Total Pageviews

Tuesday, 16 April 2013

GERMAN BAKERY ATTACK

ठेचण्यालायक साप!
जर्मन बेकरी स्फोट प्रकरणाची सत्र न्यायालयातील सुनावणी आता पूर्ण झाली असून, मिर्झा हिमायत बेग हा आरोपी या प्रकरणात दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. एटीएसने हिमायत बेगवर केलेले आरोप न्यायालयाने मान्य केले आहेत. आता गुरुवारी त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. या देशात राहून, येथील अन्न-पाणी खात मस्ती आल्यावर नमकहरामी करत देशाच्या विरोधात काम करणार्‍या अस्तनीतल्या हिरव्या सापांच्या पिलावळीचा मिर्झा हिमायत बेग हा एक प्रतीक आहे. असले हिरवे साप जिवंत ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. त्यांना मरेपर्यंत ठेचणे, हाच एकमेव पर्याय आहे. तर आणि तरच अशा प्रकारे देशद्रोह करण्याचा किडा ज्यांच्या डोक्यात वळवळत असेल, त्यांना यातून धडा मिळेल.
महात्मा गांधींच्या काळापासून चालत आलेल्या लांगूलचालनामुळे आणि पंथवेड्या कट्टर विषारी प्रचारामुळे सर्रास देशाला कस्पटासमान मानत देशद्रोही कारवाया करण्याची मानसिकता असलेली मोठी पिलावळ तयार झाली आहे. सतत आक्रस्ताळेपणा करत रहायचा, राजकारण्यांच्या गळ्यावर गठ्ठा मतदानाची सुरी ठेवून त्यांना ब्लॅक मेल करत रहायचे, तेवढ्यावरही समाधानी राहता छोट्या छोट्या विषयातून द्वेषाची पेरणी करत देश आणि मानवता यांच्या विरोधात भयंकर कारस्थाने करण्यात धन्यता मानणारा, असा विषारी वर्ग झपाट्याने गावागावात तयार होत गेला आहे. कधी लष्कर तोयबा, कधी इंडियन मुजाहिदीन, कधी जैश महंमद अशी नावे धारण करत कुठे बॉम्बस्फोट, कुठे निरपराध लोकांचे बळी, कुठे अधिकारी, नेते यांच्या हत्या करत देशात दहशत माजविण्यात धन्यता मानणारा हा विघ्नसंतोषी लोकांचा जत्था आहे. अबू जिंदाल आणि हिमायत बेग हे अशा पिलावळीतून पुढे आलेली उदाहरणे आहेत. हिमायत बेगने केलेला अपराध हा फार मोठा आहे. देशाची व्यवस्था आणि समाज यांच्याशी द्रोह करत हिमायत बेगने लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत जर्मन बेकरीतील स्फोट घडविला. याने मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात उदगीर येथे नगराध्यक्षाच्या जागेत इंटरनेट कॅफे सुरू केला. या इंटरनेट कॅफेमध्ये रात्री बॉम्ब तयार करण्याचे उपद्व्याप केले. या बॉम्बचा उपयोग करण्यासाठी पुण्यातील जर्मन बेकरीची त्याने निवड केली. पुणे हे सुरक्षित आणि सुसंस्कृत मानले जाणारे शहर आणि त्यात जर्मन बेकरी यासाठी निवडण्यात आली की, तेथे सतत परदेशी पर्यटकांचा राबता असतो. या ठिकाणी स्फोट घडविला की या दहशतीची चर्चा जगभर होईल, असा विचार करून जर्मन बेकरीत हा स्फोट घडविण्याचा कट रचण्यात आला. बीडमध्ये चहाची टपरी चालविणार्‍याचा मुलगा असलेल्या हिमायत बेगकडे इतकी हिंमत आली कोठून, तर पाकिस्तानी दहशतवादी कारवायांतून. भारताशी उघड मैदानात युद्ध केले, तर सपाटून मार बसतो हे दोन-तीन वेळा अनुभवल्यानंतर दहशतवादाच्या मार्गाने भारताशी छुपे युद्ध करण्याची खुमखुमी पाकिस्तानी राज्यकर्ते, लष्कर यांच्या अंगात नेहमीच असते. त्यासाठी भारतातल्या बेगसारख्या अस्तनीतल्या सापांना हेरून त्यांना अधिक विषारी बनवत भारतात सोडून देण्याचा प्रयोग या पाकिस्तानातील नापाक गारुड्यांनी सतत चालविला आहे. बीडचा जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जिंदाल आणि त्याच्याच तालमीत तयार झालेला हा हिमायत बेग यांना दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानातूनच कुमक मिळाल्याचे स्पष्ट आहे.
