतर सामग्री जगभरातून पाठवण्यात आली आहे. भूकंपातील मृतांची संख्या सात हजारावर गेली असून, ती ७२७६ झाली आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment