Total Pageviews

Thursday, 28 May 2015

दक्षिण चिनी समुद्रातील वावरावरून चीन, जपान आणि व्हिएतनाम या देशांत वाद

चीनची मोठी चाल दक्षिण चिनी समुद्रातील वावरावरून चीन, जपान आणि व्हिएतनाम या देशांत वाद झाला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याचा जल्लोष एकीकडे साजरा केला जात असताना चीनने उचललेल्या पावलामुळे भारताला कसा धोका निर्माण झाला आहे, याकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही. मोदी यांची परराष्ट्र नीती भलतीच यशस्वी झाल्याचा गवगवा केला जात आहे. मोदी यांच्यामुळे भारताची जगात कशी प्रतिष्ठा वाढली, प्रतिमा उंचावली याचे गोडवे गायले जात आहेत. श्रीलंका, मंगोलिया आणि व्हिएतनाम यांसारख्या राष्ट्रांना जवळ करून भारत चीनला शह देण्यात कसा यशस्वी झाला, हे मोठय़ा उच्चारवात सांगितले जात आहे. चीनला जागतिक व्यासपीठावर उघडे पाडायला हवे, यात कोणतीही शंका नाही; परंतु सध्या भारत चीनला लष्करीदृष्ट्या शह देण्यासाठी सज्ज नाही, याचे भान ठेवायला हवे. चीनची लष्करी ताकद भारतापेक्षा १८ पट जादा आहे. चीनने ती एका दिवसात मिळवलेली नाही. त्यामुळे त्यासाठी केवळ गेल्या दहा वर्षांतील सरकारला दोष देऊन चालणार नाही, तर १९७५ पासून सत्तेवर आलेल्या सर्व सरकारांकडे त्याचा दोष जातो. गेल्या दहा वर्षांत भ्रष्टाचाराचे आरोप होतील, या भीतीने संरक्षण साहित्याची खरेदी झाली नाही, हा मोठा दोष डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारचा आहेच. तो विसरता येणार नाही. भारतीय नौसेनेची सध्याची स्थिती, कालबाह्य नौका, वारंवार अपघात होणार्यार नौका आणि नव्या नौकांचा नौदलात समावेश करण्याकडे झालेले दुर्लक्ष, याची इत्यंभूत माहिती चीनकडे आहे. त्यामुळेच आता हिंदी महासागरातील भारताच्या वर्चस्वाला शह देण्याची व्यूहनीती चीनने आखली आहे. दक्षिण चिनी समुद्रातील वावरावरून चीन, जपान आणि व्हिएतनाम या देशांत वाद झाला होता. दक्षिण चिनी समुद्राची मालकी कोणाकडे असावी, यावरूनही जपान व चीनमध्ये संघर्ष सुरू आहे. आता त्यात आणखी भर पडणार आहे, ती चीन व भारताच्या वादाची. दक्षिण चीनच्या समुद्रात लाईट हाऊस निर्माण करण्याची योजना चीनने आखली आहे. या योजनेला मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, ब्रुनेई आदी राष्ट्रांचा विरोध असून त्यामुळे या भागात सध्या तणावाचे वातावरण आहे. चीनचे सैन्य २३ लाख असून लष्करासाठीची तरतूद १४५ अब्ज डॉलर्स होती. याउलट, भारताची तरतूद फक्त ४0 अब्ज डॉलर्सची आहे. दक्षिण चिनी समुद्रातील नैन्शा बेटावर लाईट हाऊस उभारण्यासाठी कोनशिला बसवण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी हे लाईट हाऊस बांधले जात असल्याचे स्पष्टीकरण चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले असले, तरी त्यावर कोणीही विश्वाजस ठेवणार नाही. फिलिपाईन्ससारख्या छोट्या राष्ट्रांना शह देण्यासाठी हे पाऊल चीनने उचललेले नाही; परंतु या देशांनीही ऊठसूट चीनची कागाळी करण्याचे कारण नाही, असा इशाराच चीनच्या प्रवक्त्याने दिला आहे. चीनने काढलेल्या एका श्वे तपत्रिकेत अंतराळ, समुद्र, सायबरस्पेस, अण्वस्त्र आदींवर भर देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यात नौदलाचाही समावेश आहे. दक्षिण चिनी समुद्र आणि प्रशांत-हिंदी महासागर पट्टय़ात चीनचा वाढता वावर भारत व अमेरिकेच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. चीनकडे सध्याच एक विमानवाहू नौका आहे. आणखी एका विमानवाहू नौकेची बांधणी अंतिम टप्प्यात आहे. केवळ समुद्रसीमेचे रक्षण करण्यावर चीन समाधानी नाही, तर खुल्या समुद्रावर त्याचे लक्ष आहे. अमेरिकेच्या दक्षिण चीन समुद्रावर टेहळणी करणार्या, विमानाला चीनच्या नौकेने पळवून लावले होते, ही बाब पाहता भारताच्या नौसेनेलाही चीनचे कडवे आव्हान असणार आहे. दक्षिण चिनी समुद्रातील एका बेटावर चीन धावपट्टी बनवत असल्याचे वृत्त गेल्या नोव्हेंबरमध्ये आले होते. उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्राच्या आधारे ते वृत्त देण्यात आले होते. स्पार्टली बेटावर ही धावपट्टी बनवली जाणार आहे. त्या बेटावर शेजारच्या अनेक राष्ट्रांनी दावा केला आहे. अमेरिकेने चीनच्या दक्षिण समुद्रातील वावरावर हरकत घेतली होती; परंतु चीन अमेरिकेला जुमानायला तयार नाही. अफगाणी तालिबान्यांशी चर्चा करून पाकिस्तानमधील कारवाया थांबवण्यासाठी चीन प्रय▪करत आहे. अफगाणिस्तानच्या सरकारशी तेथील तालिबान्यांचे गूळपीठ जमले आहे. अशा पार्श्वकभूमीवर भावी काळात भारताला या तालिबान्यांपासून धोका संभवतो. गेल्या आठवड्यात भारतीय राजदूताला मारण्याचा प्रय▪तसेच भारतीय कंपन्यांना त्रास देण्याचा झालेला प्रय▪पाहता चीनची ही व्यूहनीती असू शकते. श्रीलंकेतील चिनी कंपन्यांची कामे रद्द केल्याचा बदला घेण्यासाठी चीन कोणत्याही थराला जाऊ शकतो.

No comments:

Post a Comment