जर्मन बेकरी स्फोटाचा तपास एटीएसने अत्यंत वेगाने करत दोन वर्षात हिमायत बेगला शिक्षा सुनावण्यापर्यंत या प्रकरणाचा छडा लावण्यात केलेली प्रगती नोंेद घेण्यासारखी आहे. मात्र, इतके पुरेसे नाही. वास्तविक अत्यंत घातक आणि भयानक शत्रूने हिंदुस्थानातील घरच्या भेद्यांना हेरून सुरू केलेली ही कारस्थाने जर हाणून पाडायची असतील, तर अशा घातपाताच्या घटना घडल्यानंतर वेगाने तपास जितका महत्त्वाचा आहे, त्यापेक्षाही या घटना घडू नयेत यासाठी सतर्क आणि अत्यंत चाणाक्ष वेगवान हालचाली जास्त महत्त्वाच्या आहेत. जर्मन बेकरीचाच संदर्भ घेतला, तर ही घटना घडण्याआधी औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळजवळ मोठ्या प्रमाणावर स्फोटकांनी भरलेली कार पोलिसांना सापडली होती. यातील एक आरोपीही खुलताबाद येथील लोकांनी पकडून पोलिसांना दिला होता. या स्फोटकांच्या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून बीडचा जबीउद्दीन अन्सारी याचे नाव त्यावेळीच पुढे आले होते. अन्सारी फरार झाला होता. ज्या प्रचंड प्रमाणात ती स्फोटके त्यावेळी सापडली होती, ते पाहता पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने आणि अत्यंत वेगाने छडा लावायला हवा होता. जबीउद्दीन अन्सारी आणि त्याचे साथीदार, त्यांच्या हालचाली यावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवायला हवे होते. त्याचवेळी या दिशेने तपास केला असता तर जबीउद्दीन अन्सारीला फरार होऊ देता पकडले असते आणि हिमायत बेगचा छडा लावला असता, तर जर्मन बेकरीचा स्फोटच काय पण मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही टाळता आला असता. मात्र, तसे घडत नाही. कोणत्याही प्रकरणात मुस्लिम आरोपी सापडले की जणू त्यांना सोडविणे हे आपले राजकीय कर्तव्य आहे आणि त्याशिवाय आपण निवडणुका जिंकूच शकत नाही अशा गैरसमजातून या देशातील काही तथाकथित सेक्युलर ढोंगी त्वरेने हालचाली करतात. पोलिस यंत्रणाही जणू असे दुर्लक्ष करायचेच असते, असे गृहीत असल्यासारखे या आरोपींकडे कानाडोळा करतात. ही प्रक्रिया कशी घडते आणि त्याचे परिणाम काय घडू शकतात याचे अबू जिंदाल, हिमायत बेग आणि जर्मन बेकरी स्फोट ही मोठी उदाहरणेच आहेत.
दुसरा विषय आहे तो गुप्तचर यंत्रणेचा. आता देशातील घातपाती, देशद्रोही नापाक कारवायांचा वेध घेण्यासाठी पाकिस्तानात जाऊन हेरगिरी करण्याची गरज नाही. आपापल्या गावात धर्मांध शक्तींच्या काय हालचाली चालू आहेत यावर बारीक लक्ष जर गुप्तचर यंत्रणेने ठेवले, तर अशा घटना घडणारच नाहीत. मात्र, आपल्याकडच्या गुप्तचर यंत्रणा या व्हाईट कॉलर आहेत. ज्यांच्याबाबत माहिती हवी त्यालाच हे गुप्तचर जाऊन माहिती विचारणार! तो आपल्या देशद्रोही कारवाया निर्धोक चालू ठेवण्यासाठी जेवढी दिशाभूल पोलिसांची करता येईल तेवढे करणार! गावात संशयास्पद काय चालले आहे? इंटरनेट कॅफे, टेलिफोन बूथ येथे काय चालते? गावातल्या डोकी बिघडलेल्या तरुणांच्या काय कारवाया चालू आहेत? कोण तरुण गायब झाले आहेत? देशद्रोही संघटनांशी संबंधित लोकांच्या काय हालचाली चालू आहेत? स्फोटकासारख्या प्रकरणात सापडलेले संबंधित लोक काय करतात? अशा सर्व प्रश्‍नांना धरून तपास यंत्रणा, गुप्तचर संघटनांनी सतर्क राहिले तर या नापाक छुप्या युद्धाला तिथल्या तिथे पराभूत करता येईल. नागरिकांनी सुद्धा याविषयात सतर्क राहून तपास यंत्रणांना माहिती पुरविली पाहिजे. असा बंदोबस्त केला तरच हे अस्तनीतले साप ठेचता येतील.
जर्मन बेकरी प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत. त्यांना ताबडतोब पकडून शिक्षा दिल्या पाहिजेत. हिमायत बेगला न्यायालयाने फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे. देशाशी गद्दारी करणार्‍यांना, समाजाशी द्रोह करणार्‍यांना, निरपराध माणसांना मारून मानवतेशी बेईमानी करणार्‍यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नाही. आता याला फाशी दिल्यावरही दयेचा अर्ज, त्याला तुरुंगात संरक्षण, त्याला पोसणे, मानवतावाद्यांचे गळे काढणे, विमान अपहरणासारख्या आणखी दहशतवादी कारवायांना संधी देणे, अशा गोष्टी टाळण्यासाठी या मिर्झा हिमायत बेगला फाशीची शिक्षा आणि त्वरेने वरच्या न्यायालयात प्रक्रिया पूर्ण करून फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली पाहिजे. या सापांना ठेचण्याशिवाय दुसरा मार्गच नाही

No comments:

Post a Comment