नक्षलवाद आणि इतर आव्हाने नक्षलवाद्यांचा क्रूर चेहरा आणी नक्षल नवजीवन योजना
असताना सछत्तीसगड सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्याच्या भटपार जंगलात ०४/०४/२०१३ ळा पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले असून यात दोन महिलांचा समावेश आहे. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठाही सापडला आहे.गेल्या दोन दिवसांपासून याभागात सी-६0 पथक कोम्बिंग ऑपरेशन राबवित होते. आज विशेष अभियान पथक कामगिरीवर काळी ६ च्या सुमारास २५0 नक्षलवादी भटपार व कवंडर या दोन गावांना लागून असलेल्या इंद्रावती नदीच्या काठावर बैठक घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी नक्षलवाद्यांना चहुबाजूने वेढले.त्यांचे मृतदेहही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीदेखील पाच नक्षलवादी ठार झाल्याचे म्हटले आहे. गडचिरोली जिल्ह्यात चार नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले. भामरागड तालुक्यातील भटपार गावामध्ये ०३/०४/२०१३ ला रात्री गस्त घालत असलेल्या पोलिसांवर नक्षलवाद्यांनी सुरुवातीला गोळीबार करण्यास सुरूवात केली.चार जणांचे मृतदेह पोलिसांना मिळाले आहेत. याकरता सी-६०च्या जवानांचे अभिनन्दन करायला हवे. नक्षलवाद्यांचा क्रूर चेहरानक्षलवाद्यांचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. छत्तीसगडमध्ये ताडमेटला जंगलात 2010 मध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 76 जवान शहिद झाले होते. या घटनेच्या तीन वर्षांनंतर ०२ मार्चला नक्षलवाद्यांनी एक चित्रफित पाठविली आहे. त्यात नक्षवाद्यांनी या हल्ल्याचा पूर्ण कट चित्रित केला असून अतिशय क्रूरपणे एका जवानाची हत्या केली. त्याचेही चित्रिकरण करण्यात आले आहे.नक्षलवाद्यांनी 6 एप्रिल 2010 ला हा हल्ला केला होता. एका मोहिमेवरुन परतणा-या सीआरपीएफच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. हल्ला कसा झाला, हल्ल्यानंतर जवानांकडील शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा कसा लुटण्यात आला तसेच घनदाट जंगलामध्ये नक्षलवाद्यांवर कशा पद्धतीने उपचार करण्यात आले इत्यादी सर्व गोष्टीचा व्हिडिओ बनविण्यात आला. हा व्हिडिओ जंगलातील आदिवासी तसेच गावक-यांना भीती दाखविण्यासाठी बनविण्यात आला होता, या हल्ल्यात अनेक जवानाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्याचे डोके फोडून शिर धडावेगळे करण्यात आले. तसेच हात पायदेखील तोडण्यात आले. डोळेही फोडून बाहेर काढले. हे सर्व करतानाचेही चित्रिकरण करण्यात आले.
नक्षल नवजीवन योजनानक्षल्यांनी शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे अश्या सरकारी योजनेमुळे,अनेक नक्षल युवक, युवतींनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे. आधी ही योजना शरण आलेल्या अतिरेक्यांसाठी होती. ती आता नक्षल्यांसाठीही लागू करण्यात आली आहे. एके ४७, ५६, ७४ यांसारखी घातक शस्त्रे तसेच छोट्या शस्त्रांसह समर्पण केल्यास तीन हजारांपासून तर १५ हजारांपर्यंत रोख रक्कम देण्यात येणार आहे. दीड लाखापासून तर आठ लाखांपर्यंतची रकम मुदत ठेवीत तीन वर्षांसाठी बँकेत जमा केली जाणार आहे. व्यवसायासाठी महिन्याला तीन हजार रुपये तीन वर्षांपर्यंत विद्यावेतन मिळणार आहे. त्यांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली जाणार आहे. असताना सछत्तीसगड सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्याच्या भटपार जंगलात ०४/०४/२०१३ ळा पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले असून यात दोन महिलांचा समावेश आहे. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठाही सापडला आहे.गेल्या दोन दिवसांपासून याभागात सी-६0 पथक कोम्बिंग ऑपरेशन राबवित होते. आज विशेष अभियान पथक कामगिरीवर काळी ६ च्या सुमारास २५0 नक्षलवादी भटपार व कवंडर या दोन गावांना लागून असलेल्या इंद्रावती नदीच्या काठावर बैठक घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी नक्षलवाद्यांना चहुबाजूने वेढले.