Total Pageviews

Monday, 18 May 2015

MODI CHINA VISIT HOW SUCCESSFUL

स्वप्नांची विक्री आशिया खंडातील दोन्ही देशांची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या ३३ टक्के आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वप्न पाहणे आणि स्वप्नांची विक्री करणे आवडते. दौरा अमेरिकेचा असो, र्जमनीचा असो की चीनचा; या देशांची गुंतवणुकीची क्षमता लक्षात घेऊन त्यांनी भारत आता कसा बदलला आहे, भारतात गुंतवणूकपूरक वातावरण कसे तयार झाले आहे, याचा पाढाच वाचायला सुरुवात केली. भारताला जागतिक हब बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे. 'मेक इन इंडिया' आणि 'सोल्ड ओव्हर वर्ल्ड' हा त्यांचा नव्या युगाचा कानमंत्र आहे. भारत व चीनचे संबंध मैत्र-शत्रुत्व या स्वरूपाचे आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौर्या च्या वेळी भारताची कुरघोडी काढण्याची संधी चीनने दवडली नव्हती. आताही मोदी चीनला जाण्याच्या अगोदर चीनच्या सरकारी वृत्तपत्रांत मोदी यांच्यावर टीका झालीच होती. मोदी जेव्हा चीनमध्ये होते, तेव्हाही भारताच्या नकाशातून काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश गायब करण्याचा प्रताप दाखवलाच!. भारत व चीन यांच्यातील व्यापारात १५ वर्षांपूर्वी अवघी एक अब्ज डॉलर्सची तूट होती. ती आता ३८ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. या पार्श्वयभूमीवर मोदी यांच्या दौर्याजत २१ करार झाले असले आणि त्यातून २२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारता येणार असली, तरी प्रत्यक्षात भारत व चीनमधील व्यापारी तूट कमी करण्यासाठी हे करार उपयुक्त आहेत का? हा खरा प्रश्न आहे. भारतात गेल्या वर्षभरात जगाच्या तुलनेत गुंतवणुकीला अतिशय पूरक वातावरण असताना अवघी चार हजार शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. चीनमधील मोठमोठय़ा कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यां्शी मोदी यांनी संवाद साधला. चीन हा जगाचा कारखाना असला, तर भारत हे त्याचे बॅक ऑफिस असल्याचा उल्लेख करून मोदी यांनी उद्योजकांच्या भावनांना साद घातली. चीनने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी गुंतवणूक केल्याच्या पार्श्वयभूमीवर मोदी यांच्या चीन भेटीला जास्त महत्त्व होते. चीनच्या अध्यक्षांनी त्यांच्या भारत दौर्याकची सुरुवात जशी मोदी यांच्या होमस्टेट असलेल्या गुजरातपासून करून नवा पायंडा पाडला, तसाच पायंडा मोदी यांनी चीनच्या दौर्या त पाडला. राजशिष्टाचार बाजूला ठेवून जिनपिंग हे मोदी यांच्या स्वागताला आले असले, तरी त्यातून दोन्ही देशांतील कटुता थोडीच दूर होणार आहे. आशिया खंडातील या दोन्ही देशांची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ३३ टक्के आहे. त्यामुळे या दोन्ही देशांत सीमावाद मिटला किंवा किमान सीमेवर शांतता राहिली आणि व्यापारउदीम वाढला, तर त्यात दोन्ही देशांचे हित आहे; परंतु आता चीनची स्पर्धा भारताशी नाहीच. ती अमेरिकेशी आहे. शस्त्रास्त्र उत्पादनातला जगातील दुसर्याि क्रमांकाचे राष्ट्र, अशी चीनची ओळख झाली असून आशिया-पॅसिफिक प्रांतात तसेच दक्षिण आफ्रिकेतील राष्ट्रांवर त्याची शस्त्रास्त्र बाजारपेठ अवलंबून आहे. सीमेवरचा तणाव कमी करण्यासाठी सातत्यपूर्ण संबंध आणि चर्चेवर मोदी यांनी भर दिला असला, तरी पाकिस्तानसारख्या राष्ट्राशी चीनचे भारतापेक्षा जास्त आर्थिक संबंध आहेत, हे विसरून चालणार नाही. दरवर्षी लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आकडे तोंडावर फेकले जातात; परंतु त्यापैकी फक्त काही कोटी रुपयांची गुंतवणूक होते, हा अनुभव आहे. मोदी यांच्या दौर्यातत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. औरंगाबादमध्ये तेथील उद्योजकांनी गुंतवणुकीची दाखवलेली तयारी प्रत्यक्षात आली, तरी खूप झाले. जिनपिंग यांच्या दौर्या्च्या वेळी महाराष्ट्राच्या वाट्याला तीन मोठे प्रकल्प येतील, असे जाहीर करण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात त्यापैकी एकाही प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही.

No comments:

Post a Comment