त्यांचे मृतदेहही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीदेखील पाच नक्षलवादी ठार झाल्याचे म्हटले आहे. गडचिरोली जिल्ह्यात चार नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले. भामरागड तालुक्यातील भटपार गावामध्ये ०३/०४/२०१३ ला रात्री गस्त घालत असलेल्या पोलिसांवर नक्षलवाद्यांनी सुरुवातीला गोळीबार करण्यास सुरूवात केली.चार जणांचे मृतदेह पोलिसांना मिळाले आहेत. याकरता सी-६०च्या जवानांचे अभिनन्दन करायला हवे. नक्षलवाद्यांचा क्रूर चेहरानक्षलवाद्यांचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. छत्तीसगडमध्ये ताडमेटला जंगलात 2010 मध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 76 जवान शहिद झाले होते. या घटनेच्या तीन वर्षांनंतर ०२ मार्चला नक्षलवाद्यांनी एक चित्रफित पाठविली आहे. त्यात नक्षवाद्यांनी या हल्ल्याचा पूर्ण कट चित्रित केला असून अतिशय क्रूरपणे एका जवानाची हत्या केली. त्याचेही चित्रिकरण करण्यात आले आहे.नक्षलवाद्यांनी 6 एप्रिल 2010 ला हा हल्ला केला होता. एका मोहिमेवरुन परतणा-या सीआरपीएफच्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. हल्ला कसा झाला, हल्ल्यानंतर जवानांकडील शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा कसा लुटण्यात आला तसेच घनदाट जंगलामध्ये नक्षलवाद्यांवर कशा पद्धतीने उपचार करण्यात आले इत्यादी सर्व गोष्टीचा व्हिडिओ बनविण्यात आला. हा व्हिडिओ जंगलातील आदिवासी तसेच गावक-यांना भीती दाखविण्यासाठी बनविण्यात आला होता, या हल्ल्यात अनेक जवानाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्याचे डोके फोडून शिर धडावेगळे करण्यात आले. तसेच हात पायदेखील तोडण्यात आले. डोळेही फोडून बाहेर काढले. हे सर्व करतानाचेही चित्रिकरण करण्यात आले.
त्यासाठी वर्षाला ४०० कोटी रुपयांची तरतूद सरकार करणार आहे. साधारणत: या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजनेखाली देशातील १० हजार नक्षल्यांना आणण्याचा सरकारचा मानस आहे. सर्वांत महत्त्वाचे आहे, नक्षली समर्पणासाठी तयार होतील, असे वातावरण निर्माण करणे. ज्या कुटुंबातील सदस्य नक्षल चळवळीत असतील, त्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना योजना समजावून सांगण्यासाठी स्वत: पोलिसनी जाणे जरुरी आहे. आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सोबतच या कुटुंबाच्या कोणत्या समस्येमुळे अन्य सदस्य नक्षल चळवळीत सामील होण्यास प्रवृत्त झाले, त्या समस्याही पोलिस जाणून घेणार आहेत. झारखंडमध्ये तिथल्या सरकारने संपूर्ण राज्यात आणि प्रामुख्याने आदिवासीबहुल भागात अशा योजनेचे मोठमोठे पोस्टर्स लावून, आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे. या योजनेचा राजकारणासाठी मुळीच वापर होता कामा नये. पोलिसांवर जबाबदारी सोपविली असताना, त्यांना त्यांचे काम मोकळेपणाने करू द्यावे. त्यात लुडबूड करता कामा नये. सरकारची ही योजना यशस्वी होण्यासाठी स्थानिक लोकांनाही सहभागी करून घेतल्यास ही योजना सफल होण्यास मदत मिळेल.दुर्गम भागात रोजगाराच्या वाढलेल्या संधी, नरेगामुळे स्थानिकांना मिळणारा हक्काचा रोजगार, या बाबींमुळे चळवळीची वाढ खुंटली असून अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांना नैराश्याने ग्रासले आहे. अशा स्थितीत शासनाने आत्मसमर्पणाची योजना अधिक आकर्षक केली तर अनेकजण या चळवळीतून बाहेर पडू शकतात,
देखरेखी समित्या स्थापन करण्याची गरज आतापर्यंत आदिवासी विकासासाठी केंद्र आणि राज्यांनी हजारो कोटींची तरतूद केली होती. त्या रकमेचे काय झाले, याचा आढावा केंद्र सरकारने घेण्याची गरज आहे. सरकारी निधीचा विनियोग हा काटेकोरपणे होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी सरकारने नावाजलेल्या समाजसेवकांच्या देखरेखीखाली समित्या स्थापन करण्याची गरज आहे. कारण, अनुभव असा आहे की, सरकारी यंत्रणांनी आतापर्यंत मोठा निधी गडप केला तर काही निधी नेत्यांनी हडप केला. म्हणून, या दोन्ही पातळ्यांवर सरकारला काम करावे लागणार आहे.
आजवर वनविभागात हिंसाचाराचा नंगानाच घालणारे माओवादी आता ग्रामीण आणि शहरी भागात घुसताहेत. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अरण्यक्षेत्रात आदिवासी तरुणांना भडकवून किंवा धमकावून आपल्या ‘वर्गलढय़ात’ सामील करून घेणा-या माओवाद्यांची नजर आता दलित-बहुजनवर्गातील तरुणांकडे वळली आहे. आदिवासी क्षेत्रात आपला पाया रोवत असताना गेल्या वर्षभरात माओवाद्यांना खूप मोठा फटका बसला आहे. त्यांचे डझनभर वरिष्ठ नेते आणि सुमारे दोनशे दहशतवादी पोलिसांच्या कारवाईत ठार झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरात माओवादी चळवळ पुन्हा तीव्र करण्यासाठी दलित-मुस्लीम आणि बहुजनवर्गातील तरुणांना आकर्षित करण्याचे शिस्तबद्ध प्रयत्न सुरू झाले आहेत.
वर्षभरात कमी हिंसाचार एक डाव पेचाचा भागसध्या सुरक्षा दलांच्या सक्रियतेमुळे समर्थकांच्या हालचालींवर बरेच नियंत्रण आल्याने नक्षलवाद्यांना ही रसद मिळणे कमी झाले आहे. यामुळे त्यांना हिंसक कारवायांमध्ये घट करावी लागली, आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर सर्वाधिक प्रभाव असलेल्या छत्तीसगड व ओरिसा राज्यातसुद्धा गेल्या वर्षभरात हिंसाचार कमी झाला आहे.पण या सर्वच ठिकाणची सुरक्षा यंत्रणा अतिशय चांगले काम करीत आहे म्हणून हिंसाचार कमी झाला, असा निष्कर्ष काढणे धाडसाचे ठरेल. गेल्या वर्षभरात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमकी मोठय़ा प्रमाणात झाल्या पण, नक्षलवाद्यांनी सापळा रचून मोठी हिंसक कारवाई केली,नाही.
नक्षलग्रस्त भागांत भारताची सत्ता चालत नाही. पाकव्याप्त काश्मिरप्रमाणेच या प्रदेशांची अवस्था बनलेली आहे.नक्षल चीनचे भारतात नेमले गेलेले सैनिक आहेत. त्यांना होणारा शस्त्रास्त्र पुरवठा पूर्वोत्तर राज्यांच्या सीमांवरुन केला जातो . आदिवासींनी व्यापलेली घनदाट जंगले ही त्यांच्यासाठी कारवाया करण्यासाठी उपयुक्त आश्रयस्थाने असल्याने त्यानी तेथे आश्रय घेतला आहे,म्हणूनच त्यात त्यांना भारत सरकारचा हस्तक्षेप कोणत्याही कारणासाठी नको आहे. आदिवासींचे नैसर्गिक जीवन व विकासावर घाला घालण्याचे कृत्य माओवादी करत आहेत.
२००५ ते३१/०३/२०१३ या काळात नक्षलवाद्यांनी ६००० जणांची हत्या केली. याउलट याच काळात पुर्वोत्तर भागात फुटीरतावाद्यांकडुन ५२२८ तर जम्मु-काश्मीरमद्धे ३४८८ लोक मुस्लिम दहशतवादी हल्ल्यांत ठार झाले. यावरुन माओवाद्यांच्या सर्वंकश युद्धाची भिषणता लक्षात यावी. माओवाद्यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारल्यापासून आजवर जेवढे लोक ठार मारले गेले आहेत तेवढे भारत-पाकमधील दोन्ही युद्धांतही मारले गेलेले नाहीत. एवढी व्यापक हत्याकांडे करुनही आजतागायत किती माओवादी फासावर लटकावले गेले या प्रश्नाचे उत्तर गृहखात्याकडेही नाही. मुस्लिम दहशतवादाबद्दल माध्यमे खूप चर्चा करतात पण नक्षलवाद्यांबाबत मात्र मोठेमोठे हिंसाचार होवूनही तशी चर्चा होत नाही, याचे काय कारण असावे? उलट नक्षलवाद्यांना छुपे समर्थन अथवा सहानुभुती दाखवणा-यांचीच संख्या अधिक आढळेल. यातून एक राष्ट्रीय स्वरुपाचा धोका आपण बळावत नेत आहोत याचे भान कोण ठेवणार?
No comments:
Post a Comment